DNA मराठी

NEET Exam

rohit pawar

Rohit Pawar on NEET Exam: नीट’ पुनर्परीक्षेचाही पेपर फुटला? रोहित पवारांचा गंभीर आरोप

Rohit Pawar on NEET Exam : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. गुजरातमध्ये पुनर्परीक्षेचाही पेपर फुटल्याचा दावा त्यांनी केला असून, या संदर्भातील काही कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर केली. रोहित पवार म्हणाले की, स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटना थांबण्याऐवजी वाढत असून त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. पवार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, असे आवाहन केले. दरम्यान, रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांवर संबंधित यंत्रणांकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, या दाव्यांची स्वतंत्र पडताळणी होणे बाकी आहे.

Rohit Pawar on NEET Exam: नीट’ पुनर्परीक्षेचाही पेपर फुटला? रोहित पवारांचा गंभीर आरोप Read More »

rahul gandhi

Rahul Gandhi: राहुल गांधी आक्रमक; विद्यार्थ्यांसाठी मांडल्या तीन नव्या मागण्या

Rahul Gandhi : NEET-UG परीक्षा आणि पेपरफुटीच्या आरोपांवरून विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या परीक्षा व्यवस्थेची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे, असे सांगत त्यांनी तीन महत्त्वाच्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या. राहुल गांधी म्हणाले की, देशातील लाखो विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र, वारंवार होणाऱ्या पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील गोंधळ आणि गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा सरकारवरील विश्वास कमी होत असून, या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारणे आवश्यक आहे. त्यांनी पहिली मागणी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, असे म्हटले. परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि सातत्याने घडणाऱ्या घटनांसाठी शिक्षण मंत्रालय जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसऱ्या मागणीत त्यांनी जंतर-मंतर येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर आक्षेप घेतला. आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तिसऱ्या मागणीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची सार्वजनिक माफी मागावी, असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याने देशभरातील तरुणांमध्ये असंतोष वाढला असून, सरकारने त्यांची भावना समजून घेत जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनीही परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्याला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत, संसदेत आणि रस्त्यावरही हा मुद्दा सातत्याने उपस्थित केला जाईल, असे आश्वासन दिले. NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा प्रक्रियेबाबत देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या आंदोलनानंतर केंद्र सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधी आक्रमक; विद्यार्थ्यांसाठी मांडल्या तीन नव्या मागण्या Read More »

img 20260604 wa0017

Neet Exam: सरकारला नव्हे, ज्यांना तुम्ही मतदान दिले त्यांना जाब विचारा

Neet Exam: देशात एखादा घोटाळा उघडकीस आला, पेपरफुटी झाली, तरुण बेरोजगार राहिले किंवा शेतकरी संकटात सापडला की सोशल मीडियावर आणि चौकाचौकांत एकच सूर उमटतो “सरकार काय करत आहे?” प्रश्न योग्य आहे. पण त्याहून महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, ज्यांना आपण मतदान करून निवडून दिले, त्यांना आपण कधी जाब विचारला आहे का? लोकशाहीत सत्ता आकाशातून पडत नाही. ती मतपेटीतून जन्माला येते. प्रत्येक आमदार, खासदार, नगरसेवक किंवा सरपंच हा जनतेच्या मतांवर निवडून येतो. त्यामुळे समस्या निर्माण झाल्यानंतर केवळ व्यवस्थेला दोष देणे पुरेसे नाही; त्या व्यवस्थेचे प्रतिनिधी म्हणून आपण निवडून दिलेल्या लोकांना उत्तर मागणेही तितकेच आवश्यक आहे. आज लाखो तरुण पेपरफुटीच्या घटनांमुळे हवालदिल झाले आहेत. वर्षानुवर्षे अभ्यास करूनही परीक्षा रद्द होतात. भरती प्रक्रिया रखडतात. शेतकरी उत्पादन खर्च वाढल्याने अडचणीत आहे. हमीभाव, सिंचन आणि बाजारपेठेच्या प्रश्नांनी तो त्रस्त आहे. या प्रश्नांवर निवडणुकीपूर्वी आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून दिल्यानंतर किती वेळा त्यांचा हिशेब मागितला? लोकशाहीतील सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे मतदाराचा सक्रिय सहभाग मतदानाच्या दिवशी संपतो. निवडणूक आली की विकास, रोजगार, शिक्षण आणि शेती यावर चर्चा होते; निवडणूक संपली की नागरिक पुन्हा प्रेक्षक बनतो. याच निष्क्रियतेतून उत्तरदायित्व हरवते. लोकशाही मजबूत करण्याचा एकच मार्ग आहे प्रतिनिधींना सतत प्रश्न विचारणे. त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण झाली का? त्यांनी विधानसभेत किंवा संसदेत आपल्या प्रश्नांवर आवाज उठवला का? आपल्या मतदारसंघासाठी निधी आणला का? या प्रश्नांची उत्तरे मागितली गेली तरच राजकारणाची दिशा बदलेल. कारण लोकशाहीत सत्ता ही जनतेची असते. सरकार बदलते, पक्ष बदलतात, चेहरे बदलतात; पण मतदाराची जबाबदारी बदलत नाही. त्यामुळे पुढच्या वेळी एखाद्या घोटाळ्यावर संताप व्यक्त करताना एक प्रश्न स्वतःलाही विचारायला हवा ज्यांना मी मतदान दिले, त्यांच्याकडे मी कधी जाब मागितला आहे का? लोकशाही केवळ मतदानाचा अधिकार देत नाही; ती प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि जबाबदारीही देते. आणि कदाचित, याच जबाबदारीच्या जाणीवेतून अधिक उत्तरदायी राजकारणाची सुरुवात होऊ शकते.

Neet Exam: सरकारला नव्हे, ज्यांना तुम्ही मतदान दिले त्यांना जाब विचारा Read More »

neet exam

Neet Exam : नीट पेपर फुटी प्रकरणात अहिल्यानगर कनेक्शन; एकाला अटक

Neet Exam: नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे राहुरी तालुक्यातील पूर्व भागात असणाऱ्या महाडुक सेंटर (माहेगाव) येथपर्यंत पोहचले आहेत. या प्रकरणात येथील बीए एम एस शिक्षण घेतलेल्या धनंजय निवृत्ती लोखंडे यांस सीबीआयच्या तपास पथकाने राहुरी येथून रात्री उशिरा ताब्यात घेतल्याने राहुरीमध्ये खळबळ उडाली आहे.  नाशिक येथील शुभम खैरनार याला ताब्यात घेतल्यानंतर तो फरार होता. धनंजय याने दोन वर्षापूर्वी आपले वैद्यकीय शिक्षण कर्नाटक येथील मंगरूळ येथे पूर्ण केले. गेल्या चार वर्षापासून तो पुणे येथील वाघोली येथे वास्तव्यास असून त्याने येथे प्रॅक्टीस देखील करत असल्याचे सांगण्यात येते. मेडिकल ॲडमिशन कॉन्सिनिलिंगचे देखील तो काम करत असल्याचे समोर आले आहे. त्याचे वडील एका शिक्षण संस्थेत लिपिक म्हणून काम करतात. सीबीआयने नाशिक येथून शुभम खैरनार याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या जबाबातून धनंजय याचे नाव समोर आल्याने त्याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. याबाबत कुटुंबीयांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, धनंजय असे कृत्य करू शकत नसल्याचे माध्यमांना नंतर त्यांनी सांगितले. नीट प्रकरणाचे मोठे रॅकेट यामधून बाहेर येण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत असून सीबीआय आता काय तपास करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Neet Exam : नीट पेपर फुटी प्रकरणात अहिल्यानगर कनेक्शन; एकाला अटक Read More »