DNA मराठी

latest news

img 20250723 wa0001

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री दहशत…,15 रिक्षा, 3 कार, 2 स्कूल बसची तोडफोड; दोघांवर वार

Pune Crime: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा आलेख वाढतात दिसत आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आता उपस्थित होत आहे. यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री रिक्षा, कार, स्कूल बससह 20 ते 25 वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक, आणि नवनाथनगर या भागात तीन अज्ञात व्यक्तींनी वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. ही घटना 22 जुलै रोजी रात्री 11.45 ते 1 वाजेच्या दरम्यान घडली आहे. पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी एकूण 15 ऑटो रिक्षा, 3 कार, 2 शालेय बस, आणि 1 पियाजिओ टेम्पो यांची काचफोड करत मोठे नुकसान केले आहे. हे गुन्हेगार वाहनांच्या रस्त्यावर असलेल्या पार्किंगवर तुफान हाणामारी करत फिरत होते. त्याचवेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन नागरिकांना देखील मारहाण करून जखमी करण्यात आले आहे. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सध्या डीबी शाखा आणि स्थानिक पोलीस अधिकारी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री दहशत…,15 रिक्षा, 3 कार, 2 स्कूल बसची तोडफोड; दोघांवर वार Read More »

kiran kale

Kiran Kale : मोठी बातमी! महिला अत्याचार प्रकरणी किरण काळेंना अटक

Kiran Kale : अहिल्यानगर शहरातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांना महिला अत्याचार प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. या बाबत कर्जत तालुक्यातील एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ही कारवाई करण्यात आली. काही दिवसापूर्वी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर 350 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करत किरण काळे राज्यातील राजकारणात चर्चेत आले होते. फिर्यादीत म्हटले आहे की, पीडित महिला व तिचा पती यांच्यातील वैवाहिक वाद मिटविण्यासाठी पीडित महिला किरण काळे यांच्या संपर्कात आली होती. महिलाला विश्वासात घेत मदतीचे आश्वासन देत 2023 ते 2024 या दरम्यान काळे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात वारंवार अत्याचार केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेबाबत कुणाला काही सांगितले तर जीवे मारू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी किरण काळे याला अटक केली आहे.

Kiran Kale : मोठी बातमी! महिला अत्याचार प्रकरणी किरण काळेंना अटक Read More »

land scam 135 crores worth of land in sawedi dna marathi

land scam – सावेडीतील कोटींच्या जमिनीवर भूमाफियांची नजर; बनावट खरेदीखतप्रकरणी राजकीय हस्तक्षेपाचा संशय

सावेडीतील १३५ कोटींच्या बनावट खरेदीखतप्रकरणात “अक्का कोण?” – हा प्रश्न सध्या शहरात चर्चेचा विषय ठरतोय. या “अक्क्या”चं नाव जरी स्पष्टपणे समोर आलं नसलं, तरी अहिल्यानगर –  “अहवाल कधी येणार?” असा सवाल सध्या सावेडी परिसरात गूंजतोय, कारण कोटींच्या बहुमूल्य जमिनीच्या बनावट खरेदीखत प्रकरणात चौकशी झाली तरी अहवालाचं अद्यापही दर्शन नाही. हे प्रकरण आता केवळ दस्तऐवजांपुरतं न राहता, राजकीय व अधिकाऱ्यांच्या संगनमताचं मोठं जाळं असल्याची चर्चा जोरात आहे. मौजे सावेडी येथील तब्बल १ हेक्टर ३५ आर इतकं भरगच्च क्षेत्र असलेली मालमत्ता बनावट कागदपत्रांद्वारे बळकावण्यात आल्याचा संशयित प्रकार उघड झाल्यानं खळबळ उधळी आहे . बाजारभावानुसार सध्या या जमिनीची किंमत अंदाजे कोटी रुपये आहे. ही जमीन कवडीमोल दरात हस्तगत करण्यासाठी भूमाफिया, महसूल यंत्रणेतले काही अधिकारी आणि राजकीय मंडळी एकत्र आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शेख मतिन आलम बशिरुद्दीन (रा. जुना बाजार, भिस्त गल्ली, अहमदनगर) यांनी या संदर्भात दुय्यम निबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली असून, त्यांनी १५ ऑक्टोबर १९९१ रोजी पारसमल मश्रीमल शाह (रा. गांधीनगर, गुजरात) यांच्या नावे बनावट खरेदीखत तयार झाल्याचा आरोप केला आहे. हे खरेदीखत दुय्यम निबंधक, अहिल्यानगर-१ दक्षिण यांच्या कार्यालयात छ-४३० व जादा पुस्तक क्र.१, खंड-१९६, पृष्ठ २१ ते ३२, क्र. छ-४२८ या नोंदीनुसार रजिस्टर करण्यात आले होते. खोट्या कुलमुखत्यारपत्राच्या आधारे गणेश शिवराम पाचार्णे यांच्या नावाने जमीन विकल्याचा संशयित दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रांत अधिकारी सुधीर पाटील यांनी चौकशी सुरु केली आहे त्या नुसार त्यांनी वस्तुनिष्ठ आवहाल मागितला होता. त्यानंतर  या प्रकरणात अप्पर तहसीलदारांकडे सुनावणी झाली असली तरी, त्याचा अहवाल अद्याप वरिष्ठांकडे पोहोचलेला नाही. ही विलंबात्मकता संशयास्पद ठरत असून, एका राजकीय पक्षाच्या नेत्याने दूरध्वनीद्वारे चौकशीत हस्तक्षेप केल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जमिनीवर डोळा ठेवणारे काहीजण सध्या मुंबई-पुण्यातूनच यंत्रणा राबवत आहेत. हे प्रकरण केवळ बनावट दस्तऐवजांपुरते मर्यादित नसून, संपूर्ण नियोजनबद्ध रचनेचा भाग असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. शेख मतिन यांनी संबंधित सह जिल्हा निबंधक व दुय्यम निबंधक यांच्याकडे अर्ज सादर करून या मालमत्तेवरील सर्व व्यवहार तत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. बेकायदेशीर दस्तऐवजांची नोंद घेतल्याप्रकरणी जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. “अक्का कोण?” सावेडीतील १३५ कोटींच्या बनावट खरेदीखतप्रकरणात “अक्का कोण?” – हा प्रश्न सध्या शहरात चर्चेचा विषय ठरतोय. या “अक्क्या”चं नाव जरी स्पष्टपणे समोर आलं नसलं, तरी तयार करण्यात आलेल्या बनावट दस्तऐवजांना संरक्षण देणारा, चौकशीचा अहवाल थांबवणारा आणि महसूल यंत्रणेत दडपशाही करणारा कुणीतरी प्रभावशाली व्यक्ती आहे, हे स्पष्ट दिसतंय. या सगळ्या घडामोडींमुळे सावेडी परिसरात अस्वस्थता वाढली असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. भूमाफिया आणि सत्ताधाऱ्यांच्या सहभागाच्या चर्चांमुळे प्रशासनावरही जनतेचा दबाव वाढत चालला आहे. आता ‘अहवाल’ येतो का, की तोही राजकीय आकसाच्या फाईलखाली गाडला जातो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरत आहे.

land scam – सावेडीतील कोटींच्या जमिनीवर भूमाफियांची नजर; बनावट खरेदीखतप्रकरणी राजकीय हस्तक्षेपाचा संशय Read More »

img 20250721 wa0003

Honey Trap : ओ बुलाती है मगर जाने का नही, ‘हनी ट्रॅप’ प्रकरण गाजतंय, पण तक्रारच नाही; पोलिस हतबल

Honey Trap : नाशिक शहरात सध्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘ती’ बुलावत होती, आणि तो गेला… मग सुरू झाला ब्लॅकमेलचा खेळ! सुरुवातीला तीन कोटी, नंतर थेट दहा कोटी रुपयांची मागणी झाली. अखेर प्रकरणाची वात खुलली, पण दोन्ही बाजूंनी लेखी तक्रार नाही. पोलिस मात्र संभ्रमात. मिळालेल्या माहितीनुसार, महसूल विभागातील अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यास सापळ्यात अडकवून, त्याच्याकडून प्रथम तीन कोटी रुपये उकळण्यात आले. पण हे पुरेसे न वाटल्याने पुन्हा दहा कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. अधिकाऱ्याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर ‘ती’ महिला थेट पोलिस ठाण्यात पोहोचली. सुरुवातीला तोंडी तक्रार करण्यात आली, त्यानंतर काही दिवसांनी लेखी तक्रारीसाठी ती पुन्हा आली. दरम्यान, संबंधित अधिकारी याच काळात ठाणे येथे गेले असताना त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याचे समजते. तिथेच त्यांनी संबंधित महिलेविरोधात तक्रार दिली. पण काही दिवसांतच दोघांनीही परस्पर समजुतीने तक्रारी मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पोलिस यंत्रणा संभ्रमात आहे. कोणतीही अधिकृत तक्रार नसल्याने पुढील कायदेशीर कारवाई करणे कठीण ठरत आहे. या प्रकरणात काही बड्या नावांचा समावेश असल्याचीही कुजबुज सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी नाशिकमधील एका हॉटेलमध्ये तपास करून त्या हॉटेलची खोली सील करण्यात आली, अशी चर्चा रंगली होती. मात्र, नाशिक पोलिसांनी याचा अधिकृत इन्कार केला आहे. सध्या त्या मजल्यावर प्रवेश बंद करण्यात आला असून, परिसरात संशयाचे वातावरण आहे. प्रकरणाचा पुढचा रंग काय घेईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण सध्या तरी ‘हनी ट्रॅप’च्या गूढ गर्तेत प्रशासनही अडकले आहे, हे निश्चित.

Honey Trap : ओ बुलाती है मगर जाने का नही, ‘हनी ट्रॅप’ प्रकरण गाजतंय, पण तक्रारच नाही; पोलिस हतबल Read More »

‘माझा महाराष्ट्र कुठे चाललाय

Padalkar Awhad विधानभवनात गोंधळाचे राजकारण: लोकशाहीचा अपमान

Padalkar Awhad :- नागपूर :- महाराष्ट्र विधिमंडळ हे राज्याच्या लोकशाही व्यवस्थेचे सर्वोच्च मंदिर. या मंदिरात जनतेच्या प्रश्नांवर गंभीरपणे चर्चा होणे अपेक्षित असते. मात्र १७–१८ जुलै रोजी जे काही घडले ते या संस्थेच्या लोकशाहीला कलंक ठरावे असेच आहे. भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद गट) (NCP) चे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यातील वैयक्तिक राजकीय वैर विधानभवनाच्या चार भिंतींमध्ये दारुण राड्याचे कारण ठरले. समर्थकांनी एकमेकांवर शिवीगाळ आणि धक्काबुक्कीसारखे प्रकार करत लोकशाहीच्या सर्वोच्च संस्थेच्या प्रतिष्ठेचा विध्वंस केला. हे प्रकरण केवळ राजकीय असभ्यता नसून ती राज्यकारभाराच्या गंभीरतेवरच गदा आणणारी घटना आहे. या घटनांमुळे विधानसभेचे कामकाज काही काळासाठी थांबवावे लागले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी घेतलेला निर्णय — आता केवळ आमदार, आमदारांचे वैयक्तिक सहाय्यक, विधान परिषद सदस्य आणि अधिकृत शासकीय अधिकारी यांनाच विधानभवनात प्रवेश असेल — हा आवश्यक असला, तरी लोकशाही प्रक्रियेमधील खुलेपणावर प्रश्न उपस्थित करणारा ठरतो. लोकशाहीत वाद होणं सहाजिक आहे, पण तो वाद संवादाच्या चौकटीतच होणं अपेक्षित असतं. ‘मी कोणत्या पक्षाचा’ हे सांगण्यापेक्षा ‘मी जनतेचा प्रतिनिधी’ या भूमिकेचा विसर गेल्यानेच अशा घटना घडत आहेत. ही केवळ पक्षीय कुरघोडी नव्हे, तर जनतेच्या विश्वासाला तडा देणारी राजकीय बेशिस्त आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे,(Eknath Shinde)  आणि विरोधी पक्षनेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मिळून अशा घटना रोखण्यासाठी आचारसंहिता आखावी. केवळ व्यक्तिकेंद्रित राजकारणाने विधिमंडळाचा अपमान होतो, आणि या अपमानाचे दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेवर उमटतात. तर ‘माझा महाराष्ट्र कुठे चाललाय? राज्य विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाणामारी झाली, आणि त्या गोंधळात सहभागी असलेल्यांपैकी काही जणांवर आधीपासूनच गंभीर गुन्हे दाखल असल्याचं समोर येतं. अशा व्यक्तींना राजकीय नेत्यांकडून खुलेआम पाठींबा दिला जातो, त्यांच्यासह विधानभवनात किंवा सभागृह परिसरात वावरण्याची मुभा दिली जाते — हे लोकशाहीच्या अंगावर काटा आणणारे चित्र आहे. जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना आमदारांचे समर्थन लाभत असेल आणि तेच लोक मारहाणीच्या घटनांमध्ये सक्रिय असतील, तर ‘माझा महाराष्ट्र कुठे चाललाय?’ हा प्रश्न प्रत्येक जागरूक नागरिकाच्या मनात उमटल्याशिवाय राहत नाही. हे दृश्य सामान्य माणसाच्या दृष्टीने नुसते चिंताजनकच नाही, तर भविष्याबद्दल असुरक्षिततेची जाणीव निर्माण करणारे आहे. जर विधिमंडळात गुन्हेगारांचा ठसा उमटू लागला, तर कायदा आणि सुव्यवस्थेची व्याख्याच मोडीत निघेल. मग रस्त्यावर न्याय मागणाऱ्या सामान्य नागरिकासाठी कोणता दरवाजा उरेल? शेवटी एकच प्रश्न राहतो: जर विधिमंडळातच कायदा-संविधानाची पायमल्ली होत असेल, तर रस्त्यावर सामान्य नागरिकाकडून काय अपेक्षा ठेवायची? राजकारणाला पुन्हा शिस्त, संवाद आणि शिष्टाचार या मार्गावर आणणं ही सध्याची काळाची गरज आहे. नाहीतर जनता मतदान करताना ‘नेते नाही, तर नाटके’ या शब्दातच आपला उद्वेग व्यक्त करेल.

Padalkar Awhad विधानभवनात गोंधळाचे राजकारण: लोकशाहीचा अपमान Read More »

jitendra awhad

Jitendra Awhad यांचा पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या; विधान भवनात रात्री घडलं काय?

Jitendra Awhad : विधानभवन परिसरात काल दुपारी झालेल्या राड्याचे पडसाद रात्रभर उमटले. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पोलिसांनी रात्री 12 वाजता विधानभवनात अटक केली. मात्र, ही गोष्ट जितेंद्र आव्हाड यांना कळताच ते तात्काळ विधानभवन परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या दिला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार देखील दाखल झाले. जितेंद्र आव्हाड ठिय्या आंदोलनावर ठाम असताना पोलिसांनी दीड वाजता आंदोलकांची धरपकड केली. जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली, पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून खेचत बाहेर काढले आणि नितीन देशमुख यांना पोलीस घेऊन गेले. या वेळी आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मकोकाचा आरोपी पसार होतो, जो मार खातो त्यांना पोलीस घेऊन जातात. विधानसभा अध्यक्षांनी शब्द दिला होता नितीनला सोडणार. मात्र, त्यांनी शब्द फिरवला, आम्हाला फसवलं. रात्री 1 वाजता या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार हे दाखल झाले. असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तर दुसरीकडे रोहित पवार यांनी देखील या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही नितीन देशमुखला पाठिंबा देतो. विधिमंडळात आव्हाड यांच्यावर हल्ला करायला मकोकाचे 4 माणसं तुम्ही घेऊन येतात. इथे बॉस अध्यक्ष आहेत, त्यांनी दिलेला शब्द जर ते पळत नसतील तर ही लोकशाहीची चेष्टा होत आहे. यांचा हा माज उतरवावं लागेल नाहीतर हे एवढे पुढे जातील , तुमच्या जमिनी घेतील आणि तुमच्या आया बहिणीला हात लावतील अशा विचारसरणीचे काही नेते आहेत. असं रोहित पवार म्हणाले. यानंतर जितेंद्र आव्हाड, रोहित पवार तसेच राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते हे मारिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला गेले, मात्र तिथे नितीन देशमुख हे नव्हते. पोलिसांनी आव्हाडांना सांगितले नितीन देशमुख यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनला ठेवण्यात आलय. जितेंद्र आव्हाड, रोहित पवार हे पोलीस स्टेशनला पोहचले. मात्र, तिथेही नितीन देशमुख नसल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. आव्हाड यांना कळले की नितीन देशमुख यांना मेडिकलसाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलय. त्यानंतर आव्हाड, पवार कार्यकर्यांसह रुग्णालयात पोहोचले आणि नितीन देशमुख यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली.

Jitendra Awhad यांचा पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या; विधान भवनात रात्री घडलं काय? Read More »

leopard 2025 vadgav gupata dna marathi

दिवसाढवळ्या तीन बिबट्यांचे उघड मळ्यामध्ये वावरणे; वनविभागाच्या दुर्लक्षामुळे गावात भीतीचे वातावरण

विशेष म्हणजे हे बिबटे केवळ रात्रीच नव्हे, तर उजाड दिवसा देखील शेतांत, रस्त्यांवर व घरांच्या आजूबाजूला फिरताना दिसत आहेत. या घटनांचे मोबाईल व्हिडीओ व छायाचित्रे गावकऱ्यांनी चित्रीत केली असून, Three leopards exposed – अहिल्यानगर : नगर तालुक्यातील वडगाव येथील उघड मळा परिसरात सलग तीन बिबट्यांचे दिवसा दर्शन झाल्यामुळे संपूर्ण गावात भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांचा हंगामी शेतीचा काळ सुरू असून, दिवसा बिनधास्त वावरणाऱ्या बिबट्यांमुळे शेतकऱ्यांचे शेतात जाणेच कठीण झाले आहे. या परिस्थितीमुळे ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून उघड मळा परिसरात बिबट्यांचे मुक्त संचार सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विशेष म्हणजे हे बिबटे केवळ रात्रीच नव्हे, तर उजाड दिवसा देखील शेतांत, रस्त्यांवर व घरांच्या आजूबाजूला फिरताना दिसत आहेत. या घटनांचे मोबाईल व्हिडीओ व छायाचित्रे गावकऱ्यांनी चित्रीत केली असून, ती सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. video पहा…. वनविभागाचे अजब उत्तर या प्रकाराबाबत वनविभागाशी वारंवार संपर्क साधूनही काहीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. “मी पिंजरा देतो, तुम्ही बोकड्या आणि ट्रॅक्टर लावून पिंजरा लावा,” असे उत्तर वनअधिकाऱ्यांनी दिले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. हे उत्तर ऐकून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाच्या निष्काळजी आणि असंवेदनशील वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया शेतकरी राम पवार म्हणाले, “शेतीचा मोसम सुरू आहे. शेतीत राबणं गरजेचं असताना जर दिवसाढवळ्या बिबटे फिरत असतील, तर आम्ही शेतात कसं उतरायचं? जीव मुठीत धरून काम करायचं का?” त्यांच्या या उद्गारांमधून शेतकऱ्यांची असहायता आणि संताप स्पष्टपणे दिसून येतो. गावकऱ्यांनी यापूर्वीही या भागात बिबट्यांचे अस्तित्व असल्याबाबत तक्रारी केल्या होत्या, मात्र वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा पुनरुच्चार यावेळीही झाला आहे. बिबट्यांचा बंदोबस्त तातडीने करावा ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, तात्काळ पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, गस्त वाढवावी आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करावी. अन्यथा जर बिबट्यांचा हल्ला झाला तर त्याची पूर्ण जबाबदारी वनविभागाची राहील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. स्थानिक प्रशासनाने आणि वनविभागाने यास गांभीर्याने न पाहिल्यास, भविष्यात कोणतीही जीवितहानी झाली, तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतात, अशी शक्यताही व्यक्त होत आहे.

दिवसाढवळ्या तीन बिबट्यांचे उघड मळ्यामध्ये वावरणे; वनविभागाच्या दुर्लक्षामुळे गावात भीतीचे वातावरण Read More »

मोठी बातमी! नगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Ahilyanagar News : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २७ जुलै २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदर आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, मिरवणुका किंवा प्रेतयात्रांवरील जमावास लागू राहणार नाही. तसेच पोलीस अधिकारी, कामावर असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच सभा अथवा मिरवणुका काढण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही हा आदेश लागू होणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मोठी बातमी! नगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी Read More »

sebastian bennett

Sawedi land Scam “दस्तऐवजीकरणाआधीच हस्तक्षेपाचा खेळ! सावेडी प्रकरणात मंडल अधिकारी ऐवजी अप्पर तहसीलदार पाठवणारा अहवाल

Sawedi land Scam धक्कादायक वळण मिळाले आहे. सर्वे नं. २४५/ब-१ (०.७२ हेक्टर) व २४५/ब-२ (०.६३ हेक्टर) या एकूण १.३५ हेक्टर भूखंडावर गेल्या ३५ वर्षांपासून कोणताही कायदेशीर किंवा अधिकृत व्यवहार झाला नसल्याचा संशय. नगर प्रतिनिधी | अहमदनगरSawedi land Scam सावेडी येथील अत्यंत महत्त्वाच्या आणि बहुमूल्य जमिनीच्या प्रकरणाला आता एक धक्कादायक वळण मिळाले आहे. सर्वे नं. २४५/ब-१ (०.७२ हेक्टर) व २४५/ब-२ (०.६३ हेक्टर) या एकूण १.३५ हेक्टर भूखंडावर गेल्या ३५ वर्षांपासून कोणताही कायदेशीर किंवा अधिकृत व्यवहार झाला नसल्याचा संशय. मात्र अलीकडेच या जमिनीवर मोठा आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली असून, त्यासाठी महसूल यंत्रणेकडे दबाव टाकण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे, संबंधित व्यक्तींनी हे प्रकरण हातात घेतल्यावर तातडीने भूमाफियांना पाठीशी घालणारी लॉबी सक्रीय झाली असून, चौकशीची दिशा वळवण्यासाठी नियोजित पद्धतीने दबाव आणला जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. जिल्हा प्रशासन, उपनिबंधक कार्यल्यावर रोष व्यक्त होऊ लागला आहे.नगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील त्यांच्याकडे या प्रकरणात तक्रार दाखल झाली होती, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले होते. मंडळ अधिकारी शैलेजा देवकते यांच्याकडे वस्तुनिष्ठ अहवाल मागवण्यात आला. त्यानंतर सावेडी मंडलाधिकारी यांनी वादी व प्रतिवादी दोघांनाही नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच या जमिनीवरील कोणतेही व्यवहार प्रांत अधिकारी सुधीर पाटील यांचा निर्णय होईपर्यंत व्यवहार होऊ नये असे पत्र दिले होते, दक्षिण-१, उत्तर-२ आणि अहिल्यानगर-३ उपनिबंधक कार्यालयांना देण्यात आले होते.परंतु, या कडक चौकशीतून बचाव करण्यासाठी आणि सत्य बाहेर येण्याआधीच तपासाला वेगळा मोड देण्यासाठी एक संपूर्ण संगनमताने यंत्रणा रचली गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. भूखंडाशी संबंधित मुक्त्यार अर्जदार पाचरणे यांनी या प्रकरणात पोलिसांकडेही अर्ज करत थेट प्रांताधिकारी यांच्यावरच पत्राद्वारे प्रश्न उपस्थित करत, ही चौकशी अप्पर तहसीलदारांकडे वर्ग करावी अशी मागणी केली. विशेष म्हणजे, ही मागणी झाल्यानंतर अवघ्या काहीच दिवसांत तपास अप्पर तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आला! ही ‘वेगवान कार्यवाही’ अनेक प्रशासकीय वर्तुळात संशयास्पद ठरत आहे.या चौकशीची अचानक बदललेली दिशा म्हणजे वस्तुनिष्ठ तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न की?या प्रकरणातील महसूल मधील अधिकाऱ्यांच्या स्पष्ट व निःपक्षपाती भूमिकेने काहीजण अस्वस्थ झाले होते हे उघड आहे. आता अहवालाची सूत्रे अप्पर तहसीलदारांकडे दिली गेल्यानंतर, नेमका कोणता निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण नगर शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. हे प्रकरण इतके गंभीर आहे की त्यात केवळ जमिनीचा व्यवहार नाही, तर प्रशासन, दस्तावेज फर्जीवाडा, आणि भूमाफियांचा संगनमत असा सगळा गुंता आहे. जर अप्पर तहसीलदारांनी पूर्वीच्या तपासाचा आदर न करता नव्याने प्रकरणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला, तर यामागे असलेले राजकीय हस्तक्षेप आणि आर्थिक हितसंबंध आणखी उघडे पडतील. ही फक्त भूखंडाची लूट नाही, तर कायदा आणि प्रशासन यांची विश्वासार्हता धोक्यात आणणारी साजिश आहे.प्रांताधिकाऱ्यांनी यांनी मंडलाधिकारी यांना वस्तुनिष्ठ अहवाल मागवला होता मात्र सर्व प्रयत्न करूनही मंडळ अधिकारी यांनी आपली भूमिका कायम ठेवली म्हणून याचा वस्तुनिष्ठ अहवाल आता अप्पर तहसीलदारांकडे अचानकपणे तपास वर्ग करणे म्हणजे केवळ कायदेशीर प्रक्रियेचा खेळ मांडण्याचा प्रयत्न असून, आता या प्रकरणात सत्य समोर येईल का, की पुन्हा एकदा दलाल आणि दबावतंत्र यांच्या राजकारणात प्रशासन झुकणार? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या आणि महसूल यंत्रणेच्या निष्पक्षतेची खरी परीक्षा आता लागणार आहे.

Sawedi land Scam “दस्तऐवजीकरणाआधीच हस्तक्षेपाचा खेळ! सावेडी प्रकरणात मंडल अधिकारी ऐवजी अप्पर तहसीलदार पाठवणारा अहवाल Read More »

शनेश्वर बनवतात

शनैश्वर देवस्थान बनावट अ‍ॅप प्रकरण : पोलिस झाले फिर्यादी, मदत करणाऱ्यांवरही कारवाई

या प्रकरणात कोणताही संबंधित व्यक्ती फिर्याद देण्यास पुढे न आल्याने अखेर पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी स्वतः फिर्याद दाखल केली. अहिल्यानगर – शनैश्वर देवस्थानच्या ( Shanaishwar Temple) नावाने तयार करण्यात आलेल्या बनावट अ‍ॅप आणि संकेतस्थळांमुळे झालेल्या फसवणुकीप्रकरणी शनिशिंगणापूर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात पाच यूआरएल धारकांसह (अ‍ॅप तयार करणारे) त्यांना साथ देणाऱ्या अज्ञात व्यक्तींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याने तपासासाठी विशेष पथके नियुक्त केली आहेत. देवस्थानच्या विश्वस्त मंडळासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली आहे. विशेष बाब म्हणजे, या प्रकरणात कोणताही संबंधित व्यक्ती फिर्याद देण्यास पुढे न आल्याने अखेर पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी स्वतः फिर्याद दाखल केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही संशयित व्यक्तींनी शनैश्वर देवस्थानच्या नावाने बनावट अ‍ॅप्स (Fake apps) व संकेतस्थळ तयार करून, देवस्थानची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता, ऑनलाईन पूजा, अभिषेक, तेल अर्पण, तसेच व्हीआयपी दर्शनासाठी नोंदणी सुरू केली होती. यामार्फत त्यांनी भक्तांकडून अनियमित शुल्क आकारले. आरोपींनी स्वतःचे पुजारी नेमून हे व्यवहार सुरू ठेवले होते आणि यामार्फत अवैध मार्गाने पैसे उकळण्यात आले. त्यामुळे या संपूर्ण प्रकारातून शनैश्वर भक्तांची व देवस्थानची आर्थिक फसवणूक झाली असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी अ‍ॅप तयार करणाऱ्या यंत्रणेशी संबंधित युआरएल्स आणि त्यांचा वापर करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला आहे. यासोबतच, आरोपींना मदत करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवरही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकारामुळे सध्या भक्तांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, देवस्थानने अधिकृत अ‍ॅप अथवा सेवा सुरू केली आहे की नाही, याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर स्पष्टता देण्याची मागणीही भक्तांकडून होत आहे.

शनैश्वर देवस्थान बनावट अ‍ॅप प्रकरण : पोलिस झाले फिर्यादी, मदत करणाऱ्यांवरही कारवाई Read More »