Ahmednagar News: अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी कर्तव्यात कसूर केले असल्याने यांची चौकशी करून त्यांना निलंबित करा अशी मागणी डॉ परवेज अशरफी,एम आय एम जिल्हाध्यक्ष ,अहमदनगर यांनी पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा गुन्हेगारी आणि जाती दंगलीचा अड्डा झाले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. जेव्हा पासून अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक या पदावर राकेश ओला साहेब यांची नियुक्ती झाली आहे तेव्हा पासून अहमदनगरमध्ये एक दिवस असे गेले नाही त्या दिवशी काही गंभीर गुन्हा झाले नाही.
पोलिस अधीक्षक राकेश ओला साहेब हे आल्यापासून जिल्ह्यात जातीय दंगली, दोन समाजात तेढ निर्माण होऊन दंगली, छोट्याशा कारणाने जातीय दंगली, काही कारण नसतांना मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर हल्ले, मुस्लिम अल्पसंख्यांक समजाच्या धार्मिक स्थळांवर हल्ले, धार्मिक ग्रंथाची विटंबना, मुस्लिम महिलांना खोट्या गुन्ह्यात फसवणे, असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे रोज जिल्ह्यात सरास घडत आहे. चोरी, डकैती, महीलाची छेडछाड, छोटे मोठे गुन्हे हे तर किरकोळ सारख्या होत आहे.
जेव्हा पासून राकेश ओला साहेब अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक पदावर विराजमान झाले तेव्हांपासून अहमदनगर येथील काही जातीवादी आतंकी संघटनेला तसेच सरकारच्या जवळीक संघटनेला कायद्या हातात घेण्याचे जणूकाही प्रमाण पत्र भेटले.
शेवगाव, राहुरी उंब्रा, राहुरी गुहा, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, अकोला, कर्जत, अहमदनगर शहर या सर्व ठिकाणी मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर अत्याचार करण्यात आले.
एकीकडे जातीवादी आतंकी संघटनेने मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर हल्ले करत आहे आणि दुसरी कडे पोलिस प्रशासनाने ज्या प्रकारे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर गुन्हे दाखल केले जसे सर्व काही पूर्ण नियोजित कट रचण्यात आले आहे. दोन समाजात दंगली झाल्यावर एका समाजावर असे गुन्हे दाखल करायचे की त्यांची ताबडतोब जमीन होईल किंवा न्यायालयात दुसऱ्या दिवशी जामीन होईल आणि त्याच गुन्ह्यात मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर असे गंभीर गुन्हे दाखल करायचे की त्यांची महिनो जामीन होणार नाही.
आपण अहमदनगर मध्ये झालेल्या सर्व घटनेची चौकशी केली तर आपल्या स्पष्ट दिसेल की पोलिस अधीक्षक साहेब यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग कसे केले आणि आपल्या सोबत पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना कसे चुकीच्या काम करण्याचे आदेश दिले.
अहमदनगर येथील कसूर केलेल्या पोलिस अधिकाऱ्याची चौकशी करण्यात आली असेल तर त्यांनी कितीही गंभीर गुन्हा केले असो, त्यांनी केलेला काम मुस्लिम अल्पसंख्यांक विरोधात केले असेल तर ते कसुरवार नाही किंवा समज देऊन सोडण्यात येते.
याचा उत्तम उदाहरण म्हणजे मागील वर्षी कोटला घास गल्ली येथे दोन समाजात झालेल्या दंगली आणि त्यात त्या वेळची तोफखाना पोलिस निरीक्षक मॅडम यांनी केलेले कार्य हा मुस्लिम अल्पसंख्यांक विरोधी होती.
शेवगाव येथे दर्ग्याचे उर्स दरम्यान कोणताही कारण नसतांना शेवगाव पोलिस निरीक्षक यांनी केलेला लाठीचार्ज. संगमनेर येथे एका जातीवादी संघटनेचा पदाधिकारी आणि एका वृत्तवाहिनीचे संपादक यांनी केलेल्या चीतावनीखोर भाषणं नंतर अकोले येथे झालेल्या एका मुस्लिम अल्पसंख्यांक सामजाच्या तरुणाची हत्या आणि आणि पोलिसांचा मुख्य आरोपी वाचवण्याचा प्रयत्न, राहुरी उंब्रे येथे मुस्लिम धार्मिक स्थळांवर जातीवादी आतंकी संघटनेने हल्ला केल्याने त्या जातीवादी आतंकी संघटनेच्या लोकांना वाचवण्यासाठी फिर्यादीवर दबाव तयार करण्याचा काम पोलिस निरीक्षक यांनी केल्याचे चित्र व त्यांनतर मुस्लिम महीलावर खोटे गुन्हे दाखल करणे.
तसेच राहुरी गुहा गावात काही जातीवादी आतंकी संघटनेच्या लोकांनी मुस्लिम दर्ग्यावर कब्जा करण्याच्या हेतूने बनावट कागदपत्रे तयार करून धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंद केले परंतु सदर दर्गा वक्फ येथे नोंद आहे.
तरी देखील पोलिस प्रशासन या जातीवादी संघटनेला पाटबल देत असल्याचे चित्र आहे. गुहा येथील या जातीवादी आतंकी संघटनेच्या लोकांची मजल इतकी झाली की त्यांनी पोलिस अधिकारी, तलाठी, तहसीलदार यांना हाताशी धरून दर्ग्यामध्ये अनधिकृत मूर्ती बसवली. विशेष म्हणजे या जागेवर कोणतीही धार्मिक विधी करण्याचा न्यायालयाचा मनाई हुकूम असताना पोलिसांच्या मदतीने हा सर्व प्रकार घडला याची कल्पना तातडीने पोलिस अधीक्षक साहेब राकेश ओला यांना दिली तर त्यांनी नेहमी प्रमाणे काहीच केले नाही.
या सर्व बाबी वरून असे दिसते की अहमदनगर पोलिस अधीक्षक साहेब हे अकार्यक्षम अधिकारी आहे किंवा हे सर्व काही ते अहमदनगरचे पालक मंत्री यांचे आदेशाने करत आहे किंवा पोलिस अधीक्षक राकेश ओला साहेब हे स्वतः या जातीवादी आतंकी संघटनेचे कार्यकर्ते आहे जे पोलिस खात्यात राहून या जातीवादी आतंकी संघटनेला मदत करत आहे.
या सर्व बाबींचा आपण घांभिर्यापूर्वक चौकशी करून अहमदनगर पोलिस अधीक्षक राजेश ओला यांच्यावर आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने कारवाई करावी.