DNA मराठी

NCP

kopargaon election

Kopargaon Election : कोपरगाव निवडणूक; राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले

Kopargaon Election : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे आज नगरपालिका व नगरपंचायत व नगराध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. मतदान केंद्रावरच कार्यकर्ते भिडल्याने एकच गोंधळ उडाला मात्र तातडीने प्रशासनाने मध्यस्थी करत हा वाद सोडवला असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयीन प्रकरणामुळे निवडणूक स्थगित झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतच्या अध्यक्ष व सदस्य आणि काही ठिकाणी केवळ सदस्य पदासाठी 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली प्रवरा , नेवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत आहे दरम्यान कोपरगावमध्ये दोन पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे नेमकं काय घडलं? माहितीनुसार, नगर परिषदेच्या निवडणुकीचे साठी आज कोपरगावात मतदान प्रक्रिया पार पडत आहे यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट युतीमधीलच घटक पक्षांमध्ये सामना पाहायला मिळत आहे मात्र मतदानापूर्वीच दोनही पक्षातील कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेरच एकमेकांशी भिडले. एका मतदान केंद्रामध्ये मतदान प्रक्रिया सुरू असताना भाजपचे लोक मतदारांवर ती दबाव आणतायेत की भाजपला मतदान करा असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रापासून हाकलून लावले यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे काळे कोल्हे संघर्ष कोपरगावमध्ये काळे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळाला यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार आशुतोष काळे यांच्याकडून काका कोयते तर विवेक कोल्हेगाटाकडून परागसंधान यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली त्यामुळे कुठेतरी काळे कोल्हे संघर्ष पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळणार हे नक्की होते. दरम्यान निवडणुका जाहीर झाल्यापासूनच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप टीकाटिप्पणी ही जोरदार पाहायला मिळाली आज मतदानाच्या दिवशी सकाळीच एका मतदान केंद्रावर काळे व कोल्हे गट एकमेकांशी भिडले प्रतिष्ठेची बनलेल्या या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणारे यामुळे निकालापूर्वीच या ठिकाणचे राजकारण राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील आता चांगला संघर्ष पाहायला मिळतोय.

Kopargaon Election : कोपरगाव निवडणूक; राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले Read More »

manikrao kokate

Manikrao Kokate : मोठी बातमी, माणिकराव कोकाटेंना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

Manikrao Kokate : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी आज उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर केली. मात्र या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देत आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे आदेश दिले आहे. शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा निर्णय माणिकराव कोकाटे यांची 2 वर्ष कारावासची शिक्षा कायम ठेवली होती. या प्रकरणात शिक्षा कायम असल्याने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. अटक वॉरंट जारी झाल्यानंतर कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तर प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना शिक्षा कायम ठेवण्याचे आदेश नाशिक जिल्हा न्यायालयाने दिल्यानंतर कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

Manikrao Kokate : मोठी बातमी, माणिकराव कोकाटेंना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा Read More »

renovation construction

Renovation Construction : इस्रायलमध्ये बांधकाम व नूतनीकरण क्षेत्रात नोकरीच्या संधी

Renovation Construction : इस्रायल देशामध्ये बांधकाम व नूतनीकरण (Renovation Construction) क्षेत्रात युवकांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील नोकरीस इच्छुक असलेल्या उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त रवीकुमार पंतम यांनी केले आहे. ​बांधकाम व नूतनीकरण क्षेत्रामध्ये प्लास्टरिंग वर्क्स आणि सिरॅमिक टाइलिंगसाठी प्रत्येकी १ हजार जागा, ड्रायवॉल वर्करसाठी ३०० जागा, तर मॅसनसाठी ३०० जागा उपलब्ध आहेत. वरील पदांसाठीची वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्जाबाबतची माहिती https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पदभरतीबाबत अधिक माहितीसाठी ०२४१-२९९५७३५ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा वसीम पठाण यांच्याशी ९४०९५५५४६५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

Renovation Construction : इस्रायलमध्ये बांधकाम व नूतनीकरण क्षेत्रात नोकरीच्या संधी Read More »

img 20251206 wa0006

Dancer Deepali Patil Case : माजी नगरसेवक संदीप गायकवाड रोहित पवारांचाच कार्यकर्ता, बिनबुडाचे आरोप करू नका, शरद कार्ले यांचा इशारा

Dancer Deepali Patil : नृत्यांगना दिपाली पाटील मृत्यू प्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकवाड हे २०१६ साली राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते रोहित पवारांसोबत होते. त्यानंतर २०२४ विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तेव्हापासून ते राष्ट्रवादीतच आहेत. त्यांचा भाजपशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. गायकवाड यांच्या पत्नीने नगरपरिषद निवडणुकीत ऐनवेळी भाजपकडून निवडणूक लढवली असली तरी संदिप गायकवाड यांचा भाजपात कुठलाही राजकीय प्रवेश झालेला नाही. ते आजही राष्ट्रवादीतच आहेत. नगरपरिषद निवडणूकीत पराभव होणार हे स्पष्ट होताच रोहित पवारांनी भाजपला व आमच्या नेत्याला बदनाम करण्याचे षडयंत्र हाती घेतले आहे, नृत्यांगणा दिपाली पाटील यांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी असून या घटनेच्या आडून रोहित पवार हे घाणेरडे राजकारण करून जामखेडची बदनामी करू पाहत आहेत, ही बाब जनता कदापी सहन करणार नाही, असा इशारा जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी दिला आहे. जामखेड येथील एका कलाकेंद्रात नृत्यांगणा म्हणून काम करणाऱ्या दिपाली पाटील या नृत्यांगनेने ४ डिसेंबर रोजी जामखेड येथील साई लाॅज येथे गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवण्याची घटना घडली होती. ही घटना उजेडात येताच आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेशी भाजपशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करताच भाजपने रोहित पवारांचीच पोलखोल केली आहे. जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले म्हणाले की, माजी नगरसेवक संदिप सुरेश गायकवाड यांनी २०१६ सालच्या जामखेड नगरपरिषद निवडणूकीत प्रभाग १० मधून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. जिंकली होती. त्यांच्या पत्नीही त्यावेळी प्रभाग ०७ मधून निवडून आल्या होत्या होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत संदिप गायकवाड हे रोहित पवारांसोबत होते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर संदिप गायकवाड यांनी २०२४ विधानसभा निवडणुकीच्या काळात जेष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी गायकवाड यांनी रोहित पवारांचा जोरदार प्रचार केला होता. नुकत्याच पार पडलेल्या जामखेड नगरपरिषद निवडणूकीत रोहित पवारांनी संदिप गायकवाड यांना उमेदवारी डावलल्याने गायकवाड यांच्या पत्नीने बंडखोरी करत ऐनवेळी भाजपकडून उमेदवारी केली. मात्र संदिप गायकवाड यांनी भाजपात प्रवेश केला नाही. एकाच कुटुंबातील अनेक जण वेगवेगळ्या पक्षात सक्रीय असतात. एखाद्याने काही चुकीचं केलं तर त्याचा संबंध कुटुंबातील व्यक्ती आणि त्यांच्या पक्षाशी जोडणे म्हणजे बालबुध्दी उपद्व्याप होय, हाच उद्योग सध्या रोहित पवारांकडून सुरू आहे असे म्हणत सभापती शरद कार्ले यांनी रोहित पवारांचा जोरदार समाचार घेतला. माजी नगरसेवक संदीप गायकवाड हे आमदार रोहित पवार यांचे कार्यकर्ते असल्याचे पुरावे सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. रोहित पवार यांनीच शरद पवारांच्या उपस्थितीत गायकवाड यांचे पक्षात जोरदार स्वागत केले होते.भाजपवर टीका करण्यापूर्वी रोहित पवारांनी स्वता:चे आत्मपरीक्षण करावे. संदीप गायकवाड प्रकरणी रोहित पवारांनी भाजपवर केलेले आरोप निरर्थक आणि बिनबुडाचे आहेत, या प्रकरणात रोहित पवार हे अडचणीत येणार असे दिसताच त्यांनी भाजपवर आरोप करून कांगावा करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक सत्य हेच आहे की, संदिप गायकवाड हेच त्यांच्या पक्षाचे आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत. जामखेड नगरपरिषद निवडणूकीत दारूण पराभव होणार हे समजल्यामुळे रोहित पवारांनी भाजप व आमच्या नेत्याची बदनामी सुरू केली आहे, भाजपला बदनाम करण्याचे रोहित पवारांनी हाती घेतलेले षडयंत्र जामखेडची जनता कदापी सहन करणार नाही, असा इशारा शरद कार्ले यांनी दिला आहे. “नृत्यांगणा दिपाली पाटील मृत्युप्रकरणाची घटना अत्यंत दुर्दैवी असुन या प्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकवाड हा पूर्वीपासून राष्ट्रवादीचाच अर्थात रोहित पवारांचा कार्यकर्ता आहे. आजपर्यंत तो त्याच पक्षात सक्रीय आहे. त्याचा भाजपची कुठलाही संबंध नाही. नृत्यांगणा मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे, या प्रकरणाच्या आडून भाजपला बदनाम करण्याचे जे षडयंत्र सुरू आहे, जनता हे कदापी सहन करणार नाही, असा इशारा बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी दिला आहे.”

Dancer Deepali Patil Case : माजी नगरसेवक संदीप गायकवाड रोहित पवारांचाच कार्यकर्ता, बिनबुडाचे आरोप करू नका, शरद कार्ले यांचा इशारा Read More »

school close

School Closed: दहावीच्या परीक्षेपूर्वी राज्यात शिक्षक आक्रमक; 25 हजार शाळा बंद, नेमकं कारण काय?

School Closed : राज्यात आज जवळपास 25 हजार शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. दहावीच्या बोर्ड परीक्षेपूर्वी खाजगी, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी निषेध करत आहेत. आज मराठवाडा भागातील अनेक शाळा पूर्णपणे बंद होत्या. या बंदमुळे सुमारे 18000 शाळांमधील वर्गांवर परिणाम झाला. शिक्षकांच्या प्रमुख मागण्या काय आहेत? शिक्षक संघटनेने शिक्षक समायोजनाचा पुनर्विचार, टीईटीची आवश्यकता रद्द करणे, ऑनलाइन आणि शैक्षणिक नसलेल्या कामाचा भार कमी करणे, जुन्या शिक्षण योजना लागू करणे आणि कंत्राटी पद्धत बंद करणे यासारख्या अनेक मागण्या मांडल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्या मागण्यांपासून मागे हटणार नाही असा इशारा संघटनेने दिला आहे. निषेधाबाबत सरकारचा कडक इशारा 5 डिसेंबर रोजी शैक्षणिक उपक्रम कोणत्याही प्रकारे विस्कळीत होऊ नयेत असे सरकारने स्पष्ट केले आहे. शाळा बंद ठेवणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल आणि आंदोलनात सहभागी असलेल्यांना एक दिवसाचा पगार कपातीचा सामना करावा लागेल. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सर्व जिल्ह्यांतील शिक्षण अधिकाऱ्यांना आणि मुंबई महानगरपालिकेला शाळा पुन्हा सुरू करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. शिक्षकांमध्ये असंतोष सरकारने वेतन कपातीचा आदेश जारी केल्यानंतर शिक्षकांमध्ये असंतोष वाढला आहे. महानगर शिक्षक संघटनेने म्हटले आहे की एक दिवसाचा पगार कपात हा त्यांच्या हक्कांवर हल्ला आहे आणि या निषेधाला पाठिंबा देईल. सरकार आणि शिक्षकांमधील संघर्ष वाढण्याची शक्यता शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे की त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत निषेध सुरूच राहील. या परिस्थितीत, सरकार आणि शिक्षक संघटनांमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

School Closed: दहावीच्या परीक्षेपूर्वी राज्यात शिक्षक आक्रमक; 25 हजार शाळा बंद, नेमकं कारण काय? Read More »

bhaskar jadhav

Bhaskar Jadhav : सत्ताधारी पक्ष संख्येने जास्त पण धाडस नाही…, भास्कर जाधवांचा हल्लाबोल

Bhaskar Jadhav : महाराष्ट्र विधिमंडळाच हिवाळी अधिवेशन 8 ते 14 डिसेंबर दरम्यान नागपूर येथे होणार मात्र यापूर्वीच सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अधिवेशनाच्या तारखेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. सत्ताधारी पक्ष कशाप्रकारे गृहीत धरून चालू शकतो याचा हे उदाहरण म्हणजे नागपूरमधील हिवाळी अधिवेशन अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, आज कामकाजा सल्लागार समितीची मीटिंग झाली. यामध्ये हिवाळी अधिवेशना संदर्भात चर्चा झाली. 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर अशी तारीख दिली होती. दोन आठवड्याच्या ऐवजी तीन आठवडे घ्या असा आमचा आग्रह होता. तिने नाही तर निदान ठरल्याप्रमाणे दोन आठवडे तरी घ्या  पण सरकारने मान्य केले नाही आणि अधिवेशन 14 तारखेला ठरलं. सत्ताधारी पक्ष संख्येने भरपूर आहे. परंतु विरोधकांच्या पक्षांना सामोर जाण्याचे त्यांच्या धाडस नाही. सत्ताधारी पक्ष संख्येने जास्त असला तरी विरोधी पक्षाच्या भडीमरा पुढे आणि त्यांच्या प्रश्नांपुढे उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे उत्तर नाहीत म्हणून सत्ताधारी पक्ष हा अधिवेशन वाढवत गेला तयार नाही. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष जाहीर करावा असा आग्रह आम्ही त्यांना करत आहोत असं माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले. तसेच मी कोणावरही नाराज नाही मी कुठेही नाराज नाही असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.   तर दुसरीकडे  मतदानाच्या एक दिवस अगोदर निवडणुका पुढे ढकलण्याचा घोषित करतात आणि काल दुपारी सांगतात मतमोजणी 21 तारखेला होणार आहे. या लोकशाहीची थट्टा उडवण्याचं काम सत्ताधारी पक्ष आणि स्वायत्त संस्था हे नावाला असलेले निवडणूक आयोग करत आहे. हे आयोग आयोग फक्त कोणाच्यातरी इशाऱ्यावर काम करणारे झालेले आहेत अशी टीका भास्कर जाधव यांनी राज्य निवडणूक आयोगावर केली.

Bhaskar Jadhav : सत्ताधारी पक्ष संख्येने जास्त पण धाडस नाही…, भास्कर जाधवांचा हल्लाबोल Read More »

yeola election

Yeola Election : येवला निवडणूक प्रकरण, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला नागरिकांनी दिला चोप

Yeola Election : येवला येथे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना नागरिकांनी रंगेहाथ पकडले यानंतर परिसरात तुफान राडा पहायला मिळाला. शिवसेना शिंदे गटाच्या रुपेश दराडे यांचा कार्यकर्ता येवला येथील निवडणूक केंद्राच्या जवळच पैसे वाटप करत होता असा आरोप नागरिकांकडून करण्यात आले आहे. यानंतर नागरिकांनी कार्यकर्त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 1 लाख 94 हजार रुपयांची रोख रक्कम जमा करण्यात आली असून आणखी रक्कम कुठे याचा तपास देखील पोलिसांनी सुरू केला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात राज्य निवडणूक आयोगाने दखल घेत येवला शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी  शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे राज्यातील 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून 21 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Yeola Election : येवला निवडणूक प्रकरण, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला नागरिकांनी दिला चोप Read More »

anagar nagar panchayat

Anagar Nagar Panchayat : अजित पवारांना चॅलेंज करावं, एवढी बाळराजेची लायकी नाही; उमेश पाटील भडकले

Anagar Nagar Panchayat : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत असणारी अनगर नगरपंचायत आता बिनविरोध झाली आहे. मात्र राजकारण काही थांबताना दिसत नाही. अजित पवारांना चॅलेंज करावं, एवढी बाळराजेची लायकी नाही अशी टीका उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, सोलापूर यांनी केली आहे. अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्यानंतर माजी आमदार राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी जल्लोष साजरा करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिला होता मात्र त्यानंतर जाहीर माफी देखील मागितली होती. तर आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हाध्यक उमेश पाटील यांनी बाळराजे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना उमेश पाटील म्हणाले की, अजित पवारांना चॅलेंज करावं याची एवढी लायकी नाही, सार्वजनिक जीवनात निवडणुकीच्या माध्यमातून चॅलेंज करायचं असतं त्यामुळे निवडणुका आल्यानंतर चॅलेंज कर आता अशा पोकळ चॅलेंज करू नका. अनगर नगरपंचायत बिनविरोध झाली म्हणून बाळराजे पाटील नाचतोय मात्र ही नगरपंचायत कोणी दिली..? त्यावेळेस अनगर ग्रामपंचायतीची नगरपंचायत करा, अशा पद्धतीची मागणी करण्यासाठी अजित पवारांकडे बाळराजे गेला होता. ज्या वेळेला यांच्या बँकेकडे पैसे नव्हते, त्यावेळेला अजित पवार यांच्याकडे राजन पाटील आणि बाळराजे पाटील हे भीक मागत गेले होते अशी टीका उमेश पाटील यांनी केली. तर दुसरीकडे आज अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे अर्ज माघार घेणार आहे. अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे अर्ज माघार घेणार आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे होत्या. मात्र त्यांच्या अर्जावर सूचकाची सही नव्हती त्यामुळे मी आक्षेप घेतला त्याचबरोबर माझा अपक्ष उमेदवारी अर्ज वैध ठरला असला, तरी मी निवडणुकीतून माघार घेणार आहे आम्ही राजन पाटलांचीच माणसं आहोत, त्यांच्या विचारानेच काम करतो. अर्ज माघारी घेणार आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Anagar Nagar Panchayat : अजित पवारांना चॅलेंज करावं, एवढी बाळराजेची लायकी नाही; उमेश पाटील भडकले Read More »

supriya sule

Supriya Sule: फडणवीससाहेब लक्ष द्या, भाजपमध्ये ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा प्रवेश; सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Supriya Sule: तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. विरोधक आता चारही बाजूने भाजपावर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुळजापूर शहरातील काहीजणांना काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला. यामध्ये शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींंचा देखील समावेश होता, अशी बातमी वाचनात आली. विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले याचे सखेद आश्चर्य वाटले. यासोबतच ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता देखील वाटली. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्याचवेळी कोणत्याही अनिष्ट, समाजविघातक प्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी देखील सार्वजनिक आयुष्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकावर असते,याबाबत आपणही सहमत असाल. आपण राज्याचे प्रमुख आहात, आपल्यासमोर अनेक कामे पडलेली असतात. त्यामुळे कदाचित ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसावी, किंवा सदर व्यक्तीच्या ड्रग्स गुन्हेगारीमधील पार्श्वभूमीबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसावी. हे गृहित धरुन मी आपणास हे पत्र लिहित आहे. समाजहित डोळ्यासमोर ठेवून ड्रग्जविरोधी लढ्यात आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. या संदर्भात मी यापूर्वीही आपणांस पत्राद्वारे कळविले होते. तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. ड्रग्स तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्जविरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याची आपण योग्य ती दखल अवश्य घ्याल की अपेक्षा आहे. असं सुप्रिया सुळे पत्रात म्हणाल्या.

Supriya Sule: फडणवीससाहेब लक्ष द्या, भाजपमध्ये ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा प्रवेश; सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र Read More »

parth pawar

Parth Pawar Land Case : मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; महिनाभरात मुंढवा जमीन प्रकरणी चौकशी अहवाल सादर होणार

Parth Pawar Land Case : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात अनियमिततेतील आरोपांची चौकशी करण्यासाठी महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची चौकशी समिती सरकारने स्थापन केली. यासंदर्भातील शासन आदेश जारी झाला असून, समितीला एक महिन्यात अहवाल द्यायचा आहे. पुणे शहरातील मुंढवा येथील सर्वे नंबर 88 मधील जमिनीच्या दस्ताच्या खरेदी-विक्री व्यवहार अनियमितता झाल्याचा प्रकार विविध प्रसिद्धी माध्यमांद्वारे समोर आला आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी होणे आवश्यक असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंंद्रशेखर बावनकुळे यांनी समिती स्थापन केली. महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत पुणे विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे जिल्हाधिकारी व मुद्रांक विभागाचे सहसचिव असे पाच सदस्य आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, चौकशी समितीला प्रस्तुत प्रकरणात नेमकी अनियमितता झाली आहे किंवा नाही, याबाबत सखोल चौकशी करणे, अनियमितता झाल्याचे आढळल्यास, त्यासाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर जबाबदारी निश्चित करणे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस शासनाकडे करणे, अनियमितता सिद्ध झाल्यास, सदर जमीन तिच्या मूळ स्थितीवर (पूर्वःस्थितीवर) आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचविणे, तसेच भविष्यात अशा प्रकारची प्रकरणे पुन्हा घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना सुचविण्यास सांगण्यात आले आहे.

Parth Pawar Land Case : मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; महिनाभरात मुंढवा जमीन प्रकरणी चौकशी अहवाल सादर होणार Read More »