DNA मराठी

Maharashtra Politics

Loksabha Election 2024 : MVA मध्ये जागावाटपाचा तिढा सुटणार? उद्या होणार मोठा निर्णय

Loksabha Election 2024 : देशात येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे सत्ताधारी पक्ष भाजपसह इतर पक्ष देखील जागावाटपाबाबत चर्चा करत आहे.  यातच राज्यात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा येत्या काही दिवसात सुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, उद्या राज्याची राजधानी मुंबईमध्ये जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस  (शरद पवार गट), शिवसेना( ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. याच बरोबर बैठकीसाठी डाव्या पक्षांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत उद्या मतदारसंघनिहाय चर्चा होणार असून जर काही जागांवर सहमती झाली नाही तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत प्रमुख नेत्यांची बैठक होऊन त्यात अंतिम जागावाटप होईल.  तर चर्चांवर विश्वास ठेवला तर महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत 30 जागांचं वाटप झालं आहे. तर उद्या राहिलेल्या 18 जागांवर चर्चा होणार आहे. ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन जागा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला दिली जाणार आहे. तर राजू शेट्टी यांना हातकणंगलेची जागा पवार गटाच्या कोट्यातून मिळण्याची शक्यता आहे.

Loksabha Election 2024 : MVA मध्ये जागावाटपाचा तिढा सुटणार? उद्या होणार मोठा निर्णय Read More »

Ahmednagar News: जय श्रीराम म्हणत अण्णांनी स्वीकारली खा.सुजय विखे यांनी दिलेली साखर भेट

Ahmednagar News: खा.सुजय विखे पाटील यांनी आज राळेगणसिद्धी इथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी खा.सुजय विखे यांनी अण्णा हजारे यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले आणि त्यांना साखर-डाळ किट प्रदान देत सध्या सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. नामदार राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून आणि खा.सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सर्वत्र साखर-डाळ, शिरा गावोगावी नागरिकांना मोफत दिला जात आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिरराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यानिमित्ताने देशभर नागरिकांनी दिवाळी सारखा सण साजरा करावा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.  त्या अनुषंगाने आपण नगर दक्षिणेचे खासदार या नात्याने संपूर्ण मतदारसंघात नागरिकांना मोफत साखर-डाळ शिरा वाटपाचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती खा.विखे यांनी अण्णांना दिली.  किट मध्ये साखर, डाळ, चालू वर्षाचे कॅलेंडर आदी गोष्टी आहेत. अण्णांना सदर किट यावेळी प्रदान करण्यात आले. आण्णा मी अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने माझ्या मतदारसंघातील नागरिकांना दिवाळी सारखा सोहळा साजरा करता यावा यासाठी साखर-डाळ शिरा भेट देत आहे, आपणही माझ्या मतदारसंघात असून माझे मतदार आहात त्यामुळे मी आपली भेट आणि आशीर्वाद घेण्यास आलो आहे असे खा. सुजय विखे यांनी सांगितले. अण्णांनीही यावेळी खा.विखे यांच्या हस्ते दिलेली साखर भेट हसत स्वीकारली. तसेच किटमध्ये काय-काय वस्तू आहेत त्याची उत्सुकतेने पाहणी केली. या अनौपचारिक भेटीत अण्णा हजारे यांनी विखे परिवारातील पद्मश्री विठ्ठलराव विखे, पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या आठवणींना उजाळा दिला. विखे परिवाराला  समाजकारणाची मोठी परंपरा असून पद्मश्री आणि पद्मविभूषण विखे यांनी अनेक विधायक कामे जनतेसाठी केली असल्याचे अण्णांनी यावेळी नमूद केले.  तसेच खा.सुजय विखे यांनी सुरू केलेल्या साखर-डाळ शिदा वाटप उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी  काशिनाथ दाते सर, लाभेश औटी, उद्योजक सुरेश पठारे, गणेश शेळके, राहुल शिंदे आदी उपस्थित होते.

Ahmednagar News: जय श्रीराम म्हणत अण्णांनी स्वीकारली खा.सुजय विखे यांनी दिलेली साखर भेट Read More »

Ahmednagar News:  अयोध्येतील ऐतिहासिक कार्यक्रमाचा आनंद द्विगणित करावा: धनश्री विखे पाटील

Ahmednagar News:  22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना होत आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने आपल्या गावामध्ये वेगवेगळे उपक्रम व आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करून या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा ऐतिहासिक कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा व राम नामाचा जयघोष करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलांनी नियोजन करावे असे आवाहन रणरागिणी मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील यांनी केले. त्या घारगाव ता. श्रीगोंदा येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन आणि साखर वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासमवेत प्रतापसिंह पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. अयोध्यातील प्रभू श्रीरामांच्या मूर्ती स्थापनेच्या ऐतिहासिक दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी घारगाव येथील मारुती मंदिर परिसराची स्वच्छता देखील करण्यात आली. यावेळी रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील यांच्यासह विक्रमसिंह पाचपुते व ग्रामस्थांनी या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला होता.  22 जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना आपल्या गावातील मंदिराची स्वच्छता तसेच सुशोभीकरण करून मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने सर्वांनी ठिकठिकाणी मंदिरांची स्वच्छता केली जात आहे.  आपणही पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध उपक्रम राबवावे असे त्यांनी जनतेला संबोधताना स्पष्ट केले. तसेच आज श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याबद्दल त्यांनी नागरिकांचे मनस्वी आभार मानले व असेच प्रेम आमच्या विखे पाटील परिवारावर कायमस्वरूपी असू देत असे मत व्यक्त केले.

Ahmednagar News:  अयोध्येतील ऐतिहासिक कार्यक्रमाचा आनंद द्विगणित करावा: धनश्री विखे पाटील Read More »

Maharashtra Politics: मुंबईसाठी भाजपचा मास्टर प्लान तयार! शिंदे गटाला मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा

प्रतिनिधी : सय्यद शाकीर  Maharashtra Politics : भारतीय निवडणूक आयोग येत्या काही दिवसात लोकसभा निवडणूक जाहीर करणार आहे. यामुळे आत्तापासूनच सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या तयारीला सुरुवात केली आहे. सर्व पक्ष आता जागा वाटपावरून एकमेकांशी बोलताना दिसत आहे.  तर दुसरीकडे राज्यात आणि केंद्रामध्ये सत्तेत असणारे भारतीय जनता पक्षाने मुंबईसाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भाजप मुंबई सर्वाधिक लोकसभा जागा लढू शकते. यामुळे शिंदे गटाला मुंबईत लोकसभेचे किती जागा मिळणार आता हे पाहावे लागणार आहे.   राज्याची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज्यात बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती अशी थेट लढत होणार आहे. यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील साही जागांवर भाजप शिवसेनेने विजय मिळवला होता मात्र आता मुंबईत ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आणि भाजप अशी लढत होणार आहे. यामुळे भाजपने एक खास प्लॅन रेडी केला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील सहा लोकसभा जागांपैकी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष चार जागांवर निवडणूक लढवू शकते. भाजप उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईसह भाजप दक्षिण मुंबईच्या लोकसभेच्या जागेवर उमेदवार देऊ शकते. जर असं झालं तर शिंदे गटाला फक्त 2 लोकसभा जागा मुंबईमध्ये मिळणार. शिंदे गटाला भाजप उत्तर पश्चिम आणि मुंबई साऊथची जागा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Politics: मुंबईसाठी भाजपचा मास्टर प्लान तयार! शिंदे गटाला मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा Read More »

Maharashtra News: विसापुर प्रकल्पात पाणी सोडण्याचे अजित पवार यांचे आदेश…

Maharashtra News: कुकडी प्रकल्पाचे मागील १५ डिसेंबर पासून आवर्तन सुरु आहे. कुकडीतून विसापुर प्रकल्पातही २१ जानेवारीपासून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती खासदार डाॅ. सुजय विखे यांनी दिली.  याप्रश्नी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे व आमदार बबनराव पाचपुते यांनी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे विसापूर धरणार पाणी सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी दिल्याने ना.विखे आणि आ.पाचपुते यांची शिष्टाई कामी आल्याची माहिती दिली.    डाॅ. विखे यांनी बोलताना विसापुरच्या पाण्याबाबत शेतकऱ्यांची मागणी आहे. पाणी सोडण्याबाबत आमदार बबनराव पाचपुते हे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांच्या वेळोवेळी संपर्कात होते. विसापूर धरणात पाणी सोडण्याबाबत दोघांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली.  त्यानुसार उपमुखमंत्री पवार यांनी येत्या २१ जानेवारीपासून कुकडीच्या सुरु असणाऱ्या आवर्तनातून विसापुर प्रकल्पात पाणी सोडण्याचे आदेश दिले. २१ ते २३ जानेवारी दरम्यान ३०० दशलक्षघनफूट पाणी विसापुरमध्ये सोडण्यात येणार असून त्यानंतर ते लाभधारकांना आवर्तनाद्वारे देण्यात येईल.  त्यामुळे त्याभागातील शेतीचा पाणी प्रश्नही मिटण्यास मदत होणार असल्याचे सांगत विसापूर धरणाखालील घारगाव, बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, चिंभळा, हंगेवाडी , शिरसगाव बोडखा, पिसोरे या गावांसह लाभधारक गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

Maharashtra News: विसापुर प्रकल्पात पाणी सोडण्याचे अजित पवार यांचे आदेश… Read More »

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धमकी…, मातोश्रीवर मोठा हल्ला होणार?

Maharashtra Politics: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर काही लोक मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे.  पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात फोनवरून ही माहिती देण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, मातोश्रीवर हल्ला करण्याबाबत उर्दूमध्ये 4 ते 5 लोक बोलत असल्याचे त्याने स्वतः ऐकले. वृत्तानुसार, महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला  एक फोन आला, ज्यामध्ये असे सांगण्यात आले की काही लोक उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर मोठा हल्ला करणार आहेत. मात्र, फोन करणाऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ‘मुंबईत भाड्याने घर घेणार’ नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने संशयितांचे संपूर्ण संभाषण ऐकल्याचा दावा केला. मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमध्ये 4 ते 5 जण प्रवास करत होते आणि मातोश्रीबाहेर हल्ला करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.  संशयितांचे संभाषण ऐकून त्यांनी तत्काळ महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला फोन केला, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमध्ये 4 ते 5 जण उर्दू भाषेत बोलत होते. ते मुंबईतील भायखळा परिसरातील मोहम्मद अली रोडवर भाड्याने खोली घेणार असल्याचे बोलत होते. या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दुसरीकडे उद्धव गटनेते संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.  राऊत म्हणाले, “मला माहित आहे की फोन करणारे कोण होते… विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी राम मंदिर उडवण्याची धमकी दिली होती. त्यांनी मुस्लिमांची नावे घेतली आणि राम मंदिर उडवण्याची धमकी दिली. या देशात लोकसभा जिंकण्याची भाजपची तयारी आहे किंवा निवडणुकीपूर्वी धार्मिक फूट पाडून निवडणूक लढवा, हे सर्व भाजपचे षडयंत्र आहे. ‘राज्यातील सरकार संशयास्पद’ पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. ते महाराष्ट्र सरकारचे नाही कारण इथे साशंक सरकार आहे. ज्या पद्धतीने ठाकरे कुटुंबीयांची सुरक्षा काढण्यात आली, तशीच शिवसेना नेत्यांची सुरक्षाही काढण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात काही घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार आणि महाराष्ट्राच्या गृहविभागावर असेल.

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धमकी…, मातोश्रीवर मोठा हल्ला होणार? Read More »

Ahmednagar News: व्यवसायिक सल्लाउद्दीन शेख (SS)यांचे कडून जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

Ahmednagar News: वसीम गुलाब शेख ,समीर अब्दुल शेख ,तन्वीर निसार शेख ,आरिफ ईस्माईल कुरेशी हे चारही लोकं आर टी ओ कार्यालय जवळ वाहनाला रेडियम लावण्याचे काम करतात तेथेच सल्लाउद्दीन शेख उर्फ SS पण रेडियम लावण्याचे व्यवसाय करतात. सल्लाउद्दीन शेख उर्फ SS हे वारंवार वरील सगळ्यांना धमकी द्यायचे काम करतात तुम्ही इथे काम करायचे नाही मी येथे 25 वर्षा पासून काम करतो इथे माझा राज चालणार इथे काम करायचा तर माझ्याकडे करायचा नाही तर काम करू देणार नाही तुम्हाला जीवे मारून टाकीन माझे नेटवर्क लई मोठे आहे.  तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अडकवेन माझा कोण काही वाकडं करू शकत नाही पोलिसांबरोबर आणि आर टी ओ बरोबर पण माझे संबंध आहे. राजकारणात पण माझा चांगला वजण आहे. तुम्हाला आयुष्यातून संपून टाकेन अशी धमकी वारंवार दिल्याने वैतागून वरील वसीम गुलाब शेख याने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद 19 एप्रिल 2023 रोजी दिली. या प्रकरणात पोलिसांनी  504,506 प्रमाणे NC दाखल करून घेतले . सल्लाउद्दीन शेख उर्फ SS याने वसीम शेख याला परत रस्त्यात अडवले व सांगितले कि तू जी NC दाखल केली ना त्या NC ने मला काही फरक पडत नाही ते तर बॉण्ड जामीन वर माझा जामीन होऊन जाईल पण मी तुला जिवंत ठेवणार नाही. नंतर काही राजकारणी यांना मध्यस्ती करायला लावून हे वाद मिटवून घेतला परंतु हे वाद मिटलेले असतांना सल्लाउद्दीन शेख उर्फ SS याने 29 डिसेंबर 2023 रोजी परत वसीम गुलाब शेख आणि इतर तिघांना परत जीवे मारण्याची धमकी दिल्याने हे लोक परत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गेले व तेथे सल्लाउद्दीन शेख उर्फ SS याच्यावर  504 , 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Ahmednagar News: व्यवसायिक सल्लाउद्दीन शेख (SS)यांचे कडून जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल Read More »

सनसनाटी आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतः आत्मपरीक्षण करावे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस शेख आरीफ पटेल यांचे प्रत्युत्तर

Ahmednagar News: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुरोगामी विचार आणि सर्व समाज घटकांना एकत्रित बांधण्याचे विचार महाराष्ट्राला तसेच देशाला माहिती आहेत.‌ माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी मागील 45 वर्षांपासून याच विचारांशी एकनिष्ठ राहून शरद पवार यांना साथ दिली आहे.   त्यांच्या वाढदिवसानिमित्त नगरमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, वंचित बहुजन आघाडी, रिपाइं अशा सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना समक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरमधील स्थानिक राजकारणाबाबत एक ज्येष्ठ आणि प्रगल्भ विचारांचे नेते म्हणून दादाभाऊ कळमकर यांनी काही भूमिका मांडली.  त्याचा विपर्यास करून कॉंग्रेसच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ज्यांना अजिबात जनाधार नाही अशा पदाधिकाऱ्यांनी कळमकर यांच्या विषयी पूर्णतः चुकीचे आणि हेतूपुरस्सर गैरसमज निर्माण करणारी भूमिका मांडली.  भाजपच्या विचारसरणीशी कळमकर कधीही जुळवून घेणार नाही हे निर्विवाद सत्य आहे. अशा वेळी केवळ सनसनाटी निर्माण करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने कळमकर यांच्या विषयी चुकीचे पत्रक काढण्यात आहे. त्यांच्या भूमिकेवर कोणीही विश्वास ठेवणार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शेख आरीफ पटेल यांनी व्यक्त केले आहे. शेख आरीफ पटेल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  महाराष्ट्राच्या राजकारणाला यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांमुळे प्रगल्भता आलेली आहे. त्यामुळे राजकीय अथवा वैचारिक विरोधक असला तरी वैयक्तिक पातळीवर एकमेकांशी संवाद, सलोखा कायम राखला जातो. हीच परंपरा आदरणीय दादाभाऊ कळमकर यांनी कायम जतन केली आहे. भाजप काय किंवा कोणत्याही विरोधी पक्षाचे नेते, पदाधिकारी असो दादांनी नेहमीच वैयक्तिक स्तरावर चांगले संबंध ठेवले आहेत व अभिषेक कळमकर सुध्दा तेच तत्व पाळत आहे. दादांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अभिष्टचिंतन केले. त्यावेळी त्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार काही भूमिका मांडली. त्याचा विपर्यास करण्याचं काहीच कारण नाही. परंतु सध्या सनसनाटी वक्तव्य करीत काही जण माध्यमातून हेडलाईन मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. यातून त्यांच्या अर्धवट अभ्यासाची आणि बालिश बुद्वीची प्रचिती येते. आरोप करताना त्यांनी आपल्या राजकीय कोलांट्या उड्यांचा इतिहास तरी आठवायचा. दादाभाऊ कळमकर यांच्या राजकीय, सामाजिक कार्यकीर्दीचि इतिहास पाहिला तर ते कदापिही चुकीच्या विचारसरणीशी तडजोड करणार नाही, हे सर्व समाज घटकांना चांगले माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत गैरसमज निर्माण करून स्वतः चमकोगिरी करणारांनी आधी आरशात पाहून स्वतःच्या निष्ठा कुठं कुठं वाहिल्या हे पाहावे अशी टीका शेख आरीफ पटेल यांनी केली आहे.

सनसनाटी आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतः आत्मपरीक्षण करावे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस शेख आरीफ पटेल यांचे प्रत्युत्तर Read More »

Ahmednagar News: अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची चौकशी करा – AIMIM  जिल्हाध्यक्ष

Ahmednagar News: अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी कर्तव्यात कसूर केले असल्याने यांची चौकशी करून त्यांना निलंबित करा अशी मागणी डॉ परवेज अशरफी,एम आय एम जिल्हाध्यक्ष ,अहमदनगर यांनी पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केली आहे.   त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा गुन्हेगारी आणि जाती दंगलीचा अड्डा झाले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. जेव्हा पासून अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक या पदावर राकेश ओला साहेब यांची नियुक्ती झाली आहे तेव्हा पासून अहमदनगरमध्ये एक दिवस असे गेले नाही त्या दिवशी काही गंभीर गुन्हा झाले नाही.  पोलिस अधीक्षक राकेश ओला साहेब हे आल्यापासून जिल्ह्यात जातीय दंगली, दोन समाजात तेढ निर्माण होऊन दंगली, छोट्याशा कारणाने जातीय दंगली, काही कारण नसतांना मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर हल्ले, मुस्लिम अल्पसंख्यांक समजाच्या धार्मिक स्थळांवर हल्ले, धार्मिक ग्रंथाची विटंबना, मुस्लिम महिलांना खोट्या गुन्ह्यात फसवणे, असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे रोज जिल्ह्यात सरास घडत आहे. चोरी, डकैती, महीलाची छेडछाड, छोटे मोठे गुन्हे हे तर  किरकोळ सारख्या होत आहे. जेव्हा पासून राकेश ओला साहेब अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक पदावर विराजमान झाले तेव्हांपासून अहमदनगर येथील काही जातीवादी आतंकी संघटनेला तसेच सरकारच्या जवळीक संघटनेला कायद्या हातात घेण्याचे  जणूकाही प्रमाण पत्र भेटले.  शेवगाव, राहुरी उंब्रा, राहुरी गुहा, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, अकोला, कर्जत, अहमदनगर शहर या सर्व ठिकाणी मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर अत्याचार करण्यात आले.  एकीकडे जातीवादी आतंकी संघटनेने मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर हल्ले करत आहे आणि दुसरी कडे पोलिस प्रशासनाने ज्या प्रकारे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर गुन्हे दाखल केले जसे सर्व काही पूर्ण नियोजित कट रचण्यात आले आहे. दोन समाजात दंगली झाल्यावर एका समाजावर असे गुन्हे दाखल करायचे की त्यांची ताबडतोब जमीन होईल किंवा न्यायालयात दुसऱ्या दिवशी जामीन होईल आणि त्याच गुन्ह्यात मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर असे गंभीर गुन्हे दाखल करायचे की त्यांची  महिनो जामीन होणार नाही.  आपण अहमदनगर मध्ये झालेल्या सर्व घटनेची चौकशी केली तर आपल्या स्पष्ट दिसेल की पोलिस अधीक्षक साहेब यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग कसे केले आणि आपल्या सोबत पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना कसे चुकीच्या काम करण्याचे आदेश दिले.  अहमदनगर येथील कसूर केलेल्या पोलिस अधिकाऱ्याची चौकशी करण्यात आली असेल तर त्यांनी कितीही गंभीर गुन्हा केले असो, त्यांनी केलेला काम मुस्लिम अल्पसंख्यांक विरोधात केले असेल तर ते कसुरवार नाही किंवा समज देऊन सोडण्यात येते.  याचा उत्तम उदाहरण म्हणजे मागील वर्षी कोटला घास गल्ली येथे दोन समाजात झालेल्या दंगली आणि त्यात त्या वेळची तोफखाना पोलिस निरीक्षक मॅडम यांनी केलेले कार्य हा मुस्लिम अल्पसंख्यांक विरोधी होती.  शेवगाव येथे दर्ग्याचे उर्स दरम्यान कोणताही कारण नसतांना शेवगाव पोलिस निरीक्षक यांनी केलेला लाठीचार्ज. संगमनेर येथे एका जातीवादी संघटनेचा पदाधिकारी आणि एका वृत्तवाहिनीचे संपादक यांनी केलेल्या चीतावनीखोर भाषणं नंतर अकोले येथे झालेल्या एका मुस्लिम अल्पसंख्यांक सामजाच्या तरुणाची हत्या आणि आणि पोलिसांचा मुख्य आरोपी वाचवण्याचा प्रयत्न, राहुरी उंब्रे येथे मुस्लिम धार्मिक स्थळांवर जातीवादी आतंकी संघटनेने हल्ला केल्याने त्या जातीवादी आतंकी संघटनेच्या लोकांना वाचवण्यासाठी फिर्यादीवर दबाव तयार करण्याचा काम पोलिस निरीक्षक यांनी केल्याचे चित्र व त्यांनतर मुस्लिम महीलावर खोटे गुन्हे दाखल करणे.   तसेच राहुरी गुहा गावात काही जातीवादी आतंकी संघटनेच्या लोकांनी मुस्लिम दर्ग्यावर कब्जा करण्याच्या हेतूने बनावट कागदपत्रे तयार करून धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंद केले परंतु सदर दर्गा वक्फ येथे नोंद आहे. तरी देखील पोलिस प्रशासन या जातीवादी संघटनेला पाटबल देत असल्याचे चित्र आहे. गुहा येथील या जातीवादी आतंकी संघटनेच्या लोकांची मजल इतकी झाली की त्यांनी पोलिस अधिकारी, तलाठी,  तहसीलदार यांना हाताशी धरून दर्ग्यामध्ये अनधिकृत मूर्ती बसवली. विशेष म्हणजे या जागेवर कोणतीही धार्मिक विधी करण्याचा न्यायालयाचा मनाई हुकूम असताना पोलिसांच्या मदतीने हा सर्व प्रकार घडला याची कल्पना तातडीने पोलिस अधीक्षक साहेब राकेश ओला यांना दिली तर त्यांनी नेहमी प्रमाणे काहीच केले नाही.  या सर्व बाबी वरून असे दिसते की अहमदनगर पोलिस अधीक्षक साहेब हे  अकार्यक्षम अधिकारी आहे किंवा हे सर्व काही ते अहमदनगरचे पालक मंत्री यांचे आदेशाने करत आहे किंवा पोलिस अधीक्षक राकेश ओला साहेब हे स्वतः या जातीवादी आतंकी संघटनेचे कार्यकर्ते आहे जे पोलिस खात्यात राहून या जातीवादी आतंकी संघटनेला मदत करत आहे. या सर्व बाबींचा आपण घांभिर्यापूर्वक चौकशी करून अहमदनगर पोलिस अधीक्षक राजेश ओला यांच्यावर आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने कारवाई करावी.

Ahmednagar News: अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची चौकशी करा – AIMIM  जिल्हाध्यक्ष Read More »

Mudassar Sheikh : …अन्यथा अंदोलन करण्यात येईल! ‘त्या’ प्रकरणात माजी नगरसेवक मुदस्सर शेख आक्रमक

 Mudassar Sheikh : मुदस्सर शेख माजी नगरसेवक महानगरपालिका अहमदनगर यांनी अहमदनगर जिल्हा अधिकारी निवेदन देऊन ऑनलाइन शिधापत्रिका प्रणाली व्यवस्थित करुन नागरिकांना लाभ मिळून देण्याची मागणी केली आहे.   अहमदनगर अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या गलथ्य कारभारामुळे प्रात्र कुटुंबांना रेशन (धान्य) व आयुष्यमान भारत योजने पासुन वंचित रहावे लागत आहे यामुळे ऑनलाइन शिधापत्रिका प्रणाली व्यवस्थित करुन नागरिकांना लाभ मिळुन द्यावा नाहीतर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.   त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 16 मे 2023 रोजी सामान्य प्रशासन शासन निर्णय अन्वये, ई शिधापत्रिका सुविधा विनामुल्य उपलब्ध करुन देण्याकरीता RCMSmahafood हि प्रणाली उपलब्ध करुन देण्यात आली होती मात्र अन्न धान्य वितरण कार्यालय येथे सदर शासन निर्णयाची अमलबजावणी होत नाही.   जे नागरीक अंत्योदय योजना (AYY), प्राधान्य कुटुंब योजनेचे (PHH) लाभार्थी आहे अश्या नागरीकांचे Public Login वरुन ऑनलाईन प्रकरण सादर करण्यास नागरीकांना शासनाने मुभा करुण दिलेली आहे. तरीही जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर यांनी सहाय्यक पुरवठा अधिकारी कार्यालय येथे DEO Officer प्रत्येकी 3 अधिकारी, Supply Inspector 3 अधिकारी व TFSO 1 अधिकारी दिलेला असुन सदर कार्यालयत वरिल अधिकारी ऑनलाईन शिधापत्रिकाची नोंदणी करत नाही व रास्त भाव दुकानदार किंवा सेतु कार्यालय येथे पाठतात.  यामुळे नागरिकांची खुप पळापळ होत आहे. जे नागरिक प्राधान्य कुटुंब यांजनाचे लाभार्थी साठी कागदपत्राची पुरतता करतील तर त्यांना PHH योजनेचा लाभ द्यावा कारण PHH योजनेचे शिधापत्रिकाचे नाव हे आयुष्यमान भारत योजने मध्ये येत आहे. यामुळे सदर प्रणाली व्यवस्तीत चालवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा अंदोलन करण्यात येईल.

Mudassar Sheikh : …अन्यथा अंदोलन करण्यात येईल! ‘त्या’ प्रकरणात माजी नगरसेवक मुदस्सर शेख आक्रमक Read More »