Dnamarathi.com

Amit Shah : सत्ताधारी भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरात तयारी सुरू केली आहे. भाजपने आगामी लोकसभे निवडणूकसाठी आपली पहिली उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आहे. या यादीमध्ये 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 195 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. 

 मात्र या यादीमध्ये राज्यातील एकाही उमेदवाराचे नाव नाही. यावरून अद्याप महायुतीमध्ये जागावाटपाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट झालं आहे.  

भाजप,  शिवसेना (एकनाथ शिंदे गट)आणि  राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 30 हून अधिक जागांवर उमेदवार उभे करायचे आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागांवर निवडणूक लढवायची आहे. मात्र भाजप त्यांना 04 जागा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तर दुसरीकडे  अजित गटाचा 16 जागांवर डोळा असल्याच्या बातम्या येत आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 22 जागांवर निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे भाजपच टेन्शन वाढला असून जागावाटपाचा मुद्दा गुंतागुंतीचा बनत चालला आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने यापूर्वी 10 जागांवर निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र आता त्यात आणखी 6 जागांची भर पडली आहे. आज आणि उद्या राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत एकूण 16 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये सध्या एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर, नाशिक आणि भाजपच्या अहमदनगर दक्षिण, भंडारा, गोंदिया, नाशिक, दिंडोरी या जागांचा समावेश आहे.

अजित पवार गटला अहमदनगर दक्षिणची जागा हवी आहे. तेथून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय पाटील हे सध्या खासदार आहेत. अजित पवार यांचे समर्थक आमदार नीलेश लंके यांना या जागेवरून निवडणूक लढवायची असून त्यांना तिकीट न मिळाल्यास ते पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याचे बोलले जात आहे.

त्याचबरोबर भंडारा गोंदिया हा प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे ती जागाही राष्ट्रवादीला हवी आहे. तर दिंडोरीतून विद्यमान केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या जागी अजित पवारांना आपल्या गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांना संधी द्यायची आहे. सध्या नाशिकमधून शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत, मात्र येथे छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

2019 मध्ये ईशान्य मुंबईची जागा राष्ट्रवादीने जिंकली होती. त्या जागेचाही राष्ट्रवादी आढावा घेणार आहे. शिवसेनेचे संजय मंडलिक हे सध्या कोल्हापुरात खासदार आहेत. 2014 ते 2019 दरम्यान ही जागा राष्ट्रवादीकडे होती.

या सहा जागांव्यतिरिक्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणखी दहा जागांवर उमेदवार उभे करायचे आहेत. ज्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या धाराशिव, परभणी या जागेचा समावेश आहे. तर, गडचिरोली, माढा या जागा भाजपने गेल्या निवडणुकीत जिंकल्या होत्या आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या हिंगोली, बुलढाणा या जागांचा समावेश आहे. याशिवाय बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागांचाही समावेश आहे.

अमित शहा आज निर्णय घेणार!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज (5 मार्च) महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यावेळी राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपाच्या सूत्रावर चर्चा होऊ शकते. त्यामुळे सत्ताधारी महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न सुटू शकतो. भाजप आपल्या मित्रपक्षांना जास्त जागा देऊ शकेल, अशी चर्चा आहे, पण कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *