Dnamarathi.com

Loksabha Election 2024 : देशात येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे सत्ताधारी पक्ष भाजपसह इतर पक्ष देखील जागावाटपाबाबत चर्चा करत आहे. 

यातच राज्यात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा येत्या काही दिवसात सुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, उद्या राज्याची राजधानी मुंबईमध्ये जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस  (शरद पवार गट), शिवसेना( ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. याच बरोबर बैठकीसाठी डाव्या पक्षांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत उद्या मतदारसंघनिहाय चर्चा होणार असून जर काही जागांवर सहमती झाली नाही तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत प्रमुख नेत्यांची बैठक होऊन त्यात अंतिम जागावाटप होईल.

 तर चर्चांवर विश्वास ठेवला तर महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत 30 जागांचं वाटप झालं आहे. तर उद्या राहिलेल्या 18 जागांवर चर्चा होणार आहे.

ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन जागा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला दिली जाणार आहे. तर राजू शेट्टी यांना हातकणंगलेची जागा पवार गटाच्या कोट्यातून मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *