DNA मराठी

Maharashtra Politics

devendra fadnavis

Devendra Fadnavis: इतके कंफ्यूज विरोधक जीवनात कधी पहिले नव्हते ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: महाविकास आघाडीचे नेते आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज राज्य निवडणूक आयोगाची भेट घेत मतदार यादीत घोळ असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये अशी मागणी केली आहे. तसेच राज्यात पाच वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाही आणि आणखी सहा महिने झाले नाहीतर काही फरक पडणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तर जेव्हापर्यंत मतदार यादीमध्ये असलेला घोळ दूर होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत इतके कंफ्यूज विरोधक जीवनात कधी पहिले नव्हते असा टोला लावला आहे. सोलापुरात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इतके कंफ्यूज विरोधक जीवनात कधी पहिले नव्हते. आगामी निवडणुकीत पराभव दिसत असल्याने आधीच नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच विरोधकांमध्ये सर्वात समजदार हे शरद पवार आहेत. मतदार यादीत सुधारणा करण्यास माझा पाठिंबा आहे असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis: इतके कंफ्यूज विरोधक जीवनात कधी पहिले नव्हते ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

st co operative bank

ST Co-operative Bank : एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मीटिंगमध्ये तुफान राडा… फ्री स्टाईल मारामारी नंतर पोलीस केस

ST Co-operative Bank : एसटी को-ऑपरेटिव बँक ही एसटी कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालणारी आशिया खंडातील सगळ्यात मोठी को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जात होती. परंतु सध्या ह्या बँके बाबत नेहमीच काही ना काही विचित्र ऐकायला येते. भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेले संचालक मंडळ कामगारांच्या मेहनतीच्या पैशांवर मौज करत आहे. याचे अनेक उदाहरणे आजवर आपण बघितलेत. आज एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची मीटिंग घेण्यात आली.त्यात अडसूळ गटातील संचालकांनी सदावर्ते गटातील संचालकांनी बँकेत चालवलेला भ्रष्टाचार बाहेर काढल्याने या मीटिंगमध्ये अक्षरशा फ्रीस्टाइल मारामारी बघायला मिळाली. संचालक मंडळाच्या सदावर्ते गटाने अक्षरशः बाहेरून बाया बोलवून त्यांच्या हातून संचालक मंडळाच्या अडसूळ गटाला तुफान मारहाण केली, शिव्यांचा अक्षरशः पाऊसच पडला,कपडे फाडले,लाथा बुक्क्यांनी तुडवले. संचालकांचा हा राडा आता पोलीस स्टेशन पर्यंत गेला असून पुढील कारवाई चालू आहे. अशा संचालकांच्या हाती एसटी बँक देऊन एसटीचे सभासद आता पश्चाताप करत आहेत.

ST Co-operative Bank : एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मीटिंगमध्ये तुफान राडा… फ्री स्टाईल मारामारी नंतर पोलीस केस Read More »

img 20251015 wa0014

Ahilyanagar News : उसतोड मजुरांना विमा व भाववाढ फरक द्या; अन्यथा 14 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा

Ahilyanagar News : महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी, वाहतूक मुकादम कामगार युनियनने ऊसतोड मजुरांच्या प्रलंबित विमा व मजुरीतील फरकाच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले आहे. युनियनचे गहिनीनाथ थोरे पाटील यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, मुंबई यांना पाठवलेल्या निवेदनात या मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास १४ ऑक्टोबरपासून ऊसतोड कामगार व वाहतूकदार बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा दिला आहे. युनायटेड इन्शुरन्स कंपनीमार्फत २००३ पासून उसतोड कामगारांसाठी विमा योजना राबविण्यात आली होती. या योजनेचा कालावधी २०२२ पर्यंत सुरू होता आणि त्यातून राज्यभरातील हजारो कामगारांना जवळपास १४०० कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. मात्र, २०२२ नंतर शासनाने साखर कारखान्यांकडून प्रती टन १० रुपये दराने विमा कपात केली असून, सुमारे १७८ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. परंतु ही रक्कम विमा कंपनीकडे जमा न झाल्याने कामगारांना एकही लाभ मिळालेला नाही, असा गंभीर आरोप युनियनने केला आहे. तसेच, ४ सप्टेंबर २०२४ रोजी उसतोड मजुरीत ३४ टक्के वाढ जाहीर करण्यात आली होती, मात्र अद्याप या वाढीचा फरक कामगारांना मिळालेला नाही. शासनाने विमा व मजुरी फरकाचा प्रश्न तातडीने सोडवून कामगारांचे देणे द्यावे, अशी मागणी युनियनने केली आहे. याबाबत शासन, विमा कंपनी आणि साखर संघाच्या प्रतिनिधींची तातडीने बैठक बोलवून प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा संप अपरिहार्य होईल, असा इशारा थोरे पाटील यांनी दिला आहे. या संपामुळे ऊस तोडणी हंगाम ठप्प होण्याची शक्यता असून, सरकारने हा प्रश्न गंभीरतेने घेतला नाही तर साखर उद्योगासमोर मोठे संकट उभे राहू शकते, असा इशारा युनियनने दिला आहे.

Ahilyanagar News : उसतोड मजुरांना विमा व भाववाढ फरक द्या; अन्यथा 14 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा Read More »

mns

Raj Thackeray: मनविसेकडून ABVP कार्यालयाला टाळं, प्रत्युत्तरात ABVP चीही घोषणाबाजी…

Raj Thackeray: पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. वाडिया कॉलेज परिसरात ABVP ने ‘बायकॉट मनविसे’ अशी पोस्टर्स लावल्याचा आरोप करत मनविसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. या निषेधार्थ मनविसे कार्यकर्त्यांनी टिळक रोडवरील ABVP च्या पुणे कार्यालयावर धडक देत कुलूप ठोकले. कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत त्यांनी जोरदार आंदोलन केले. मनविसेच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की ABVP जाणूनबुजून वाद निर्माण करत आहे. दरम्यान, या घटनेनंतर ABVP कार्यकर्त्यांनीही त्यांच्या बंद कार्यालयाबाहेर प्रतिउत्तरात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. त्यामुळे पुण्यात दोन्ही विद्यार्थी संघटनांमध्ये संघर्षाचे वातावरण चिघळले आहे. दरम्यान आता यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केली असून पुढील कारवाई सुरू केली असल्याची माहिती कृषिकेश रावले,पोलीस उपायुक्त झोन-1 यांनी दिली.

Raj Thackeray: मनविसेकडून ABVP कार्यालयाला टाळं, प्रत्युत्तरात ABVP चीही घोषणाबाजी… Read More »

asaduddin owais

Asaduddin Owais: फक्त मलाच लव्ह लेटर का? खासदार ओवेसी भडकले

Asaduddin Owais: अहिल्यानगर शहरात एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा पार पडली. मात्र या सभेपूर्वी पोलिसांनी खासदार ओवैसी यांना सभेसाठी काही अटी आणि शर्ती घातल्याने सभेत बोलताना ओवैसी यांनी फक्त मलाच लव्ह लेटर का? असा प्रश्न विचारत पोलिसांचा भरपूर समाचार घेतला. या सभेत बोलताना खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता येतो, जेव्हा ठाकरे गटाचा नेता येतो, जेव्हा आरएसएसची सभा असते आणि जेव्हा भाजपचा नेता येतो तेव्हा पोलीस त्यांना लव्ह लेटर देत नाही. फक्त आम्हालाच लव्ह लेटर मिळतो कारण पोलिसांना देखील माहिती मर्द फक्त एकच आहे. अश्या शब्दात खासदार ओवैसी यांनी पोलिसांचा समाचार घेतला. पुढे बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये मी भारताचा नेतृत्व दुसऱ्या देशामध्ये केलं. कतरचे एक शेख पॅलेस्टाईन संबंधी भारताविषयी बोलत होते तेव्हा माझ्या डेलिगेशनने माझ्याकडे पाहिलं आणि मी त्या शेख ला उत्तर दिलं की भारतापेक्षा तर तुमचा हा कतर पॅलेस्टाईनच्या अगदी जवळ आहे मग तुम्ही का नाही पहिले मदत पोहोचवत आणि भारत याने आपला एक हिस्सा हा पॅलेस्टाईन साठी ठेवलेला आहे. असं मी कतर मध्ये भारताची साईट घेऊन सांगितलं आज मी भारतासाठी दुसऱ्या देशांशी लढत आहे तरी देखील जिथे मी जातो तिथे मला लव्ह लेटर दिला जातो आणि त्यात सांगितलं जातं की मी काय बोलावं आणि काय नाही ? बीजेपी पार्टीचे नेते येतात, शिंदे पार्टीचे नेते येतात, अजित पवार पार्टीचे नेते येतात तेव्हा त्यांना का हा लव्हलेटर दिला जात नाही. मी एकटाच मर्द पोलिसांना दिसतो का? आणि ज्या कलमान्वये मला हा लेटर देण्यात आला तो कलमला रद्द करण्यासाठी मीच 35 मिनिट सादनात भाषण केलं आहे. कदाचित पोलीस हे विसरले. पोलिसांनी दिलेला हा लव्ह लेटर मी रिजेक्ट करतो असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

Asaduddin Owais: फक्त मलाच लव्ह लेटर का? खासदार ओवेसी भडकले Read More »

imtiaz jaleel

Imtiaz Jaleel On Sangram Jagtap: नगर शहरात चिकनी चमेली; इम्तियाज जलील यांचा आमदार जगतापांना प्रत्युत्तर

Imtiaz Jaleel On Sangram Jagtap : अहिल्यानगर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नगर शहरात चिकनी चमेली राहत असून काम न करता फक्त हिंदू मुस्लिम करत असल्याची टीका त्यांनी नाव न घेता आमदार जगताप यांच्यावर केली आहे. या सभेत बोलताना आम्ही पंतप्रधान मोदींना उत्तर देतो तर तू कोण? तू तर चिल्लर आहे असा टोला देखील माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आमदार संग्राम जगताप यांना लावला. तर दुसरीकडे त्यांनी नगर – औरंगाबाद रस्त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आव्हान करत मी 20 हजार रुपये देतो तुम्ही एकदा नगर – औरंगाबाद रस्त्यावर प्रवास करा असं म्हटले आहे. तसेच आमच्या पक्षावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो मात्र मी जेव्हा आमदार आणि नंतर खासदार झालो तेव्हा मी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता अशी आठवण देखील जलील यांनी विरोधकांना करून दिली. तर दुसरीकडे नगर शहरात एक विषारी साप असून तो दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र त्याच्या विष मध्ये दम नाही अशी टीका फारुख शाब्दी यांनी आमदार जगताप यांच्यावर केली.

Imtiaz Jaleel On Sangram Jagtap: नगर शहरात चिकनी चमेली; इम्तियाज जलील यांचा आमदार जगतापांना प्रत्युत्तर Read More »

nilesh ghaywal

Nilesh Ghaywal : घायवळने माहिती लपवली; पासपोर्ट जप्तीसाठी कारणे दाखवा नोटीस

Nilesh Ghaywal : कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळ याच्या परदेशवारीबाबत नवीन माहिती समोर आली आहे.घायवळविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने त्याला विशिष्ट अटींवर २०२२ मध्ये न्यायालयीन जामीन मंजूर करण्यात आला होता. या अटींमध्ये पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे निर्देश होते. मात्र न्यायालयीन आदेश असूनही पासपोर्ट पोलिसांच्या ताब्यात का आला नाही हा प्रश्न उपस्तित होतो. तसे झाले असते तर घायवल देशाबहेर जाण्याचा प्रश्न च उद्भवला नसता. परिणामी घायवळ याला २०१९ मध्ये तत्काळ (तत्काळ) योजनेतून मिळवलेला पासपोर्ट वापरून परदेशात जाणे शक्य झाले. तत्काळ योजना आणि पडताळणी तत्काळ योजनेत अर्जदाराला जलद पासपोर्ट मिळतो. या प्रक्रियेत पासपोर्ट आधी दिला जातो आणि नंतर काही दिवसांत पोलिस पडताळणी केली जाते. पडताळणी अहवाल नकारात्मक आल्यास पुढे पासपोर्ट एक्ट नुसार पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई करता येते. पोलिसांचा पडताळणी अहवाल विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, घायवळने २०१९ मध्ये तत्काळ योजनेतून मिळवलेल्या पासपोर्टसाठी झालेल्या पोलिस पडताळणी (पीव्ही) अहवालात त्याच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नसल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच घरावर भेट दिली असता तो “उपलब्द नाही (नॉट अव्हेलेबल)” असल्याची नोंद करण्यात आली होती. वास्तविक पाहता पोलिसांनी गुन्हयाची माहिती अवहालात देणे अपेक्षित होते परंतु तसे झालेले दिसत नाही. यामुळे त्याचा पासपोर्ट कायम ठेवण्यात अडचण आली नाही. पासपोर्टविषयी पुढील कारवाई घायवळने पासपोर्ट अर्ज करताना स्वतःविरुद्ध असलेले गुन्हे लपवून चुकीचे प्रतिज्ञापत्र सादर करुण 2019 मध्ये पासपोर्ट मिळवला होता. पोलिसांनी आरोपी देशा बाहेर गेल्यानंतर हा प्रकार पासपोर्ट कार्यालयला निदर्शनास आणून दिला. त्या नंतर त्याचा पासपोर्ट जप्तीबाबत कारणे दाखवा नोटीस (एससीएन) जारी करण्यात आली आहे. तसेच पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी स्पष्ट करण्यात आले आहे.

Nilesh Ghaywal : घायवळने माहिती लपवली; पासपोर्ट जप्तीसाठी कारणे दाखवा नोटीस Read More »

Rohit Pawar: क्रिकेटच्या मैदानात आमदार रोहित पवारांची फटकेबाजी

Rohit Pawar: जळगाव शहरात आयोजित एका शालेय क्रिकेट स्पर्धेच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी आज भेट देत महाराष्ट्र आणि उत्तराखंड संघातील सामना पाहिला. सामना संपल्यानंतर त्यांनी स्वतः मैदानात उतरून काही फटकार ठोकत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. खेळ संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राजकीय क्षेत्रात येताना येणाऱ्या ‘गुगली, स्पिन आणि स्पेस’ डिल करणं शिकावं लागतं असं सांगितलं. पण, ‘गावठी शॉट’ म्हणजेच खालच्या पातळीचं वक्तव्य टाळावं लागतं, असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं. यावेळी रोहित पवार यांनी मराठी मीडियालाही आपला ‘कोच’ संबोधत, “मीडिया वेळोवेळी वेडी वाकडी पण अभ्यासपूर्ण प्रश्न विचारतं. त्यांना टाळण्यापेक्षा योग्य उत्तरं देण्याचा प्रयत्न केल्यामुळेच मी कोणत्याही वादात अडकलेलो नाही,” अशी प्रतिक्रिया देखील रोहित पवार यांनी दिली.

Rohit Pawar: क्रिकेटच्या मैदानात आमदार रोहित पवारांची फटकेबाजी Read More »

oplus 16908288

Shirdi Sai Baba: साईबाबांना साई भक्ताने दिला तब्बल एक कोटीचा हार

Shirdi Sai Baba : श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्‍तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक श्री साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या सांगता दिनी आंध्रप्रदेश येथील एका श्री साईभक्‍ताने श्री साईचरणी ९५४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम व नवरत्‍नांचे खडे असलेला सोन्‍याचा हार श्री साईबाबांच्‍या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍याकडे सुपुर्द केला. याची किंमत ०१ कोटी ०२ लाख ७४ हजार ५८० रुपये असून हा सुंदर नक्षीकाम असलेला हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार श्री साईभक्‍त यांचा सत्‍कार केला. श्री साईभक्‍त यांच्‍या विनंतीवरून त्‍यांचे नाव गुप्‍त ठेवण्‍यात आले आहे.

Shirdi Sai Baba: साईबाबांना साई भक्ताने दिला तब्बल एक कोटीचा हार Read More »

img 20251006 wa0006

Pune Crime News: धक्कादायक, गुन्हे शाखेच्या हवालदारावर कोयत्याने हल्ला

Pune Crime News: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांमध्ये आता भीतीची वातावरण निर्माण होत आहे. यातच आता पोलिसांवरच हल्ल्यांच्या घटना घडू लागल्याने कायदा-सुव्यवस्थेची स्थिती किती गंभीर झाली आहे. रविवारी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली ज्यामुळे पुण्यातील कायद्याव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री डेक्कन परिसरात गुन्हे शाखा युनिट-3 मध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार अमोल काटकर (बकल क्र. 7835) यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना लॉ कॉलेज रोडसमोर घडली. मिळालेल्या माहितीनुसार काटकर हे शनिवारी रात्री ड्युटी संपवून आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना रात्री सुमारे एकच्या सुमारास हा प्रकार घडला. अचानक आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी अज्ञात कारणावरून त्यांच्यावर कोयत्याने वार केला. यात त्यांच्या डोक्याच्या मागील भागाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्राथमिक तपासात ‘कट मारल्याच्या’ वादातून हल्ला झाल्याची चर्चा आहे. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून डेक्कन पोलीस ठाण्याने त्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यात पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यावरच असा हल्ला होणे हे अत्यंत गंभीर असल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे.

Pune Crime News: धक्कादायक, गुन्हे शाखेच्या हवालदारावर कोयत्याने हल्ला Read More »