DNA मराठी

Mumbai News

vishal

Vishal Brahma Drug Case : 40 कोटी किमतीच्या ड्रग्जसह ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याला अटक

Vishal Brahma Drug Case : स्टुडंट ऑफ द इयर 2 या बॉलिवूड चित्रपटात काम करणारा अभिनेता विशाल ब्रह्मा याला चेन्नई विमानतळावर ड्रग्जसह अटक करण्यात आली आहे. वृत्तानुसार, सिंगापूरहून AI-347 या फ्लाइटमधून उतरल्यानंतर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अंदाजे 40 कोटी (अंदाजे US$1.2 अब्ज) किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. नायजेरियन टोळीने अडकवले तपासात असे दिसून आले की 32 वर्षीय विशालला नायजेरियन ड्रग्ज टोळीने आमिष दाखवले होते. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विशालला कंबोडियाला सुट्टीचे आमिष दाखवण्यात आले होते, परंतु तो परत आल्यावर त्याला ड्रग्जने भरलेली ट्रॉली बॅग देण्यात आली, जी तो घेऊन भारतात परतला. या टोळीचा हेतू असा होता की सुरक्षा एजन्सी त्याच्या अभिनेत्याच्या रूपामुळे त्याच्यावर संशय घेऊ नयेत. विशालला टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांच्या भूमिका असलेल्या स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून प्रसिद्धी मिळाली. तो “बिहू अटॅक” चित्रपटातही दिसला. मात्र त्याच्या अलीकडील अटकेमुळे त्याच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला आहे. तपास सुरूच, टोळीपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न संचालनालय (डीआरआय) आणि इतर तपास संस्था आता संपूर्ण नेटवर्क उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. नायजेरियन टोळ्यांची भूमिका, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी कट आणि भारतातील त्याची मुळे तपासण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

Vishal Brahma Drug Case : 40 कोटी किमतीच्या ड्रग्जसह ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याला अटक Read More »

Crime News : धक्कादायक, गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी, सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी

Crime News : शेअर बाजारात झालेल्या नुकसानात घरातील गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी एका तरुणीने तिच्याच सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी केल्याची धक्कादायक घटना वसई येथे समोर आली आहे. ज्योती मोहन भानुशाली, 27 असे या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी तिला गुजरातच्या नवसारी येथून अटक केली आहे. तिच्याकडून तब्बल दीड करोड चे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. अवघ्या बारा तासाच्या आत जप्त करून आरोपीला बेड्या ठोकले आहेत. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, ओधवजी खिमजी भानुशाली,66 वर्षे हे घरात एकटेच असताना एक दाढीवाला पुरुष कच्ची भाषेत बोलून मला रूम हवी आहे. मला मदत करा असं सांगून घरात घुसला. त्यांनी आपल्या गावाकडचा असल्याने त्याला घरात घेतलं आणि गजरा समाजाच्या विषयी बोलल्यामुळे आपुलकी अजून वाढली आणि त्या चोरट्याने वॉशरूम मध्ये जायचं असं सांगून वॉशरूम मध्ये गेला आणि तुमचं बाथरूम लिकेज झाला आहे. असं सांगून दाखवण्यासाठी नेऊन त्याच बाथरूम मध्ये ढकलून त्यांना कोंडून ठेवले आणि घरातील मौल्यवान वस्तू दागिने घेऊन लंपास झाला. मध्यवर्ती गुन्हे शाखेने आजूबाजूचे सीसीटीव्ही चेक केले असता त्या सीसीटीव्ही मध्ये बॅगा हातात घेऊन जाताना कॅप घातलेला पुरुषाचा वेश धारण केलेला इसम दिसला. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी एका झुडपामध्ये बॅगा लपून त्या ठिकाणी पुन्हा एका महिलेने येऊन त्या बॅगा घेऊन गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्या सीसीटीव्हीचा माग घेता घेता पोलीस गुजरातच्या नवसारी येथे पोहोचले आणि ज्योती मोहन भानुशाली, 27 हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे दीड करोड चे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. पुरुषाचा वेश धारण करण्यासाठी तिने इंस्टाग्राम वरील मिम्स पाहिले असल्याची माहिती मदन बल्लाळ,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी दिली.

Crime News : धक्कादायक, गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी, सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी Read More »

manikrao kokate

पिक विम्याची 379 कोटी भरपाई मिळणार: कृषीमंत्री माणिकराव कोकटेंची घोषणा

Manikrao Kokate : सर्व समावेशक पीक विमा योजनेंतर्गत पीक नुकसान भरपाईची प्रलंबित 379 कोटी रक्कम विमा कंपनी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होईल आणि माझा बळीराजा सुखावेल, असा विश्वास राज्याचे कृषी मंत्री अँड. माणिकराव कोकाटे (Agriculture Minister Manikrao Kokate) यांनी व्यक्त केला. यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या विमा हप्त्यासाठी तब्बल 1028.97 कोटी रुपयांची मंजूरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. खरीप हंगाम 2024 साठी आतापर्यंत 3907.43 कोटीची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून यासाठीचे 3561.08 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. मात्र नुकसान भरपाई पोटी 346.36 कोटी प्रलंबित होते. कृषी मंत्री कोकाटे यांच्या सदर बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने याबाबत प्रशासकीय पातळीवर आढावा घेत याचा सदर प्रस्ताव वित्त विभागाकडे अंतिम मंजूरीसाठी पाठविला होता. या प्रस्तवास वित्त विभागाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर राज्य शासनाने राज्य विमा हप्त्याचे 1028.97 कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे केंद्र सरकारच्या पिक विमा पोर्टलद्वारे सदर कार्यवाही पूर्ण होईल. कृषी (Agriculture Minister) मंत्र्यांच्या सजगतेमुळे आता पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई व काढणी पश्चात नुकसान भरपाईचे प्रलंबित 379 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनी मार्फत जमा होतील. याबाबत शेताकऱ्यांना काही अडचणी आल्यास आपल्या विभागाशी थेट संपर्क करण्याचे आवाहन कृषी मंत्री कोकाटे यांनी केले आहे.

पिक विम्याची 379 कोटी भरपाई मिळणार: कृषीमंत्री माणिकराव कोकटेंची घोषणा Read More »

ठाकरे गटाला धक्का, दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Uddhav Thackeray: शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी त्यांना प्रवेश देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार प्रविण दरेकर, मुंबई भाजपा उपाध्यक्ष कमलाकर दळवी उपस्थितीत होते. यावेळी मंत्री शेलार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने प्रेरित होऊन तसेच भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांशी एकरूप होऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करत शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. याचा अर्थ त्यांनी उबाठाचे नेतृत्व नाकारले आहे. हा या नाटकाचा पहिला अंक आहे लवकरच दुसरा आणि तिसरा व शेवटचा अंक तुम्हाला पहायला मिळेल. उबाठाची अवस्था धोकादायक आणि जिर्ण झाली आहे. त्यांनी मुंबई, मुंबईकर, हिंदुत्व, हिंदु सण उत्सव यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यामुळे ते धोकादायक स्थितीत आहेत, तर त्यांना सोडून ज्या पद्धतीने पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार जात आहेत त्यावर तो पक्ष जिर्ण अवस्थेत आहे. 2017 च्या निवडणूकीत त्यावेळच्या शिवसेनेपेक्षा भाजपाला फक्त दोन जागा कमी होत्या आता भाजपामध्ये चार माजी नगरसेवकांंनी प्रवेश केल्यानंतर भाजपा नंबर 1 चा पक्ष झालाच शिवाय मुळ शिवसेनेतील 50 हून अधिक नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले त्यामुळे उबाठा सेना हा पक्ष अत्यंत जिर्ण अवस्थेत आहे, अशी टीका शेलार यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मुंबईला 5 लाख कोटींचा निधी दिला आम्ही मुंबईकरांची सेवा करीत असून देव, देश आणि धर्मासाठी आमची लढाई सुरु आहे, असेही ते म्हणाले.

ठाकरे गटाला धक्का, दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश Read More »

दिशा सालियन प्रकरण, आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल होणार? संजय निरुपमांचा मोठा दावा

Sanjay Nirupam On Disha Salian: दिशा सालियन हत्येमागे मुंबईतील सेलिब्रेटिंगचे ड्रग्ज रॅकेट आहे. असा धक्कादायक दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी केला आहे. तसेच सतीश सालियन यांनी नव्याने केलेले आरोप गंभीर असून त्यांच्या तक्रारीवर लवकरच मालवणी पोलीस ठाण्यात ‘एफआयआर’ नोंदवला जाईल, असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला. शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम माध्यमांशी बोलताना म्हणाले की, दिशा सालियन हत्याकांडात उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांची मोठी भूमिका असल्याचे पुरावे आहेत, लवकरच आदित्य ठाकरेवर गुन्हा दाखल होईल आणि ते हत्यादी ठाकरे बनतील, अशी घणाघाती टीका निरुपम यांनी केली. निरुपम म्हणाले की, नुकताच वडील सतीश सालियन यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे दिशा सालियन प्रकरणात तक्रार केली आहे. या तक्रारीत उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ही तक्रार मालवणी पोलीस स्टेशनमध्ये एफ.आय.आर करण्यासाठी पुढे पाठवण्यात आल्याची माहिती निरुपम यांनी दिली दिशा सालियनची ८ जून २०२० मध्ये हत्या झाली. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची दिशा सालियन मॅनेजर होती. दिशा सालियनची हत्या संशयास्पद झाली होती. या दिवशी दिशा सालियनच्या घरी झालेल्या पार्टीमध्ये सर्वजण उपस्थित होते, अशी चर्चा त्या दिवशी झाली होती, असे निरुपम म्हणाले. राज्य सरकारने या प्रकरणी एसआयटीची स्थापना केली असून त्याकडून चौकशी सुरु आहे. दिशावर सामूहिक अत्याचार करुन हत्या केल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला आहे. दिशा सालियनचा शवविच्छेदन अहवाल तीन दिवस उशीराने प्राप्त झाला. तिचा मृतदेह हा इमारतीपासून २५ फूट लांब आढळून आली. तिच्या शरिरावर कोणत्याही जखमा नव्हत्या आणि नग्नावस्थेत तिचा मृतदेह आढळून आला होता. या सगळ्या गोष्टी संशयास्पद असून त्याची नव्याने सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, असे निरुपम म्हणाले. सरकार विरोधी पक्षांचा बदला घेण्यासाठी दिशा सालियन प्रकरणाचे राजकारण करत आहेत, असा आदित्य ठाकरे यांचा आरोप खोटा आहे, असे निरुपम म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आदित्य ठाकरेने सुप्रीम कोर्टात सीबीआयने क्लिन चीट दिल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र सीबीआयने दिशा सालियन प्रकरणाचा नाही तर सुशांत सिंग हत्येचा तपास केला होता. आदित्य यांच्या खोट्या प्रतिज्ञापत्रावर देखील कारवाई होईल, असे निरुपम म्हणाले. या प्रकरणी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डी नो मोरिया आणि इतरांवर संशय आहे. हे सर्व ड्रग्ज रॅकेटशी संबधित असून त्यांना ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या समीर खान याने नार्कोटिस ब्युरोकडे कबुली दिली होती. आदित्य ठाकरे ड्रग्ज घेतो, असे समीर खानने चौकशीत म्हटले होते. त्यामुळे दिशा सालियनच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार, मुंबई पोलीस कटिबद्ध असल्याचे निरुपम म्हणाले. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चर्चा वाढल्यानंतर उबाठा गटाने कुणाल कामराचे वादग्रस्त गाणे जाणुनबुजून व्हायरल करण्यात आले. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेवर कुणाल कामरावर निश्चित कारवाई होईल, असे निरुपम म्हणाले.

दिशा सालियन प्रकरण, आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल होणार? संजय निरुपमांचा मोठा दावा Read More »

Eknath Shinde: सकाळ – संध्याकाळ तुम्ही शिव्या देताय; ‘त्या’ प्रकरणात शिंदेंचा उबाठाला टोला

Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर शिवसेनेने आता महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. उंच भरारी घेण्यासाठी गरुड (बाज) बनावे लागेल, धोकेबाज बनून चालणार नाही, आताच समुद्र पार केलाय, अजून अवकाश बाकी आहे अशा पंक्तींमधून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले. वरळीच्या एनएससीआय डोम सेंटरमध्ये आयोजित मुंबईतील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मागील अडीच वर्षात सरकारने मुंबई आणि राज्यात केलेली कामे जनतेपर्यंत घेऊन जा. प्रत्येक वॉर्डात शिवसेनेच्या शाखा आणि घर तिथे शिवसैनिक झाला पाहिजे. विधानसभेत एक झटका दिलाय आणि मुंबई महापालिकेत दुसरा झटका द्यायचा आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्त्याना केले. शिवसेना वाढवायची आहे. कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक वॉर्डात मतदार यादीतील 123 नावे सदस्य म्हणून नोंदवायची तसेच प्रत्येक वॉर्डात 10 हजारांहून अधिक सदस्यांची नोंदणी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. यावेळी उबाठा गटाचे विलेपार्ले उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे, युवती सेनेच्या अजिता जनावळे, उपविभागप्रमुख अनिल खांडेकर, हनी सबलो, शरद पवार गटाचे मुंबई सचिव सतीश नायर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ते पुढे म्हणाले की, निवडणुका आल्या की मुंबई तोडणार अशी भाषा काहीजण करतात पण जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोवर कोणीही मुंबई आपल्यापासून तोडू शकत नाही. सरकार रखडलेल्या पुनर्विकासाला चालना देणार आहे आणि बाहेर फेकलेल्या मुंबईकराला पुन्हा मुंबईत आणणार असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. म्हाडा, एमएमआरडीए, महाप्रीत, एमआयडीसी अशा सर्व विभागांना एकत्र करुन ठाण्याप्रमाणेच मुंबईतही क्लस्टरच्या माध्यमातून विकास सुरु केला आहे. आपल्या सरकारने मुंबईत 7 एसटीपी केले. येत्या तीन चार वर्षात समुद्रात जाणारे काळे पाणी प्रक्रिया करुन सोडले जाईल आणि मुंबईच्या समुद्राचे पाणी निळेशार होईल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईतील सर्व रस्ते दोन टप्प्यात काँक्रीटचे होणार आहेत. मात्र मुंबईच्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली काहीजणांनी आतापर्यंत 3500 कोटी खाल्ले, अशी टीका शिंदे यांनी उबाठावर केली. सरकारने राज्यात 700 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरु केले आहेत. मुंबईत 300 एकरचे सेंट्रल पार्क होणार आहे. मात्र काहींनी साट्यालोट्यामुळे महालक्ष्मी रेसकोर्सची जमीन घेण्याची हिंमत दाखवली नव्हती पण आपण रेसकोर्सची 120 एकर जागा मिळवली, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री असताना मी मुंबईचे रस्ते धुतले आणि प्रदूषण कमी केले पण तुम्ही मात्र इतकी वर्ष तिजोरीची सफाई केली अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली विधानसभेत पहिल्याच भाषणा घोषणा केली होती महायुतीच्या 200 हून अधिक जागा निवडून आणू नाहीतर गावी शेती करायला जाईन. पण राज्यातील लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडक्या जेष्ठांनी महायुतीला भरभरुन मतदान केले. जनतेच्या न्यायालयात खरी शिवसेना कोण हे निवडणुकीत दाखवून दिले. खोके खोके आरोप करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेने निवडणुकीत खोक्यांमध्ये बंद करुन टाकले. एकनाथ शिंदेवर विश्वास टाकला तर जीवाची बाजी लावतो. आम्ही खुर्चीसाठी नाही तर माणसे शोधतो. पदासाठी कधीही मागणी नाही केली किंवा कुठलीही तडजोड केली नाही, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी हा उठाव केला. धर्मवीर आनंद दिघेंची शिकवण पाठिशी आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्यांना बाळासाहेबांचे विचार नकोत तर प्रापर्टी पाहिजे, असा टोला शिंदे यांनी उबाठाला लगावला. ते पुढे म्हणाले की, या देशाला हिंदुत्वाचे विचार देणारे एकमेव नेते बाळासाहेब ठाकरे होते. खुर्चीचा मोह झाला आणि सगळं संपल. ते मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता. तुम्ही सहकाऱ्यांना नोकर समजायला लागलात. मालक आणि नोकर बनवून पक्ष मोठा होत नाही, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. दिल्लीत राज्यप्रमुखांची बैठक घेतली तेव्हा त्यांनी एका राज्यप्रमुखाला फोन केला आणि म्हणाले मालकासोबत राहणार की नोकराबरोबर जाणार अशी तुम्ही तुलना केली. अशाने पक्ष कधीच वाढणार नाही, असे खडे बोल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला सुनावले. हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. शिवसेना बाळासाहेबांनी जीवापाड जपली. शिवसैनिकांना जपले म्हणून आपण बाळासाहेबांचे आणि आनंद दिघेंचे विचार जपले. राज्यात सर्वसामान्यांच्या मनातले सरकार आणले. उठावानंतर झालेल्या राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक शिवसेनेत येत आहे मात्र तुमच्याकडून का जात आहेत याचे आत्मपरिक्षण करा, असा सल्ला शिंदे यांनी दिला. घटनाबाह्य किती बोलणार, मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो पण या महाराष्ट्रातील जनतेच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्यासाठी मी जन्माला आलोय, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठणकावून सांगितले. महापराक्रमी महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार मला मिळाला. एका मराठी माणसाने दुसऱ्या मराठी माणसाचा सत्कार केला. पण मला शिव्या देताना त्यांनी महादजी शिंदे यांच्या वशजांचा अपमान. साहित्यिकांचा अपमान आणि ज्यांच्यामुळे ते मुख्यमंत्री झाले त्यांचाही अपमान केला. गरज सरो वैद्य मरो अशी तुमची वागणूक आहे, असे ते म्हणाले. महायुतीत तिनही पक्ष काम करत आहेत. कोणतेही कोल्ड वॉर नाही तर विकास विरोधी काम करणाऱ्यांच्या विरोधात आमचे युद्ध आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. अयोध्येत भव्य राममंदीर आणि काश्मिरमधील कलम 370 हटवायचे असे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पूर्ण केले पण सकाळ संध्याकाळ त्यांनाही तुम्ही शिव्या देताय. उठता बसता तुम्ही शिव्या देताय तुमची शिव्यासेना झालीय का असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला.

Eknath Shinde: सकाळ – संध्याकाळ तुम्ही शिव्या देताय; ‘त्या’ प्रकरणात शिंदेंचा उबाठाला टोला Read More »

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू, ‘या’ ड्रेसमध्ये प्रवेश नाही, जाणून घ्या नवीन नियम

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरातील सर्व भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. मंदिर प्रशासनाच्या मते, मंदिराचे पावित्र्य आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन नियमानुसार, लहान किंवा फाटलेले कपडे घालून मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. सर्व भाविकांनी सभ्य आणि पारंपारिक कपडे घालून मंदिरात यावे. मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, 30 जानेवारीपासून मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी हा नवीन ड्रेस कोड नियम लागू होईल. या नवीन व्यवस्थेनुसार, स्कर्ट, फाटलेले कपडे आणि उघडे कपडे घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी याबाबत माध्यमांना माहिती देताना सांगितले की, मुंबईत असलेले सिद्धिविनायक मंदिर हे केवळ भारतातच नाही तर जगभरातील सनातनी आणि गणेश भक्तांसाठी एक प्रमुख श्रद्धेचे केंद्र आहे. लाखो लोक येथे दर्शनासाठी येतात आणि येथे येणाऱ्या भाविकांच्या इच्छा पूर्ण होतात. परंतु, जेव्हा लोक एखाद्या पवित्र ठिकाणी जातात तेव्हा तेथे काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते, जेणेकरून त्या ठिकाणाचे पावित्र्य राखले जाईल. आचार्य पवन त्रिपाठी पुढे म्हणाले की, मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सूचनांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या काही भाविकांच्या पोशाखाबद्दल अनेक भाविकांनी चिंता व्यक्त केली होती, ज्यांचे कपडे योग्य नव्हते. हे लक्षात घेऊन, सिद्धिविनायक ट्रस्टने निर्णय घेतला की दर्शनासाठी येणाऱ्यांना चांगले कपडे घालावे लागतील. हा राजकारणाचा विषय नाही. हा धार्मिक आणि श्रद्धेशी संबंधित विषय आहे. जेव्हा लोक मंदिरात जातात तेव्हा ते सहसा स्नान करून आणि चांगले आणि सभ्य कपडे घालून जातात. आम्हाला फक्त एवढेच हवे आहे की मंदिरात येणाऱ्या भाविकांनी याचे पालन करावे. अनेक मंदिरांमध्ये ड्रेस कोड आधीच लागूआचार्य पवन त्रिपाठी पुढे म्हणाले की, देशभरातील अनेक मंदिरांमध्ये ड्रेस कोड आधीच लागू आहे आणि तिथे येणाऱ्या भाविकांना या नियमांची आधीच माहिती आहे. आम्हाला खात्री आहे की कालांतराने, सिद्धिविनायक मंदिरातही लोक हळूहळू या नियमांचे पालन करू लागतील. सिद्धिविनायक मंदिराचे पावित्र्य आणि भाविकांच्या श्रद्धेचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू, ‘या’ ड्रेसमध्ये प्रवेश नाही, जाणून घ्या नवीन नियम Read More »

EVM Scam: मोठी बातमी! ईव्हीएम हॅकिंगच्या दाव्यावरून मुंबईत एफआयआर

EVM Scam : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण देशात पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार मुंबई सायबर पोलिसांनी ईव्हीएम हॅक केल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. सय्यद शुजा नावाच्या व्यक्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याने दावा केला होता की महाराष्ट्र निवडणुकीत ईव्हीएम हॅक होऊ शकतात. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ही तक्रार खोटी आणि निराधार असल्याचे सांगून पोलिसात दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे दक्षिण मुंबईतील सायबर पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘शुजाने 2019 मध्येही असाच दावा केला होता. त्याच्याविरुद्ध दिल्लीत एफआयआर दाखल करण्यात आला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असून 288 पैकी 236 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला 46 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप आता विरोधकांकडून करण्यात येते. पार्श्वभूमी:– सय्यद शुजा हा 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही ईव्हीएम हॅकिंगचे असंध्दावे करीत होता, ज्यामुळे दिल्लीत त्याविरुद्ध एफआयआर दाखल झाली होती. – यावेळी त्याच्या व्हिडिओमध्ये असे सांगण्यात आले होते की, ईव्हीएममधील मतदान डेटा बदलला जाऊ शकतो, परंतु निवडणूक आयोगाने (ECI) हे खंडन केले आहे. निवडणूक निकाल आणि विवाद:– **महायुती** (भाजप+शिवसेना-शिंदे+राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट) यांना 288 पैकी **236 जागा** मिळाल्या आहेत. – **महाविकास आघाडी** (काँग्रेस+शिवसेना-उद्धव+राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट) यांना **46 जागा** मिळाल्या आहेत. – विरोधी पक्षांच्या एका गटाकडून ईव्हीएममध्ये “घोळ” (मस्करी) होत असल्याचे आरोप केले जात आहेत, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया:ईव्हीएम हॅक करणे शक्य नसल्याचे ECI ने अनेक वेळा स्पष्ट केले आहे. मशीन्स वेगळ्या प्रणालीवर चालतात, त्यांना ब्ल्यूटूथ/इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसते आणि प्रत्येक ईव्हीएमला VVPAT (व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल) सोबत जोडले जाते, ज्यामुळे पारदर्शकता राखली जाते. निष्कर्ष:सध्या सायबर पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. निवडणूक आयोग आणि सरकार यांनी ईव्हीएम प्रणालीवरील विश्वास राखण्यासाठी पुरावे सादर केले आहेत. तथापि, विरोधकांच्या आरोपांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर सतत चर्चा होत आहे.

EVM Scam: मोठी बातमी! ईव्हीएम हॅकिंगच्या दाव्यावरून मुंबईत एफआयआर Read More »

Mumbai Rape:  महाराष्ट्र हादरला, पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक

Mumbai Rape: बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  माहितीनुसार, पुन्हा एकदा राज्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. मुंबईत एका 21 वर्षीय तरुणाने 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केला आहे. आरोपी तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडितेला भेटला होता. POCSO कायद्याच्या अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल आरोपींनी अल्पवयीन मुलीला अंधेरीतील एका ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिला गुजरातमध्ये नेऊन पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसांनी मुलगी घरी परतली आणि तिने घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला.  मुलीने त्या व्यक्तीचा फोटो इंस्टाग्रामवर दाखवला आणि कुटुंबीयांनी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलम 4, 8 आणि 12 अंतर्गत अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईतील नागपाडा परिसरात आठ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. 

Mumbai Rape:  महाराष्ट्र हादरला, पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक Read More »

Mumbai Hit And Run : मुंबईत हिट अँड रन, भरधाव एसयूव्हीने दोघांना चिरडले, एकाचा मृत्यू

Mumbai Hit And Run :  पुण्यातील कल्याणी नगर परिसरात घडलेल्या हिट अँड रन प्रकरण चर्चेत असताना आता मुंबईत देखील हिट अँड रन प्रकरण घडले आहे.  माहितीनुसार, मुंबईच्या वर्सोवा बीच परिसरात भरधाव एसयूव्हीने दोघांना चिरडले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. 12 ऑगस्टच्या पहाटे गणेश यादव आणि बबलू श्रीवास्तव  वर्सोवा बीचवर झोपले असताना ही घटना घडली. ‘अचानक झोप उडाली’ पोलिसांनी सांगितले की, बबलूच्या डोक्याला आणि हाताला अचानक जोराचा जबर मार लागल्याने तो जागा झाला आणि त्याने पाहिलं की एक भरधाव कार त्याच्या शेजारी झोपलेल्या गणेशला चिरडत होती. या घटनेत बबलूच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर दुखापत होऊन तो बेशुद्ध झाला. पोलिसांनी सांगितले की, कार चालक आणि त्याचा मित्र वाहनातून खाली उतरले, मात्र दोघेही गंभीर जखमी आणि बेशुद्ध असल्याचे पाहून त्यांनी तेथून पळ काढला. सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल यानंतर बबलू आणि गणेशला शहरातील कूपर रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान गणेशचा मृत्यू झाला. कारचालक निखिल जावळे (34) आणि त्याचा मित्र शुभम डोंगरे (33) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली. दोघांवर निर्दयी हत्येचा आरोप आहे. अटकेनंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले, तेथून त्याला 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. घटनेच्या वेळी दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. अलीकडे अनेक अपघात झाले आहेत गेल्या महिन्यात शहरातील वरळी येथे अशाच एका घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर तिचा पती जखमी झाला होता. शिवसेना नेते राजेश शहा (शिंदे गट) यांचा मुलगा मिहीर शाह याने त्यांच्या स्कूटरला बीएमडब्ल्यूने धडक दिली. 22 जुलै रोजी मुंबईत भरधाव वेगात असलेल्या ऑडी कारने दोन ऑटो रिक्षांना धडक दिली, त्यात चालक आणि दोन्ही रिक्षातील दोन प्रवासी जखमी झाले.  त्याचवेळी, 20 जुलै रोजी मुंबईतील आणखी एका घटनेत शहरातील वरळी परिसरात भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यूच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

Mumbai Hit And Run : मुंबईत हिट अँड रन, भरधाव एसयूव्हीने दोघांना चिरडले, एकाचा मृत्यू Read More »