DNA मराठी

Pankaj Ashiya

fb img 1781585362460

El Nino : ‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर पाण्याचे काटेकोर नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

El Nino : ‘एल-निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करावे. शासनाच्या २०१८ च्या निर्णयानुसार पिण्याच्या पाण्याचे आरक्षण प्राधान्याने राखून कालवे व बॅकवॉटर क्षेत्रातील अनधिकृत पाणी उपसा तात्काळ थांबवावा. आवश्यकतेनुसार अशा ठिकाणांवरील वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एल-निनो’चा संभाव्य प्रभाव, पाणीसाठा आरक्षण व कृषी विभागाच्या उपाययोजनांबाबत आयोजित तातडीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, नगरपालिका प्रशासन अधिकारी डॉ.प्रदीप पठारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.विरेंद्र बडदे, नायब तहसीलदार भारती घोरपडे तसेच कृषी, जलसंपदा, महापालिका व महसूल विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन शेतीसाठी देण्यात येणारे पाणी आवर्तन तात्काळ बंद करण्यात यावे. जलसंपदा विभागाने पाणीचोरी रोखण्यासाठी तात्काळ भरारी पथके नियुक्त करावीत. कालवे व बॅकवॉटर क्षेत्रात सुरू असलेला अनधिकृत पाणी उपसा त्वरित बंद करावा. आवश्यकतेनुसार संबंधित विद्युत वितरण केंद्रे बंद करून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. महापालिका, नगरपालिकांनी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी ग्रामीण भागात उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. स्थानिक परिस्थितीनुसार नागरिकांना दैनंदिन किंवा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याबाबत निर्णय घ्यावा. तसेच जलसंपदा विभागाच्या मुख्य व कार्यकारी अभियंत्यांनी विद्यमान पाणीसाठ्याची स्थिती तपासून पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी सविस्तर नियोजन आराखडा तातडीने सादर करावा, असे त्यांनी सांगितले. कालव्यांद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्यास अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अधिक किफायतशीर व पाणी बचतीचे ठरत असेल, तर त्या पर्यायाची तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर तपासणी करावी, असे निर्देशही आशिया यांनी बैठकीत दिले. कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीबाबत योग्य मार्गदर्शन करावे. जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय व समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. उतारावर आडवी पेरणी करण्याबाबत जनजागृती करावी. जिल्ह्यात खते व बियाण्यांची पुरेशी उपलब्धता आहे. मात्र खतांचा काळाबाजार, लिकिंग तर होत नाही ना याची कृषी विभागाने भरारी पथकांच्या माध्यमातून तपासणी करावी. खत व बियाणे पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी आणि ‘डिजिटल पीक पाहणी’ मोहीम तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी कृषी विभागाला दिल्या. जिल्ह्यात सुरू असलेली जलसंधारणाची कामे, गाळ काढण्याची कामे व इतर पाणी साठवण क्षमतेत वाढ करणारी कामे जलद गतीने पूर्ण करावीत, जेणेकरून उपलब्ध पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त साठा निर्माण करता येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी सांगितले.

El Nino : ‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर पाण्याचे काटेकोर नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया Read More »

Pankaj Asia 1024x683

Petrol Price Today: जिल्ह्यात इंधनाच्या साठ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्वाची आदेश

Petrol Price Today: जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा सुरळीत पुरवठा राखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. पेट्रोल, डिझेलचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच प्रत्येक तालुक्यात इंधनाचे समप्रमाणात वाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल, डिझेल पुरवठ्याबाबत आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी वैभव कलुबर्मे, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले , पुणे व मनमाड येथील इंधन डेपो निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू ठेवून जिल्ह्यातील पेट्रोल पंपांना इंधनाचा अविरत पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी. नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. इंधन वाटपावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पेट्रोल पंप परिसरात पोलीस गस्त वाढविण्यात यावी. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर नागरिकांना सुरळीत सेवा मिळणे आवश्यक असून पेट्रोलपंप चालकांनी ग्राहकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. पुरवठा साखळी सक्षम ठेवणे तसेच नागरिकांना वेळेत इंधन उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयाने कार्य करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. बैठकीत जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेल साठा, पुरवठा व्यवस्था, वाहतूक समन्वय तसेच विविध तालुक्यांतील इंधन उपलब्धतेबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

Petrol Price Today: जिल्ह्यात इंधनाच्या साठ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्वाची आदेश Read More »

pankaj ashiya

Pankaj Ashiya : घरवापरगुती गॅसचा व्यावसायिक रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आदेश

Pankaj Ashiya : घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिले. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले , घरगुती वापरासाठी असलेल्या अनुदानित एलपीजीचा हॉटेल, ढाबे यांसारख्या व्यावसायिक ठिकाणी अवैध वापर होत असल्याने सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे आणि शासनाच्या निधीचे मोठे नुकसानही होते आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या काळाबाजारावर तात्काळ ठोस कारवाई करण्यात यावी. अवैध रिफिलिंग आढळल्यास संबंधित गॅस एजन्सीवर कारवाई करून तिचे परवाने रद्द करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. घरगुती गॅसच्या अवैध व्यापारात सहभागी किंवा गैरव्यवहार करणाऱ्या गॅस एजन्सींना देण्यात आलेले ना हरकत प्रमाणपत्र तातडीने रद्द करावे. तसेच पेट्रोलियम अधिनियमांतर्गत एजन्सीची साठवणूक आणि विक्रीची परवानगीही तत्काळ रद्द करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. ग्राहकांनी गॅस सिलेंडर घेताना वजन काट्यावर तपासून घ्यावे तसेच लिकेज डिटेक्टरद्वारे गॅस गळतीची खात्री करून घ्यावी. अवैध रिफिलिंगमुळे गॅस गळतीची आणि मोठ्या अपघातांची शक्यता असते. त्यामुळे आपले गॅस सिलेंडर इतरांना देऊ नयेत आणि घरगुती सिलेंडर व्यावसायिक वापरासाठी अजिबात वापरू नयेत. घरगुती गॅसचा अवैधरित्या वापर होत असल्याची माहिती मिळाल्यास ती संबंधित कंपनीच्या सेल्स अधिकारी किंवा नोडल अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.

Pankaj Ashiya : घरवापरगुती गॅसचा व्यावसायिक रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आदेश Read More »

pankaj ashiya

Pankaj Ashiya : अपघातप्रवण ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करा; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आदेश

Pankaj Ashiya : जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणी संबंधित विभागांनी समन्वय साधून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, विनापरवानगी उभारलेले गतीरोधक तत्काळ काढावेत आणि अधिकृत थांब्यांवरच वाहने थांबवण्याची व्यवस्था करावी, अशा ठोस सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, एस. आर. वर्पे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पवन टेंभुर्णे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, वसंत पंदरकर, अभिजित पोटे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन ड्रंक अँड ड्राईव्ह, रिफ्लेक्टर, हेल्मेट आदींची तपासणी करावी. अपघातस्थळी पोलीस, सार्वजनिक बांधकाम व परिवहन विभाग यांनी संयुक्तपणे पाहणी करून अपघातांचे विश्लेषण करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. ब्लॅकस्पॉटवरील अपघातांची माहिती घेऊन तेथे सुधारणा कराव्यात.’’ ‘‘अनेकदा अनधिकृत थांब्यावर बस थांबवल्या जातात, परिणामी अपघात होतात. यासाठी अधिकृत थांब्यांवरच बस थांबतील, याची दक्षता घ्यावी. प्रत्येक बसमध्ये तक्रार क्रमांक प्रदर्शित करावा,’’ अशाही सूचना त्यांनी दिल्या. ‘‘जिल्ह्यात अनेक ठिकाणी विनापरवानगी गतीरोधक उभारण्यात आले आहेत. या गतीरोधकांमुळे अनेकदा अपघात होतात. त्यामुळे ते काढून टाकावेत व आवश्यकतेनुसारच गतीरोधक ठेवावेत. गतीरोधकांच्या ठिकाणी रिफ्लेक्टर व सूचना फलक बसवावेत. बीओटी तत्त्वावरील रस्त्यांच्या दुरुस्त्यांची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची आहे. आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्त्या करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदारांना द्याव्यात,’’ असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

Pankaj Ashiya : अपघातप्रवण ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करा; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आदेश Read More »