DNA मराठी

NCP

ahilyanagar municipal corporation election

Ahilyanagar Municipal Corporation Elections: अहिल्यानगर महापालिकेत महापौर कुणाचा; भाजप – राष्ट्रवादी युती तर शिवसेना स्वबळावर

Ahilyanagar Municipal Corporation Elections: अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून राष्ट्रवादी शरद पवार गट 32, शिवसेना ठाकरे गट 24 आणि काँग्रेस 12 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तिन्ही पक्ष एकत्र येत महाविकास आघाडी म्हणून लढणार असून ज्या ठिकाणी डबल एबी फॉर्म दिले गेले ते विथड्रवाल करणार येणार असल्याची माहिती महाविकास आघाडीकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये युतीची घोषणा झाली असून भाजप 32 तर राष्ट्रवादी काँग्रेस 34 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महायुतीमधून बाहेर होण्याची घोषणा केली आहे. शिवसेना शिंदे गटाला समाधानकारक जागा न मिळाल्याने शिवसेना शिंदे गट स्वबळावर अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे आता अहिल्यानगर महापालिकेसाठी महायुती विरुद्ध महाविकास विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीसाठी शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपमध्ये युतीसाठी चर्चा सुरू होती मात्र जागावाटपावरून मतभेद झाल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे एमआयएम आणि मनसे देखील अहिल्यानगर महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे आता अहिल्यानगर महापालिकेत महापौर कुणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अहिल्यानगर महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Ahilyanagar Municipal Corporation Elections: अहिल्यानगर महापालिकेत महापौर कुणाचा; भाजप – राष्ट्रवादी युती तर शिवसेना स्वबळावर Read More »

BJP

Ahilyanagar Municipal Corporation Election: अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

Ahilyanagar Municipal Corporation Election: अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये युती असून राष्ट्रवादी काँग्रेस 34 तर भाजप 32 जागांवर निवडणूक लढवणार आहे. अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी प्रभाग क्रमांक 1 (ब )शारदा दिगंबर ढवन प्रभाग क्रमांक 2 (अ) रोशनी प्रवीण भोसले उर्फ त्र्यंबके ( ड ) निखील बाबासाहेब वारे प्रभाग क्रमांक 3 (अ )उषा शिवाजीराव नलावडे (ड ) ऋग्वेद महेंद्र गंधे प्रभाग क्रमांक 5 ( ब ) धनंजय कृष्णा जाधव प्रभाग क्रमांक 6 (अ) मनोज लक्ष्मण दुल्लाम ( ब) सोन्याबाई तयागा शिंदे (क )सुनिता श्रीकृष्ण कुलकणी ( ड) करण उदय कराळ प्रभाग क्रमांक 7 (अ) वषां रोहन सानप (ब )पुष्पाताई अनिल बोरुडे ( क )वंदना विलास ताठे (ड ) बाबासाहेब सोन्याबापू वाकळे प्रभाग क्रमांक 8 ( ब )आशाबाई लोभाजी कातोरे प्रभाग क्रमांक 9 (ब )पद्माताई विजयकु‌मार बोरुडं ( ड )महेश राम लोंढे प्रभाग क्रमांक 10 (अ) महेंद्र दत्तात्रय बिज्जा (ब ) शितल अजय ढोण (क )मयुरी सुशांत जाधव (ड) सागर राजू मुतोडकर प्रभाग क्रमांक 11 ( अ) विकास (विकी) किशोर वाघ ( ब ) दीप्ती सुवेंद्र गांधी (ड ) सुभाष सोपानराव लोंढे प्रभाग क्रमांक 12 (क )अमोल सुरेश निस्ताने ( ड ) शुभ्रा पुष्कर तांबोळी प्रभाग क्रमांक 15 ( ब )दत्तात्रय सोमनाथ गाडळकर ( ड )सुजय अनिल मोहिते प्रभाग क्रमांक 16 ( क )विजय मोहन पठारे ( ड )ज्ञानेश्वर शिवाजी येवले प्रभाग क्रमांक 17 (क) कमल जालिंदर कातकर ( ड )मनोज शंकर कोतकर

Ahilyanagar Municipal Corporation Election: अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर Read More »

ahilyanagar

Ahilyanagar Municipal Corporation Election: महायुती अडचणीत, शिवसेना शिंदे गट वेगळी चूल मांडणार?

Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत महायुती होण्याची शक्यता सध्या धूसर होताना दिसत आहे. जागावाटपावरून सुरू असलेले मतभेद टोकाला पोहोचल्याने शिवसेना शिंदे गट स्वतंत्रपणे, म्हणजेच वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काल रात्री उशिरापर्यंत महायुतीतील प्रमुख नेत्यांची बैठक सुरू होती. मात्र या बैठकीतही जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेषतः शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच भाजप यांच्यातील चर्चा फिस्कटल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना शिंदे गट आपल्या विद्यमान नगरसेवकांच्या जागांवर ठाम असून, त्या जागा सोडण्यास स्पष्ट नकार देत असल्यानेच वाद अधिक चिघळल्याचे समजते. दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादीकडून नव्याने समतोल जागावाटपाची भूमिका मांडण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आज संध्याकाळपर्यंत आपली अधिकृत भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, महायुती टिकणार की तुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ahilyanagar Municipal Corporation Election: महायुती अडचणीत, शिवसेना शिंदे गट वेगळी चूल मांडणार? Read More »

sanjay raut

Sanjay Raut on NCP Alliance: पुण्यात दोन्ही NCP एकत्र येणार? संजय राऊत स्पष्टच बोलले

Sanjay Raut on NCP Alliance : पुण्यातील राजकारणात सध्या हाय वॉल्टेज ड्रामा सुरू असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिकेसाठी एकत्र येण्यासाठी चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे आता अजित पवार कोणतीही सुरक्षा न घेता कुठे तरी निघून गेल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया देत पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय सुरू आहे हे मला माहिती नाही असं म्हटलं आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मला माहिती नाही, त्यांच्या पक्षात काय चाललय त्यावर मी काय बोलणार. अजून तिथे काही घडत नाही आहे. तर दुसरीकडे यावेळी राऊत यांनी मुंबईमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी बरोबर युतीसाठी आमची सकारात्मक चर्चा झाली असून त्यांना ज्या जागा हव्या होत्या त्यातल्या बहुतेक जागा त्यांना दिल्यात असल्याची माहिती दिली आहे. तसेच आमच्या युतीत काही अडचण या क्षणी दिसत नाही, मनसेच्या गोटातल्या काही जागा आहेत . पण आम्ही त्याचं समाधान केलंय. आमच्या सोबत असावेत आमची इच्छा आहे. आमच्या वाट्याच्या जागा दिल्यात, आमचं नुकसान झालं पण ठीक आहे ते चालेल. आमच्या अनेक जागा मनसेला सीटिंग आहेत, आमचेही लोक नाराज झाले, पण युतीमध्ये या गोष्टी पहायच नाही असं संजय राऊत म्हणाले. तर दुसरीकडे ठाण्यात शिवसेना मनसे युती आहे. राष्ट्रवादी सोबत चर्चा सुरू आहे. जागा वाटप पूर्ण झालं आहे पण ठाण्यात महत्व वेगळं आहे, भाजपला ठाण्यात शिंदेंचा पराभव करायचा आहे. लोकसभा विधानसभेच गणित वेगळं होतं तिथे आमची केवळ भाजपशी लढाई असेल असेही संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut on NCP Alliance: पुण्यात दोन्ही NCP एकत्र येणार? संजय राऊत स्पष्टच बोलले Read More »

ajit pawar

Ajit Pawar: पुण्यात हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा; उपमुख्यमंत्री अजित पवार नेमके गेले कुठे?

Ajit Pawar: पुणे महापालिका निवडणुकीसाठी सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असून आता एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणारी चर्चा फिस्कटली असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक सकाळी बारामती हॉस्टेल मधून पोलीस संरक्षण,पोलीस ताफा काहीही न घेता एकटे निघाले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नेमके कुठे गेले याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार बारामती हॉस्टेल मधून निघून जिजाई या त्यांच्या निवासस्थानी असण्याची शक्यता आहे. अजित पवार बारामती हॉस्टेल मधून ज्या गाडीतून निघाले ती गाडी जिजाई बंगल्या मध्ये असल्याने अजित पवार देखील जिजाई बंगल्यातच असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे युतीसाठी अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक झाली असल्याची देखील माहिती समोर आली आहे. अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली असून लवकरच युती बाबत निर्णय होणार असल्याचे देखील बोलले जात आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट या निवडणुकीत एकत्र लढणार असून काँग्रेस स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

Ajit Pawar: पुण्यात हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा; उपमुख्यमंत्री अजित पवार नेमके गेले कुठे? Read More »

nawab malik

Maharashtra Election: राष्ट्रवादीचे 40 स्टार प्रचारक मैदानात; नवाब मलिकसह ‘या’ नावांचा समावेश

Maharashtra Election : राज्यातील 29 महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार गटाकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नावाचा देखील समावेश करण्यात आला आहे. नवाब मलिक यांच्या नावाला महायुतीमध्ये भाजपकडून जोरदार विरोध पाहायला मिळत आहे मात्र तरी देखील अजित पवार यांनी नवाब मलिक यांच्यावर महापालिका निवडणुकीसाठी मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांचा नाव स्टार प्रचारक म्हणून घोषित झाल्यानंतर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस स्टार प्रचारकांची यादी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर केलेल्या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, सयाजी शिंदे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार सना मलिक-शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार इद्रीस नायकवडी, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार झिशान सिद्दीकी, माजी आमदार राजेंद्र जैन, शरद पाटील, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, लहू कानडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष नाझेर काझी, प्रदेश प्रवक्ते महेश शिंदे, राजलक्ष्मी भोसले, ज्येष्ठ नेत्या सुरेखा ठाकरे, अल्पसंख्याक सेलचे प्रमुख नेते नजीब मुल्ला, प्रतिभा शिंदे आणि विकास पासलकर आदींचा समावेश आहे.

Maharashtra Election: राष्ट्रवादीचे 40 स्टार प्रचारक मैदानात; नवाब मलिकसह ‘या’ नावांचा समावेश Read More »

rahul kalate

Rahul Kalate : शरद पवारांना मोठा धक्का; राहुल कलाटे भाजपवासी

Rahul Kalate : राज्यातील 29 महानगर पालिकांसाठी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी शरद पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मातब्बर नेते, महापालिकेतील माजी गटनेते व माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राहुल कलाटे यांच्यासोबत असलेल्या माजी नगरसेवकांनी यापूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला होता, परंतु कलाटे यांच्या प्रवेशाकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, चिंचवडचे आमदार शंकर जगताप आणि भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले, “राहुल कलाटे यांच्यासारखा एक चांगला कार्यकर्ता आणि त्यांच्या सोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाने भाजपात प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही. पूर्ण ताकदीने महापालिका निवडणूक लढवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करूया.” यावेळी आमदार शंकर जगताप म्हणाले, “शहरातील एक तरुण तडफदार नेतृत्व भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असताना मला आनंदच होत आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपा अबकी बार सव्वाशे पार होईल. या प्रवेशामुळे भाजपा पिंपरी चिंचवड शहराचे मजबुतीकरण होईल. राहुल कलाटे यांचे भाजपामध्ये स्वागत करतो.” पक्ष प्रवेशानंतर राहुल कलाटे यांनी स्पष्ट केले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम, कणखर व विकासाभिमुख नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी योगदान देता येईल, या विश्वासातूनच हा निर्णय घेतला आहे. लोकांची कामे व्हायला पाहिजेत हीच माझी भूमिका राहिलेली असून, यासाठी मागील 20 वर्षांपासून मी संघर्ष करतोय. लोकांनी कायमच माझ्यावर विश्वास ठेवला आहे. आणि हाच विश्वास मी भाजपा नेतृत्वाकडे सोपवत आहे.” पुढे बोलताना कलाटे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडकरांनी मोठ्या कष्टातून उभारलेल्या या शहराला देश-विदेशात ओळख मिळवून दिली आहे. मात्र, शहरात काही स्थानिक समस्या अद्यापही प्रलंबित आहेत. या सर्व समस्या सोडवून प्रत्येक नागरिकाला त्याचा न्याय्य हक्क मिळवून देणे आणि सामान्य माणसाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हेच माझे प्रमुख ध्येय आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकासासाठी काम करत राहणार!” या पक्षप्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिक मजबूत होणार आहे. राहुल कलाटे यांचा प्रशासकीय अनुभव, व्यापक जनाधार, संघटन कौशल्य आणि जनतेशी थेट संवाद साधण्याची कार्यपद्धती यामुळे भाजपाला निश्चितच बळ मिळणार आहे. या प्रवेशामुळे भाजपा शत प्रतिशत कडे वाटचाल करेल असे बोलले जात आहे. शहरातील विरोधी गटातील सर्वात मोठा प्रमुख नेता व आक्रमक चेहरा भाजपामध्ये दाखल झाल्याने भाजपासाठी स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये निर्णायक व सकारात्मक बदल घडणार असून, आगामी महापालिका निवडणुकीसाठी हा प्रवेश अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, अशी चर्चा शहरभर सुरू आहे.

Rahul Kalate : शरद पवारांना मोठा धक्का; राहुल कलाटे भाजपवासी Read More »

mahayuti

Maharashtra Election: नगरपरिषद अन् नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय; 207 जागांवर मारली बाजी

Maharashtra Election 2025 : राज्यातील 288 नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांनी शानदार कामगिरी केली आहे. भाजपने सर्वात जास्त 120 पेक्षा जास्त जागा जिंकले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त 44 जागांवर विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीमध्ये काँगेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. कोणाला किती जागा मिळाल्या? महाराष्ट्र निवडणूक आयोगाने (EIC) रविवारी रात्री उशिरा निवडणुकीच्या निकालांचे अंतिम आकडे शेअर केले. आकडेवारीनुसार, भाजप 117 जागा जिंकून सर्वात मोठा विजयी ठरला, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 53 जागांसह आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 37 जागांसह स्थान मिळवले. महायुती आघाडीमध्ये काँग्रेसने 28 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 7 जागा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 9 जागा जिंकल्या. इतर नोंदणीकृत पक्षांनी 4 जागा जिंकल्या, मान्यता नसलेल्या नोंदणीकृत पक्षांनी 28 जागा जिंकल्या आणि अपक्ष उमेदवारांनी 5 जागा जिंकल्या. महाराष्ट्रातील 288 नगरपरिषदा आणि नगरपरिषदेच्या जागांसाठी 2 आणि 20 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. इतर दोन नगरपरिषदांमधील उमेदवार बिनविरोध निवडून आले. या निकालांवरून राज्यात महायुती आघाडीची स्थिती मजबूत असल्याचे स्पष्ट होते. विरोधी पक्षांचा निवडणूक आयोगावर आरोप दरम्यान, विरोधी पक्ष काँग्रेस आणि शिवसेना (यूबीटी) यांनी निवडणूक आयोगावर महायुती आघाडीला विजय मिळवून देण्यास मदत केल्याचा आरोप केला आहे. प्रदेश काँग्रेस प्रमुख हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप मित्रपक्षांना इशारा देत म्हटले आहे की, “भाजपचे यश एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसाठी धोक्याची घंटा आहे. भाजप या दोन्ही मित्रपक्षांना 100% बाहेर काढेल” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Maharashtra Election: नगरपरिषद अन् नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय; 207 जागांवर मारली बाजी Read More »

Ram Shinde And Rohit Pawar

Ram Shinde on Rohit Pawar: जनतेचा कौल राम शिंदेनां ; विजयानंतर राम शिंदेनी रोहित पवारांवर केली टीका

Ram Shinde on Rohit Pawar : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगर परिषदेमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत 15 जागा आणि नगराध्यक्ष पदी विजय मिळवला आहे. या विजयानंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरती टीकास्त्र डागले आहे, नगरपरिषद निवडणुकीत आमच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले मात्र जामखेडच्या मतदारांनी आमच्या बाजूने कौल दिला आहे. अशाच पद्धतीने येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील भाजपला घवघवीत यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच महाविकास आघाडीला आता आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याच देखील त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपने नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत शानदार कामगिरी करत तब्बल 123 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट आणि तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राहिला आहे. तर काँग्रेसने देखील विदर्भात चांगली कामगिरी करत भाजपला रोखण्याचे प्रयत्न केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाला या निवडणुकीत काही खास करता आलेला नाही. जामखेड नगरपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने देखील 2 जागा मिळवल्या आहे.

Ram Shinde on Rohit Pawar: जनतेचा कौल राम शिंदेनां ; विजयानंतर राम शिंदेनी रोहित पवारांवर केली टीका Read More »

rohit pawar

Rohit Pawar on Congress: काँग्रेस भाजपची बी टीम; पराभवानंतर आमदार रोहित पवार भडकले

Rohit Pawar on Congress: जामखेड नगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार प्रचंड संतप्त झाले असून, त्यांनी थेट महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसवरच तोफ डागली आहे. भाजपविरोधात लढाई असल्याचे सांगत असतानाच काँग्रेसने प्रत्यक्षात भाजपची बी-टीम म्हणून काम केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आमदार रोहित पवार म्हणाले की, जनतेने दोनदा भरभरून मतांचं दान दिलं, मी कायम त्यांच्या ऋणात राहीन. कार्यकर्त्यांनी जीव तोडून मेहनत घेतली, उमेदवारांनी ताकदीने लढा दिला, तरीही निकाल अत्यंत निराशाजनक आहे. काम करणाऱ्यांचं मनोबल खच्ची करणारा हा पराभव आहे. जनतेवर आक्षेप नाही. पण जिथे सर्वत्र पैसाच चालतो, तिथे बचत गट चालक, शेतकरी, दुकानदार, सामान्य कुटुंबातील उमेदवारांना न्याय कधी मिळणार? आम्ही त्यांना सत्तेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या विरोधात निवडून आलेल्यांचे कारनामे पाहिले, तर… आमदार पवारांनी आजच्या राजकारणावरही तिखट भाष्य केलं. तत्त्व, विचार आणि विकासावर चालणारं स्वच्छ राजकारण कमी होत चाललंय. पैशांनी गढूळ झालेलंच राजकारण आज जास्त दिसतं. आमच्या विरोधात निवडून आलेल्यांचे कारनामे पाहिले, तर चारचौघात त्यांची नावं घेण्याचीही लाज वाटते, असा घणाघात त्यांनी केला. भाजपाची बी-टीम बनून जातीयवादी शक्तींना विजय मिळवून दिला सर्वात स्फोटक आरोप करताना पवार म्हणाले, काही अपक्षांसह धर्मनिरपेक्षतेचा गजर करणाऱ्या काँग्रेसने भाजपाच्या उमेदवारालाच स्वतःच्या तिकिटावर उभं केलं. भाजपाची बी-टीम बनून जातीयवादी शक्तींना विजय मिळवून दिला. लोकंही या तिरक्या खेळीला बळी पडली. यापुढे काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांवर विश्वास कसा ठेवायचा, हा मोठा प्रश्न आहे. जामखेडच्या पराभवानंतर महाविकास आघाडीतच आता आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली असून, रोहित पवारांच्या या भडक वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Rohit Pawar on Congress: काँग्रेस भाजपची बी टीम; पराभवानंतर आमदार रोहित पवार भडकले Read More »