DNA मराठी

Pune News

mns

Raj Thackeray: मनविसेकडून ABVP कार्यालयाला टाळं, प्रत्युत्तरात ABVP चीही घोषणाबाजी…

Raj Thackeray: पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. वाडिया कॉलेज परिसरात ABVP ने ‘बायकॉट मनविसे’ अशी पोस्टर्स लावल्याचा आरोप करत मनविसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. या निषेधार्थ मनविसे कार्यकर्त्यांनी टिळक रोडवरील ABVP च्या पुणे कार्यालयावर धडक देत कुलूप ठोकले. कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत त्यांनी जोरदार आंदोलन केले. मनविसेच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की ABVP जाणूनबुजून वाद निर्माण करत आहे. दरम्यान, या घटनेनंतर ABVP कार्यकर्त्यांनीही त्यांच्या बंद कार्यालयाबाहेर प्रतिउत्तरात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. त्यामुळे पुण्यात दोन्ही विद्यार्थी संघटनांमध्ये संघर्षाचे वातावरण चिघळले आहे. दरम्यान आता यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केली असून पुढील कारवाई सुरू केली असल्याची माहिती कृषिकेश रावले,पोलीस उपायुक्त झोन-1 यांनी दिली.

Raj Thackeray: मनविसेकडून ABVP कार्यालयाला टाळं, प्रत्युत्तरात ABVP चीही घोषणाबाजी… Read More »

Pune Crime News : पुण्यात तलवारीचा थरार, घरात घुसून महिलेस व मुलास मारहाण

Pune Crime News: पुण्यातील येरवडा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. माहितीनुसार, लक्ष्मीनगर येथे रविवारी सकाळी चार जणांनी घरात शिरून एका महिलेस आणि तिच्या मुलावर तलवारीने हल्ला केला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण आहे. फिर्यादी रहीसा महंमद शेख (वय 44, रा. कामराजनगर, येरवडा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जहूर शेख (28), सुलतान खान (20), आझाद खान (22) आणि मुस्तफा खान (21) हे सर्व एकाच परिसरातील रहिवासी असून, अचानक त्यांच्या घरात घुसले. “माझ्या आईला का मारले?” असा प्रश्न विचारत जहूर शेख याने हातातील तलवारीने फिर्यादी महिला आणि तिच्या मुलगा साजिदवर वार केले. यात दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान इतर आरोपींनी घरातील वस्तूंचे नुकसान केले तसेच शिवीगाळ करत दहशत निर्माण केली. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, नागरिकांनी पोलिसांकडून तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Pune Crime News : पुण्यात तलवारीचा थरार, घरात घुसून महिलेस व मुलास मारहाण Read More »

img 20251006 wa0006

Pune Crime News: धक्कादायक, गुन्हे शाखेच्या हवालदारावर कोयत्याने हल्ला

Pune Crime News: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांमध्ये आता भीतीची वातावरण निर्माण होत आहे. यातच आता पोलिसांवरच हल्ल्यांच्या घटना घडू लागल्याने कायदा-सुव्यवस्थेची स्थिती किती गंभीर झाली आहे. रविवारी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली ज्यामुळे पुण्यातील कायद्याव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री डेक्कन परिसरात गुन्हे शाखा युनिट-3 मध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार अमोल काटकर (बकल क्र. 7835) यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना लॉ कॉलेज रोडसमोर घडली. मिळालेल्या माहितीनुसार काटकर हे शनिवारी रात्री ड्युटी संपवून आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना रात्री सुमारे एकच्या सुमारास हा प्रकार घडला. अचानक आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी अज्ञात कारणावरून त्यांच्यावर कोयत्याने वार केला. यात त्यांच्या डोक्याच्या मागील भागाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्राथमिक तपासात ‘कट मारल्याच्या’ वादातून हल्ला झाल्याची चर्चा आहे. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून डेक्कन पोलीस ठाण्याने त्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यात पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यावरच असा हल्ला होणे हे अत्यंत गंभीर असल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे.

Pune Crime News: धक्कादायक, गुन्हे शाखेच्या हवालदारावर कोयत्याने हल्ला Read More »

screenshot 2025 09 06 19 15 45 11 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

Pune Ganesh Visarjan 2025 : मोठी बातमी, गणेश विसर्जनादरम्यान दोन युवकांचा मृत्यू

Pune Ganesh Visarjan 2025 : पुणेसह संपूर्ण राज्यभरात आज गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक इथे गणेश विसर्जनादरम्यान दोन युवकांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरातून याविषयी हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे ठिकठिकाणच्या विहिरी तलाव नद्या याठिकाणी विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Pune Ganesh Visarjan 2025 : मोठी बातमी, गणेश विसर्जनादरम्यान दोन युवकांचा मृत्यू Read More »

Pune Crime: सरकारी कामात अडथळा, तीन मुलींविरोधात गुन्हा दाखल पण राजकीय नेत्यांना सूट?

Pune Crime : मारहाण आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप तीन मुलींनी कोथरूड पोलिसांवर केला होता. तर आता या प्रकरणात श्वेता पाटील आणि अन्य तीन अशा एकूण पाच जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कलम 132 अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. माहितीनुसार या प्रकरणात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड पोलिसांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांनी आणि त्यांच्यासोबत सहकाऱ्यांनी रात्रभर ठिय्या मांडला होता. यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल परिपत्रक देखील श्वेता पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांनी फाडून टाकलं होतं यामुळे या मुलीने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र एकीकडे या मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला असताना दुसरीकडे रोहित पवार, अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर हे राजकीय नेते सुद्धा या आंदोलनात सहभागी असताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

Pune Crime: सरकारी कामात अडथळा, तीन मुलींविरोधात गुन्हा दाखल पण राजकीय नेत्यांना सूट? Read More »

mahesh landge

गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे! आमदार Mahesh Landge यांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे सुनावले

MLA Mahesh Landge : गोरक्षक धर्माचे रक्षण करीत आहे. गोमातेच्या संवर्धनासाठी काम करीत आहेत. गोरक्षकांवर खोटे केस करण्याचा प्रयत्न कुणी केला. तर आम्ही कदापि सहन करणार नाही. गोरक्षण करणे म्हणजे चिंचोका खेळणं नाही. चुकीच्या पद्धतीने काही लोक प्रशासनासमोर गोरक्षकांबाबत मांडणी करीत आहेत. त्यांनी एकदा गोवंश कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या गाडीचा पाठलाग करावा, म्हणजे गोरक्षण काय आहे, हे तुम्हाला समजेल, अशी खणखणीत भूमिका भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मांडली. इंदापूर येथे वीर सरदार मालोजीराजे भोसले यांची गढी आणि समाधी येथील अतिक्रमण हटवण्याबाबत सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित हिंदूत्ववादी जनसमुदायाला संबोधित करताना आमदार लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे सुनावले आहे. तीन दिवसांपूर्वी कुरेशी समाजातील प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी गोरक्षकांबाबत चुकीची मांडणी केली. त्यावर अजित पवार यांनी ‘‘गोरक्षकांना आवर घाला…’’ अशा सूचना पोलिस प्रशासनाला केल्या. याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे हिंदुत्ववादी संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजाची सूर आहे. हिंदूत्ववादी सरकार असतानाही गोरक्षकांवर बंदी घालण्याची भूमिका घेतली जात आहे, अशी खंत गोरक्षकांमधून व्यक्त होत होती. दरम्यान, इंदापूरच्या मोर्चामध्ये आमदार लांडगे यांनी ‘‘गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे..’’ असे वक्तव्य केल्यामुळे गोसंवर्धन आणि गोरक्षकांच्या मुद्यावरुन दोन ‘दादा’ पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे आमने-सामने आले आहेत, असे चित्र आहे. एखादा जिहादी, कोणी कुरेशी जातो आणि सांगतो..‘‘गोरक्षक आमचे नुकसान करतात’’. त्यांना काय अडचण आहे. जुन्नरमधील बेकायदेशीर कत्तलखाने आम्ही बंद केले आहेत. गोमातेचे आम्ही रक्षण करणार आहोत. गोरक्षकांवर बंदी घालण्याची भाषा कोणी करु नये. गोरक्षण, लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद, धर्मांतर खपवून घेणार नाही. भाजपा महायुती हिंदूत्ववादी सरकार आहे. गोरक्षकांनी घाबरण्याचे कारण नाही. असं देखील यावेळी भाजप आमदार महेश लांडगे म्हणाले.

गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे! आमदार Mahesh Landge यांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे सुनावले Read More »

yavat

Yava Curfew: मोठी बातमी, यवत येथे जमावबंदी आदेश शिथिल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Yava Curfew : दौंड तालुक्यातील मौजे यवत येथे धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता गावात १ ऑगस्ट पासून लागू करण्यात आलेले जमावबंदी आदेश सकाळी ६ वाजल्यापासून ते सकाळी ११ वाजेपर्यंत शिथिल करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आदेश जारी केले आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ नुसार मौजे यवत येथे जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. आता पुढील आदेश होईपर्यंत सकाळी ६ वाजल्यापासून ते सकाळी ११ वाजेपर्यंत जमावबंदी शिथिल करुन त्यानंतर जमावबंदी लागू करण्यात येत आहे. या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ मधील तरतूदी व प्रचलित काद्यान्वये शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Yava Curfew: मोठी बातमी, यवत येथे जमावबंदी आदेश शिथिल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश Read More »

मोठी बातमी! पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र तसेच दिवाणी न्यायालयाची स्थापना होणार

Devendra Fadnavis: पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या दोन्ही न्यायालयांसाठी आवश्यक पदांनाही मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी 43 नियमित पदे मंजूर करण्यात आली असून 11 मनुष्यबळांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरसाठी 20 नियमित पदे मंजूर करण्यात आली असून 4 मनुष्यबळांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी पुणे न्यायालयाचे अंतर दूर पडत असल्याने, शिवाय न्यायदान कक्षाची उपलब्धता, प्रलंबित प्रकरणांची संख्या, निवासस्थानांची उपलब्धता विचारात घेता या नवीन न्यायालयांची स्थापन करणे गरजेचे होते. नव्याने स्थापन झालेल्या या न्यायालयांमुळे पिंपरी-चिंचवड येथील प्रलंबित प्रकरणे जलद गतीने चालविणे सुलभ होईल व नागरिकांची व पक्षकारांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

मोठी बातमी! पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र तसेच दिवाणी न्यायालयाची स्थापना होणार Read More »

illegal village liquor kilns

Pune News: राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; जेजुरी गावांच्या हद्दीत अवैध गावठी दारुच्या भट्टीवर छापे

Pune News :- विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, पुणे सागर धोमकर यांच्या आदेशानुसार व निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे नरेंद्र थोरात यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांचे पथकाने 22 जुलै 2025 रोजी पुरंदर तालुक्यातील भोसलेवाडी गाव हद्दीत टेमजाई माता मंदिराच्या मागील बाजूस, मोकळया जागेत तसेच जेजुरी गावच्या हद्दीत बारामती जेजुरी रोड लगत, ओढ्याच्या काठी दोन विकाणी सुरु असलेल्या अवैध गावठी दारुच्या भट्टीवर छापे मारले. या छाप्यामध्ये 5550 लिटर रसायन, 1855 लिटर अवैध गावठी हातभटटी दारु व निर्मीती साहीत्य असा एकुण अंदाजे रु. 3,94,500 किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या ठिकाणी गावठी दारूभट्टी तयार करणा-या इसमाविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 ब. क. ई. फ नुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यापुढे देखील अवैध गावठी हातभटटी दारु निर्मीती, वाहतुक व विक्रीवर आळा घालण्याच्या दृष्टीने सातत्याने छापे मारण्याची कारवाई सुरु राहणार असल्याचे निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. सदरची कारवाई विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वये निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक धिरज सस्ते, जवान शशीकांत भाट, संदिप सुर्वे व ऋतिक कोळपे यांनी केली असून, या गुन्हयांचा पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक धिरज सस्ते करीत आहेत. पुणे शहरातील नागरीकांना अवैध दारु निर्मीती, वाहतुक व विक्री व्यवसायाशी संबंधीत माहिती असल्यास त्यांनी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांचे कार्यालयाशी संपर्क साधवा असे, आवाहन निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी केले आहे.

Pune News: राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; जेजुरी गावांच्या हद्दीत अवैध गावठी दारुच्या भट्टीवर छापे Read More »

img 20250723 wa0001

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री दहशत…,15 रिक्षा, 3 कार, 2 स्कूल बसची तोडफोड; दोघांवर वार

Pune Crime: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा आलेख वाढतात दिसत आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आता उपस्थित होत आहे. यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री रिक्षा, कार, स्कूल बससह 20 ते 25 वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक, आणि नवनाथनगर या भागात तीन अज्ञात व्यक्तींनी वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. ही घटना 22 जुलै रोजी रात्री 11.45 ते 1 वाजेच्या दरम्यान घडली आहे. पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी एकूण 15 ऑटो रिक्षा, 3 कार, 2 शालेय बस, आणि 1 पियाजिओ टेम्पो यांची काचफोड करत मोठे नुकसान केले आहे. हे गुन्हेगार वाहनांच्या रस्त्यावर असलेल्या पार्किंगवर तुफान हाणामारी करत फिरत होते. त्याचवेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन नागरिकांना देखील मारहाण करून जखमी करण्यात आले आहे. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सध्या डीबी शाखा आणि स्थानिक पोलीस अधिकारी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री दहशत…,15 रिक्षा, 3 कार, 2 स्कूल बसची तोडफोड; दोघांवर वार Read More »