DNA मराठी

Pune News

Vaishnavi Hagwane

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, आतापर्यंत काय काय घडलं? पोलिसांनी सांगितली A to Z माहिती

Vaishnavi Hagwane : राजेंद्र हगवणेला शोधायला 3 पथक तयार करण्यात आले असून हगवणेला लवकरच अटक करणार येणार असल्याची माहिती सुनील कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिली. तसेच आमच्यावर या प्रकरणात कोणाचाही दबाव नाही नाही आम्हाला कोणाचा फोन आला आहे. एका महिलेचा असा दुर्दैवी आणि अत्यंत क्रूरतेने अंत झाला आहे त्यामुळे या घटनेकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत आहोत. आरोपींना कोर्टात हजर करून पोलीस रिमांड वाढवून घेणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली. माध्यमांशी बोलताना सुनील कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त पुढे म्हणाले की, शिवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी जे ॲडव्हान्स मेडिकल सर्टिफिकेट दिलेलं आहे. त्यामध्ये डॉक्टरांनी काही पार्ट्स काढून ठेवलेले आहेत ते पुढील तपासासाठी आम्ही पाठवणार आहोत. त्यामध्ये डॉक्टरांनी हँगिंगचं एक कारण दिलेला आहे आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत. ॲडव्हान्स मेडिकल सर्टिफिकेटमध्ये या सगळ्यांचा उल्लेख आहे. त्यानुसार आम्ही कलम 304 हे वाढवले आहे. त्यासोबतच हुंडाबळी 80(2), 108 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. उर्वरित दोन आरोपी म्हणजे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा यांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या तीन-तीन बनवल्या आहेत आणि त्यांचा वेगवेगळ्या पथकांमार्फत तपास सुरू आहे त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. या गुन्ह्याचा जो सिक्वेन्स आहे जे पुरावे आहेत त्यानुसार या घटनेचा जो लेखाजोखा आहे मारहाण केल्यापासून आत्महत्येस प्रवृत्त करण्यापर्यंतच्या दोन तासाचे अनेक पुरावे आम्हाला मिळाले आहेत. त्यामुळे आज आरोपींना कोर्टात हजर करून त्यांचं पोलीस रिमांड वाढवून घेणार आहोत. असं देखील ते म्हणाले. हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांच्या घरी असणारे पाच ते सहा सीसीटीव्ही कॅमेरे परिस्थितीजन्य पुरावे आहे. आजूबाजूला असणारे साक्षीदार यांना जमा करण्यास आम्हाला वेळ मिळाला आहे. आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही आम्हाला कुणाचाही फोन आला नाही कायदेशीर पद्धतीने आमचा तपास सुरू आहे. ही घटना जी आहे. एका महिलेचा असा दुर्दैवी आणि अत्यंत क्रूरतेने अंत झाला आहे त्यामुळे या घटनेकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत असून अगदी बारकाईने सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. अशी माहिती देखील सुनील कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिली.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, आतापर्यंत काय काय घडलं? पोलिसांनी सांगितली A to Z माहिती Read More »

Pahalgam Attack

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू

Pahalgam Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 6 महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला आहे . तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झालेत.

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू Read More »

IMG 20250318 WA0007 473x1024

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील वकील वाजीद खान बिडकर यांचे जुनिअर साहिल डोंगरेंवर जीवघेणा हल्ला?

Pune News: स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर घडलेल्या अत्याचार घटनेत आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचे वकील वाजीद खान बिडकर यांचे जुनिअर साहिल डोंगरे याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप वाजीद खान बिडकर यांनी केला आहे. आज्ञात लोकांनी त्यांना गाडीत उचलून नेले आणि मारहाण करून दिवेघाटात सोडून दिले असा आरोप वाजीद खान बिडकर यांच्याकडून करण्यात आला. तर दुसरीकडे पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, साहिल बबन डोंगरे वय- 25, धंदा- वकिली व समाजकार्य (वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी) यांना पहाटेच्या सुमारास काही इसमानी गाडीतळ परिसरातून जबरदस्तीने गाडीत बसवून मारहाण करून दिवे घाट येथे सोडून दिले. त्यांना डोळ्याजवळ, पायाला व शरीरावर किरकोळ जखमा दिसत असून त्यांना नेमके कुठून व कधी गाडीत बसवून नेले याबाबत व्यवस्थित माहिती सांगता येत नाही अधिक माहिती घेतली असता ते रात्री दारू पिऊन होते व मोटर सायकलवर स्लीप होऊन पडले असल्याची शक्यता वाटते. हडपसर पोलीस स्टेशन येथे ते हजर होताच , त्यांना उपचारासाठी पोलीस अंमलदार देऊन ससून रुग्णालय येथे पाठविले आहे.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील वकील वाजीद खान बिडकर यांचे जुनिअर साहिल डोंगरेंवर जीवघेणा हल्ला? Read More »

Vijay Wadettiwar

…म्हणून शक्ती कायदा लागू करत नाही, विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर हल्लाबोल

Vijay Wadettiwar : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यात मोठी वाढ होताना दिसत आहे. नुकतंच पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडल्याने पुन्हा एकदा राज्यात महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या प्रकारावरून आता विरोधकांनी सरकारवर चारही बाजूने टीकेला सुरुवात केली आहे. यातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकार महाविकास आघाडीला श्रेय मिळू नये म्हणून शक्ती कायदा आणत नसल्याची टीका केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महिलांवर होणाऱ्या अत्याचार प्रकरणात पीडितेला लवकर न्याय मिळावा म्हणून महाविकास आघाडी सरकारने आणलेले शक्ती विधेयक राष्ट्रपतींनी मंजूर केले नाही त्यामुळे हा कायदा अस्तित्वात येणार नाही. आम्ही गेले अडीच वर्ष मागणी करतोय या कायद्याची अंमलबजावणी करावी पण या कायद्याबाबत महायुती सरकारने काहीच हालचाल केली नाही. विशेष म्हणजे महायुती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहे. अस असताना महायुती सरकारची ही भूमिका खेदजनक आहे. महाविकास आघाडीला श्रेय मिळू नये म्हणून विधेयक अजून मंजूर करण्यात आलेला नाही का ? महिलांशी संबंधित प्रश्नांवर राजकारण करण्याची संधी महायुती सरकारने सोडली नाहीं. असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

…म्हणून शक्ती कायदा लागू करत नाही, विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर हल्लाबोल Read More »

Warkari Educational

Pune News: महिला आयोगाच्या निर्देशानुसार आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू

Pune News : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी, पुणे यांनी आळंदी परिसरातील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू केली आहे. पुढील दोन दिवसात 20 समिती  सखोल चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहेत. आळंदी परिसरात वारकरी विद्यार्थी वसतीगृहांमध्ये होणाऱ्या बालकांच्या लैंगिक शोषण संदर्भात आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांनी सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी आळंदी पोलीस स्टेशन येथे आढावा बैठक घेत परिसरातील वारकरी शिक्षण संस्थांची पाहणी केली होती. नोंदणी नसलेल्या, नियमावलीचे पालन न करणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी, पुणे यांनी 3 सदस्यांचा सहभाग असलेल्या 20 समिती स्थापन केल्या असून दिनांक 6 आणि 7 फेब्रुवारी या दोन दिवसात शिक्षण संस्था, वसतिगृहे यांची सखोल तपासणी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायसह अहवाल सादर करण्याचे निर्देश या समितींना दिले आहेत. या 20 समिती 8 फेब्रुवारी रोजी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, पुणे यांना आपला अहवाल सादर करणार आहेत. यासाठी यादी तसेच विहित नमुना ही तयार करून देण्यात आला आहे. अध्यक्ष आणि दोन सदस्य अशी तीन सदस्यांच्या एकूण वीस समिती नेमण्यात आल्या असून यात गट शिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नायब तहसीलदार, प्रशासन अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, संरक्षण अधिकारी, समुपदेशक, विधी सल्लागार, शिक्षक, मुख्यसेविका यांचा समावेश आहे. समिती स्थापन झाल्यानंतर श्रीमती चाकणकर म्हणाल्या, वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमध्ये सुरू असणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांमध्ये गैरप्रकार सुरू असून मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन हे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय तिथे पोलिस तपास करत आहेत. आता समिती मार्फत सर्व अनधिकृत संस्थांचा सखोल तपास होणार आहे.   सर्व 20 समितीचा अहवाल आणि त्यावरील एकत्रित अहवाल आल्यानंतर या प्रकरणाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात येईल.

Pune News: महिला आयोगाच्या निर्देशानुसार आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू Read More »

GBS Syndrome

GBS Syndrome: मोठी बातमी! सोलापूरमध्ये GBS सिंड्रोममुळे एकाचा मृत्यू, 19 नवीन रुग्ण आढळले

GBS Syndrome : सोलापूरमध्ये ‘गिलेन-बॅरे सिंड्रोम’ या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरने ग्रस्त असल्याचा संशय असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. 26 जानेवारी रोजी, जीबीएसचे 19 नवीन संशयित रुग्ण आढळले. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या मते, आतापर्यंत गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे एकूण 101 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 81 रुग्ण पुण्यातील, 14 पिंपरी चिंचवडमधील आणि सहा रुग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत. गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे जो उपचार करण्यायोग्य आहे. सध्या पुण्यात 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या रुग्णांमध्ये 19 मुले आहेत ज्यांचे वय 9 वर्षांपेक्षा कमी आहे. 50 ते 83 वर्षे वयोगटातील 23 रुग्ण आहेत. जीबीएस ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे. आरोग्य तज्ञ म्हणतात की जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून परिधीय मज्जासंस्थेच्या भागावर हल्ला करते तेव्हा असे होते. यामुळे मज्जातंतूंमध्ये जळजळ होते ज्यामुळे स्नायू कमकुवत होणे किंवा पक्षाघात आणि इतर लक्षणे उद्भवतात. मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये मेंदू आणि पाठीचा कणा समाविष्ट असतो. 68 पुरुष आणि 33 महिलारविवारी पुण्यात जीबीएसच्या एकूण रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली, असे राज्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. संक्रमित लोकांमध्ये 68 पुरुष आणि 33 महिलांचा समावेश आहे. यापैकी 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. सोलापूरमध्ये संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या जलद प्रतिसाद पथके (RRTs) आणि आरोग्य विभागाचे अधिकारी सिंहगड रोडच्या बाधित भागात संसर्ग प्रकरणांवर लक्ष ठेवून आहेत.

GBS Syndrome: मोठी बातमी! सोलापूरमध्ये GBS सिंड्रोममुळे एकाचा मृत्यू, 19 नवीन रुग्ण आढळले Read More »

Guillain Barre Syndrome

Guillain-Barré Syndrome : सावधान…, पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे 24 संशयित रुग्ण, जाणून घ्या लक्षणे

Guillain-Barré Syndrome : गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे पुण्यात 24 संशयित रुग्ण आढल्याने एकच खळबळ उडाली असून राज्य सरकारने या आजाराच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ का झाली? याचा तपास करण्यासाठी एक पथक स्थापन केले आहे. पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाने रुग्णांचे नमुने चाचणीसाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवले आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. यातील बहुतेक प्रकरणे शहरातील सिंहगड रोड भागातून नोंदवली गेली आहेत, असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही लक्षणे आहेतडॉक्टरांच्या मते, गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ विकार आहे ज्यामुळे अचानक सुन्नपणा आणि स्नायू कमकुवत होतात. यासोबतच, या आजारात हात आणि पायांमध्ये तीव्र कमजोरी अशी लक्षणे देखील आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले की, शहरातील सहा रुग्णालयांमध्ये जीबीएसचे 24 संशयित रुग्ण आढळले आहेत. पुणे शहर आणि आसपासच्या भागात जीबीएसच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्याची चौकशी करण्यासाठी राज्य आरोग्य विभागाने जलद प्रतिसाद पथक (आरआरटी) स्थापन केले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. डॉ. बोराडे यांनी स्पष्ट केले की बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य संसर्गामुळे सामान्यतः जीबीएस होतो कारण ते रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतात. ते म्हणाले, हे मुले आणि तरुण वयोगटातील दोघांनाही होऊ शकते. तथापि, जीबीएसमुळे महामारी किंवा जागतिक महामारी होणार नाही. उपचाराने, बहुतेक लोक या स्थितीतून पूर्णपणे बरे होतात. बहुतेक संशयित रुग्ण 12 ते 30 वयोगटातील आहेत. तथापि, 59 वर्षीय रुग्णाचे प्रकरणही समोर आले आहे. अशी त्यांनी माहिती दिली.

Guillain-Barré Syndrome : सावधान…, पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे 24 संशयित रुग्ण, जाणून घ्या लक्षणे Read More »

1000014747

Pune News : पुण्यात धक्कादायक घटना, पाण्याची टाकी कोसळूली, 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

Pune News : पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात पाण्याची टाकी कोसळून 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. भोसरीतील सदगुरुनगर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले असून अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी लेबर कॅम्पमधील काही कामगार राहत होते. बिल्डरने तकलादू पद्धतीने ही पाण्याची टाकी उभारली होती, असा आरोपही नागरिकांनी केला आहे. आज सकाळी सुमारे 7 च्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. टाकीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आतापर्यंत चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर काही कामगार जखमी झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवडमधील अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या हा ढिगारा हटवून जखमींना बाहेर काढले जात आहे. तसेच सध्या जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे.मात्र या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह काढण्यास नातेवाईकांडून विरोध दर्शवला जात आहे.

Pune News : पुण्यात धक्कादायक घटना, पाण्याची टाकी कोसळूली, 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू Read More »

1000009166

Maharashtra Assembly Election : आचारसहितेचा उल्लंघन, भाजपकडून गंभीर आरोप अन् आमदार धंगेकर विरोधात गुन्हा दाखल

Maharashtra Assembly Election : राज्यात विधानसभेचे वारे वाहत असल्याने महाविकास आघाडी कडून आणि महायुतीकडून आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहे. यातच काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकरवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने दिलेल्या तक्रारीनंतर आमदार रविंद्र धंगेकर यांच्यावर समर्थ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसहितेचा उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून आरोप करण्यात आला आहे की, आमदार धंगेकर दिवाळीच्या निमित्ताने मतदारांना फराळ वाटप करून त्यांना प्रलोभित करत आहेत,असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला असून, फराळ वाटपासाठी वापरला गेलेला टेम्पो देखील पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आला आहे. तर दुसरीकडे धंगेकर पुन्हा एकदा कसब्यातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. येत्या काही दिवसात त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देखील जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोप प्रताप वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते.

Maharashtra Assembly Election : आचारसहितेचा उल्लंघन, भाजपकडून गंभीर आरोप अन् आमदार धंगेकर विरोधात गुन्हा दाखल Read More »

Zika

Zika Virus: सावधान, ‘या’ शहरात वाढत आहे झिकाचा धोका, समोर आले 15 रुग्ण

Zika Virus:  राज्यात हळूहळू झिका वाढताना दिसत आहे. माहितीनुसार, पुण्यात आतापर्यंत झिकाचे 15 रुग्ण आढळून आले आहे.  त्यामध्ये 9 गर्भवती महिलांचाही समावेश आहे. तीन नवीन रुग्ण आढळल्याने मंगळवारी पुण्यातील झिका रुग्णांची संख्या 15 वर पोहोचली. तिन्ही बाधित महिला गर्भवती असून त्या जिल्ह्यातील पाषाण परिसरात राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय 23 आठवड्यांच्या गर्भवती महिलेचा अहवाल 5 जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. तर 8 जुलै रोजी 18 वर्षांच्या 28 आठवड्यांच्या गर्भवती महिलेमध्ये संसर्गाची पुष्टी झाली. तिसरा केस, 23 आठवड्यांची गरोदर असलेल्या 19 वर्षीय महिलेची 8 जुलै रोजी चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांना सांधेदुखी आणि सौम्य ताप होता. 20 जूनपासून, पुणे महानगरपालिकेने (PMC) झिका विषाणूची 15 प्रकरणे नोंदवली आहेत, ज्यात नऊ गर्भवती महिलांचा समावेश आहे. जर गर्भवती महिलांना झिकाची लागण झाली असेल तर त्यांच्या नवजात बालकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. डोळ्यांच्या समस्या, ऐकण्याची क्षमता कमी होणे अशा अनेक समस्या नवजात बालकांमध्ये उद्भवू शकतात. मेंदूच्या असामान्य विकासामुळे अनेक प्रकरणांमध्ये बाळाचे डोके खूपच लहान असते. देशात झिकाची अद्याप कोणतीही लस नाही. झिका   प्रामुख्याने संक्रमित एडिस डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. हा संसर्ग गंभीर नसला तरी गर्भवती महिलेला संसर्ग झाल्यास तो गर्भासाठी धोकादायक ठरू शकतो. झिका  लैंगिक संभोगातूनही पसरू शकतो. याशिवाय, काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये, झिका संक्रमित रक्ताच्या संक्रमणाने देखील पसरतो.

Zika Virus: सावधान, ‘या’ शहरात वाढत आहे झिकाचा धोका, समोर आले 15 रुग्ण Read More »