DNA मराठी

latest news

Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन हुकूमशाही पद्धतीने चिरडण्याचा प्रयत्न

Maratha Reservation: राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करत आहे.  मात्र सरकारकडून याबाबत कोणताही निर्णय होत आणि आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हुकूमशाही पद्धतीने चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा अहमदनगरकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात आज सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा अहमदनगरकडून आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आला आहे.  या निवेदनात म्हटले आहे की, मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील मराठा समाज 50 % च्या आत ओबीसी मधुन आरक्षणाची  मागणी करत आहे.  मागील चार – पाच महिन्यापासून मराठवाडा परिसरातील अंतरवली सराटी, तालुका अंबड, जिल्हा जालना येथे मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी याच मागणीसाठी आंदोलन करत आहेत. यापूर्वी अंतरवली येथे आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर करून लाठीहल्ला केला ज्यामध्ये अनेक महिला आणि मुलांना सुद्धा जखमा झालेल्या आहेत सदर हल्ल्याची चौकशी करावी अशी मागणी करूनही जबाबदार लोकांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. आरक्षणाची जी मागणी मराठा समाजाने केलेली आहे त्याबद्दल सरकारने मागणी मान्य केल्याचे सांगितले आहे मात्र तिची पूर्तता आणि कार्यवाही करण्यासाठी अजूनही पुरेसे आदेश काढलेले नाहीत आणि सर्व मागण्या मान्य झालेल्या नाहीत. मात्र आंदोलन मोडीत काढण्यासाठी आंदोलकांवर बळाचा वापर करून कायद्याच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकवणे, आंदोलकांची बदनामी करणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत.   यामुळे आपण आंदोलन मोडित काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र सरकार आणि संबंधित लोकांवर योग्य ती कारवाई करावी आणि आंदोलकांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.

Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन हुकूमशाही पद्धतीने चिरडण्याचा प्रयत्न Read More »

Health Tips: लवकर राग येतो का? ‘ह्या’ टिप्स फॉलो करा आणि रागावर नियंत्रण मिळवा

Health Tips: राग ही एक फार वाईट गोष्ट आहे ज्यामुळे तुमचा सर्वनाशही होऊ शकतो, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा तुमचा उत्कर्षच होईल.  परंतु कोणाकोणाचा राग इतका वाढतो की त्याचा परिणाम त्याच्या स्वतःच्या व इतरांच्या जीवनावर पडू लागतो, काही लोक त्यांना कधी राग येतो हे मान्यच करत नाहीत आणि त्यांना जेव्हां राग येतो तो नियंत्रणाबाहेर होऊन जातो अशातच ते आपल्या जवळच्या लोकांना नुकसान पोहोचवतात.  आपल्यामधील काहीच मान्य करतात की त्यांचा स्वभाव रागीट आहे. आज आपण जाणणार आहोत की राग येण्यास कसे ओळखावे. राग कसा नियंत्रित करावा यासाठी टिप्स  राग येण्याचे संकेत  जीवनात प्रत्येक क्षण समान नसतो. कधी आनंद तर कधी दुःख सुध्दा येतात जेव्हां नात्यांच्या धाग्यांना रागाने ओढतोड केली जाते त्यात अनेक नात्यांची धागी मात्र तुटून जातात. ती जोडण्यास बराच वेळ लागतो. नातं जितकं मजबुत तितकाच वेळ लागतो तो जोडण्यासाठी. रागाची लक्षणे  धैर्याचा बांध तुटणे. चिडचिडेपणा. अस्वस्थता वाढणे. शंका व संशयी भाव वाढणे. प्रत्येक कारणास दुसऱ्यांना दोषी ठरविणे. अपमान करणे. संबधीत व्यक्तीस कमी लेखणे. वर्तमानात सभोवतालचे भान नसणे. पत्नी मूलबाळ आणि नातेवाईक तुमच्याशी बोलण्यास घाबरतात. हे राग येण्याची सामान्य लक्षणे आहेत. याशिवाय परिस्थितीनुरूप अनेक कारणांनी राग वाढू शकतो, आपला परिवार, मित्रसंघ, कार्यक्षेत्र आणि आपल्या जवळच्या लोकांमुळे काही विशेष कारणास्तव रागाची निर्मीती होऊ शकते.  रागाच्या उत्पत्तीचे मुळ हे स्वभावात म्हणजेच आपल्या मानसिक तारतम्यांवर अवलंबून असते. त्यामुळे जर तुम्हाला असे वाटते की तूम्हाला राग येतो आहे यासाठी तुम्हास स्वतःच स्वतःवर नियंत्रणासाठी विशेष पाउलं उचलावी लागतील. तर मग हा प्रश्न उठतो की रागाचे नियंत्रण कसे करावे. राग नियंत्रित करण्याचे काही महत्वाचे उपाय  1) 10 पर्यंत अंकांची गणना जर तुम्हास समोरच्या व्यक्तीवर राग येत असल्यास त्याच्याशी बोलणे टाळा. त्याच्याशी नजर मिळवू नका व मनात 10 पर्यंत किंवा पुढेही अंकांची गणना खात्रीने सुरू ठेवा.आपले मन पूर्णपणे अंकांच्या उच्चारात केंद्रीत करा. बघा तुमचा राग शांत हातो की नाही यामुळे तुम्हाला रागाबाबत योग्य निर्णय घेण्यास वेळ मिळेल. 2) एक ब्रेक घ्यावा  जर तूम्हाला अशांत करणारा जोरदार राग येत असेल तर ज्याच्याशी तुम्ही वाद घालता आहात त्यापासून दूर जावे व शांत बसून आपले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा दिसेल. समोरचा व्यक्ती शांत झाला असेल तर त्याच्याशी चर्चा करा किंवा वाटत असेल तर चर्चाही न करता त्याच्याशी बोलणे व संपर्क करणे टाळा. 3) प्राणायाम करून राग घालवा  प्राणायाम व पहाटेचा व्यायाम तसेच पहाटेचे चालणे सुध्दा तुमचा मुड दिवसभरासाठी चांगला करू शकतो, प्राणायामात मन केंद्रीत करण्याचा सराव होतो.  तसेच श्वास केंद्रीत करण्याचा सराव आपणांस राग घालवण्यास मदत करेल. पोहणे, हास्य व्यायाम व चर्चां मुळे तुमचा राग येण्यास बऱ्याच प्रमाणात आळा बसतो. 4) निवांत झोप  कधी कधी कामाची दगदग आणि दगदगीच्या दिनचर्येमुळे मन चिडचिडे होते त्यामुळे राग लवकर येणे साहजिकच आहे, पण त्याचा फायदा कोणताच नाही सर्व नुकसानच आहे. त्यामुळे राग घालविण्यासाठी आपल्या मेंदूला शांत करणे फार जरूरी आहे. त्याकरीता निवांत झोप घेणे फार जरूरी आहे. निवांत झोपेमुळे तुमची मनस्थिती चांगली होते व त्यामूळे व्यक्ती मानसिक दृष्टया तयार ही होतो किमान 7 ते 8 तासांची झोप आवश्यक मानली जाते. रागीट स्वभाव सर्वांनाच अप्रिय आणि व्देषाचा भागी बनतो. रागास दाबून ठेवणे हे फार चुकीचे ठरते व त्यामुळे कोणत्याच समस्येचा उपाय निघत नाही त्याकरीता स्वतःच्या मनातील विचार सर्वांशी जुळवून घ्या तरच रागाचे प्रमाण कमी होईल.  प्रत्येकाचे बोलणे ऐका व त्यास आपली बाजू प्रेमाने समजावून सांगा, न पटल्यास चर्चा करा त्याने नक्कीच कोणता ना कोणता योग्य पर्याय समोर येईल. तर ह्या काही सोप्या आणि छोट्याश्या टिप्स जे आपल्याला मदत करतील रागावर नियंत्रण ठेवायला.

Health Tips: लवकर राग येतो का? ‘ह्या’ टिप्स फॉलो करा आणि रागावर नियंत्रण मिळवा Read More »

New Rules: मोठी बातमी! उद्यापासून देशात बदलणार ‘हे’ नियम, बसणार सर्वसामान्यांच्या खिशाला फटका?

New Rules: उद्यापासून नवीन महिन्याची सुरुवात होणार आहे. याचबरोबर देशात देखील नवीन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून काही नियमात बदल होणार आहे. ज्याच्या फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे. हे जाणुन घ्या, देशात 1 मार्चपासून केवायसी, जीएसटी, एलपीजी सिलिंडर आणि बँकिंगशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत.   एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल एलपीजी सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलतात. 1 मार्च रोजी सिलिंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो. 1 फेब्रुवारी रोजी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 14 रुपयांची वाढ करण्यात आली होती. सोशल मीडियाचे नवीन नियम 1 मार्च रोजी सोशल मीडियाशी संबंधित नियमांमध्येही बदल होणार आहे. सरकारने नवीन माहिती तंत्रज्ञान नियम लागू केले आहेत. जे फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामसह सर्व सोशल मीडिया कंपन्यांना फॉलो करावे लागेल. नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारला जाऊ शकतो. बँक सुट्टी आरबीआयने मार्चमध्ये होणाऱ्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. पुढील महिन्यात 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. आणि 14 दिवसांपैकी 8 सुट्या सणांसाठी आहेत. फास्टॅग केवायसी नियम तुम्ही अजून FasTag KYC अपडेट केले नसेल, तर ते 29 मार्च 2024 पर्यंत करा. NHAI ने Fastag KYC साठी KYC अपडेट अनिवार्य केले आहे. काम पूर्ण न झाल्यास तुमचे फास्टॅग खाते काळ्या यादीत टाकले जाऊ शकते. जीएसटीशी संबंधित नवीन नियम लागू होणार   करचोरी रोखण्यासाठी जीएसटीशी संबंधित नवीन नियम 1 मार्चपासून लागू होऊ शकतो. ज्या अंतर्गत ई-चलानसाठी ई-वे बिल तयार करण्याची गरज भासणार नाही.

New Rules: मोठी बातमी! उद्यापासून देशात बदलणार ‘हे’ नियम, बसणार सर्वसामान्यांच्या खिशाला फटका? Read More »

Sujay Vikhe News : जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान: खासदार डॉ. सुजय विखे पाटील

Sujay Vikhe News: अहमदनगर जिल्ह्यात जनसेवा फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. या माध्यमातून खास करून महिला भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी विविध गोष्टींचे वाटप असेल किंवा महिलांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे असेल तसेच गरजू महिलांच्या हाताला काम मिळवून देणे असेल अशा सर्व प्रकारची कामे जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येतात. याच अनुषंगाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्यातील श्रीगोंदा, शेवगाव, जामखेड, राहुरी आणि पाथर्डी तालुक्यात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व सांस्कृतिक महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. या सोहळ्यात विविध क्षेत्रात बहुमूल्य कामगिरी करणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच भव्य लकी ड्रॉ, पैठणी आणि बरच काही.. या थीम अंतर्गत विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यामधील विजेत्या महिलांना खासदार सुजय विखे आणि आमदार मोनिका राजळे यांच्या वतीने आकर्षक बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत. यामध्ये फ्रिज, वॉशिंग मशीन, टिव्ही वॉटर प्युरिफायर, सायकल यासह अनेक आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.    तसेच या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले, अभिनेत्री मानसी नाईक, महाराष्ट्राचे हास्यवीर सुनील पाल, रोहित माने आणि शिवाजी परब उपस्थितांचे मनोरंजन करणार आहेत.  राजू आणि प्रशांत अनासपुरे यांच्या यांच्या संकल्पनेतून साकार होणारा सदरील कार्यक्रम हा ०१ मार्च रोजी श्रीगोंदा येथील बाजारतळ, ०२ मार्च रोजी शेवगाव येथील खंडोबा मैदान, ०३ मार्च रोजी जामखेड येथील जामखेड महाविद्यालय, ०४ मार्च रोजी राहुरी येथील केशर मंगल कार्यालय (मल्हारवाडी रोड) आणि ०५ मार्च रोजी पाथर्डी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात सादर होणार आहे. वरील सर्व कार्यक्रमांची वेळ ही सायं. ०६ वाजेची असून समस्त महिला भगिनींनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची रंगत वाढवावी असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

Sujay Vikhe News : जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान: खासदार डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Health Tips: झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्या, मिळणार ‘हे’ जबरदस्त फायदे

Health Tips: कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी उठून कोमट पिण्याचा सल्ला तर आपण अनेकांकडून ऐकला असेलच.  कोमट पाण्यात सर्व शारीरिक कार्य व्यवस्थित पद्धतीने पार पाडण्याची क्षमता असते. झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायद्याचे आहे. झोपताना अनेक लोक पाणी पिणे टाळतात परंतू कोमट पाणी पिण्याने आरोग्यही चांगलं राहतं आणि शांत झोप देखील लागते. योग्य रित्या होईल पचन कोमट पाणी पचन तंत्रात अवांछित अन्नाला योग्य पचन दिशेत घेऊन जाण्यात मदत करतं. रात्री आपले पचन तंत्र सर्वात कमजोर अवस्थेत असतं अशात कोमट पाणी पिण्याने अन्न लवकर पचण्यात मदत मिळते. वजन कमी होण्यास मदत मिळेल आमचे पचन तंत्र रात्री मजबूत अवस्थेत नसतं. अशात कोमट पाण्यामुळे आहार लवकर पचवण्यात मदत मिळतं. ज्याने वजन कमी होण्यात मदत मिळते. काळजी आणि उदासीनता दूर होईल शरीरात पाण्याची कमी ताण निर्माण होतं. यामुळे झोप देखील प्रभावित होते. दिवसाच्या शेवटी कोमट पाण्याचे सेवन केल्याने शरीरात जल स्तराचे प्रमाण योग्य राहील आणि आपली मन देखील प्रसन्न राहील. विषारी पदार्थांपासून मुक्ती कोमट पाणी शरीराचे आंतरिक तापमान वाढवतं आणि घाम निर्माण करतं ज्यामुळे रक्त परिसंचरण सुरळीत राहतं आणि शरीराला विषाक्त पदार्थांपासून मुक्ती मिळते. सौंदर्यात वाढ झोपण्यापूर्वी कोमट पाण्याचे सेवन केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते आणि त्वचेचं सौंदर्य वाढतं.

Health Tips: झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्या, मिळणार ‘हे’ जबरदस्त फायदे Read More »

PM Kisan Samman Nidhi : अवकाळी पावसात शेतकऱ्यांना दिलासा! खात्यात जमा होणार 6000 रुपये

PM Kisan Samman Nidhi: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे.  मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासा बातमी समोर आली आहे.  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे. होय, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासोबतच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचे दुप्पट पैसेही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत. म्हणजेच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 6000 रुपये जमा होणार आहे. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या काळात पंतप्रधान किसान सन्मान निधीसोबतच राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते किसान सन्मान निधीच्या 16व्या हप्त्याचे वितरण करतील. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आणखी एक भेट मिळणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्राकडून मिळून 6000 रुपये मिळतील. राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता म्हणजे एकूण 4000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच आज राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 6000 रुपये दिले जाणार आहेत. महाराष्ट्रातील सुमारे 88 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार लिंक बँक खात्यात 6,000 रुपये थेट जमा केले जातील. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. नमो शेतकरी योजना काय आहे? प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने राज्यात नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 86 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी आणखी 6,000 रुपये दिले जातील.  राज्यातील शेतकऱ्यांना पीएम सन्मान निधीचे सहा हजार रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये दरवर्षी हप्त्याने मिळणार आहेत. म्हणजेच दरवर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 12 हजार रुपये पाठवले जातील.

PM Kisan Samman Nidhi : अवकाळी पावसात शेतकऱ्यांना दिलासा! खात्यात जमा होणार 6000 रुपये Read More »

Maharashtra IMD Alert:- आभाळ फाटलं, काळीज तुटलं, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नंनावर पाणी

Maharashtra IMD Alert : गेल्या काही दिवसापासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे.  या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.  अकोला जिल्ह्य़ात व बाळापूर, तेल्हारा, अकोट, पातुर तालुक्यात काल झालेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. काही शेतकऱ्यांना अवकाळी दिलासा मिळाला तरी काही शेतकऱ्यांची निराक्षा झाली आहे. अकोल्या जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.  टरबूज, संत्रा, गहू, कांदा, हरभरा, ज्वारी अशा सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यात सायंकाळी वादळी  पावसासह काही भागात गारपीट झाली आहे. राज्यात मागील तीन-चार वर्षात दुष्काळाचं सावट काहीसे कमी झालंय आहे. पण अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून येणारे आहे. खरं तरं हा काळ रब्बीचे पिकं घेण्याचा होता. मात्र फळपिकांचे झालेलं नुकसानीने शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे.  तरी यांकडे अकोला जिल्हाअधिकारी अजित कुंभार यांनी लक्ष देऊन नुकसान झालेल्या गहू, हरभरा, ज्वारी,कादा संञा, या पिकांचे सर्वे करण्याचे आदेश तलाठी यांना द्यावे व नुकसान झालेल्या अकोल्या जिल्ह्य़ातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असे अकोला जिल्ह्य़ातील व बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या बाळापूर तालुक्यांमध्ये हरभरा, कादा काढण्याचे काम चालू आहे. त्यामुळे लोहारा ,कवठा,बहादूरा, निंबा, हाता,जानोरी,वझेगाव, अंदुरा या परिसरात काल झालेल्या अवकाळी पाऊसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेत.

Maharashtra IMD Alert:- आभाळ फाटलं, काळीज तुटलं, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नंनावर पाणी Read More »

Dhruv Jurel :  ध्रुव जुरेल चमकला, थेट महेंद्रसिंग धोनीच्या यादीत स्थान मात्र …….

Dhruv Jurel : भारतीय संघाने रांची कसोटीमध्ये चमकदार कामगिरी करत इंग्लंडचा पराभव केला आहे. या सामन्यात भारताला आणखी एक स्टार खेळाडू मिळाला आहे. होय, आपल्या पदार्पणापासूनच यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल सोशल मीडियावर चर्चेत आहे.   रांची कसोटीच्या पहिल्या डावात त्याला शतक झळकावण्याची संधी होती मात्र तो 90 धावांवर बाद झाला. यामुळे त्याने आता असा विक्रम केला आहे जो त्याला  लक्षात ठेवायला आवडणार नाही.  रांची कसोटीमध्ये भारतीय संघाने पहिल्या डावात 307 धावा केल्या होत्या. या डावात 171 धावांच्या स्कोअरवर भारताने 7 विकेट गमावल्या होत्या पण ध्रुव जुरेलने चमकदार कामगिरी करत  इंग्लंडच्या मोठ्या आघाडीच्या आशा संपुष्टात आणल्या. ध्रुव जुरेलमुळे इंग्लंडला फक्त 46 धावांची आघाडी घेता आली.  महेंद्रसिंग धोनीच्या यादीत ध्रुवचा समावेश  2012 मध्ये नागपूर कसोटीत महेंद्रसिंग धोनी 99 धावा करून धावबाद झाला होता. तर 2007 मध्ये ओव्हल कसोटीमध्ये तो 92 धावावर बाद झाला होता. तर आता रांची कसोटीमध्ये ध्रुव जुरेल देखील 90 धावांवर बाद झाला आहे.  रांची कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने इंग्लडचा 5 विकेटने पराभव करत पाच सामन्याच्या मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या ध्रुव जुरेलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं आहे.  रांची येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो रूटच्या शतकामुळे संघाने पहिल्या डावात 353 धावा केल्या. भारत पहिल्या डावात अडचणीत सापडला होता आणि संघाने 177 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या पण येथे कुलदीप यादव आणि ध्रुव जुरेल यांच्या भागीदारीने भारताला 307 धावांपर्यंत नेले.  दुसऱ्या डावात 46 धावांची आघाडी घेऊन मैदानात उतरलेला इंग्लंडचा संघ अवघ्या 145 धावांवर गारद झाला. आर अश्विनने 5 तर कुलदीपने 4 विकेट घेतल्या आणि भारताचा विजय निश्चित केला.

Dhruv Jurel :  ध्रुव जुरेल चमकला, थेट महेंद्रसिंग धोनीच्या यादीत स्थान मात्र ……. Read More »

PM Modi: पंतप्रधानांचं स्वच्छ भारत अभियानाचं स्वप्न होतंय साकार: खासदार डॉ. सुजय विखे पाटील

PM Modi: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात असून प्रत्येक गाव स्वच्छ झाले पाहिजे या दृष्टिकोनातून आता इलेक्ट्रिक घंटागाडी वाटप मोहीम राबविली जात आहे. या माध्यमातून पंतप्रधानांचे स्वप्न साकार होत असल्याचे मत खा. विखे यांनी मांडले. ते महासंस्कृती महोत्सव येथील कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन अंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतून कचरा संकलन व वाहतूक कामी इलेक्ट्रिक घंटागाडीचे वाटप तसेच उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांना कर्ज व लाभ वाटप आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, समर्थ शेवाळे, राहुल शेळके, उमेदचे सोमनाथ जगताप, महिला आर्थिक विकास महामंडळाचे  संजय गर्जे तसेच महिला व नागारिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार विखे म्हणाले, महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता राखणे ही काळाची गरज आहे. या अनुषंगाने ग्रामीण भागामध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करणे गरजेचे आहे. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून त्याचे चांगले व्यवस्थापन देखील केले पाहिजे. यासाठी अहमदनगर महापालिकेच्या परिसरातील व नगर तालुक्यातील गावांना घनकचरा व्यवस्थापनासाठीच्या नियोजित प्रकल्पासाठी दहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती खासदार विखेंनी दिली. तसेच मागील ज्या इलेक्ट्रिक घंटा गाड्या आपण वाटप केल्या होत्या, त्या नगर एमआयडीसीमध्ये तयार करण्यात आल्या होत्या. नगरमधील युवकांना रोजगार मिळावा यासाठीचा आमचा हा प्रयत्न होता आणि त्या इलेक्ट्रिक घंटा गाड्या त्यांनी केवळ तीन लाख रुपयांमध्ये बनवल्या होत्या. यावेळी ज्या गाड्या दिल्या जात आहेत त्या पाच लाख रुपये किमतीच्या असून उत्तम दर्जाच्या गाड्या या ग्रामपंचायतींना आज आपण प्रदान केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान या संकल्पनेला चालना देण्याच्या उद्देशाने या घंटागाडीचा कचरा गोळा करण्यासाठी वापर करून कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे असे आवाहन यावेळी सुजय विखे पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून महिला रोजगार प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या अनुषंगाने या एका वर्षामध्ये महिला बचत गटांमध्ये सुमारे 185 कोटी रुपयांचे जिल्हा बँकेमार्फत कर्ज वाटप करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा नियोजनामध्ये महिला रोजगार निर्मिती करण्यासाठी कुणीही प्रयत्न केला नाही. परंतु राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, तेव्हापासून अशा विविध हितावह धोरणांचा अवलंब करून महिला सक्षमीकरणासाठी अतोनात प्रयत्न केले जात आहेत. जोपर्यंत महायुती सरकार व आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब पालकमंत्री असतील तोपर्यंत महिलांना व महिला बचत गटांना कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही असे त्यांनी आश्वासित केले. तसेच महासंस्कृती महोत्सव झाल्यानंतर याच ठिकाणी 27 आणि 28 तारखेला नमो महा रोजगार मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये 200 पेक्षा जास्त कंपन्या सहभाग घेणार आहेत. या माध्यमातून रोजगाराची संधी चांगल्या पद्धतीने उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे जास्तीत जास्त नगर जिल्ह्यातील युवकांनी या नमो महा रोजगार मेळाव्यात सामील व्हावे असे आवाहन देखील त्यांनी युवक वर्गाला केले.

PM Modi: पंतप्रधानांचं स्वच्छ भारत अभियानाचं स्वप्न होतंय साकार: खासदार डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Ahmednagar News: अहमदनगर शहरासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर :खा डॉ सुजय विखे पाटील

Ahmednagar News: नगर विकास विभागाच्या खात्यातून “महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद” या योजनेअंतर्गत अहमदनगर महानगरपालिका करिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्या असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितली. अहमदनगर महापालिका क्षेत्राचा विकास आता अधिक जलद गतीने होणार आहे. कारण शासनाकडून नागरी मुलभूत सेवा सुविधांसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच महापालिकेला वर्ग केला जाणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.  पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून नगर विकास विभागाच्या खात्यातून “महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद” या योजनेअंतर्गत अहमदनगर महानगरपालिका करिता २० कोटी रुपयांच्या अनुदानास शासनाने मंजूरी दिली आहे. यामुळे शहरातील मुलभूत सोई सुविधा उभारण्यासाठी येणारी निधीची समस्या मार्गी लागली असून लवकरच शहरात विविध नागरी कामांना सुरवात केली जाईल असे खासदार विखे म्हणाले.  अहमदनगर महापालिका क्षेत्रात अनेक कामे निधीच्या अभावामुळे रखडली होती. यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत आणि माझ्यामार्फत महापालिकेला नागरी मुलभूत सेवा सुविधांच्या कामासाठी निधी मिळण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागणीला प्रतिसाद देत सदर निधी मंजूर केला आहे.  सदर निधीतून शहरातील रस्ते, जलवाहिन्या, गटारे, सभामंडप आणि इतर विविध नागरी कामे मार्गी लागणार आहेत. यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या कमी होऊन शहराचा विकास साधला जाईल असा आत्मविश्वास खासदार डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. सदर निधीसाठी योग्य तो पाठपुरावा केल्याबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अहमदनगर निवडणूक प्रमुख महेंद्र गंधे आणि प्रिया जानवे व मयुर बोचकुळ यांनी आभार व्यक्त केले.

Ahmednagar News: अहमदनगर शहरासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर :खा डॉ सुजय विखे पाटील Read More »