DNA मराठी

Marathi News

ashish chanchlani and elli avram's instagram post created a stir on social media dna marathi

“Finally!” पोस्टमुळे आशीष-एली चर्चेत; प्रेमसंबंध जाहीर की नव्या प्रोजेक्ट हिंट?

मात्र, त्यानंतर आशीष चंचलानी (Ashish Chanchlani)  आणि एली अवराम (Elli AvRam)  यांनी त्यांच्या नात्याबाबत कोणताही खुलासा केला नाही. मुंबई : – प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आशीष चंचलानी (Ashish Chanchlani) आणि अभिनेत्री एली अवराम (Elli AvRam) यांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आशीषने जुलै १२ रोजी इंस्टाग्रामवर एलीसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत केवळ “Finally!” असे लिहिले आहे. हा फोटो आणि त्यावरील शब्द सध्या चर्चेचा विषय ठरले असून त्यावर नेटकऱ्यांमध्ये जोरदार चारच्या सुरु झाली आहे आहे . या पोस्टनंतर सोशल मीडियावर दोघांच्या नात्याविषयी अफवा पुन्हा एकदा गडद झाल्या आहेत. काही चाहत्यांनी याला “प्रेमसंबंधाची अधिकृत कबुली” मानले आहे, तर काहींनी हा नवीन म्युझिक व्हिडीओ, वेब सिरीज किंवा ब्रँड प्रमोशन असण्याची शक्यता वर्तवली आहे. दोघांनी याआधी फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या Elle List Awards इव्हेंटमध्ये एकत्र हजेरी लावली होती. तेव्हापासून त्यांच्यातील मैत्री आणि जवळीक यावर नेटकरी चर्चा करत होते. मात्र, त्यानंतर आशीष चंचलानी (Ashish Chanchlani)  आणि एली अवराम (Elli AvRam)  यांनी त्यांच्या नात्याबाबत कोणताही खुलासा केला नाही. या पोस्टनंतर काही तासांतच Instagram वर लाखोंच्या संख्येने लाईक्स आणि हजारो कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. चाहते “Congratulations”, “Finally together” अशा प्रतिक्रिया देत असून काही बॉलिवूड कलाकारांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एली अवराम ही “मिकी व्हायरस”, “किस किसको प्यार करूं” (“kis kisako pyaar karoon”) या चित्रपटांमधून ओळख मिळवलेली अभिनेत्री असून ती बिग बॉस  (big boss ) च्या एका सिझनमध्येही झळकली होती. आशीष चंचलानी हा युट्यूबवरील एक लोकप्रिय विनोदी कंटेंट क्रिएटर असून त्याचे व्हिडीओ जगभरात पाहिले जातात. सध्या तरी दोघांकडून कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. ही पोस्ट केवळ वैयक्तिक प्रेम व्यक्त करणारी आहे की कोणत्यातरी प्रोजेक्टचा भाग, याविषयी स्पष्टता नसली तरी सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. https://www.instagram.com/p/DL__mwju1Up/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MTBoeGV0cmprajlycA== थोडक्यात  अफवा नव्हे, स्पष्ट संकेत? गेल्या काही महिन्यांपासून आशीष आणि एली अवरामच्या मैत्रीविषयी अनेक चर्चा रंगत होत्या. फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या Elle List या ग्लॅमरस इव्हेंटमध्ये दोघेही एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या अफवा पुन्हा एकदा चर्चेत आल्या. मात्र, त्यानंतर आशीष – एली यांनी कोणताही खुलासा केला नाही. आता जुलै १२ रोजी आशीषने इंस्टाग्रामवर एक रोमँटिक फोटो शेअर केला असून, त्यात दोघेही एकमेकांच्या मिठीत आहेत. पोस्टखाली लिहिलं आहे – “Finally”. या एकाच शब्दाने नेटकऱ्यांना संभ्रमात टाकलं आहे – ही रिलेशनशिपची अधिकृत घोषणा आहे की फक्त एखाद्या नव्या कोलॅबोरेशनची झलक? चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या पोस्टवर काही तासांतच लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत. अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी, शुभेच्छा, आणि ‘कॉन्ग्रॅच्युलेशन्स’चा वर्षाव केला आहे. काही प्रसिद्ध कलाकारांनीही या पोस्टखाली “So happy for you both!”, “Finally Indeed!” अशा कमेंट्स केल्या आहेत. सोशल मीडियावर काही चाहत्यांनी या पोस्टला ‘इंटरनेटवरचं नवीन IT कपल’ असं बिरूद दिलं आहे. ट्विटर आणि इंस्टाग्राम स्टोरीजवर चाहत्यांनी #AshEl आणि #Finally ट्रेंड सुरू केला आहे. काही चाहत्यांनी लग्नाचीही शक्यता बोलून दाखवली आहे. रिलेशनशिप की प्रोफेशनल स्टंट? तथापि, अनेक जाणकार आणि डिजिटल माध्यम तज्ज्ञांचे मत आहे की ही पोस्ट एखाद्या नव्या डिजिटल प्रोजेक्टचा भाग असू शकते — कदाचित म्युझिक व्हिडीओ, वेब सिरीज किंवा ब्रँड कोलॅबरेशन! कारण आशीष चंचलानी ही सोशल मीडियावर सर्जनशील आणि युनिक प्रमोशनल स्टंटसाठी ओळखला जातो. या आधीही अनेक कलाकारांनी त्यांच्या रिलेशनशिपच्या अफवांद्वारे आपल्या आगामी प्रोजेक्ट्सचा प्रचार केला आहे, त्यामुळे काही युझर्स याकडे साशंकतेने पाहत आहेत. कोण आहेत हे दोघे? आशीष चंचलानी हे नाव सोशल मीडियावर नवीन नाही. त्यांच्या विनोदी व्हिडीओज, स्केचेस आणि वेब सिरीज यांमुळे ते घराघरात पोहोचले आहेत. ३० दशलक्षांहून अधिक युट्यूब सब्स्क्राइबर्स असलेला आशीष हा देशातील अग्रगण्य डिजिटल क्रिएटर्सपैकी एक आहे. एली अवराम ही एक स्वीडिश-भारतीय अभिनेत्री असून, “मिकी व्हायरस”, “किस किसको प्यार करूं” यांसारख्या चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बिग बॉस मध्ये भाग घेतल्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. पुढे काय? सध्या तरी या दोघांपैकी कुणीही अधिकृतरित्या रिलेशनशिप जाहीर केलेली नाही. पोस्टवरून हा खरोखर प्रेमाचा स्वीकार आहे की फक्त एखाद्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा भाग — याबाबत स्पष्टता नाही. मात्र सोशल मीडियावरील उत्साह पाहता, या विषयावर अधिक माहिती लवकरच उघड होण्याची शक्यता आहे. एका साध्या “Finally” कॅप्शनने आंतरजालावर एवढी मोठी चर्चा निर्माण होईल, याचा प्रत्यय या पोस्टने दिला आहे. आशीष आणि एली यांच्यात खरंच प्रेम आहे की हा फक्त प्रमोशनल गिमिक आहे, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मात्र, चाहत्यांच्या मनात मात्र ही जोडी घर करून बसली आहे. पुढील अपडेट्सकडे सगळ्यांचे डोळे लागून आहेत!

“Finally!” पोस्टमुळे आशीष-एली चर्चेत; प्रेमसंबंध जाहीर की नव्या प्रोजेक्ट हिंट? Read More »

img 20250712 wa0012

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळ्यात नवे वळण; तालुकास्तरावरील विक्रीसाठी हालचाली

Sawedi land Scam पारनेर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक अधिकाऱ्यांनी यास स्पष्ट नकार दिला Sawedi Land Scam : सावेडी येथील कोट्यवधींचा वादग्रस्त भूखंड घोटाळा प्रकरण आता गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे. सह दुय्यम निबंधक, अहिल्यानगर कार्यालयात खरेदी-विक्री थांबवण्याचे प्रशासनाने पत्र दिल्यानंतर, आता काही मंडळींनी तालुकास्तरावरील कार्यालयांमार्फत व्यवहार करण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील संबंधितांनी पारनेर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक अधिकाऱ्यांनी यास स्पष्ट नकार दिला. कुठल्याही परिस्थितीत हा व्यवहार पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे, सावेडीमधील सर्वे नं. २४५/ब १ (०.७२ हेक्टर) व २४५/ब २ (०.६३ हेक्टर) या एकूण १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाच्या भूखंडावर गेल्या ३५ वर्षांत कोणताही अधिकृत व्यवहार झालेला नाही. मात्र सध्या याच जमिनीवर मोठा व्यवहार करण्याचा अट्टहास सुरू असून, संबंधितांच्या वतीने महसूल विभागावर दबाव आणण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. याच पार्श्वभूमीवर नगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल चौकशी सुरू असून, मंडळ अधिकारी शैलेजा देवकते यांच्याकडे वस्तु निष्ठा अहवाल मागवण्यात आला आहे. तसेच वादी-प्रतिवादींना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. या जमिनीचे कोणतेही व्यवहार चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबवावेत, अशा असे पत्र दक्षिण-१, उत्तर-२ आणि अहिल्यानगर-३ या सह दुय्यम निबंधकांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पोलीस यंत्रणेकडेही या प्रकरणात तक्रार दाखल झाली असून, या संदर्भात पुढील तपास सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तालुकास्तरावरील इतर नोंदणी कार्यालयांतून व्यवहार करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे, यापुढील काळात पोलीस आणि महसूल यंत्रणांची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळ्यात नवे वळण; तालुकास्तरावरील विक्रीसाठी हालचाली Read More »

pawar's ncp has a new president, jitendra awhad's explanation

जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर – जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण

पवारांच्या राष्ट्रवादीत नवा अध्यक्ष ? या चर्चांना स्वतः पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उघडपणे फेटाळून लावले आहे मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात एक नवा पेच निर्माण झाला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अध्यक्षपदावरून राजीनामा दिल्याच्या चर्चा शनिवारी दिवसभर रंगल्या. मात्र, या चर्चांना स्वतः पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उघडपणे फेटाळून लावले आहे. “ही केवळ खोडसाळपणाची अफवा आहे,” असे आव्हाड यांनी स्पष्ट केले. शनिवारी संध्याकाळनंतर विविध माध्यमांवर जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची माहिती झपाट्याने पसरू लागली. अनेकांनी या घडामोडींचा अर्थ पक्षातील अंतर्गत उलथापालथ म्हणून लावायला सुरुवात केली. मात्र, आव्हाड यांनी ट्विट करत सांगितले की, “जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि राहणार. त्यांच्या राजीनाम्याच्या अफवा त्या-त्या मंडळींनी स्वतःसाठी तयार केलेल्या आहेत. पक्षात अशा पद्धतीने निर्णय घेतले जात नाहीत.” दरम्यान, जयंत पाटील यांनी यापूर्वीच (१० जून) पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सूचक विधान केले होते – “नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे.” यामुळेच त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना पुन्हा एकदा बळकटी मिळाली. मात्र, अधिकृतरीत्या त्यांनी कोणताही लेखी राजीनामा दिलेला नाही, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांच्या नावाचीही चर्चा रंगली आहे. ते नवा प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. काही माध्यमांच्या माहितीनुसार, १५ जुलैला या संदर्भात पक्षाकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राजकीय निरीक्षकांचे मतया चर्चांमुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात नेतृत्वबदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे का, यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार गटाच्या तुलनेत आपला पक्ष अधिक तरुण, लढाऊ आणि परिवर्तनशील आहे, हे दाखवण्यासाठी शरद पवार यांच्यासह जयंत पाटील यांचा मार्ग वेगळा आहे का, हा देखील प्रश्न निर्माण होतो. राजीनामा झाला की नाही, याचा निर्णय अधिकृतपणे होईपर्यंत जयंत पाटील यांच्या पुढील वाटचालीकडे राज्यातील राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या तरी पक्षाच्या अधिकृत भूमिकेनुसार, पाटीलच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांचे नेतृत्व अखेर शरद पवारांच्या सल्ल्यानुसारच ठरणार आहे, हे स्पष्ट दिसते.

जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर – जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण Read More »

discussions gain strength after jayant patil's resignation; sangram jagtap

जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर चर्चांना बळ; संग्राम जगताप

“अजित पवार यांच्या गटात आले, तर मनापासून स्वागत” — संग्राम जगताप अहिल्यानगर | प्रतिनिधी – जयंत पाटील बातमी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) NCP अध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे. यावर अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप sangrm Jagtap यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. “जयंत पाटील Jayant Patil, यांचं नाव गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मतदारसंघात घेतलेल्या भेटींमुळेही अनेक शक्यता पुढे आल्या. त्यानंतर त्यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं, मात्र त्यांच्यातील अस्वस्थता कायम राहिली,” असं जगताप यांनी सांगितलं. “माजी महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्री होते, परंतु सरकार पडल्यानंतर त्यांच्या भोवतीच्या चर्चांना वेग आला. आज त्यांनी स्वतःहून राजीनामा सादर केला, यावरून या चर्चांमध्ये काही तथ्य होतं, हे स्पष्ट होतं,” असं मत जगताप यांनी व्यक्त केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, “जर जयंतदादा अजित पवार aajit pawar यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असतील, तर आम्ही सर्वजण त्यांचं मन:पूर्वक स्वागत करू. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला आणि राज्याला निश्चितच फायदा होईल,” असा ठाम विश्वास संग्राम जगताप यांनी व्यक्त केला आहे. जयंत पाटील यांचा पुढील राजकीय निर्णय काय असणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर चर्चांना बळ; संग्राम जगताप Read More »

sawedi plot scam police entry

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळा : पोलिसांची एन्ट्री, महसूल अधिकार्‍यांवर दबावाचं वातावरण

Sawedi land scam  – तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; चौकशी पूर्ण होईपर्यंत व्यवहार स्थगित अहिल्यानगर | प्रतिनिधी Sawedi land scam  – सावेडी येथील वादग्रस्त भूखंड प्रकरणात आता पोलिसांचीदेखील एन्ट्री झाली असून महसूल यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू असून मंडळ अधिकारी शैलेजा देवकते यांनी वादी-प्रतिवादींना नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, या जमिनीचे कोणतेही व्यवहार चौकशी पूर्ण होईपर्यंत होऊ नयेत, अशा सूचनाही सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर (दक्षिण-१, उत्तर-२ आणि अहिल्यानगर-३) यांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. पाचरणे यांनी तक्रार करताना “जमिनीच्या व्यवहारात अडथळे निर्माण केले जात आहेत” असा आरोप केला आहे. त्यामुळे आता प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले असून, चौकशीवर दबाव आणण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. कोण आहेत पाचरणे? या प्रकरणात पाचरणे हे शिरूर तालुक्यातील रहिवासी असून त्यांनीच ही पोलीस तक्रार दिली आहे. त्यांचा दावा आहे की, डायाभाई अब्दुल आजीज यांच्याकडून पारसमल शहा यांनी विकत घेल्याचा दावा केलाय, शहा  यांच्याकडून जनरल मुखत्यारपत्रावरून जमिनीचा व्यवहार पाचरणे यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र, या खरेदी खताच्या कायदेशीरतेवर संशय व्यक्त होत असून त्यावरच संपूर्ण वाद उद्भवला आहे. नेमकं काय आहे प्रकरण? (Sawedi land scam ) सावेडीच्या भूखंड नोंदणी प्रकरणाने नगर शहराला हादरवून सोडले आहे. तीन दशके झोपलेल्या कागदांनी अचानकच ‘जिवंत’ होण्याचा प्रकार समोर आला आहे. सर्वे नंबर २४५/ब १ (०.७२ हेक्टर) आणि २४५/ब २ (०.६३ हेक्टर) असा एकूण १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाचा भूखंड – ज्या जमिनीची ३५ वर्षांपूर्वी कोणतीही व्यवहार प्रक्रिया झाली नाही, ती अचानक नोंदणीसाठी समोर आली, या प्रकरणांमध्ये अजित दादाभाई आणि साजिद दयाभाई यांचे जनरल मुखत्यार म्हणून रमाकांत सोनवणे राहणार स्टेशन रोड अहिल्यानगर यांनी तक्रार केली आहे त्यावरून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे सावेडी भागातील एक भूखंड 1991 मध्ये खरेदी करण्यात आल्याचं खरेदी खत सादर करण्यात आलं आहे. मात्र, तब्बल ३० वर्षांनंतर म्हणजेच २०२५ मध्ये ही नोंद करण्यात आली. त्यात काही बाबी संशयास्पद असून बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी केल्याचा संशय वर्तवला जात आहे. हे लक्षात आल्यानंतर महसूल विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली असून, प्रांताधिकारी सुधीर पाटील अंतिम निर्णय घेईपर्यंत कोणताही व्यवहार होऊ नये, असे पत्र देण्यात आले आहे .

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळा : पोलिसांची एन्ट्री, महसूल अधिकार्‍यांवर दबावाचं वातावरण Read More »

सावेडी जमीन संशयास्पद व्यवहार : गुजरातचे येतात, जमीन घेतात… आणि महाराष्ट्राचे अधिकारी बघ्याची भूमिका घेतात!

अहिल्यानगर – अहिल्यानगर शहरातील नगर-मनमाड रोडवरील सावेडी नाक्याच्या पुढे असलेल्या तब्बल १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाच्या जमिनीच्या ३५ वर्षांनंतर झालेल्या संशयास्पद नोंदणीने सध्या शहरवासीयांमध्ये प्रचंड खळबळ उडवली आहे. हा केवळ एक जमीन व्यवहार नाही, तर प्रशासनातील बेजबाबदारपणा, सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त आणि भ्रष्ट यंत्रणेचे दर्शन घडवणारा प्रकार आहे. सावेडी मधील सर्व्हे नंबर २४५/ब १ आणि २४५/ब २ या जमिनीचे व्यवहार अचानक इतक्या वर्षांनी होणे आणि त्याचे खरेदीखत गुपचूप तयार होणे हेच पुरेसे संशय वाढवणारे आहे. इतक्या मोठ्या व्यवहारासाठी कोणतीही जाहिर सूचना नाही, आणि पारदर्शक प्रक्रियेचा लवलेशही नाही! हाडांचा कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जमिनीवरील जुन्या भिंती पाडल्या जातात आणि नव्या भिंती उभारण्याचे काम झपाट्याने सुरू होते. हे सगळं लोकांच्या नजरेआड करण्याचा केविलवाणा प्रयत्न नाहीतर काय? आणखी गंभीर बाब म्हणजे गुजरातमधून थेट बाहेरील लोक येऊन बांधकाम सुरू करतात आणि स्थानिक प्रशासन मूकदर्शक बनते. प्रांताधिकारी, तहसीलदार, अप्पर तहसीलदार, सर्कल अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे तक्रारी गेल्यानंतरही काम थांबत नाही, उलट वेगाने सुरू राहते. यामागे सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त नसेल तर काय असेल? ९० कोटींपेक्षा जास्त किंमतीची जमीन असे सहज ताब्यात घेतली जात असेल, तर सामान्य नागरिकांनी काय करायचे? या प्रकरणात तत्कालीन तलाठी, सर्कल अधिकारी यांची भूमिका सखोल तपासली गेली पाहिजे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा संभाव्य संगनमतामुळे इतका मोठा गैरव्यवहार झाला असेल, तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. नागरिकांनी आता जागरूक राहून उच्चस्तरीय चौकशीची मागणी जोर धरायला हवी. प्रशासन आणि सरकारने हे लक्षात घ्यायला हवे की, जमिनीवर भूखंडमाफियाचे सावट निर्माण झाले तर विकासाचे स्वप्न नेहमीच उध्वस्त होईल. आणि यात गरीब मारतो.. कोट्यवधींच्या जमिनीच्या लाटणीसाठी एखादा मोठा अनर्थ व्हावा लागेल का, म्हणजे प्रशासन जागे होईल? हा प्रश्न आज प्रत्येक अहिल्यानगरकराच्या मनात खोलवर टोचतो आहे. आता वेळ आली आहे की, पारदर्शक चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि भूमाफियांना पुन्हा अशा प्रकारची हिंमत करता कामा नये, याची व्यवस्था प्रशासनाने करावी. अन्यथा सावेडी प्रकरण हे भविष्यात अशा भूखंड लाटणाऱ्या टोळ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, आणि नागरी हक्कांचा आणि विकासाचा गळा घोटला जाईल, यात शंका नाही.

सावेडी जमीन संशयास्पद व्यवहार : गुजरातचे येतात, जमीन घेतात… आणि महाराष्ट्राचे अधिकारी बघ्याची भूमिका घेतात! Read More »

Ahmednagar News: व्हाट्सअप ग्रुपवर मराठा समाजाची बदनामी, गुन्हा दाखल

Ahmednagar News:  मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण   मिळावा या मागणी करिता आमरण उपोषण सुरू केला आहे. या उपोषणाला समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाकडून 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला अहमदनगर शहरात देखील प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे शेंडी गावातील सरपंच प्रयागा प्रकाश लोंढे यांना गावातील काही लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना कचरा टाकण्याकरीता खड्डा करण्याच्या वादातून घडली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या घटनेला जातीय रंग देऊन लोंढे यांना झालेली मारहाण ही मराठा ओबीसी वादातून झाली असल्याची पोस्ट एका  व्यक्तीने सोशल मीडियावर टाकली.   आता या प्रकरणात तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये रामदास जरांगे यांच्या फिर्यादीवरून कलम 501 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहे.

Ahmednagar News: व्हाट्सअप ग्रुपवर मराठा समाजाची बदनामी, गुन्हा दाखल Read More »

Devendra Fadnavis : छगन भुजबळ यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा! फडणवीस म्हणाले,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच …..

Devendra Fadnavis : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर आता शिंदे सरकारला सर्व बाजूंनी घेरले जात आहे. यातच आता मराठा आरक्षणाच्या निषेधार्थ ओबीसी नेते आणि राज्य सरकारमध्ये मंत्री असणारे छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते भुजबळ यांनीच याचा खुलासा केला आहे. गेल्या वर्षी ओबीसींच्या पहिल्या मेळाव्याला संबोधित करण्याच्या एक दिवस आधी त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 16 नोव्हेंबर 2023 रोजी दोन महिने अगोदर शिंदे सरकारचा राजीनामा दिल्याचा खुलासा ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत मौन बाळगण्यास सांगितले होते, असा दावा भुजबळ यांनी केला. पण जेव्हा लोक मला बडतर्फ करण्याविषयी बोलत आहेत, तेव्हा मी त्यांना सांगू इच्छितो की, मी दोन महिन्यांपूर्वीच राजीनामा दिला आहे. त्यावर प्रथमच प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, भुजबळांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच अधिक माहिती देऊ शकतात. जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला गडचिरोलीत आलेल्या फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भुजबळांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली. भुजबळांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री शिंदेच सांगू शकतील, असं फडणवीस म्हणाले. आज मी एवढेच सांगेन की आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.  भुजबळ यांच्या राजीनाम्याच्या घोषणेने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.  भुजबळांनी मराठा आरक्षण सर्वेक्षणावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. भुजबळ म्हणाले, 360 कोटी रुपये देऊन खोटा रेकॉर्ड तयार केला जात आहे. डेटाशी छेडछाड केली जात आहे. बनावट प्रमाणपत्रे दिली जात आहेत. सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी आरक्षण संपेल. मागासवर्ग आयोगाकडून करण्यात आलेले सर्वेक्षण खोटे आहे. राजीनाम्याबाबत भुजबळ म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलू नका असे सांगितले होते. यावर भुजबळ म्हणाले, “मी यावर गप्प राहिलो, मात्र ओबीसींच्या बाजूने बोलल्याबद्दल भुजबळांना मंत्रिमंडळातून हटवा, असे काही लोक म्हणत आहेत. मी शेवटच्या श्वासापर्यंत ओबीसींसाठी लढणार आहे.”

Devendra Fadnavis : छगन भुजबळ यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा! फडणवीस म्हणाले,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच ….. Read More »

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धमकी…, मातोश्रीवर मोठा हल्ला होणार?

Maharashtra Politics: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर काही लोक मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे.  पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात फोनवरून ही माहिती देण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, मातोश्रीवर हल्ला करण्याबाबत उर्दूमध्ये 4 ते 5 लोक बोलत असल्याचे त्याने स्वतः ऐकले. वृत्तानुसार, महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला  एक फोन आला, ज्यामध्ये असे सांगण्यात आले की काही लोक उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर मोठा हल्ला करणार आहेत. मात्र, फोन करणाऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ‘मुंबईत भाड्याने घर घेणार’ नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने संशयितांचे संपूर्ण संभाषण ऐकल्याचा दावा केला. मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमध्ये 4 ते 5 जण प्रवास करत होते आणि मातोश्रीबाहेर हल्ला करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.  संशयितांचे संभाषण ऐकून त्यांनी तत्काळ महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला फोन केला, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमध्ये 4 ते 5 जण उर्दू भाषेत बोलत होते. ते मुंबईतील भायखळा परिसरातील मोहम्मद अली रोडवर भाड्याने खोली घेणार असल्याचे बोलत होते. या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दुसरीकडे उद्धव गटनेते संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.  राऊत म्हणाले, “मला माहित आहे की फोन करणारे कोण होते… विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी राम मंदिर उडवण्याची धमकी दिली होती. त्यांनी मुस्लिमांची नावे घेतली आणि राम मंदिर उडवण्याची धमकी दिली. या देशात लोकसभा जिंकण्याची भाजपची तयारी आहे किंवा निवडणुकीपूर्वी धार्मिक फूट पाडून निवडणूक लढवा, हे सर्व भाजपचे षडयंत्र आहे. ‘राज्यातील सरकार संशयास्पद’ पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. ते महाराष्ट्र सरकारचे नाही कारण इथे साशंक सरकार आहे. ज्या पद्धतीने ठाकरे कुटुंबीयांची सुरक्षा काढण्यात आली, तशीच शिवसेना नेत्यांची सुरक्षाही काढण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात काही घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार आणि महाराष्ट्राच्या गृहविभागावर असेल.

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धमकी…, मातोश्रीवर मोठा हल्ला होणार? Read More »

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील 21 जानेवारीला अहमदनगर शहरात, जाणुन घ्या संपुर्ण रूट

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता आमरण उपोषणसाठी लवकरच मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल होणार आहे. आरक्षणासाठी पाटील पायी मुंबईला जाणार आहे. या वारीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. पाटील 20 जानेवारी 2024 ला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून या वारीची सुरुवात करणार आहे.  तर अहमदनगर जिल्ह्यात 21 जानेवारी रोजी ही वारी दाखल होणार आहे. जिल्ह्यात या वारीचा मुक्काम बाराबाभळी मदरसा येथे असणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातून या वारीमध्ये तब्बल तीन ते चार लाख लोकांचा सहभाग राहणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली.  ही वारी अहमदनगर शहरातून भिंगार माळीवाडा बस स्टँड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळायला पुष्पहार अर्पण करून केडगाव मार्गे पुणेकडे जाणार आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील 21 जानेवारीला अहमदनगर शहरात, जाणुन घ्या संपुर्ण रूट Read More »