DNA मराठी

latest news

Health Tips: फ्रीजमध्ये अंडी ठेवता? मग ‘या’ 5 गोष्टी जाणून घ्या

Health Tips: आज अनेकजण स्वतःला फिट ठेवण्यासाठी या बिझी लाईफस्टाईल मध्ये रोज सकाळी किंवा रात्री अंडी खातात मात्र आपल्याला हे माहित आहे का ? फ्रीज मध्ये ठेवलेले अंडी हे आपले आरोग्य बिघडवू शकतात.    संसर्ग होण्याचा धोका बऱ्याच वेळा अंडींच्या सालांवर बाहेरची घाण लागलेली असते. ज्यामुळे फ्रीज मध्ये ठेवल्याने इतर पदार्थांमध्ये देखील संसर्ग पसरण्याचा धोका असतो. हेच कारण आहे की अंडी फ्रीज मध्ये ठेवणे टाळावे. फ्रीज बाहेर ठेवलेली अंडी जास्त आरोग्यवर्धक आहे   फ्रीज मध्ये ठेवलेली अंडी बाहेरच्या अंडींपेक्षा जरी जास्त दिवस चांगले राहत असेल तरी फ्रीज मध्ये ठेवलेली अंडी जास्त थंड झाल्यामुळे आपले पोषक घटक गमावतात.  अशा परिस्थितीत जर आपण आरोग्याबद्दल सज्ज आहात तर हे जाणून घ्या की खोलीच्या तापमानात ठेवलेली अंडी, फ्रीज मध्ये ठेवलेल्या अंडींच्या तुलनेत जास्त आरोग्यदायी आहे.  बॅक्टेरियांचा धोका अंडींना फ्रीज मध्ये ठेवल्यावर त्यांना सामान्य तापमानात ठेवल्याने कंडेनसेशन म्हणजे गॅस मधून द्रव होण्याची प्रक्रिया ची शक्यता वाढते. कंडेनसेशनमुळे अंडींच्या सालींवरील असलेले बॅक्टेरिया झपाट्याने वाढतच नाही तर अंडींच्या आत देखील प्रवेश करू शकतात. अश्या अंडींचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. तापमान  जर आपण अंडींचा वापर बेकिंग उत्पादन साठी करू इच्छिता तर हे फ्रीज मध्ये ठेवू नये. कारण फ्रीज मधील ठेवलेल्या अंडींना फेणायला त्रास होतो. एवढेच नव्हे तर फ्रीज मधील ठेवलेल्या अंडींना वापरल्याने त्यांच्या चवीमध्ये आणि रंगात बदल होऊ शकतो. तुटण्याची भीती  बाजारातून आणलेले अंडी त्वरितच उकडण्यासाठी ठेवल्याने त्यांची फुटायची भीती कमी असते. तर फ्रीज मधील अंडींना उकडल्याने ती अंडी फुटायची भीती असते.

Health Tips: फ्रीजमध्ये अंडी ठेवता? मग ‘या’ 5 गोष्टी जाणून घ्या Read More »

Ahmednagar News: मोठी बातमी! माळीवाडा बस स्थानकासमोर लागली आग

Ahmednagar News : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार अहमदनगर शहरातील माळीवाडा बस स्थानकासमोर दुपारी साडेबारा – एकच्या दरम्यान आग लागली. या लागलेल्या आगीमुळे माळीवाडा परिसरामध्ये एकच खळबळ उडाली.  मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील उज्वल नगर येथील मोकळ्या पटांगणात ही आग लागली होती. ही आग उष्णतेमुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.  आग लागल्याची माहिती मिळतात अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले व काही वेळेतच आग आटोक्यात आणण्यात यशस्वी झाले.

Ahmednagar News: मोठी बातमी! माळीवाडा बस स्थानकासमोर लागली आग Read More »

Sujay Vikhe News: खा. डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते दोन कोटी रुपयांचे साहित्य व कर्ज वाटप

Sujay Vikhe News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नारीशक्ती वंदन या कार्यक्रमाच्या अंतर्गत कर्जत मंडलामधील महिलांना दुरदृष्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मोर्चा अध्यक्ष यांनी केले. कर्जत तालुक्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज बचत गटातील महिलांना सक्षमीकरणासाठी कर्ज व साहित्य वाटपाचे वितरण खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. दरवर्षी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून अनेक आश्वासने दिली जातात.  पण महिला सक्षमीकरणासाठी कोणतेही काम झाले नव्हते. मात्र यावेळी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन अंतर्गत महिलांना 40 कोटी रुपयांचा निधी देऊन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. जोपर्यंत महायुती सरकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील तोपर्यंत जिल्ह्यातील महिला बचत गटांना कुठल्याही निधीची कमतरता पडणार नाही अशी ग्वाही खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. शिवपार्वती लॉन्स येथे संपन्न होत असलेल्या बचत गटातील महिलांना साहित्य व कर्ज वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, शेखर खरमरे, प्रतिभाताई, अर्चनाताई, शबनम इनामदार, प्रभा पाटील, शामल थोरात, नीता कचरे, विक्रम भोसले, संजय तापकीर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कर्जत तालुक्यासाठी मागील जिल्हा नियोजन अंतर्गत 13 महिला बचत गटांना 65 लाख रुपयांचे साहित्य वाटप केले होते. यावेळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन विकास योजनेच्या अंतर्गत 40 महिला बचत गटांना दोन कोटी रुपयांचे साहित्य व कर्ज वाटप करण्यासाठीच्या निधीची तरतूद केली आणि प्रत्यक्षात वाटप देखील सुरू आहे. यामध्ये मसाला कांडप, शेवया मशीन, पिठाची गिरणी, स्टॉल आदी वस्तूंचा समावेश आहे. तसेच पुढच्या वर्षी ज्या जिरायत पट्ट्यामध्ये किंवा तालुक्यात जे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. त्या पिकासाठी आपण उमेद व महावीग यांना सांगून आपणास जे काही साहित्य अपेक्षित राहील त्याबाबत कळवावे. लागेल ते साहित्य पुरवण्याचे काम खा. डॉ. विखे पाटील करेल असे देखील उपस्थितांना त्यांनी आश्वासित केले. निस्वार्थ भावनेने तालुक्याच्या विकासासाठी वारंवार काम करण्याचा प्रयत्न केला आहे. एक सुशिक्षित व्यक्ती निवडून दिल्यानंतर आपल्या भागाचा विकास कसा होतो याचे उदाहरण खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले आहे. नगर करमाळा अंतर कापण्यासाठी पूर्वी चार तास लागत होते.  मात्र आता काम मार्गी लावून वेळेची बचत कशी झाली याचे उदाहरण खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले आणि नगर करमाळाचे काम अवघ्या 18 महिन्यात पूर्ण करून तो रस्ता नागरिकांसाठी खुला केला.  सध्या काही लोक आम्ही किती गरीब हे समाजापुढे दाखवत असतात. पण ती नंतर कसे श्रीमंत होतात कळत सुद्धा नाही. एक सुशिक्षित व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला लोकप्रतिनिधी निवडून दिला तर तो कुठल्याही कामांमध्ये टक्केवारी न घेता काम कसे पूर्ण होईल याकडे जास्त लक्ष देतो.  दरम्यान विखे यांनी यावेळी विरोधकांना चांगलेच खडे बोल सुनावले व सुजय विखे पाटील हे कामातून उत्तर देत असतात. तालुक्याची विकासक गती कशी वाढवता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न सर्वांनी केले पाहिजेत असे मत देखील खासदार विखेंनी यावेळी मांडले. भारतीय जनता महिला मोर्चाच्या संयुक्त विद्यमानाने कर्जत मंडल येथे आयोजित नारी शक्ती वंदन या कार्यक्रमाअंतर्गत विश्वनेते नरेंद्र मोदी साहेब यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी नरेंद्र मोदींनी प्रथमतः भारत माता की जय, जय मां काली, जय माँ दुर्गा अशा जयघोषाने भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, देशातील लाखो भगिनीही या कार्यक्रमात दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. मी त्या सर्व महिलांना आणि उपस्थित महिला भगिनींना नमस्कार करतो. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सर्व भगिनींचे मला अभिनंदन करायचे आहे. कारण मी पुरुषांच्या मॅरेथॉनबद्दल ऐकले होते, परंतु आमच्या महिला कार्यकर्त्या नारी शक्ती वंदनाच्या माध्यमातून गावोगावी जात आहेत. न थकता पायपीट करत आहेत. या माता, या बहिणी आणि मुली मोदींच्या रक्षणासाठी चिलखताप्रमाणे उभ्या आहेत. आज प्रत्येक देशवासी स्वत:ला मोदींचे कुटुंब म्हणवत आहे.  आज देशातील प्रत्येक गरीब, प्रत्येक शेतकरी, प्रत्येक तरुण, प्रत्येक बहीण आणि मुलगी म्हणत आहे मी मोदींचे कुटुंब आहे. या कुटुंबाला पुढे घेऊन जाण्यासाठी माझ्यासह संपूर्ण भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते सक्षम आहेत असे उपस्थितांना त्यांनी सांगितले.

Sujay Vikhe News: खा. डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते दोन कोटी रुपयांचे साहित्य व कर्ज वाटप Read More »

Chandrapur Crime : महाराष्ट्र हादरला! तिहेरी हत्याकांडाने खळबळ

Chandrapur Crime : चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.  या माहितीनुसार कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलींची निर्घृण हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मौशी गावात रविवारी ही घटना घडली. 50 वर्षीय अंबादास तलमले यांनी त्यांची 42 वर्षीय पत्नी अलका, 19 वर्षांची मुलगी प्रणाली तलमले आणि 17 वर्षांची मुलगी तेजू तलमले यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. मारेकरी पती अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पती अंबादास याचा पत्नीसोबत वाद सुरू होता. दरम्यान, काल पहाटे क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. यादरम्यान अंबादासचा संयम सुटला आणि त्याने शिवीगाळ सुरू केली. दरम्यान, रागाच्या भरात अंबादासने पत्नी व दोन मुलींवर कुऱ्हाडीने वार केले. त्याचा जागीच मृत्यू झाला. या खुनाची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील कायदेशीर कारवाई केली. पोलिसांनी तिन्ही महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. तसेच आरोपी अंबादास याला अटक केली. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत. घटना घडली त्यावेळी अंबादास यांचा मुलगा घरी नव्हता, तो कामावर गेला होता.

Chandrapur Crime : महाराष्ट्र हादरला! तिहेरी हत्याकांडाने खळबळ Read More »

Amit Shah : महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार? अमित शहा आज घेणार मोठा निर्णय

Amit Shah : सत्ताधारी भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरात तयारी सुरू केली आहे. भाजपने आगामी लोकसभे निवडणूकसाठी आपली पहिली उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आहे. या यादीमध्ये 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 195 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.   मात्र या यादीमध्ये राज्यातील एकाही उमेदवाराचे नाव नाही. यावरून अद्याप महायुतीमध्ये जागावाटपाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट झालं आहे.   भाजप,  शिवसेना (एकनाथ शिंदे गट)आणि  राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 30 हून अधिक जागांवर उमेदवार उभे करायचे आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागांवर निवडणूक लढवायची आहे. मात्र भाजप त्यांना 04 जागा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे  अजित गटाचा 16 जागांवर डोळा असल्याच्या बातम्या येत आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 22 जागांवर निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे भाजपच टेन्शन वाढला असून जागावाटपाचा मुद्दा गुंतागुंतीचा बनत चालला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने यापूर्वी 10 जागांवर निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र आता त्यात आणखी 6 जागांची भर पडली आहे. आज आणि उद्या राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत एकूण 16 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये सध्या एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर, नाशिक आणि भाजपच्या अहमदनगर दक्षिण, भंडारा, गोंदिया, नाशिक, दिंडोरी या जागांचा समावेश आहे. अजित पवार गटला अहमदनगर दक्षिणची जागा हवी आहे. तेथून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय पाटील हे सध्या खासदार आहेत. अजित पवार यांचे समर्थक आमदार नीलेश लंके यांना या जागेवरून निवडणूक लढवायची असून त्यांना तिकीट न मिळाल्यास ते पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर भंडारा गोंदिया हा प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे ती जागाही राष्ट्रवादीला हवी आहे. तर दिंडोरीतून विद्यमान केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या जागी अजित पवारांना आपल्या गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांना संधी द्यायची आहे. सध्या नाशिकमधून शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत, मात्र येथे छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. 2019 मध्ये ईशान्य मुंबईची जागा राष्ट्रवादीने जिंकली होती. त्या जागेचाही राष्ट्रवादी आढावा घेणार आहे. शिवसेनेचे संजय मंडलिक हे सध्या कोल्हापुरात खासदार आहेत. 2014 ते 2019 दरम्यान ही जागा राष्ट्रवादीकडे होती. या सहा जागांव्यतिरिक्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणखी दहा जागांवर उमेदवार उभे करायचे आहेत. ज्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या धाराशिव, परभणी या जागेचा समावेश आहे. तर, गडचिरोली, माढा या जागा भाजपने गेल्या निवडणुकीत जिंकल्या होत्या आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या हिंगोली, बुलढाणा या जागांचा समावेश आहे. याशिवाय बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागांचाही समावेश आहे. अमित शहा आज निर्णय घेणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज (5 मार्च) महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यावेळी राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपाच्या सूत्रावर चर्चा होऊ शकते. त्यामुळे सत्ताधारी महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न सुटू शकतो. भाजप आपल्या मित्रपक्षांना जास्त जागा देऊ शकेल, अशी चर्चा आहे, पण कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट असेल.

Amit Shah : महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार? अमित शहा आज घेणार मोठा निर्णय Read More »

Travel Tips: प्रवासाच्या दरम्यान अस्वस्थ असाल, तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Travel Tips : बऱ्याच वेळा असं होत की आपण प्रवास करतो परंतु आपले आरोग्य पूर्णपणे चांगले नसते.एखाद्या ग्रुपसह प्रवास करतांना देखील ही समस्या उद्भवू शकते की प्रवासाची संपूर्ण योजना आखल्यावर देखील थोडं आजारी पडल्यावर प्रवासाच्या योजनेत बदल करण्या ऐवजी सर्वांची सोय बघून प्रवासात निघून जातो. बऱ्याच वेळा आपले आरोग्य हवा आणि पाणी बदल झाल्यामुळे चांगले होते.बऱ्याच वेळा स्थिती अशी होते की आपल्यामुळे प्रवाशांना देखील त्रास होतो. म्हणून स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचे आहे.या साठी आपण आजारी असल्यावर प्रवासात काळजी काय घ्यावी जाणून घ्या. अतिरिक्त औषधे जवळ बाळगा  आपण अस्वस्थ असाल तर सर्वप्रथम, प्रवासाला जाण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करून घेणं महत्त्वाचे आहे. डॉक्टर जे काही औषधें देतील त्या औषधांची यादी आपल्या सह घ्यावीच या व्यतिरिक्त औषधे आपल्या जवळ ठेवा.  जर एखादं औषध  दोन वेळा घ्यावयाचे आहे तर दोनच्या ऐवजी चार घेऊन जा. असं केल्यानं आपण जिथे जाता तिथे जाऊन औषधाची शोधाशोध होणार नाही. आपली स्थिती स्पष्ट करा आपल्या आरोग्याबद्दल लोकांना आधीपासूनच कळवा,असं केल्याने त्यांना आपल्या आरोग्या विषयी माहिती होऊन त्यांचा व्यवहार तसा राहील. जसं एखाद्या लांब पल्ल्यातून जायचे असेल तर त्यानुसार व्यवस्था करतील.जर आपण स्वस्थ असाल तर व्यवस्था करण्याचा प्रश्न नाही आपण हसत खेळतच एका ठिकाण्यावरून दुसऱ्या ठिकाणी गेला असता. पण अस्वस्थ असाल तर आता ते आपली चांगली काळजी घेतील. अन्ना बद्दल विशेष काळजी घ्या जर आपण अस्वस्थ असाल तर डॉक्टरांनी ज्या गोष्टींना घेण्यास नकार दिला आहे त्याचे सेवन करू नये. अन्यथा आपल्याला समस्यांना सामोरी जावे लागू शकतं. आपल्या आवडीचे पदार्थ बघून जर आपण आहार ठरवाल तर आपल्याला त्रास होऊ शकतो.म्हणून चमचमीत आणि चटपटीत खाण्या ऐवजी आरोग्याला सांभाळून आरोग्याची काळजी घेऊन आहार घ्यावा. ऑनलाईन माहिती घ्या आपण जिथे जात आहात त्या जागेची ऑनलाईन माहिती घ्या. आपल्याला काहीही आरोग्य विषयक त्रास झाल्यास त्याच्याशी निगडित डॉक्टर कोण आहे ? त्यांचे रुग्णालय कुठे आहेत? असं केल्यानं जास्त त्रास झाल्यास आपल्याला काहीच त्रास होणार नाही आणि गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घेऊ शकाल.

Travel Tips: प्रवासाच्या दरम्यान अस्वस्थ असाल, तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा Read More »

Ahmednagar News : खासदार विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान!

Ahmednagar News:  जनसेवा फाउंडेशनच्या वतीने येणाऱ्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सांस्कृतिक महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. जामखेड महाविद्यालय येथे हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी महिला भगिनींनी कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी करत उपस्थिती दर्शविली.  यावेळी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या अनमोल कार्याने आपला ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सन्मानित करण्यात आलेल्या सर्व महिला भगिनींचे खासदार विखेंनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या कार्याला सदिच्छा दिल्या. यावेळी महिला भगिनींचे मनोरंजन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. या कार्यक्रमात भव्य लकी ड्रॉ, पैठणी आणि बरच काही.. या थीम अंतर्गत विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. सोनालीने आपल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकत हा सोहळा अधिक खास बनवला.  विशेष म्हणजे जामखेड मध्ये पहिल्यांदाच असा कार्यक्रम झाला की त्या कार्यक्रमात महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली. या आधी इतक्या प्रचंड संख्येने कोणत्याच कार्यक्रमाला गर्दी पहायला मिळाली नव्हती. तालुक्यातील व जामखेड शहरातील असंख्य महिलांनी सहभागी होत या कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित केला. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची संपूर्ण तालुक्यात चर्चा होत आहे.  उत्कृष्ट नियोजन आणि महिलांचे संघटन काय असते हे या कार्यक्रमाकडे बघून सर्वांना समजले. मुळात म्हणजे महिला भगिनींनी अतिशय मनसोक्तपणे या कार्यक्रमाचा आनंद लुटला. तसेच ज्या महिलांचा सन्मान येथे करण्यात आला त्या महिलांकडून सर्वांनी प्रेरणा घ्यावी आणि त्या दिशेने वाटचाल करावी. मदतीसाठी विखे कुटुंबीय सदैव तत्पर आहे असे संबोधित केले. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या शोभा आरोळे, शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या बेबी हसीना खान, सामाजिक कार्यकर्त्या उमा जाधव, बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या मनीषा मोहळकर, नॅशनल खेळाडू माधुरी भोसले, पीएसआय गायत्री राळेभात, जनविकास सेवाभावी संस्था चालविणाऱ्या लक्ष्मीताई पवार, सामाजिक कार्यकर्त्या निलम साळवे, उत्कृष्ट शेती करणाऱ्या काजल मासाळ, बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांचे संघटन करणाऱ्या मनिषा वडे, आधुनिक शेती आणि शेतीपूरक दूध व्यवसाय करणाऱ्या पल्लवी बरबडे, पार्वती खेतमाळस, विविध प्रकारचे मसाले तयार करणारे इंद्रजीत कांबळे, अगरबत्ती व समई वात करणाऱ्या राणी गावडे, दुग्ध प्रक्रिया उद्योग चालविणाऱ्या जयश्री बेंद्रे आदी कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले.

Ahmednagar News : खासदार विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान! Read More »

Ahmednagar News: महाविद्यालयात येणारा विद्यार्थी कोचिंग क्‍लासकडे का वळाला? राधाकृष्‍ण विखे पाटील

Ahmednagar News: नव्‍या शैक्षणिक धोरणाच्‍या अंमलबजावणीमध्‍ये कौशल्‍य शिक्षणाला दिलेले प्राधान्‍य विचारात घेवून औद्योगिक क्षेत्राला आवश्‍यक असलेले मनुष्‍यबळ निर्माण करण्‍याचे काम विद्यापीठाच्‍या उपकेंद्रातून व्‍हावे अशी अपेक्षा महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त  केली.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या नगर येथील उपकेंद्राचे उद्घाटन पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न झाले. उच्‍च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील दुरदृष्‍य प्रणालीव्‍दारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.  खासदार डॉ.सुजय विखे पाटील, जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालिमठ, जिल्‍हा बॅकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, विद्यापीठाच्‍या व्‍यवस्‍थापन परिषदेचे सदस्‍य राजेंद्र विखे पाटील, कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी, प्र.कुलगुरु डॉ.पराग काळकर यांच्‍यासह व्‍यवस्‍थापन परिषदेचे सर्व सदस्‍य याप्रसंगी उपस्थित होते.   मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, नगर येथे उपकेंद्र व्‍हावे यासाठी सुरु असलेल्‍या प्रयत्‍नांना अनेक वर्षांनंतर यश आले. या केंद्रासाठी पुढाकार घेणा-या सर्वांचेच अभिनंदन करुन, उपकेंद्र आता नगर येथे सुरु झाल्याने अधिकची जबाबदारी वाढली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने दिलेल्या नव्‍या राष्‍ट्रीय शैक्षणि‍क धोरणाची अंमलबजावणी करण्‍याचे मोठे आव्‍हान आपल्‍या सर्वांपुढे आहे. त्‍यासाठी आता विद्यापीठां बरोबरच महाविद्यालयांनीही पुढाकार घेण्‍याचे त्‍यांनी आवाहन केले.  आज शिक्षणाच्‍या परिभाषा सर्व बदलल्‍या आहेत. एकाच वेळी अनेक विद्या शाखांचे ज्ञान संपादन करण्‍याची प्रक्रीया गतीने पुढे जात आहे. यामध्‍ये पुणे विद्यापीठालाही मागे राहुन चालणार नाही. कारण केवळ बी.ए, बी.कॉम सारख्‍या तत्‍सम पदव्‍या घेवून विद्यार्थी आता स्‍पर्धेत टिकू शकणार नाही.  यासाठी या पदवी शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्‍यांना कौशल्‍य  आणि तांत्रिक शिक्षणही कसे घेता येईल याचाही विचार व्‍हावा असे सुचीत करुन, मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, नगर येथे सुरु झालेले उपकेंद्र हे कौशल्‍य शिक्षणाचे एक महत्‍वपूर्ण केंद्र ठरावे यासाठी कौशल्‍य विकासाचे सर्व कोर्स येथे तातडीने सुरु करुन, विद्यार्थ्‍यांना संधी देण्‍याची व्‍यवस्‍था  निर्माण करावी.   विद्यापीठाने आता आपली व्‍याप्‍ती वाढविणे गरजेचे आहे. कारण यापुर्वी विद्यापीठं एका चाकोरीमध्‍ये अडकली गेली. ए.आय.सी.टी, यु.जी.सी यांसारख्‍या कमिट्यांच्‍या मार्गदर्शक सुचनांमुळे आजपर्यंत संस्‍था  कार्यरत राहील्‍या. परंतू आता या कमिट्यांचेच योगदान काय? असा प्रश्‍न  विचारण्‍याची वेळ आली आहे असे स्‍पष्‍ट करुन, याबाबत आता केव्‍हा तरी प्रधानमंत्र्यांशी आपण बोलणार असून, जिल्‍ह्यांमध्‍ये असलेल्‍या शैक्षणिक संस्‍थाची संख्‍या लक्षात घेवून प्रत्‍येक जिल्‍ह्यात आता स्‍वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्‍याची मागणीही त्‍यांनी आपल्‍या भाषणात केली.  शिक्षण व्‍यवस्‍थेमध्‍ये कोचिंग क्‍लासचा वाढलेला हस्‍तक्षेप हे व्‍यवस्‍थेच अपयश आहे. या कोचिंग क्‍लासवर आपण कुठलेही नियंत्रण आणू शकलो नाही. महाविद्यालयात येणारा विद्यार्थी या कोचिंग क्‍लासकडे का वळाला? याचे आत्‍मपरिक्षण करण्‍याची गरज ना.विखे पाटील यांनी आपल्‍या भाषणातून व्‍यक्‍त केली. खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपकेंद्राच्‍या इमारतीची निर्मिती ही स्‍व.दादा पाटील शेळके यांची स्‍वप्‍नपुर्ती असून, 25 वर्षे न सुटलेला प्रश्न हा मागील दोन वर्षात मार्गी लागला. या उपकेंद्राच्‍या इमारतीमुळे गावाचे अन्‍य प्रश्‍नही सोडविण्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली.  याप्रसंगी कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी, डॉ.राजेंद्र विखे पाटील यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक सिनेट सदस्‍य सचिन गोर्डे यांनी केले.  विद्यापीठाच्‍या विस्‍तारासाठी जिल्‍हा नियोजन व विकास समितीच्‍या माध्‍यमातून 5 कोटी रुपयांचा निधी तसेच ई-बस उपलब्‍ध  करुन देण्‍याची केलेली मागणी मंत्री विखे पाटील यांनी मान्‍य करुन, या उपकेंद्राकडे येणा-या रस्‍त्‍याचे रुंदीकरण व विद्युतीकरणासाठी मदत करण्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी दिले.

Ahmednagar News: महाविद्यालयात येणारा विद्यार्थी कोचिंग क्‍लासकडे का वळाला? राधाकृष्‍ण विखे पाटील Read More »

Ice Cream Benefits : काय सांगता, आईस्क्रिम खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Ice Cream Benefits : राज्यात आता उन्हाळा सुरू झाला आहे. यामुळे आता राज्यात आंबे, फणसची मागणी वाढली आहे.  उन्हाळ्याच्या दिवसात जसे आंबे, फणस खाल्ल्याचा मोह अनेकांना आवरत नाही त्याचप्रमाणे कडक उन्हात आईस्क्रिमची चव चाखणं अनेकांना आवडते. अधिक आईस्क्रिम खाल्ल्यास सर्दी, खोकल्याचा त्रास होतो असे सांगत लहान मुलांना आईस्क्रिम खाण्यापासून दूर केले जाते परंतू प्रमाणात आईस्क्रिम खाल्ल्यास आरोग्याला फायदादेखील होतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ?   आरोग्यदायी आईस्क्रिम    आईस्क्रिम हे आरोग्यदायी असल्याचे काही संशोधनातून समोर आले आहे. हावर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ रिसर्चच्या अहवालानुसार आईस्क्रिममध्ये नाइसिन, थाइमिन आणि व्हिटामिन A,D,B हे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे प्रमाणात आईस्क्रिमचे सेवन केल्यास आरोग्याला त्याचा फायदा होऊ शकतो.   कॅल्शियम  आईस्क्रिममध्ये व्हिटॅमीन डी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीरात कॅल्शियमचे शोषण उत्तमप्रकारे होण्यास मदत होते.  डोळ्यांसाठी फायदेशीर  आईस्क्रिममधील व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्याला फायदेशीर ठरते.  उर्जा स्त्रोत  आईस्क्रिममध्ये कार्ब्स, फॅट्स आणि प्रोटीन हे घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीराला उर्जा मिळते.   रक्ताचा प्रवाह सुधारतो   आईस्क्रिममधील व्हिटॅमिन के शरीरातील रक्ताचा प्रवाह सुधारण्यास मदत करतो.  मेटॅबॉलिझम   आईस्क्रिममध्ये बी 6 व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असल्याने शरीरातील मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते.  स्मरणशक्ती तल्लख  आईस्क्रिममध्ये बी 12 व्हिटॅमिन असल्याने स्मरणशक्ती तल्लख राहण्यास मदत होते.  वजन घटवणं   वजन घटवण्यसाठी आईस्क्रिम मदत करते. आईस्क्रिम थंड स्वरूपाचे असते. त्याला सामान्य स्थितीमध्ये आणण्यासाठी शरीराला मेहनत घ्यावी लागते. यामुळे वजन घटवण्यास मदत होते.  अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी करण्यासाठी व्हेनिला आईस्क्रिम मदत करते. व्हेनिला आईस्क्रिम हे कोणतेही प्रिझर्व्हेटीव्ह न मिसळाता, घरच्या घरी किंवा शुद्ध स्वरूपात बनवलेले असेल तर त्यामुळे अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

Ice Cream Benefits : काय सांगता, आईस्क्रिम खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे Read More »

Ahmednagar News: अहमदनगर येथील नमो महारोजगार मेळाव्यास तरुणांचा प्रतिसाद

Ahmednagar News:-  इयत्ता दहावी ते पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराच्या संधी आणि स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी अहमदनगर येथील भिस्तबाग महलाशेजारील मैदानावर दोन दिवसीय विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. या मेळाव्यास विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या पाचही जिल्ह्यातील तरुण-तरुणींनी प्रचंड असा प्रतिसाद दिला. एकाच छताखाली त्यांच्या शिक्षणानुसार नोकरीच्या संधी प्राप्त झाल्याने जगण्याला अधिक बळ मिळाल्याची भावना तरुण-तरुणींनी व्यक्त केल्या. नोकरीमुळे जीवनाला मिळाली नवी दिशा अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील रहिवाशी असलेल्या गोविंदा मोरे या तरुणाने राहाता येथुन बी.कॉम पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. गेल्या दोन वर्षापासुन नोकरीच्या शोधात होता. परंतु नोकरीची संधी मिळाली नाही. महाविद्यालयातील प्राचार्यांनी महारोजगार मेळाव्याबाबत माहिती दिली. महारोजगार मेळाव्यात सहभागी होऊन नोकरीसाठी मुलाखत दिली. पहिल्याच प्रयत्नात यश येऊन रिंकल्स ॲकवा या कंपनीत नोकरीची संधी मिळाली. नोकरीमुळे जीवनाला एक नवी दिशा मिळाली आहे. शासनाने आयोजित केलेल्या या महारोजगार मेळाव्यामुळे गोरगरीब व होतकरु तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याची भावनाही गोविंदाने व्यक्त केली. महारोजगार मेळाव्यामुळे नामांकित कंपनीमध्ये नोकरी संधी  नंदुरबार जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या किरण रावताळे व विकास गावित या तरुणांना महारोजगार मेळाव्यातुन पहिल्याच प्रयत्नात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. आयटीआय मधुन मोटार मेकॅनिकचा कोर्स केल्यानंतर नोकरीच्या शोधात होतो. शासनाने आयोजित केलेल्या या मेळाव्याची माहिती भेटली आणि लगोलग अहमदनगर गाठले. महिंद्रा अँड महिंद्रासारख्या नामांकित कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाल्याने या संधीच सोन करत अर्थाजनाबरोबरच नवीन टेक्नॉलॉजीची माहिती यातुन होणार आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे एक नवी उभारी मिळाल्याचेही तरुणांनी सांगितले. महारोजगार मेळाव्यामुळे कंपन्यांना मनुष्यबळाची उपलब्धता  शासनाने आयोजित केलेल्या नमो महारोजगार मेळाव्यामुळे एकाच छताखाली वेगवेगळे कौशल्य असलेले मनुष्यबळ कंपनीस उपलब्ध झाले.  यातुन अनेक तरुण-तरुणींना रोजगारही देता आला.  प्रशासनाने या महारोजगार मेळाव्याचे उत्कृष्टपणे व्यवस्थापन करण्यात आले होते. या ठिकाणी आयोजित केलेल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे तरुण-तरुणींच्या करिअरला एक नवी दिशा मिळाली. दरवर्षी अशाप्रकारचे मेळावे आयोजित करण्यात येऊन कंपन्यांना मनुष्यबळ व उद्योगांना मनुष्यबळ मिळणे सोईचे होणार असल्याची भावना इंडोस्कल्प ऑटोकॉम्प प्राइवेट लिमिटेडचे रघुनाथ कलकर, श्‍नायडर इलेक्ट्रीक इंडिया प्रा.लिमिटेडचे विरेंद्र दहिफळे यांच्यासह विविध उद्योजकांनी बोलुन दाखवली.

Ahmednagar News: अहमदनगर येथील नमो महारोजगार मेळाव्यास तरुणांचा प्रतिसाद Read More »