DNA मराठी

Maharashtra Politics

ashish shelar

Ashish Shelar : राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर, आशिष शेलार यांच्याकडून पुरस्कार प्राप्त कलाकरांचे अभिनंदन

Ashish Shelar : कलेच्या विविध क्षेत्रात प्रतिवर्षी नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन, कलादान, प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक, लोकनृत्य, लावणी/संगीतबारी,भारुड/विधीनाटय, वाद्यनिर्मिती, झाडीपटटी, खडीगंमत, दशावतार, नमन खेळे, वहीगायन, दुर्मिळ प्रयोगात्मक कला, प्रयोगात्मक कलेशी संबधित संस्था, ध्वनीतंत्रज्ञ, संगीत संयोजन, व्हाईस ओव्हर या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केलेली आहे, अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले. ज्येष्ठ पुरस्कार तीन लाख रुपये, युवा पुरस्कार एक लाख रुपये, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. हे सर्व पुरस्कार लवकरच मुंबई येथे सर्व कलाकारांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारर्थींची नावे पुढील प्रमाणे. ज्येष्ठ पुरस्कार नाटक – अरुण कदम (2025), कंठसंगीत – धनंजय जोशी (2025), वाद्यसंगीत – विजय चव्हाण (2025), मराठी चित्रपट – शिवाजी लोटन पाटील (2025), उपशास्त्रीय संगीत- उदय भवाळकर (2025), किर्तन/समाजप्रबोधन- गहिनीनाथ ज्ञानेश्वर औसेकर महाराज (2025), तमाशा- कोंडीराम आवळे (2025), शाहिरी- शाहिर मधुकर मोरे (2025), नृत्य- श्रीमती रंजना फडके (2025), लोककला- हरिभाऊ वेरुळकर (2025), आदिवासी गिरीजन – रायसिंग हिरा पाडवी (2025), कलादान- चंद्रकांत घरोटे (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- प्रा. आनंद गिरी (2024), संजीव भागवत (2025), लोकनृत्य- सुभाष नकाशे (2024), अरविंद राजपूत (2025), लावणी संगीतबारी- श्रीमती शकुंतला नगरकर (2024), श्रीमती कल्पना जावळीकर ( 2025), भारुड/विधीनाट्य/गौळण- श्रीमती पदमजा कुलकर्णी (2024), श्रीमती गोदावरी मुंडे (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार- युसुफ घडूलाल मुल्ला (2024), भालेराव नागोराव दडांजे (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- रामदास चौधरी (2024), बुधा भलावी (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन- ओमप्रकाश यशवंत चव्हाण (2024), भानुदास शंभा सावंत (2025), दुर्मिळ प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था- धर्मा कांबळे (2024), श्रीमती साखराबाई टेकाळे (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरीटेबल ट्रस्ट (2025), तांबवेश्वर शाहिरी कलापथक (तुकाराम ठोंबरे), बीड (2024), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार- अविनाश ओक (2024), महेश अंबेरकर (2025), संगीत संयोजन- अमर हळदीपूर (2024), कमलेश भडकमकर (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- अंबरीश मिश्र (2024), उदय सबनीस (2025) युवा पुरस्कार नाटक – तेजश्री प्रधान (2024), भूषण कडू (2025), कंठसंगीत- धनंजय म्हसकर (2024), मयुर सुकाळे (2025), वाद्यसंगीत- ऋषिकेश जगताप (2024), वरद कठापूरकर (2025), मराठी चित्रपट- मधुरा वेलणकर (2024), शंतनु रोडे (2025), उपशास्त्रीय संगीत- राहुल देशपांडे (2024), भाग्येश मराठे (2025), किर्तन/समाजप्रबोधन- जयवंत बोधले (2024), ज्ञानेश्वर माऊली कदम ( 2025), तमाशा- नितीन बनसोडे (2024), अमृता थोरात (2025) शाहिरी- शाहिर आझाद नाईकवडी (2024) शाहिरा अनिता खरात (2025), नृत्य- वृषाली दाबके (2024), संतोष भांगरे (2025), लोककला- संदिप पाल महाराज (2024), चेतन बेले (2025), आदिवासी गिरीजन- साबूलाल बाबूलाल दहिकर (2024), गंगुबाई चांगो भगत (2025) कलादान- श्रीमती कस्तुरी देशपांडे (2024), सिध्देश कलिंगण (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- खंडुराज गायकवाड (2024), तेजस्विनी आचरेकर (2025), लोकनृत्य- दिपक बीडकर (2024), गणेश कांबळे (2025), लावणी संगीतबारी- प्रमिला लोदगेकर ( 2024), वैशाली वाफळेकर (2025), भारुड/विधीनाट्य/गौळण- हमीद सय्यद (2024), रामानंद उगले (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार- उमा शंकर दाते (2024), सर्वजीत विष्णू पोळ (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- मुकेश देशमुख (2024), दुधराम परसराम कावळे (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन- लक्ष्मीकांत नाईक (2024), रामकृष्ण कैलास घुळे (2025), दुर्मिल प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था- रेणुका शेंडगे जेजूरीकर (2024), प्रसाद गरुड (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- सव्यसाची गुरुकुलम लखन जाधव (2024), इतिहासाचे अबोल साक्षिदार बहुउद्देशिय ट्रस्ट (निलेश सकट) (2025), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार- प्रणाम पानसरे (2024), विराज भोसले (2025), संगीत संयोजन- अनुराग गोडबोले (2024), अमित पाध्ये (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- मेघना एरंडे (2024), समिरा गुजर(2025). सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी अभिनंदन केले आहे.

Ashish Shelar : राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर, आशिष शेलार यांच्याकडून पुरस्कार प्राप्त कलाकरांचे अभिनंदन Read More »

pune crime

Maharashtra Crime: मद्यार्क चोरी प्रकरण, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 1 कोटी किमतीचा मुद्देमाल जप्त

Maharashtra Crime : राज्य उत्पादन शुल्क विभाग, विभागीय भरारी पथक, पुणे यांनी सापळा रचून टँकरद्वारे मद्यार्काची चोरी व तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत दोन टँकरांसह एकूण रुपये 1 कोटी 19 लाख 4 हजार 500 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 25 नोव्हेंबर रोजी भोर तालुका, निगडे गाव हद्दीतील सातारा–पुणे महामार्गावर हॉटेल चौधरी पॅलेस, राजस्थानी प्युअर व्हेज मागील मोकळ्या जागेत करण्यात आली. मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला असता, अशोक लेलॅण्ड कंपनीचे 16 चाकी टँकर क्र. एमएच-12 वायबी-9186 मधून 39,800 लि. मद्यार्क व एमएच-12 युएम-9887 मधून 39,800 लि. मद्यार्क हे दोन्ही टँकर संशयास्पदरीत्या थांबले व चालकांनी प्लास्टिक पाईपद्वारे मद्यार्क बाहेर काढण्यास सुरुवात केली. पथकाने तत्काळ छापा टाकताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. योवळी 200 लिटर क्षमतेचे दोन ड्रम – प्रत्येकी 180 लि. मद्यार्क, 35 लिटर कॅन – 35 लि. मद्यार्क, 20 लिटर प्लास्टिक बादली – 20 लि. मद्यार्क, रिकामे ड्रम, कॅन, पाईप, नरसाळे, पक्कड इत्यादी साहित्य असे 79 हजार 600 साहित्यासह एकूण रुपये 1 कोटी 19 लाख 4 हजार 500 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन्ही टँकर चालक, टँकर मालक, संबंधित आसवणी व्यवस्थापक तसेच ज्ञात/अज्ञात आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65(अ)(ई), 67, 81, 83, 90 व 103 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Maharashtra Crime: मद्यार्क चोरी प्रकरण, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 1 कोटी किमतीचा मुद्देमाल जप्त Read More »

hemant patil

Hemant Patil on Ashok Chavan : भाजप सेनेची युती तुटण्यास अशोक चव्हाण कारणीभूत; हेमंत पाटलांचा गंभीर आरोप

Hemant Patil on Ashok Chavan : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. महायुतीमधील अनेक पक्ष या निवडणुकीत स्वयंबळावर निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकीत युती तुटल्याने शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांनी थेट अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. मी म्हणेल तसेच जिल्ह्याने चालावे, या भूमिकेमुळेच चव्हाण यांनी युती तोडली, असा आरोप पाटील यांनी केला. शिवसेनेच्या आमदारांनी 60-20 टक्के जागा वाटपाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे जिल्ह्यातील तीनही आमदार यांनी दोन वेळा चव्हाण यांची भेट घेतली, पण त्यांनी जागा देण्यास नकार दिला. पैशाच्या जोरावर कार्यकर्ते आणि पक्ष संपवण्याचा प्रयोग नांदेडमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा गंभीर आरोपही हेमंत पाटील यांनी केला आहे. मोठ्या निवडणुकांसाठी युती करायची आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत युती तोडायची, ही पद्धत चुकीची असल्याचे मत त्यांनी मांडले. तर दुसरीकडे राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

Hemant Patil on Ashok Chavan : भाजप सेनेची युती तुटण्यास अशोक चव्हाण कारणीभूत; हेमंत पाटलांचा गंभीर आरोप Read More »

img 20251125 wa0001

प्रतीक्षा संपणार, Bigg Boss Marathi 6 लवकरच कलर्स मराठीवर आणि JioHotstar वर!

Bigg Boss Marathi : मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो  बिग बॉस मराठीचा सहावा सीझन  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता बिग बॉसच्या घराचा दरवाजा पुन्हा उघडणार आणि एंटरटेनमेंटचा बार पुन्हा उडणार. प्रत्येक वर्षीप्रमाणे प्रेक्षकांच्या मनात हजारो प्रश्न घोळू लागले आहेत. यंदाचा USP काय असेल? थीम काय असेल? सदस्य कोण असतील? घर कसे असेल? यंदाचा गेम प्लॅन काय असणार? आणि बरंच काही. तसेच यावेळेस सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजे रितेश देशमुख करणार का? भाऊचा कट्टा पुन्हाएकदा घराघरात पाहायला मिळणार का ? या सर्व प्रश्नांमुळे बिग बॉसच्या पुनरागमनाची वारे सगळीकडे वाहू लागले आहेत. कलर्स मराठीकडून सादर करण्यात आलेल्या खास टीझरमध्ये प्रेक्षकांना यंदाच्या सीझनच्या थीमचा सर्वात महत्त्वाचा संकेत मिळाला तो म्हणजे दरवाजा. या वेळी एक नाही तर अनेक दरवाजे असणार आहेत. यावेळेसचा खेळ अजूनच धमाकेदार होणार आहे. या वर्षीच्या बिग बॉस मराठी सिझन 6 च्या टीझरमध्ये एकाच दाराऐवजी अनेक दरवाजे दिसतात, आणि याच क्षणी प्रेक्षकांची उत्सुकता क्षणात वाढते. खरं काहीच उघड न करता टीझर प्रेक्षकांना थेट गुंतवून ठेवतो. दारांमधून येणारा प्रकाश, त्यांची अनोखी रचना आणि रहस्यमय वातावरण हे फक्त एकच सांगतं या सीझनमध्ये काहीतरी खूप वेगळं घडणार आहे. सध्या या सिझनबद्दलची सर्व माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून ती लवकरच उलगडणार आहे. सदस्यांची नावे, घराची पहिली झलक, थीमची अधिकृत घोषणा आणि या वर्षीचे मोठे ट्विस्ट हे सर्व लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहेत. महाराष्ट्रभर पुन्हा एकदा “Bigg Boss आदेश देत आहेत!” हा आवाज घुमण्याच्या तयारीत आहे आणि मनोरंजनाचा बाप बिग बॉस मराठी सिझन 6 लवकरच परततोय फक्त कलर्स मराठीवर आणि JioHotstar वर!

प्रतीक्षा संपणार, Bigg Boss Marathi 6 लवकरच कलर्स मराठीवर आणि JioHotstar वर! Read More »

anagar nagar panchayat

Anagar Nagar Panchayat : अजित पवारांना चॅलेंज करावं, एवढी बाळराजेची लायकी नाही; उमेश पाटील भडकले

Anagar Nagar Panchayat : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत असणारी अनगर नगरपंचायत आता बिनविरोध झाली आहे. मात्र राजकारण काही थांबताना दिसत नाही. अजित पवारांना चॅलेंज करावं, एवढी बाळराजेची लायकी नाही अशी टीका उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, सोलापूर यांनी केली आहे. अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्यानंतर माजी आमदार राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी जल्लोष साजरा करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिला होता मात्र त्यानंतर जाहीर माफी देखील मागितली होती. तर आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हाध्यक उमेश पाटील यांनी बाळराजे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना उमेश पाटील म्हणाले की, अजित पवारांना चॅलेंज करावं याची एवढी लायकी नाही, सार्वजनिक जीवनात निवडणुकीच्या माध्यमातून चॅलेंज करायचं असतं त्यामुळे निवडणुका आल्यानंतर चॅलेंज कर आता अशा पोकळ चॅलेंज करू नका. अनगर नगरपंचायत बिनविरोध झाली म्हणून बाळराजे पाटील नाचतोय मात्र ही नगरपंचायत कोणी दिली..? त्यावेळेस अनगर ग्रामपंचायतीची नगरपंचायत करा, अशा पद्धतीची मागणी करण्यासाठी अजित पवारांकडे बाळराजे गेला होता. ज्या वेळेला यांच्या बँकेकडे पैसे नव्हते, त्यावेळेला अजित पवार यांच्याकडे राजन पाटील आणि बाळराजे पाटील हे भीक मागत गेले होते अशी टीका उमेश पाटील यांनी केली. तर दुसरीकडे आज अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे अर्ज माघार घेणार आहे. अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे अर्ज माघार घेणार आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे होत्या. मात्र त्यांच्या अर्जावर सूचकाची सही नव्हती त्यामुळे मी आक्षेप घेतला त्याचबरोबर माझा अपक्ष उमेदवारी अर्ज वैध ठरला असला, तरी मी निवडणुकीतून माघार घेणार आहे आम्ही राजन पाटलांचीच माणसं आहोत, त्यांच्या विचारानेच काम करतो. अर्ज माघारी घेणार आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Anagar Nagar Panchayat : अजित पवारांना चॅलेंज करावं, एवढी बाळराजेची लायकी नाही; उमेश पाटील भडकले Read More »

girish mahajan

Girish Mahajan : गिरीश महाजनांनी चक्र फिरवली पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध

Girish Mahajan : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या जामनेर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच भाजपाचे सहा नगरसेवकदेखील बिनविरोध निवडून आले आहेत. जामनेर नगरपालिका निवडणुकीत माघारीच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेले तीनही अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून साधना महाजन यांनी, तर महाविकास आघाडीकडून रूपाली ललवाणी, प्रतिभा झाल्टे आणि सरिता बोरसे यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र तिन्ही उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली. नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीबद्दल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत राज्यातील एकूण तीन नगरपालिकांमध्ये भाजपचे तीन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बिनविरोध निवडणून आले आहे.

Girish Mahajan : गिरीश महाजनांनी चक्र फिरवली पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध Read More »

img 20251120 wa0007

सहकाराची परंपरा, नेतृत्वाचा वारसा : राष्ट्रपतींच्या गौरवात उमटलेली विखे घराण्याची तीन पिढी

Vikhe Patil – महाराष्ट्राच्या सहकार चळवळीची वाटचाल सांगताना काही नावे अनिवार्यपणे उच्चारावी लागतात. त्यांमध्ये सर्वात प्रखर ठसा उमटवलेले नाव म्हणजे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील. सहकार म्हणजे केवळ आर्थिक संघटना नव्हे, तो ग्रामीण समाजाचा विकासमार्ग आहे, ही भूमिका ज्या व्यक्तींनी आपल्या कामाने सिद्ध केली त्यापैकी अग्रगण्य व्यक्तिमत्त्व हेच. आज, जेव्हा त्यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांना वेगवेगळ्या कालखंडात भारताच्या राष्ट्रपतींकडून गौरव मिळाला आहे, तेव्हा हा प्रवास केवळ एका घराण्याचा नाही. तर महाराष्ट्रातील ग्रामीण नेतृत्व, सहकार आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या सातत्याचा दस्तऐवज ठरतो. पहिली पायाभरणी- विठ्ठलराव विखे पाटील यांचे राष्ट्रपतींकडून झालेले पहिले गौरव 1950 च्या दशकात भारत स्वराज्याच्या पहिल्या श्वासांसोबत पुढे जात असताना ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया अस्थिर होता. शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मध्यस्थांची पकड होती, कर्जपुरवठ्याची व्यवस्था बळकट नव्हती. त्याच काळात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे रूपच बदलले. हे केवळ एका उद्योगाची कथा नव्हती ही होती शेतकऱ्याला उद्योगाचा ‘हिस्सेदार’ बनवण्याची नवचेतना. त्यामुळेच देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना पद्मश्री देऊन गौरवताना सहकार चळवळीच्या मूलभूत मूल्यांना मान्यता दिली. आजही हा पुरस्कार केवळ सन्मान नसून भारतीय सहकाराच्या क्रांतिकारी युगाची सुरुवात मानला जातो. नवी वाटचाल बाळासाहेब विखे पाटील यांचे राष्ट्रीय योगदान सहकाराच्या घराण्यात जन्मलेल्या बाळासाहेब विखे पाटील यांनी राजकारण, शिक्षण आणि सहकार या त्रिसूत्रीला वेगळा आयाम दिला. सहकार क्षेत्राचा विस्तार, शिक्षणसंस्थांची उभारणी आणि ग्रामीण भागातील सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास ही त्यांची प्रमुख कामगिरी. 2010 मध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी दिलेला पद्मभूषण हा पुरस्कार राज्य आणि केंद्राच्या धोरणनिर्मितीत त्यांच्या प्रभावी योगदानाची दखल होता. हेही लक्षात घ्यावे लागेल की बाळासाहेब विखे यांचे कार्य केवळ सहकारपुरते मर्यादित राहिले नाही. तर ग्रामीण समाजातील सामाजिक भान आणि प्रशासकीय दूरदृष्टीचा एक नमुना म्हणून ते राष्ट्रीय नेतृत्वात स्वीकारले गेले. समकालीन परंपरा – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जलव्यवस्थापन आजच्या महाराष्ट्रात सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे पाणी. हवामानबदल, वाढती मागणी, सिंचनातील असमानता आणि जलसंपत्तीचे अव्यवस्थापन यांमधून मार्ग शोधताना परिणामकारक प्रशासन, वैज्ञानिक धोरणे आणि जलसाक्षरता हे तीन घटक महत्त्वाचे ठरतात. 2024 मध्ये केंद्र सरकारने जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून दिलेला “बेस्ट स्टेट कॅटेगरी” राष्ट्रीय पुरस्कार हा या व्यापक बदलांचा सरकारी शिक्का आहे. हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देण्यात आला. या सन्मानाचा स्वीकार राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हा पुरस्कार व्यक्तीगत कामगिरीचा नसून संपूर्ण विभागाच्या कार्यक्षमतेचा राष्ट्रीय पुरावा आहे, आणि विखे पाटील यांच्या नेतृत्वातील धोरणात्मक स्थिरतेचे प्रतीकही. एकाच कुटुंबाच्या तीन पिढ्या — महाराष्ट्राची सहकार परंपरा जगाच्या नकाशावर एका घराण्याच्या तीन पिढ्यांना राष्ट्रपतींकडून सन्मान मिळणे, हे अपवादात्मक आहे. पण या सन्मानांमागे घराणेशाही नसून सातत्यपूर्ण समाजकार्य, सहकार विचारांची परंपरा आणि ग्रामीण विकासाचे अधिष्ठान आहे. डॉ. विठ्ठलराव – सहकाराची क्रांती बाळासाहेब – सहकार + शिक्षण + राजकीय नेतृत्व राधाकृष्ण – आधुनिक प्रशासन, जलव्यवस्थापन, तंत्रज्ञानाधारित धोरण ही परंपरा एका घराण्यापुरती मर्यादित नसून महाराष्ट्राच्या ग्रामीण समाजशास्त्राचा आराखडा ठरते. विखे पाटील कुटुंबाच्या तीन पिढ्या हे सिद्ध करतात की विकास हा योगायोग नसतो तो दृष्टिकोन, कष्ट आणि मूल्ये यांची सलग परंपरा असते. आज जेव्हा महाराष्ट्र जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर पहिले स्थान मिळवतो, तेव्हा या परंपरेची बाजू अजूनही मजबूत असल्याचे दिसते. राजकीय मतभेद असोत वा सहकारातील नवनवे आव्हान महाराष्ट्राची ग्रामीण परिवर्तनाची गाथा लिहिताना विखे पाटील कुटुंबाचा उल्लेख अपरिहार्य राहणार आहे. सन्मान ही केवळ मानाची पाऊलवाट नाही तर ग्रामीण भागाचा आत्मविश्वास वाढवणारी प्रेरणा आहे. ही परंपरा पुढच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरावी, हीच आजच्या संपादकीयाची मुळ भूमिका.

सहकाराची परंपरा, नेतृत्वाचा वारसा : राष्ट्रपतींच्या गौरवात उमटलेली विखे घराण्याची तीन पिढी Read More »

oplus 16908288

Maharashtra Government : मोठी बातमी! राज्यात आयएएस बदल्यांची फेरबदल; पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

Maharashtra Government: राज्य सरकारने मोठा निर्णय घेत आयएएस अधिकाऱ्यांचा फेरबदल जाहीर केला आहे. प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी तसेच महत्त्वाच्या विभागांना नवे नेतृत्व देण्यासाठी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची विविध वजनदार पदांवर बदली करण्यात आली आहे. शासनाने जारी केलेले आदेश तत्काळ लागू झाले असून, आगामी काळात अनेक धोरणात्मक निर्णयांवर या फेरबदलाचा परिणाम दिसून येणार आहे. कोणत्या अधिकाऱ्यास कोणती नवी जबाबदारी? राहुल रंजन माहीवाल यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फार्मिंग कॉर्पोरेशन, पुणे येथे नियुक्ती झाली आहे. प्रकाश खापले, जे आयुक्त – मृदा व जलसंधारण, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत होते, त्यांची बदली करून व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ, मुंबई येथे नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. मंजिरी मनोळकर , ज्या व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फार्मिंग कॉर्पोरेशन, पुणे या पदावर होत्या, त्यांची बदली करून त्यांना आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI), पुणे या महत्त्वाच्या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्रिगुण कुलकर्णी , उपमहानिदेशक – यशदा, पुणे, यांना अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे या प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अंजली रमेश , मुख्य कार्यकारी अधिकारी – जिल्हा परिषद, हिंगोली, यांची बदली करत त्यांना आयुक्त, मृदा व जलसंधारण विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे नेमण्यात आले आहे. या फेरबदलामुळे प्रशासनात मोठी चर्चा सुरू झाली असून, बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ आपल्या नवीन पदांची सूत्रे स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Maharashtra Government : मोठी बातमी! राज्यात आयएएस बदल्यांची फेरबदल; पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या Read More »

vijay kumbhar

Vijay Kumbhar : पार्थ पवारांना दिलेली “क्लिन चिट” म्हणजे केवळ विनोद; मुंढवा जमीन प्रकरणात विजय कुंभार भडकले

Vijay Kumbhar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार सध्या राज्यातील राजकारणात चर्चेत आहे. पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यात त्यांचा नाव आल्याने पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विरोधक करत आहे. तर आता मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना दिलेली “ क्लिन चिट” म्हणजे केवळ विनोद नाही तर ते महाराष्ट्राचं प्रशासन रसातळाला गेल्याचं लक्षण आहे अशी टीका सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. विजय कुंभार म्हणाले की, मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना दिलेली “ क्लिन चिट” म्हणजे केवळ विनोद नाही तर ते महाराष्ट्राचं प्रशासन रसातळाला गेल्याचं लक्षण आहे. घोटाळ्याची सुरुवात ज्यातून झाली त्या LLP च्या ठरावावर त्यांची स्वतःची सही आहे. – जिल्हा उद्योग केंद्राकडून LOI – करोडोंच्या स्टॅम्प ड्युटीतून सूट – रजिस्ट्रेशनची सर्व प्रक्रिया प्रत्येक कागद त्यांच्या स्वाक्षरीमुळे शक्य झाला आणि तरीही ते “निर्दोष”! ही चौकशी नाही. हे प्रशासनाने राजकारण्यांशी – घराणेशाहीशी केलेलं संगनमत आहे. कागदपत्रांचा मार्ग सुरू होतो आणि संपतो तो पार्थ पवारांवर त्यामुळे क्लिन चिट देणं म्हणजे त्या व्यवहारात थेट सहभागी असणं असं विजय कुंभार यांनी म्हटले आहे.

Vijay Kumbhar : पार्थ पवारांना दिलेली “क्लिन चिट” म्हणजे केवळ विनोद; मुंढवा जमीन प्रकरणात विजय कुंभार भडकले Read More »

Ambernath Crime: धक्कादायक, अंबरनाथच्या जावसई भागात तरुणावर तलवार-कोयत्यांनी जीवघेणा हल्ला

Ambernath Crime: अंबरनाथ जावसई परिसरात एका तरुणावर 8 ते 9 जणांच्या टोळीने तलवार-कोयत्यांसारख्या धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फुलेनगर वाडीतील सुधीर ओमप्रकाश सिंह हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि परिसरात त्यांचा तबेलाही आहे. गाडीच्या तुटलेल्या वेल्डिंगचे काम करण्यासाठी ते घराजवळील दुकानात गेले असताना अचानक मोटरसायकलवरून आलेल्या तरुणांनी त्यांच्यावर भीषण हल्ला चढवला. आरोपींकडे तलवार, कोयता यांसारखी घातक हत्यारे होती आणि त्यांनी थेट जीव घेण्याच्या उद्देशाने मारहाण केली. या हल्ल्यात सुधीर सिंह यांच्या पाठीवर, हातावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्लेखोरांनी पळ काढताना पीडिताची मोटरसायकलसुद्धा फोडून टाकली. संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसून आली आहे.या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हल्लेखोरांच्या टोळीचा शोध तीव्र केला आहे. शहरातील वाढत्या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये मोठी भयभीतता पसरली आहे.

Ambernath Crime: धक्कादायक, अंबरनाथच्या जावसई भागात तरुणावर तलवार-कोयत्यांनी जीवघेणा हल्ला Read More »