DNA मराठी

latest news

Ahmednagar News : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विळद यांचामार्फत दिव्यांग सर्वेक्षण व तपासणी शिबिराचे आयोजन

Ahmednagar News: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विळद घाट अहमदनगर, जिल्हा समाज कल्याण विभाग व ग्रामपंचायत देहरे यांच्या संयुक्त विद्यामाने दि. 10 फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र देहरे येथे दिव्यांगासाठी शिबिर आयोजित करण्यात आले ‍होते. या शिबिरात देहरे व परीसरातील पात्र दिव्यांगाची सहाय्यक साधनांसाठी पुनर्वसन केंद्रांच्या तज्ञाकडून तपासणी व नोंदणी करण्यात आली.   यातील पात्र दिव्यांग व्यक्तीना भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या एडीप 2024 या योजने अंतर्गत नजीकच्या काळात सहाय्यक साधनांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हयातील दिव्यांगांना केंद्र शासनाच्या योजना पोहचविण्यासाठी मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे विशेष प्रयत्न करत आहे. दिव्यांगांच्या तपासणी बरोबरच “अहमदनगर जिल्हा दिव्यांग सर्वक्षण अभियानाचा” शुभारंभ करण्यात आला. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांने आपले मोबाईल ॲप डीडीआरसीनगर या नावाने तयार केले असुन या ॲपच्या माध्यमातुन जिल्हयातील दिव्यांगांची माहिती संकलीत करण्यात येणार आहे. जेणे करुन विविध योजना त्यांच्यापर्यत पोहचविण्यास मदत होणार आहे.  या शिबिरासाठी पुनर्वसन केंद्राचे संचालक डॉ. अभिजित दिवटे व समन्वयक डॉ. दिपक अनाप यांचे मार्गदर्शन लाभले. या शिबिराप्रसंगी सरपंच सौ. नंदाताई संतोष भगत, उपसरपंच श्री. दिपक जाधव, देहरे सोसायटीचे  संचालक श्री. भानुदास भगत, देहरे सोसायटीचे  खजिनदार श्री. सुभाष, प्राथमिक आरोग्य केंद्र देहरे येथील डॉ. कसबे सर व डॉ. खरे सर उपस्थित होते.

Ahmednagar News : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विळद यांचामार्फत दिव्यांग सर्वेक्षण व तपासणी शिबिराचे आयोजन Read More »

Sujay Vikhe: खा. सुजय विखे पाटील यांनी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांना अर्पण केले लाडू..

Sujay Vikhe: आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीत जाऊन अहमदनगर जिल्ह्यातील माता भगिनींनी बनवलेले नैवेद्यासाठीचे लाडू प्रभू श्रीरामांना चरणी अर्पण केले. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोफत साखर वाटप करण्यात आली होती. या साखरेपासून लाडू बनवून 22 जानेवारी रोजी सर्वांनी प्रभू श्रीरामांना प्रसाद म्हणून अर्पण करावेत असे आवाहन त्यांनी जिल्ह्यातील समस्त नागरिकांना केले होते.  दरम्यान आज नगर जिल्ह्यातील माता भगिनींनी बनवलेले नैवेद्यासाठीचे लाडू स्वतः खासदार सुजय विखे यांनी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांना अर्पण केले असून माता भगिनींनी इतक्या आपुलकीने बनवलेला हा प्रसाद प्रभू श्रीरामांच्या पुढे ठेवण्यासाठी अयोध्येत येण्याचे भाग्य मला लाभले याचा विशेष आनंद होत आहे. माझ्या जीवनातील हा एक अविस्मरणीय असा क्षण असल्याचे मी समजतो असे मत त्यांनी यावेळी मांडले. मला विश्वास आहे की या लाडूंच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्याच्या आमच्या माता भगिनींनी केलेल्या सर्व प्रार्थना आणि मनोकामना पूर्ण होतील असे सांगून त्यांनी सर्वांना सुखी समाधानी आयुष्य लाभो अशी प्रार्थना प्रभू श्रीरामांच्या चरणी केली.

Sujay Vikhe: खा. सुजय विखे पाटील यांनी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांना अर्पण केले लाडू.. Read More »

होणार बंपर बचत! आता Maruti Wagon R खरेदी करा अवघ्या 1.15 लाखात; जाणुन घ्या कसं

Maruti Wagon R: येत्या काही दिवसात तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही बाजारात धुमाकूळ घालणारी लोकप्रिय कार मारुती वॅगन आर अवघ्या 1.15 लाखात घरी आणू शकता. मारुती वॅगन आरमध्ये तुम्हाला 1061 cc इंजिन मिळते जे 67 bhp पॉवर आणि 34 NM टॉर्क जनरेट करते. ही 5 सीटर कार आहे ज्याच्या व्हील्सचा आकार 13 इंच आहे. याच बरोबर पॉवर स्टीयरिंग, पॉवर विंडो, रीयर सीट हेडरेस्ट आणि कप होल्डर देखील कारमध्ये उपलब्ध आहेत. एअर कंडिशनर, हीटर, इलेक्ट्रॉनिक मल्टी ट्रिप मीटर, फॅब्रिक अपहोल्स्ट्री, ग्लोव्ह कंपार्टमेंट देखील कारमध्ये देण्यात आले आहे. सेफ्टीसाठी  सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक, डे नाईट रिअर व्ह्यू मिरर, सीट बेल्ट वॉर्निंग, रियर सीट बेल्ट साइड, इम्पॅक्ट टीम ॲडजस्टेबल सीट्स आणि इंजिन इमोबिलायझर या सुविधाही उपलब्ध आहेत.  cardekho.com वर सेकंड हॅण्ड मारुती वॅगन आर 1.15 लाखात खरेदी करु शकता. आतापर्यंत एकूण ही कार फक्त 26000 किलोमीटर चालली आहे. ही पेट्रोल इंजिन असलेली मॅन्युअल ट्रान्समिशन कार आहे.  जर तुम्ही ही कार बाजारात खरेदी करण्यासाठी गेलात तर तिची ऑन रोड किंमत 3.28 लाख ते 4.06 लाख रुपयांच्या दरम्यान असेल. 

होणार बंपर बचत! आता Maruti Wagon R खरेदी करा अवघ्या 1.15 लाखात; जाणुन घ्या कसं Read More »

Ahmednagar News: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयचा अनोखा अभिनव उपक्रम

Ahmednagar News: दिनांक ३१/०१/२०२४ रोजी  मकारसंक्रांती निमित्त डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयातील सामाजिक आरोग्य विभाग परिचर्या विभाग  व  माहिला सेल ने वडगाव गुप्ता येथील महिलासाठी हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. या निमित्ताने गावातील १५० महिला करिता हळदी कुंकू व तिळगूळचा कार्यक्रम घेण्यात आला.  प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रामपंचायत सरपंच सौ. सोनुबाई विजय शेवाळे तर प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सोनाली वाहडणे (स्त्री. रोगतज्ञ) वाहाडणे  हॉस्पिटल, अहमदनगर ह्या होत्या तसेच सौ कविता बबन वाकळे (तलाठी), सौ. निता शिवराम गीरी (साहाय्यक कृषि अधिकारी) डॉ.सुवर्णा कांबळे (सामाजिक आरोग्य अधिकारी) व डॉ. प्रतिभा चांदेकर, प्राचार्या,  परिचर्या महाविद्यलयाच्या व डॉ. योगिता औताडे उप प्राचार्या व सामाजिक आरोग्य विभाग परिचर्या विभाग  प्रमुख उपस्थतीत होत्या.  या निम्मीताने महिल्यासाठी डॉ. सोनाली वाहडणे स्त्री रोग तज्ञ यांनी महिलांमध्ये योनि मुख मार्गाचा कर्करोग व स्तनाचा कर्करोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून व चर्चा केली. या प्रसंगी त्या म्हणाल्या कि महिलांनी आपलया ९ ते १४ वर्ष वयोगटातील मुलींचे योनी मार्गाच्या कर्करोग होऊ नये यासाठी  लसीकरण करणे आवश्यक आहे तसेच, समतोल आहार रोज एक तास व्यायाम करणे गरजेचे आहे आणि प्रत्येक महिन्यात मासिक पाळी  नंतर स्व-स्तन परीक्षण करून जर त्यात काही बदल जाणवले तर  त्वरित  डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, वयाच्या ४५ वर्षानंतर स्तनांची सोनोग्राफी (म्यॅमोग्राफी) करणे आवश्यक आहे.  म्हणून महिलांनी स्वतःच्या आरोग्य संदर्भात जागरूक असावे. लवकर निदान  व योग्य उपचारातून कर्करोग बारा होऊ  शकतो व आपले आयुष्य सुखकर होऊ शकते. तसेच परिचर्या महाविद्यालयातील स्त्री रोग विभाग  प्रमुख सौ. कविता भोकनळ व सहायक प्राध्यापक सौ मोहिनी सोनवणे यांनी स्व-स्तन परिक्षण कसे करावे या विषायी प्रात्यक्षिक  दाखवले .या निम्मीताने महिलाना सामाजिक आरोग्य विभागाने पॅम्फ्लेट देण्यात आले. या कार्यक्रमात महिलांनी स्वयंस्फूर्तिने सहभाग नोंदविला तसेच महिलांनी उखाणे घेऊन कार्यक्रमाला उत्सुफुर्त प्रतिसाद दिला.  डॉक्टर वहाडणे यांनी आरोग्य शिक्षणाचा देऊन, जनजागृती केली, आणि अमूल्य असा आरोग्याचा वाण आपल्या सर्वाना दिला असे प्राचार्य डॉ. प्रतिभा चांदेकर  म्हणालया. यावेळी त्यांनी सर्वांचे उपस्थिती बद्दल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील उप प्राचार्या व सामाजिक आरोग्य परिचर्या विभाग प्रमुख डॉ. योगिता औताडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला.  यासाठी त्यांना सौ. सलोमी तेलधुणे ,बाल आरोग्य विभाग व महिला सेल प्रमुख, सौ. कविता भोकनळ ,स्त्री रोग विभाग प्रमुख तसेच सहहायक प्राध्यापक सौ मोहिनी सोनवणे यांनी सहकार्य केले तसेच पुजा मोरे व सौ. आश्लेषा सुरासे यांनी सूत्र संचालन केले श्री. अमोल शेळके ,सौ रिबिका साळवे ,सौ सोनल बोरडे सौ. ऐश्वर्या पवार आणि श्री. प्रशांत अंबरीत ,यांचे मोलाचे सहकार्य मिळाले व प्रथम वर्ष एम एस्सी नर्सिंग व जीएनएम च्या विद्याथ्यांनी सहभाग घेतला.

Ahmednagar News: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयचा अनोखा अभिनव उपक्रम Read More »

Ahmednagar News: छगन भुजबळ यांना अजित पवार कसे चालतात? ‘त्या’ प्रकरणात मराठा क्रांती मोर्चाकडून खुले आव्हान

Ahmednagar News: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर आता राज्यात राजकीय वातावरण आणखी तापले आहे.  यातच शनिवारी राज्य सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ( अजित पवार गट) छगन भुजबळ यांनी अहमदनगर येथील ओबीसी एल्गार सभेत नाभिक बांधवांना मराठा समाजावर बहिष्काराचे आवाहन केले आहे. त्यांच्या या विधानाला आता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उत्तर देण्यात आला आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर समाजात तेढ निर्माण करण्याचे आरोप केले आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी छगन भुजबळ हे केवळ सुपारी घेऊन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करत असून त्यांनी कुणाकडून सुपारी घेतली आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत असून अनाजी पंताच्या सुपारीवर छगन भुजबळ यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करू नयेत. छगन भुजबळ यांना अजित पवार कसे चालतात असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये संघटनेकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.  अजित पवार यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे मात्र ते छगन भुजबळ यांना चालतात. केवळ गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणालाच भुजबळ यांचा विरोध असल्याचं देखील या पत्रकार परिषदेमध्ये संघटनेकडून म्हणण्यात आलं आहे. राजीनामा राज्यपालांकडे द्या तर या पत्रकार परिषदेमध्ये छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याबाबत देखील टीका करण्यात आली आहे. भुजबळ यांनी राजीनाम्याबद्दलचे केलेले वक्तव्य संभ्रम निर्माण करत आहे त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे द्यायला पाहिजे होता मात्र अद्याप देखील ते त्याबद्दल सविस्तर बोलायला तयार नाहीत.  तर दुसरीकडे ते सरकारी गाडी, सरकारी सुविधा आणि मंत्र्यांसाठी सगळ्या असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटचा लाभ घेत आहेत. यामुळे त्यांनी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असा सल्ला मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे.

Ahmednagar News: छगन भुजबळ यांना अजित पवार कसे चालतात? ‘त्या’ प्रकरणात मराठा क्रांती मोर्चाकडून खुले आव्हान Read More »

Ahmednagar News: 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या! कुणाल भंडारी 

Ahmednagar News : 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या आणि सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालविण्यात यावा अशी मागणी अहमदनगर जिल्हा बजरंग दल संयोजक कुणाल भंडारी यांनी अहमदनगर पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.  त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, लातुर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील वलांडी भागात अत्यंत गरीब मागासवर्गीय कुटूंबातील 6 वर्षाच्या लहान मुलीवर निर्दयीपणे एका सराईत आरोपीने लैंगिक अत्याचार केला.  त्या आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी व सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालविण्यात यावा.  तसेच सदर पिडीत मुलीला व तिच्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण देण्यात यावे आणि शासनाच्या वतीने मुलीच्या पुनर्वसनासाठी व तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनात अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

Ahmednagar News: 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या! कुणाल भंडारी  Read More »

Ahmednagar News: जिल्हा बार असोसिएशनच्या काम बंद आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चेचा पाठिंबा

Ahmednagar News:  काही दिवसांपूर्वी राहुरी शहरातील वकील दांपत्यांच्या निर्घृण हत्या करण्यात आली होती ही प्रकरण उघडकीस आल्यानंतर तात्काळ पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली व तपासाची चक्रे वेगाने फिरवली.  त्यानंतर यातील पाच आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात असून 3 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाचे कामकाज बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.  आज या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्त्यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. यावेळी रामेश्वर निमसे, अमोल हुंबे, अनिकेत आवारे, राम जरांगे, श्रीकांत भामरे, गिरीश भामरे, एडवोकेट गजेंद्र दांगट, एडवोकेट स्वप्निल दगडे, किशोर शिंदे, योगेश देशमुख, विलास तळेकर, अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ahmednagar News: जिल्हा बार असोसिएशनच्या काम बंद आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चेचा पाठिंबा Read More »

BJP News: राष्ट्रवादीचे युवानेते पवनराजे राळेभात यांचा भाजपात प्रवेश

BJP News:  जामखेडच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला असून, राष्ट्रवादीचे युवानेते व जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक पवनराजे राळेभात यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत  राळेभात यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.  पवनराजे राळेभात यांनी बुधवारी (ता.३१) चौंडी येथे आ प्रा राम शिंदे यांच्या निवासस्थानी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाचे विधानसभाक्षेत्र प्रमुख रवी सुरवसे, तालुकाध्यक्ष अजय काशीद, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, माजी सभापती डाॅ.भगवान मुरूमकर, सौ अर्चना ताई राळेभात ; संपत राळेभात ;सचिन पोठरे, माजी उपसभापती दादासाहेब रिठे,  गौतम उत्तेकर, नगरसेवक अमीत चिंतामणी, बिबिशन धनवडे, सोमनाथ राळेभात, तात्याराम पोकळे,, खर्ड्याच्या सरपंच  संजीवनी पाटील, जवळयाचे सरपंच सुशील आव्हाड, उपसरपंच प्रशांत शिंदे, युवानेते राहूल पाटील, डाॅ.ज्ञानेश्वर झेंडे , प्रवीण सानप, मोहन गडदे, डाॅ.विठ्ठल राळेभात यांच्यासह मोठया संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान पवनराजे राळेभात यांच्या भाजपा प्रवेशाने आ रोहित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जामखेड शहरातील प्रमुख चेहरा असलेले पवनराजे राळेभात यांचा शहरात मोठा समर्थक वर्ग असल्याने जामखेड शहरात भाजपाची ताकद वाढणार आहे. तर राळेभात यांच्या भाजपा प्रवेशाने  राष्ट्रवादीला पुन्हा एकदा मोठे खिंडार पडले आहे.  यावेळी आमदार राम शिंदे व पवन राळेभात यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

BJP News: राष्ट्रवादीचे युवानेते पवनराजे राळेभात यांचा भाजपात प्रवेश Read More »

Ahmednagar News : मुकुंदनगर भागातील हिंदु मंदिरावर होणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करा

Ahmednagar News: मुकुंदनगर भागातील हिंदु मंदिरावर होणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई आणि मंदिराचे जीर्णोध्दार व सुशोभिकरण करण्यात यावे अशी मागणी कुणाल भंडारी यांनी निवेदनाद्वारे अहमदनगर महापालिका आयुक्तांना केली आहे.   त्यांनी आपल्या निवेदनात असं म्हटले आहे की, मुकुंदनगर भागातील इंडिया बेकरी समोरील श्री पावन दत्त मंदिर हे जुने व पुरातन मंदिर असून या मंदिराच्या असलेल्या जागेच्या परिसरामध्ये अतिक्रमण करुन बांधकाम करण्यात आलेले असून या मंदिराची जागा हडपुन या मंदिराच्या पावित्र्याला धोका निर्माण होत आहे.  याबाबत तातडीने कारवाई करुन संबंधीत बांधकाम काढण्यात यावे व मुकुंदनगर भागातील शांतीधाम मंदिर हे सुध्दा पुरातन व जुने मंदिर असून महानगरपालिकेच्या जागेत हे मंदिर असल्याने या मंदिराच्या बाबतीत दिनांक 1 फेब्रुवारी 2022 रोजी बजरंग दलाने आपणास निवेदन दिलेले होते.  या मंदिरामध्ये त्या भागातील मुस्लिम गुंडांकडून मंदिराच्या जागेत अतिक्रमण करणे, तसेच ड्रेनेजचे पाणी सोडणे, कचरा आणुन टाकणे, मांसाचे तुकडे टाकणे असे मंदिराच्या पावित्र्याला धोका निर्माण होऊन मंदिराच्या जागेवरती कब्जा करण्याच्या उद्देशाने व तेथील हिंदु बांधवांना हाकलून लावण्याचे हे षडयंत्र आहे व हे सातत्याने अनेक वर्षापासून चालु आहे.  तरी आपण संबंधीत विषयामध्ये तातडीने कारवाई करुन मंदिराचा जीर्णोध्दार करुन वॉल कंपाऊंड बांधुन त्या ठिकाणी सुशोभिकरण करावे व मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करावी.  तसेच संबंधीत समाज कंटकांवर त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा बजरंग दल तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभारेल व पुढील होणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी जबाबदार महानगरपालिका व पोलिस प्रशासन असेल असा इशाराही त्यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.

Ahmednagar News : मुकुंदनगर भागातील हिंदु मंदिरावर होणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करा Read More »

Ahmednagar News: जिल्हा न्यायालयातील वकिलांचे 3 फेब्रुवारी पर्यंत काम बंद आंदोलन..

Ahmednagar News: अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने आज मंगळवारी वकिलांनी काम बंद आंदोलन ठेवून राहुरी येथील न्यायालयातील अॅड.राजाराम आढाव आणि अॅड.मनिषा आढाव या वकील दाम्पत्याची निर्घृण हत्या झालेल्या या घटनेचा निषेध व्यक्त करत, भविष्यामध्ये अशा घटना थांबल्या नाहीत तर वकील संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलने केली जातील असा इशाराही यावेळी वकील संघटनांनी दिला आहे.  यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट नरेश गुगळे, उपाध्यक्ष महेश शेडाळे, एडवोकेट सतीश गुगळे, सचिव संदीप शेळके, एडवोकेट अनिता दिघे, एडवोकेट सुहास टोने, एडवोकेट महेश काळे, एडवोकेट विकास सांगळे, एडवोकेट अनिता येवले आदी वकिलांनी सहभाग नोंदवला होता.  तसेच सदर परिस्थिती गांभीर्याने घेऊन शासनाने एडवोकेट प्रोटेक्शन कायदा संमत करावा अशी मागणी अहमदनगर जिल्हा न्यायालय ते अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत  मोर्चा काढून निदर्शने दर्शवत जिल्हाधिकारी यांना एडवोकेट प्रोटेक्शन कायदा लागू करण्याची केली मागणी.

Ahmednagar News: जिल्हा न्यायालयातील वकिलांचे 3 फेब्रुवारी पर्यंत काम बंद आंदोलन.. Read More »