DNA मराठी

Nitesh rane

vaibhav naik

Vaibhav Naik on Nitesh Rane: नितेश राणे आपण कोणाची लाचारी करून पद घेतलेलं आहे? वैभव नाईक भडकले

Vaibhav Naik on Nitesh Rane: मुख्यमंत्री पदावरुन राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी नितेश राणे यांना प्रत्युत्तर देत टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री हे स्वतःहून झाले नाहीत, तर त्यांना त्यावेळी ‘महाविकास आघाडी’च्या लोकांनी आग्रह केला होता आणि भारतीय जनता पार्टीने जो ‘मातोश्री’मध्ये शब्द दिला होता तो शब्द फिरवला म्हणून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हावे लागले. शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा अशी उद्धवजींची तेव्हा पण इच्छा होती. ​आज आपण बघितलं असेल की, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धवजींनी स्वतःहून विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतली असती, त्याला सगळ्यांचा पाठिंबा होता. परंतु, उद्धवजींनी नेहमीच पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचं ठरवलं होतं आणि म्हणूनच आज अनेक लोक मोठ्या-मोठ्या पदांपर्यंत पोहोचले आहेत. ​ नितेश राणेंनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, आपण कोणाची लाचारी करून पद घेतलेलं आहे? आपण काँग्रेसमधून जेव्हा तुम्हाला तिकीट मिळालं, तेव्हा काँग्रेसने तुम्हाला तिकीट दिलं, पहिल्यांदा आमदार केलं आणि त्यानंतर त्या काँग्रेसला सोडून तुम्ही स्वतःचा पक्ष विसर्जित करून भाजपच्या पदराखाली गेलात आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजप ज्या पद्धतीने निवडणुका जिंकतोय, त्यामुळे तुम्ही भाजपच्या नावावर निवडणूक जिंकलात तर ते काही मोठं नाहीये. ​पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे असणारे कार्यकर्ते आजही एका शक्तीविरुद्ध लढत आहेत आणि ते कुठेही लाचारी करत नाहीत. जर लाचारी करायची असती तर उद्धवजींना अनेक पदं मिळाली असती आणि आज पण आपण बघितलं असेल की जो तुम्ही मोर्चा काढताय, जे काही सरकारच्या विरोधात, आपल्याच सरकारच्या विरोधात आहे. कारण तुम्ही कुठेतरी कमी पडला आहात आणि त्यामुळे लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तुम्ही हे करताय. ​परंतु आता मात्र तुमच्या राजकारणामध्ये, पुढच्या काळामध्ये तुमच्या राजकारणात ट्विस्ट येईल आणि उद्धव ठाकरेंवर तुम्ही बोलल्याशिवाय तुम्हाला किंमत नाहीये हे तुम्हाला माहिती आहे, म्हणून वारंवार तुम्ही त्यांच्याविरुद्ध बोलताय. ​नारायण राणेंना मुख्यमंत्री बाळासाहेबांनी केल्यानंतर, पुढच्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये सत्ता गेली आणि त्यामुळे ते मुख्यमंत्रीपदावर बसले नाहीत. त्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी प्रयत्न केले होते. पण तरीपण सत्ता आली नाही, त्यामुळे नारायण राणे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. उद्धव ठाकरेंनी स्वतः आपण बघितलं असेल की, त्यानंतर सुद्धा आमची सत्ता आली आणि त्या सत्तेमध्ये स्वतः कुठलं पद घेतलं नव्हतं. दुसऱ्या वेळी सत्ता आली तेव्हा सुद्धा ते कुठले सदस्य नव्हते, परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांचं नाव सगळ्यांनी सुचवलं म्हणून त्यांना मुख्यमंत्री व्हावं लागलं. आणि त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, त्याचबरोबर सदस्यत्वाचा पण राजीनामा ते त्यावेळी देणार होते. परंतु वरिष्ठांनी त्यांना थांबवलं आणि त्यांच्या शब्दाला मान म्हणून तो दिला नव्हता. ​आज पण उद्धवजींनी स्वतः म्हटलं असतं तर स्वतः पण सदस्य झाले असते. काही लोक आपण बघितलं असेल की ५०-५० वर्ष सदस्य म्हणून काम करतायत, परंतु उद्धवजींनी तसं केलं नाही, सामान्य कार्यकर्त्याला पुन्हा एकदा संधी दिली असं वैभव नाईक म्हणाले. नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे? सिंधुदुर्गात मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 1995 पासूनच षडयंत्र रचल्याचा आरोप राणे यांनी केला. राणेसाहेब आणि राज ठाकरे यांच्या विरोधातही घाणेरड्या पद्धतीने राजकारण केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच एकनाथ शिंदेंना दिलेला शब्द फिरवून स्वतः मुख्यमंत्री झाल्याचाही आरोप त्यांनी केला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत सत्ता हातातून निसटत असल्यामुळे अंबादास दानवेंना पुढे केल्याची टीकाही राणे यांनी केली.

Vaibhav Naik on Nitesh Rane: नितेश राणे आपण कोणाची लाचारी करून पद घेतलेलं आहे? वैभव नाईक भडकले Read More »

Nitesh Rane 1024x875

Nitesh Rane: ‘या’ दिवशी सुरू होणार मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक (रो- रो )सेवा ; मंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा

Nitesh Rane: जलवाहतूक (रो – रो )सेवा सुरू करणे, ही संकल्पना मुळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे.त्यापैकीच मुंबई आणि कोकणाला जल वाहतुकीच्या माध्यमातून जोडणे हा उपक्रम आहे. त्यांच्या या संकल्पनेला खऱ्या अर्थाने १ मार्चपासून पासून सुरुवात होत आहे. भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा पहिला टप्पा मुंबई आणि कोकणाला जोडण्याच्या दृष्टिकोनातून सुरू करत आहोत. अशी माहिती मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विधिमंडळात पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले, मुंबई ते विजयदुर्ग हा पहिला मार्ग रो रो सेवेचा असेल.येणाऱ्या काळात मुंबई ते रत्नागिरी, मुंबई ते महाड असे वेगवेगळे मार्ग यामध्ये वाढवणार आहोत असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. या बोट सेवेची संपूर्ण माहिती आणि तिकीट चे दर काय आहेत. याची संपूर्ण माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. तिकीट बुकिंग देखील मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले आहे. चांगला प्रतिसाद या तिकीट बुकिंग च्या माध्यमातून रोरो सेवेला मिळत आहे. कोकणात शिमगोत्सव सुरू होणार आहे. या शिमगोत्सवाला कोकणात जाण्यासाठी, सिंधुदुर्ग कोकणची जनता मोठ्या प्रमाणात सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देत आहे. हे तिकीट बुकिंग च्या माध्यमातून दिसत आहे. अशा पद्धतीचे प्रयत्न रो रो सेवेच्या माध्यमातून मुंबई कोकण किंबहुना मुंबईला अन्य राज्यांबरोबर जोडण्याचे काम आणि पर्यटन रोजगार आणि कृषी क्षेत्राला चालना देण्याचे काम या जलवाहतुकीच्या माध्यमातून होणार आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार आपण करत आहोत.कोकणात जाण्यासाठी जेव्हा साडेचार ते पाच तासात कोकणात जाऊ शकू तेव्हा आपला जास्तीत जास्त वेळ वाचू शकतो.आंबा, काजू, मच्छीमारी व्यवसायाला देखील मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. पर्यटन आणि रोजगाराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळणार. रो रो सेवा संदर्भात सुरक्षिततेच्या सर्व परवानगी मिळाल्यानंतरच काही ट्रायल केल्यानंतर हि सेवा सुरू करत आहोत. १ मार्चपासून प्रवासी तिथे जायला सुरुवात करतील. आपण त्या बोटीवर काही डॉक्टर सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत. जेणेकरून काही लोकांना समुद्र प्रवासाचा होणारा त्रास झाल्यास उपचार मिळेल.पर्यावरण पूरक विकास हाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा हेतू आहे.असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

Nitesh Rane: ‘या’ दिवशी सुरू होणार मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक (रो- रो )सेवा ; मंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा Read More »

Nitesh Rane

Nitesh Rane on Rahul Gandhi : राहुल गांधी देशाची बदनामी करणारे पार्ट टाइम राजकारणी; नितेश राणेंचा घणाघात

Nitesh Rane on Rahul Gandhi : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन करणार आहे. विधानसभा निवडणुकीत एनडीएने 243 पैकी 202 जागा जिंकल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत राहुल गांधी यांचा पार्ट टाइम राजकारणी म्हणून उल्लेख केला आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, राहुल गांधी हे देशासाठी पर्यटक आहेत. ते देशाची बदनामी करणारे पार्ट टाइम राजकारणी आहेत. अशांना भारतीय म्हणायचं का? हा प्रश्न आहे. बिहारच्या जनतेने अशा लोकांना स्पष्ट नाकारलं आहे. लोकशाहीची थट्टा करणं ही राहुल गांधींची सवय आहे. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारून NDA ला संधी दिली असं माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले. तसेच लालू प्रसाद यादव यांच्या काळात कायदा-सुव्यवस्था ढासळली होती. पण नितीश कुमार आणि मोदी सरकारने महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. विविध योजना आणल्या आणि त्याचं प्रतिबिंब निकालात स्पष्ट दिसलं असं देखील नितेश राणे म्हणाले.   तर दुसरीकडे हिंमत असेल तर काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान देखील त्यांनी यावेळी काँग्रेसला दिले.

Nitesh Rane on Rahul Gandhi : राहुल गांधी देशाची बदनामी करणारे पार्ट टाइम राजकारणी; नितेश राणेंचा घणाघात Read More »

nitesh rane attack on uddhav thackeray

Nitesh Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव; मंत्री राणेंचा हल्लाबोल

Nitesh Rane on Uddhav Thackeray : आम्ही सगळे जमिनीवरचे आहोत. घरात बसून राजकारण करणारे लोक नाही. कधी तरी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव अशी टीका राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पीएम केअर फंडमधून शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. तर आता या मागणीवर प्रतिक्रिया देत स्वतः मुख्यमंत्री असताना काय केलं असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी विचारला आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, स्वतः मुख्यमंत्री असताना काय केलं त्यांनी. पंतप्रधान मोदी आणि आम्ही सगळे जमिनीवरचे आहोत. घरात बसून राजकारण करणारे लोक नाही. कधी तरी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव असं माध्यमांशी बोलताना मंत्री राणे म्हणाले. तर दुसरीकडे त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर देखील प्रतिक्रिया दिली. यावेळी मंत्री राणे म्हणाले की, सकारात्मक गोष्ट आहे. दोन दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक भागाचा दौरा केला. आमच डबल इंजिनच सरकार आहे, याचा फायदा आमच्या राज्याला होणार. केंद्र सरकारने महाराष्ट्राला कधीच खाली हात पाठवलं नाही. या संकटाच्या काळात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या राज्याला भरभरून देतील.

Nitesh Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव; मंत्री राणेंचा हल्लाबोल Read More »

Nitesh Rane

मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भातील नविन मार्गदर्शक सूचना लागू; Nitesh Rane यांची मोठी घोषणा

Nitesh Rane : मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भातील नविन सूचनांमुळे राज्यातील मत्स्य प्रकल्प अधिक कार्यक्षम होतील तसेच स्थानिक उत्पादकांनाही चालना मिळेल. गुणवत्तापूर्ण व सुरक्षित मत्स्यखाद्यामुळे उत्पादनात वाढ होऊन राज्यातील मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम व स्वावलंबी होईल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे व्यक्त केला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाची महत्वाची अधिसूचना राज्यात लागू करण्याच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले, सध्याच्या स्थितीत मत्स्यखाद्य मुख्यतः राज्याबाहेरून आयात करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी व गुणवत्तेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाच्या अर्थसहाय्याने विविध प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये मत्स्यबीज उत्पादन व संवर्धन केंद्र, पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प, बायोफ्लॉक, रास पद्धती व संगोपन तलाव आदींचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुणवत्तापूर्ण मत्स्यखाद्याची आवश्यकता आहे. राज्यातील सर्व अनुदानित मत्स्य प्रकल्पांनी केवळ राज्यातील केंद्र पुरस्कृत, राज्य शासनाच्या पथदर्शी, अनुदानित व नोंदणीकृत मत्स्यखाद्य उत्पादकांकडूनच मत्स्यखाद्य खरेदी करणे बंधनकारक राहील, असे मंत्री राणे म्हणाले. या सूचनानुसार मत्स्यखाद्य भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (ISI / BIS / FSSAI ) प्रमाणित असणे गरजेचे आहेत. त्यावर प्रथिन, स्निग्ध, आर्द्रता, कर्बोदके इत्यादी पोषणमूल्यांचे विश्लेषण व उत्पादन तारीख व कालबाह्यता तारीख पॅकिंगवर स्पष्टपणे नमूद असावी. पुरवठ्याच्या वेळी अधिकृत पावती किंवा करबिल (Tax Invoice) देणे अनिवार्य आहे. मत्स्यखाद्य हवाबंद आणि सुरक्षित पॅकिंग असणे गरजेचे असून कोरड्या व स्वच्छ वाहतूक साधनातून पुरवले जावे. पुरवठाधारकाची GST नोंदणी आवश्यक आहे. मत्स्यखाद्य खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंद ठेवणे बंधनकारक आहे. शाश्वत व पर्यावरण पूरक मच्छी खाद्य उत्पादनास प्रोत्साहन देताना या अनुषंगाने गुणवत्तेबाबत शेतकरी व मच्छीमारांच्या तक्रारी आल्यास तात्काळ दखल घेतली जाईल असे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भातील नविन मार्गदर्शक सूचना लागू; Nitesh Rane यांची मोठी घोषणा Read More »

IMG 20250621 WA0000 1024x683

बंदर विभागाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करा, केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल

Nitesh Rane: महाराष्ट्रातील बंदर विभागाचे प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी केंद्रीय आणि राज्य शासनाचे विभाग यांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिल्या. किनारपट्टीच्या विकासासाठी केंद्रीय आणि राज्य विभागाची एकत्रित बैठक ही एक सकारात्मक पाऊल असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले. राज्यातील बंदर विकास आणि महत्वाच्या प्रकल्पांविषयी केंद्रीय मंत्री सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री राणे यांच्या उपस्थितीत केंद्रीय आणि राज्य शासनाचे विभाग यांची एकत्र बैठक झाली. यावेळी केंद्रीय मंत्री सोनोवाल आणि राज्याचे मंत्री राणे बोलत होते. बैठकीस बंदरे व परिवहन सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, जेएनपीटी चे अध्यक्ष उन्मेष वाघ, एम बी पी टी चे उपाध्यक्ष आदेश तितारमारे, डिजिसीएचे महासंचालक श्याम जगन्नाथ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री सोनोवाल म्हणाले की, सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्रात भरपूर संधी आहेत. महाराष्ट्रातील बंदरे क्षेत्रातील प्रकल्प महत्वाचे असून त्यासाठी लागणाऱ्या परवानगी लवकर देण्यात याव्यात. रेल्वे आणि रस्ते मार्गाने बंदराची जोडणी करणारे प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत. सागरमाला अंतर्गत महाराष्ट्रात मंजूर करण्यात आलेले प्रकल्प 2026 सालापर्यंत पूर्ण करावेत. मंत्री राणे म्हणाले की, केंद्रीय विभागांची परवानगी वेळेत मिळण्यासाठी दोन्ही विभागणी समन्वयाने काम करावे. तसेच या परवानग्या मिळणे सुलभ व्हावे यासाठी प्रयत्न व्हावे. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन खर्चात बचत होईल. आजची बैठक ही सकारात्मक झाली असून यामुळे राज्यातील बंदर विभागाची कामे गतीने मार्गी लागतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. या बैठकीमध्ये वैभववाडी कोल्हापूर रेल्वे प्रकल्प, आनंदवाडी बंदर, रो रो सेवा, वॉटर टॅक्सी, अंतर्गत जलमार्ग, जेटीचे प्रश्न याबाबत चर्चा झाली.

बंदर विभागाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करा, केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल Read More »

Nitesh Rane 1024x875

वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदरे विभागाने तयारी करावी; मंत्री राणे यांचे आदेश

Nitesh Rane: गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेटी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी बंदर विभागाने त्यांचे नियोजन पूर्ण करावे. तसेच गरजेच्या ठिकाणी जेटी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात आज वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत बैठक संपन्न झाली. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. बैठकीस परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणचे ब्रिजेश सिंघल, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढीये यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्प्या टप्प्याने सुरू करावी. तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. माल वाहतुकीसाठीही जेटी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत, अशा सूचना मंत्री राणे यांनी दिल्या. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नवीन जलटॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. या सेवेमुळे नवी मुंबईतील विविध भागांशी मुंबईचे कनेक्टिव्हिटी सुधारेल. प्रवासाची वेळ सुमारे 40 मिनिटे असणार आहे. या जलटॅक्सी सेवांमध्ये इलेक्ट्रिक बोट्सचा वापर केल्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाला फायदा होईल. या सेवांमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल. मुंबईतील जलवाहतुकीच्या या नव्या योजनेमुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल आणि नागरिकांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळेल.

वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदरे विभागाने तयारी करावी; मंत्री राणे यांचे आदेश Read More »

Nitesh Rane

पाकिस्तानला उत्तर देऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम; नितेश राणे स्पष्टच बोलले

Nitesh Rane: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशाचा संतापाची लाट पसरली असून या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता होत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी सक्षम पंतप्रधान मोदी आहेत आणि यावी ठोस उत्तर दिले जाईल अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. तर दुसरीकडे त्यांनी यावेळी पुण्यात हिंदू सकल समाजाचा मोर्चा निघाला असून जिहादी प्रवृत्तीला प्रत्युत्तर दिले जाईल असं देखील ते म्हणाले. तसेच हिंदूंनी सत्तेत बसवले असल्यामुळे जबाबदारी स्वीकारली आहे. असेही यावेळी ते म्हणाले. मत्स्य खात्यात गोड्या पाण्यातील तलावातील मासेमारी संदर्भात बैठक पार पडली असून या बैठकीत गाळ कसा काढायचा यावर चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पुण्यात मोठे मत्स्यालय सुरू करण्याची योजना असून यासाठी हडपसरमध्ये जागा उपलब्ध करण्यात येणार असं देखील ते म्हणाले. तर दुसरीकडे उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना गरजेच्या असून सध्या अपेक्षित उत्पन्न मिळत नाही अशी कबुली देखील यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दिली.

पाकिस्तानला उत्तर देऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम; नितेश राणे स्पष्टच बोलले Read More »

Rais Sheikh

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला आदील कोण? हे राणेंनी सांगावे; रईस शेख यांचे प्रत्युत्तर

Rais Sheikh on Nitesh Rane : पहलगाम हल्ल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीचे मंत्री नितेश राणे यांनी या हल्ल्यानंतर धर्म विचारून दुकानातून वस्तू खरेदी करा असा सल्ला हिंदूंना दिल्याने त्यांच्यावर चारही बाजूने टीका होत आहे. तर दुसरीकडे आता समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पर्यटकांना वाचवताना मृत्युमुखी पडलेला आदील कोण होता? असा प्रश्न नितेश राणे यांना विचारला आहे. दुकानदाराला धर्म विचारून वस्तू खरेदी करा आणि त्याच्या धर्माविषयी संशय आल्यास हनुमान चालीसा म्हणायला लावा असं नितेश राणे यांनी एका सभेत बोलताना म्हटले आहे. तर आता राज्याचे मत्सव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे धार्मिक व्देष पसरवत आहेत. कश्मीरमध्ये पर्यटकांना वाचवताना अतिरेक्यांच्या गोळ्यांनी मृत्युमुखी पडलेला सय्यद आदील कोण होता, हे राणे यांनी सांगावे, असे आव्हान समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी दिले आहे. मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी, 26 एप्रिल रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील सभेत सदर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याला उत्तर देताना आमदार रईस शेख म्हणाले की, पहलगाम खोऱ्यात 22 एप्रिल रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी धर्म विचारुन पर्यटकांवर केलेला गोळीबार निंदनीय आहे. देशातील एकही मुसलमान अतिरेक्यांच्या या भ्याड हल्ल्याचे समर्थन करत नाही. याप्रकरणी पाकिस्तानविरोधात केलेल्या भारताच्या कृतीला मुसलमानांचा पाठिंबाच आहे. मात्र पर्यटकांना वाचवताना अतिरेक्यांशी दोन हात करताना मृत्युमुखी पडलेला सय्यद आदील हुसेन शहा हा स्थानिक मुस्लीम होता. 22 एप्रिलच्या हल्ल्यानंतर पर्यंटकांना स्थानिकांनी मोफत टॅक्सी, मोफत अन्न आणि मोफत निवासाची साेय उपलब्ध करुन दिली. हे सर्व स्थानिक मुस्लीम आहेत. जम्मू-कश्मीरच्या प्रत्येक मशिदीमध्ये, दर्ग्यामध्ये मयत पर्यटकांसाठी दुआ केली जात आहे. याविषयी मंत्री नितेश राणे का बोलत नाहीत, असा सवाल आमदार रईस शेख यांनी केला. ते पुढे म्हणाले, भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. पाकिस्तान प्रमाणे आम्ही धर्माच्या आधारावर देश चालवत नाही. त्यामुळे मंत्री नितेश राणे यांचे वक्तव्य तितकेच निंदनीय आहे. धर्माचे राजकारण करणे हा नितेश राणे यांचा धंदा बनला आहे. मांस खरेदी संदर्भातही राणे यांनी हलाल पद्धतीसंदर्भात केलेल्या वक्तव्याला कोणी गांभीर्याने घेतले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्र उभे करण्याचे काम करत असताना त्यांच्या भाजपचे मंत्री असलेले नितेश राणे देश तोडण्याचे काम करत आहेत, असा आरोप आमदार रईस शेख यांनी केला. बेताल धार्मिक वक्तव्य केल्याने कोणी धर्माचा कैवारी होत नसतो, नेता होत नसतो. भारतामध्ये धार्मिक राजकारणाला अजिबात थारा नाही. मंत्रीपदाची शपथ राणे हे विसरलेले आहेत. त्यांच्या अशा वक्तव्यांना त्यांच्या पक्षातूनही समर्थन नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची व्याख्याने मंत्री राणे यांनी मुळातून ऐकावीत, असा सल्ला आमदार रईस शेख यांनी दिला आहे.

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला आदील कोण? हे राणेंनी सांगावे; रईस शेख यांचे प्रत्युत्तर Read More »

Nitesh Rane

‘आधी धर्माबद्दल विचारा, नंतर वस्तू खरेदी करा’, मंत्री नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य

Nitesh Rane: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता देशात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितेश राणे यांनी या हल्ल्यावरून वादग्रस्त वक्तव्य केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे एका सभेला संबोधित करताना हिंदूंनी कोणत्याही दुकानदाराकडून वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्याचा धर्म विचारावा असं ते म्हणाले. त्यामुळे आता या प्रकरणावरून पुन्हा एका विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. या सभेत बोलताना नितेश राणे म्हणाले की, दहशतवाद्यांनी लोकांना मारण्यापूर्वी त्यांच्या धर्माबद्दल विचारले. म्हणून, आता हिंदूंनीही खरेदी करण्यापूर्वी दुकानदारांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले पाहिजे. जर कोणी म्हणत असेल की तो हिंदू आहे, तर त्याला हनुमान चालीसा पठण करायला सांगा. जर तो पठण करू शकत नसेल तर त्याच्याकडून काहीही खरेदी करू नका. असं या सभेत बोलताना नितेश राणे म्हणाले. राणे पुढे म्हणाले की, कधीकधी काही लोक त्यांचा धर्म लपवतात किंवा खोटे बोलतात. त्यामुळे लोकांनी सतर्क राहिले पाहिजे. आता हिंदू संघटनांनीही अशा गोष्टींबद्दल उघडपणे बोलले पाहिजे. पहलगाममध्ये काय घडले? 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला होता. या 27 पैकी 6 जण महाराष्ट्राचे होते. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे.

‘आधी धर्माबद्दल विचारा, नंतर वस्तू खरेदी करा’, मंत्री नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य Read More »