DNA मराठी

latest news

Ahmednagar News: धक्कादायक घटना, श्रीगोंदा तालुक्यात नऊ वर्षाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार, दोन आरोपींना अटक

Ahmednagar News: ८ मार्च म्हणजे सगळीकडे जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो मात्र श्रीगोंद्यात एका अल्पवयीन मुलीवरती सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांना जेरबंद करत न्यायालयात हजर केल्यावर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील दक्षिणेकडील एका गावातील एका अल्पवयीन म्हणजे नऊ वर्षाच्या मुली वरती दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील मुख्य आरोपी संतोष रामभाऊ पवार व युवराज नंदू शेंडगे यांनी अल्पवयीन मुली सोबत एक महिन्यांपासून वारंवार बलात्कार केला असून त्याचे मोबाईल चित्रीकरण केल्यानंतर मोबाईल मधील चित्रीकरण नातेवाईकांनी पाहिल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत या दोघांना विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तर दिली.  मात्र प्रकरण चांगलेच अंगाशी येत आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी घडलेल्या सगळा प्रकार सांगितला यावरून मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून संतोष रामभाऊ पवार, युवराज नंदू शेंडगे यांच्यावर पोक्सो ॲट्रॉसिटीसह सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलिसांनी दोघांना जेरबंद केले असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 मार्चपर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आली.  या घटनेस चा सर्व प्रकार उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे हे करत आहेत मात्र जागतिक महिलादिनी असा प्रकार घडल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Ahmednagar News: धक्कादायक घटना, श्रीगोंदा तालुक्यात नऊ वर्षाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार, दोन आरोपींना अटक Read More »

Health Tips: अंडे की पनीर,कोणता पदार्थ आहे प्रोटीनचा उत्तम स्रोत? जाणून घ्या व्हाल थक्क

Health Tips: आहाराद्वारे शरीराला योग्य प्रमाणात प्रथिनांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. अंडे की पनीर? यापैकी कोणत्या पदार्थाद्वारे शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळतात, जाणून घेऊया याबाबतची माहिती. पनीर आणि अंडे, दोन्हींमध्येही शरीरास आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अंडे व पनीर, दोन्ही पदार्थ प्रोटीनचा उत्तम स्त्रोत मानले जातात. शाकाहार करणाऱ्यांना पनीरपासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करणं भरपूर आवडते. तर मांसाहार व डाएट फॉलो करणाऱ्या व्यक्ती आपल्या आहारामध्ये अंड्याचा आवर्जून समावेश करतात. पनीरमध्ये पोषक तत्त्वांचा खजिना आहे. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फोरस, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी चे घटक आहेत. दरम्यान प्रोटीनमुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते शिवाय स्नायू मजबूत राहण्यासाठीही शरीराला पुरेशा प्रमाणात प्रोटीनचा पुरवठा होणे गरजेचं आहे.  अंडे आणि पनीर, दोन्हींमध्येही भरपूर प्रमाणात आरोग्यवर्धक गुणधर्मांचा साठा आहे. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती कोणत्या पदार्थामध्ये प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक आहे? दोन प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थाची तुलना केली जाते, त्यावेळेस आपल्या मनात पहिला प्रश्न असा उपस्थित होतो की ‘पनीर’ आणि ‘अंडे’ यापैकी कोणत्या पदार्थांद्वारे शरीराला सर्वाधिक प्रोटीनचा पुरवठा होतो? दोन मोठ्या आकाराच्या अंड्यांचे वजन जवळपास 100 ग्रॅम एवढे असते. यामध्ये अंदाजे प्रोटीनची मात्रा 14 ग्रॅम इतकी असते. तर 100 ग्रॅम पनीरमध्येही प्रोटीनचे प्रमाण 14 ग्रॅम एवढंच असते. अशा प्रकारे या दोन्ही पदार्थांमध्ये प्रोटीनची मात्रा जवळपास समानच आहे. पनीर आणि अंड्याची तुलना अंडे आणि पनीर दोन्हींमधील पोषक तत्त्वांमुळे आपले स्नायू निरोगी व मजबूत राहतात. या दोन्ही पदार्थामध्ये पुरेशा प्रमाणात पोषक घटकांचा समावेश असतो. ज्यामुळे आपल्या शरीराच्या अंतर्गत असणाऱ्या पेशींना पुरेसा ओलावा मिळतो तसंच ओलावा टिकून राहण्यासही मदत मिळते. यामुळे स्नायूंचे आरोग्य निरोगी राहते. हाडे बळकट होतात पनीर आणि अंड्याद्वारेही आपल्या शरीराला कॅल्शिअमचा पुरवठा होतो. जेव्हा आपल्या शरीरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण होते तेव्हा ही झीज भरून काढण्यासाठी शरीर हाडांमधील कॅल्शिअम शोषून घेते. या अवस्थेत हाडे कमकुवत होऊ लागतात. परिणामी हाडांशी संबंधित गंभीर समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. शरीराचे हे नुकसान टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पनीर किंवा अंड्याचा योग्य प्रमाणात आहारामध्ये समावेश करावा. अंड्यामुळे आपल्या हाडांना व्हिटॅमिन डीचा देखील पुरवठा होतो. स्नायूंच्या निर्मितीसाठी अंड्याच्या सेवनामुळे आपल्या स्नायूंना भरपूर लाभ मिळतात. अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये प्रोटीन आणि अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते. या पोषक तत्त्वामुळे शरीरात स्नायूंची निर्मिती होण्यास मदत मिळते. सोबत अंड्याच्या सेवनामुळे स्नायू मजबूत देखील होतात.  याच कारणामुळे व्यायाम करणारे, जिममध्ये जाणाऱ्या व्यक्ती आहारामध्ये अंड्याचा समावेश करतात. अंडे खाल्ल्याने दिवसभरासाठी शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जा मिळते. त्वचेसाठी पनीर व अंड्याचे फायदे त्वचा निरोगी राहण्यास उपयुक्त असलेले पोषक घटक अंडे आणि पनीरमध्ये आहेत. या घटकांमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. पनीरमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आहे. त्वचा निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन ए पोषक असते. नितळ त्वचेसाठी आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन ए युक्त खाद्यपदार्थांचा समावेश करावा.

Health Tips: अंडे की पनीर,कोणता पदार्थ आहे प्रोटीनचा उत्तम स्रोत? जाणून घ्या व्हाल थक्क Read More »

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसकडून महिला दिनानिमित्त मेडिकल शिबिरचं आयोजन

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने महिला दिनानिमित्त मेडिकल शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व महिलांना कौतुकाचे प्रमाणपत्र आणि सर्व महिलांच्या समानता आणि सक्षमीकरणाची सहानुभूती आणि प्रतीक म्हणून गुलाबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवर नेते, पदाधिकारी उपस्थित होते,मा.शांतिलालजी मिसाळ प्रदेश पदाधिकारी,मा अब्दुलसत्तार शेख भाई सरचिटणीस अल्पसंख्याक सेल,नरेश इन्द्रसेन जाधव अध्यक्ष कॅन्टोन्मेट विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर, फरदीन पटेल युवक कार्याध्यक्ष कॅन्टोन्मेट विधानसभा मतदारसंघ ,मा.जयदेवराव इसवे अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग,मा.गौरीजी जाधव प्रभारी अध्यक्ष पुणे महिला विंग,मा अलिमभाई शेख कार्याध्यक्ष अल्पसंख्याक सेल पुणे शहर,मा. दिनेशजी अर्धाळकर ब्लॉक अध्यक्ष कॅन्टोन्मेट बोर्ड पुणे,मा.दिनेशजी परदेशी उपाध्यक्ष पुणे शहर,मा.रुहीजी सय्यद सरचिटणीस पुणे शहर,मा.आयाजभाई शेख उपाध्यक्ष कॅन्टोन्मेट विधानसभा,मा. अतुलजी जाधव अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग मा.शुभमजी शिंदे अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग,मा.विशाल गद्रे , मा.विकास कांबळे मा.विनायक जाधव आणि इतर क्षेत्रातील मान्यवर अॅड.मंगलाताई भोसले,मा अर्पणाताई यादव शिक्षिका कॅम्प एज्युकेशन सोसायटी उपस्थित होते.

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसकडून महिला दिनानिमित्त मेडिकल शिबिरचं आयोजन Read More »

Ahmednagar News : जनसेवा फाउंडेशनच्या वतीने रविवारी नवनागापूर येथे होणार कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

Ahmednagar News :  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली जात आहे.  नगर तालुक्यातील महिलांसाठी रविवारी (दि.१०) सायंकाळी शेंडी बायपास वरील द्वारकादास शामकुमार साडी सेंटरच्या पाठीमागे नवनागापूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या वेळी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.  या निमित्ताने महिलांच्या करमणुकीसाठी सुप्रसिद्ध गायक – संगीतकार अजय अतुल म्युझिकल नाईटचे ही आयोजन करण्यात आले असून नटरंग फेम प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि मानसी नाईक यांचीही नृत्य अदाकारी यावेळी पाहायला मिळणार आहे. याशिवाय महाराष्ट्राचे हास्यवीर रोहित माने व शिवाली परब यांच्या कॉमेडीचा तडका ही पाहायला मिळणार आहे.   नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील विविध तालुक्यात कला,मनोरंजन, गायन, संगीत क्षेत्रातील नामवंत सेलिब्रेटींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सर्व कार्यक्रमांना महिलावर्गाची जबरदस्त गर्दी दिसून आली. अगदी शालेय मुली, कॉलेज युवतींपासून लग्न झालेल्या महिला, मुलं-नातवंड असलेल्या आजीबाईंपर्यंत या रंगारंग कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेताना दिसून आले.  या सांस्कृतिक महोत्सवात महिलांचे मनोरंजन करण्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून  कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांसाठी भव्य लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित करून महिलांना पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नवनागापूर येथे रविवारी (दि.१०) सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जनसेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Ahmednagar News : जनसेवा फाउंडेशनच्या वतीने रविवारी नवनागापूर येथे होणार कर्तृत्ववान महिलांचा सन्मान Read More »

Railway Scam: धक्कादायक! रेल्वेत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली 23 जणांची फसवणूक; अधिकाऱ्याला अटक

Railway Scam: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीचं आमिष दाखवून 23 हून जास्त  तरुणांची फसवणूक करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली आहे.   आरोपी अधिकाऱ्याने 23 हून अधिक लोकांना रेल्वेत नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रेल्वेत नोकरी देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याप्रकरणी मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपी अधिकारी मध्य रेल्वेमध्ये मुख्य डेपो मटेरियल सुपरिटेंडंट (CDMS) आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने राजेश रमेश नायक याला ताब्यात घेतले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, नायकने दोन भावांना रेल्वेत नोकरी लावण्याच्या नावाखाली 10 लाख रुपयांहून अधिक रक्कम घेतल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडितेच्या वडिलांनी सीबीआयकडे जाऊन रेल्वे अधिकारी राजेश नायक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर सीबीआयने तपास सुरू केला. झडतीदरम्यान सीबीआयने विविध कागदपत्रे जप्त केली. 23 हून अधिक लोक कथितपणे फसवणुकीचे बळी ठरल्याचे कागदपत्रांवरून समोर आले आहे.

Railway Scam: धक्कादायक! रेल्वेत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली 23 जणांची फसवणूक; अधिकाऱ्याला अटक Read More »

Loksabha Election: भाजप देणार ‘या’ विद्यमान खासदारांना धक्का; कापले जाणार तिकीट

Loksabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीमुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यातच सत्ताधारी ‘महायुती’ मध्ये अद्याप जागा वाटपाचा फॉर्मुला ठरला नसल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.   तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप राज्यातील काही विद्यमान खासदारांना धक्का देणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार भाजप आगामी लोकसभा विद्यमान निवडणुकीमध्ये तब्बल डझनभर खासदारांना तिकीट नाकारणार आहे. यामुळे आता कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाचं तिकीट कापलं जाणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्मुला पुढील आठवड्यामध्ये ठरू शकतो.  यानंतर भाजप आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील आपल्या उमेदवारांची घोषणा देखील करण्याची शक्यता आहे.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महायुतीच्या जागावाटपात विजय हा एकमेव निकष आहे. महायुतीमध्ये समाविष्ट सर्व पक्षांना सन्मानजनक जागा मिळतील. जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. सुरुवातीची चर्चा सकारात्मक झाली असून 11-12 मार्चपर्यंत जागावाटपाचा निर्णय होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील लोकसभेच्या 45 जागा कशा जिंकायच्या, याशिवाय जागावाटपाचा दुसरा कोणताही फॉर्म्युला नाही. पंतप्रधानांच्या विजयासाठी तिन्ही पक्ष एकत्र काम करतील. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. अनेक बैठका होऊनही महायुती आघाडी किंवा विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) आघाडीने महाराष्ट्रात जागावाटपाचा निर्णय घेतलेला नाही. राज्यातील विद्यमान खासदारांची कार्यपद्धती आणि परिणामकारकता जाणून घेण्यासाठी भाजपने पक्षांतर्गत तीन सर्वेक्षण केल्याचे वृत्त आहे. डझनभर खासदारांचा स्ट्राइक रेट समाधानकारक नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्या खासदारांचा स्ट्राइक रेट चांगला नाही अशा खासदारांना हटवले जाण्याची शक्यता आहे. उमेदवारांची निवड करताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गेल्या पाच वर्षांतील विद्यमान खासदारांची कामगिरी हा सर्वोच्च निकष ठेवला आहे. याशिवाय सामाजिक समीकरणाबरोबरच स्थानिक पातळीवरील राजकारणातील त्या नेत्याचा प्रभावही तपासण्यात आला आहे. भाजपने राज्यातील 32 ते 37 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. भाजप येत्या दोन-तीन दिवसांत लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करू शकते. ज्यामध्ये डझनभर नवीन नावांचा समावेश अपेक्षित आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी या खासदारांची तिकिटे कापली जाऊ शकतात. 1. उत्तर मध्य मुंबई- पूनम महाजन 2. उत्तर मुंबई- गोपाळ शेट्टी 3. सोलापूर- जयसिद्धेश्वर स्वामी 4. सांगली- संजय काका पाटील 5. लातूर- सुधाकर श्रृंगारे 6. जळगाव- उन्मेष पाटील 7. धुळे- सुभाष भामरे 8. बीड- प्रीतम मुंडे 09. नांदेड- प्रतापराव चिखलीकर 10. रावेर- रक्षा खडसे 11. वर्धा- रामदास तडस.

Loksabha Election: भाजप देणार ‘या’ विद्यमान खासदारांना धक्का; कापले जाणार तिकीट Read More »

Maharashtra News: अवधूत गुप्तेंच्या भन्नाट गाण्यांवर खा.सुजय विखे आणि माजीमंत्री शिवाजी कर्डीले थिरकले!!

Maharashtra News: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली जात आहे.  कला,मनोरंजन, गायन,संगीत क्षेत्रातील नामवंत सेलिब्रेटींच्या उपस्थितीत होत असल्याने या सर्व कार्यक्रमांना महिलावर्गाची जबरदस्त गर्दी दिसून येत आहे. अगदी शालेय मुली, कॉलेज युवतींपासून लग्न झालेल्या महिला, मुलं-नातवंड असलेल्या आजीबाईंपर्यंत या रंगारंग कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेताना दिसून येत आहे.  याबाबत बोलताना फाउंडेशनच्या धनश्री विखे आणि खा.सुजय विखे यांनी सांगितले की, भारतीय समाजात घरामध्ये स्त्री ला निश्चितच मानाचे आणि आदराचे स्थान दिले जाते. अनेक युवती-महिला शिक्षण आणि त्यांच्यातील कलागुण कौशल्याने नोकरी-व्यवसायात स्थिरावत असल्या तरी एकूणच स्त्रीला आजही घरातील सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे सार्वजनिक जीवनात घेता येईल असा मनोरंजन, छंद आदींचा आनंद घेता येत नाही. घरातील कामांची व्यस्तता आणि समाज काय म्हणेल म्हणून महिलांची व्यक्ती म्हणून घुसमट होत असते. त्यामुळे आम्ही महिला दिनाचे औचित्य साधून सर्व घटकांतील युवती-महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. इतर कोणी मंडळी कार्यक्रम घेताना वेग वेगळे इप्सित डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम घेत असतील, मात्र आम्ही जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून कुठलाही राजकीय हेतू डोळ्यासमोर न ठेवता आणि याची उगाच जास्तीची प्रसिद्ध न करता केवळ महिलांच्या मनाचा विचार करून त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण पेरण्याच्या हेतूने कार्यक्रम घेत आहोत.  विशेष म्हणजे आम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमांना महिला,युवतीं बरोबर अगदी नातू-पणतू असलेल्याआजीबाई देखील आवर्जून उपस्थिती लावत आहेत हे आमच्या कार्यक्रमांचे यश असल्याचे धनश्री विखे म्हणाल्या. शेवगाव, पाथर्डी,कर्जत,जामखेड नंतर राहुरी इथे आयोजित कार्यक्रमास तर रेकॉर्डब्रेक गर्दी झाल्याचे दिसून आले. असंख्य महिलांची उपस्थिती, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि दिलखेचक लावणी नृत्यासाठी ओळख निर्माण केलेल्या मानसी नाईक यांचे प्रेक्षकांवर भुरळ घालणारे नृत्य, प्रसिद्ध धम्माल गायक, परीक्षक अवधूत गुप्ते यांचा प्रेक्षकांची मने जिंकणारा आवाज, महिलांसाठी पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसांची लयलूट आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्तृत्ववान महिलांचा केलेला सन्मान असा अनोखा आणि दैदिप्यमान सोहळा काल राहुरी येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दीसह संपन्न झाला.  जनसेवा फाउंडेशन च्या माध्यमातून काल राहुरी येथील केशर मंगल कार्यालय,(मल्हारवाडी रोड) येथे महिला दिनाच्या अनुषंगाने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व सांस्कृतिक महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले होते. माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले आणि धनश्री विखे पाटील यांची सदरील कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.  या कार्यक्रमात महिलांच्या गर्दीने परिसर अगदी फुलून गेला होता. दरम्यान विविध क्षेत्रात आपले बहुमूल्य योगदान देऊन आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा सन्मान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सन्मानित करण्यात आलेल्या महिलांकडून सर्वांनी प्रेरणा घेऊन त्यांच्या पायावर पाय ठेवत वाटचाल करावी असे आवाहन सुजय विखेंनी उपस्थित महिलांना केले. या सांस्कृतिक महोत्सवात महिलांचे मनोरंजन करण्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम राबविण्यात आले. भव्य लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित करून महिलांना पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली.  तसेच दिग्गज कलाकार, जसे की अवधूत गुप्ते यांनी आपल्या गोड आवाजात आणि मानसी नाईक यांनी आपल्या नृत्याविष्कार सादर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या कार्यक्रमात राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शशिकलाताई पाटील, शेती व व्यवसाय क्षेत्रातील पुष्पलताताई येवले, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. दिपा कुसळकर, 32 वर्षांपासून ईश्वरीय सेवेत असणाऱ्या ब्रह्मशांती पद्मादेवी, कृषी क्षेत्रातील कविता जाधव, वैद्यकीय क्षेत्रातील श्रीम. डॉ. केतन साळवे, अध्यात्मिक कार्य करणाऱ्या ह.भ.प. वंदना आंधळे, क्रीडा व कृषी क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या ज्योती खेडेकर/ धामोरे, दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील ज्योती शिंदे, क्रीडा व राजकीय क्षेत्रातील सोनाली बर्डे, सामाजिक कार्यकर्त्या सविता मगर, फोटोग्राफी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काजल शर्मा, बालक संगोपन सेवा क्षेत्रातील सखुबाई जाधव, उद्योजिका रोहिणी कुसमुडे, बचत गट संघटन करणाऱ्या उमा जैन, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या वंदना कांडेकर, बचत गट क्षेत्रात कार्य करणाऱ्या वैशाली धसाळ, अध्यात्मिक कार्य करणाऱ्या ह.भ.प. सोनालीताई गावडे/ तागड, शैक्षणिक क्षेत्रातील प्रमिला ढोकणे आदी कर्तृत्ववान महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले. रेकॉर्ड ब्रेक गर्दी.. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून राहुरी येथे आयोजित कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव 2024 साठी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. गेल्या आठवडाभरात वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या या महोत्सवाला जी गर्दी पाहायला मिळाली त्यापेक्षा अधिक गर्दी कालच्या या भव्य सोहळ्यात दिसून आली. खरंतर हा एक ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असा क्षण होता.. आपल्या खास धमाल गाण्यांच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या गाण्यांवर गुप्ते यांनी खा.सुजय विखे यांना नाचायला भाग पाडलेच. आपल्या अवखळ स्वभावामुळे अवधूत गुप्ते कार्यक्रमात मोठी रंगत आणतात. अरे दिवानो, मुझे पाहचानो..  में हु डॉन.. या गाण्यावर खा.सुजय विखे चांगलेच नाचले. यावेळी समर्थक चाहत्यांनी खा.विखे आणि माजीमंत्री कर्डीले यांनी खांद्यावर घेत नाचत एकच जल्लोष केला. यावेळी काळा गॉगल घालून कर्डीले आणि विखे यांनीही खांद्यावर नाचत गाण्याचा आनंद घेतला.

Maharashtra News: अवधूत गुप्तेंच्या भन्नाट गाण्यांवर खा.सुजय विखे आणि माजीमंत्री शिवाजी कर्डीले थिरकले!! Read More »

Ahmednagar News: धडाकेबाज कारवाई! दोन फुटी तलवारीसह आरोपी जेरबंद

Ahmednagar News: 07 मार्च 2024 रोजी शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इसम नामे संदीप नवनाथ माळी रा. मळेगाव ता. शेवगाव याने वाढदिवसानिमीत्त तलवारीने केक कापलेचा स्टेटस मोबाईलला ठेवला होता.  व समाजात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर प्रसिद्ध करून दहशत करत आहे.  या माहितीवरून पोनि/ दिगंबर भदाणे यांनी  पोहेकाँ/नाकाडे, पोहेकॉ दराडे, पोशि/शाम गुजाळ, पोशि/बप्पासाहेब धाकतोडे, पोशि/ संपत खेडकर, नगर दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुडू,नितीन शिंदे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने तांत्रिक व लोकेशन मदतीने सदर इसमाचा शोध घेऊन त्याला  बोधेगाव ता. शेवगाव मधून अटक केली. त्याची दोन पंचासमक्ष  अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक पितळी मुठ असलेली दोन फुट लांबीची एक पांढरे रंगाची लोखंडी तलवार मिळून आली. यानंतर आरोपी व तलवार ताब्यात घेउन शेवगाव पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले.   सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव  उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांचे आदेशाने पोहेकाँ/नाकाडे, पोहेकॉ दराडे, पोशि/शाम गुजाळ, पोशि/बप्पासाहेब धाकतोडे, पोशि/ संपत खेडकर, नगर दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुडू,नितीन शिंदे यांनी कारवाई केली.  तसेच पोलीस निरीक्षक शेवगाव यांनी शेवगाव तालुक्यातील जनतेस आव्हान केले आहे की वाढदिवसानिमित्त तलवारीने केक  कापत असेल व  हत्यार बाळगून समाजामध्ये दहशत निर्माण करत असेल व अवैधरित्या गावठी कट्टा व तलवारी चाकू व चोरीच्या उद्देशाने कुणी संशयितरित्या फिरत असतील तर  शेवगाव पोलिसांच्या ०२४२९ २२१२३३ या क्रमांकावर ती संपर्क करावा खबर देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आव्हान पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी केले.

Ahmednagar News: धडाकेबाज कारवाई! दोन फुटी तलवारीसह आरोपी जेरबंद Read More »

Loksabha Election 2024 : निलेश लंके लोकसभेची तुतारी फुंकणार… तनपुरे यांनी सांगूनच टाकलं

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नगर दक्षिण लोकसभा जागेवर अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके शरद पवार गटाकडून लोकसभा लढवणार का याबाबत तर्क वितर्क लावले जात असतानाच यावर आमदार प्राजक तनपुरे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.  अनेक लोक हातातील घड्याळ काढून तुतारी वाजविण्यास सज्ज असतील असा आम्हाला आशा आहे असा विश्वास यावेळी आमदार तनपुरे यांनी व्यक्त केला. निलेश लंके देखील लवकरच शरद पवार गटात येतं लोकसभा निवडणूक लढवतील असा विश्वास यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना आमदार तनपुरे म्हणाले की, लोकसभेसाठी माझं नाव चर्चेत नसून मी स्वतः लोकसभा लढवणार नाही मी विधानसभा लढवणार आहे असं तनपुरे यांनी स्पष्ट केलं तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, लंके यांनी घेतलेल्या महानाट्य मोठा जनप्रतिसाद मिळाला.  तसेच येणाऱ्या काळामध्ये अनेक लोक हातातली घड्याळ काढून तुतारी फंकण्यास सज्ज राहतील अशी आशा आम्हाला आहे.  लंकेचा पक्षप्रवेश होणार काय यावरती बोलताना ते म्हणाले की लंके का येणार नाही असे म्हणतच एक प्रकारे लंकेंचा लवकरच पक्ष प्रवेश होणार असं असं सुचक विधान यावेळी तनपुरे यांनी केलं.  महाविकास आघाडीकडून नगर दक्षिणेसाठी अगदी तोला मोलाचा उमेदवार दिला जाईल  याबाबत कुठलेही शंका नाही असं देखील यावेळी बोलताना प्राजक्ता तनपुरे यांनी स्पष्ट केले.

Loksabha Election 2024 : निलेश लंके लोकसभेची तुतारी फुंकणार… तनपुरे यांनी सांगूनच टाकलं Read More »

Ahmednagar News:  जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पाथर्डी येथे आयोजित कार्यक्रमास महिलांची ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी..

Ahmednagar News:  काल जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला दिनाच्या निमित्ताने पाथर्डी येथे आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सांस्कृतिक महोत्सव 2024 मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  पाथर्डी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाथर्डी येथे पाहायला मिळाली. सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये आपल्या बहुमूल्य योगदानाने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सन्मानित करण्यात आलेल्या सर्व महिला भगिनींचे खासदार विखेंनी मनापासून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या कार्याला सदिच्छा दिल्या. तसेच उपस्थित महिला भगिनींना देखील या सन्मानित करण्यात आलेल्या महिला भगिनिंकडून प्रेरणा घेत वाटचाल करण्याचे आवाहन केले.  या सांस्कृतिक महोत्सवात महिलांचे मनोरंजन करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात आले. भव्य लकी ड्रॉ, पैठणी आणि बरच काही.. या थीम अंतर्गत विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या नृत्याने उपस्थित सर्वच महिलांची मने जिंकत या सोहळ्याचा उत्साह अधिक वाढवला.  पाथर्डी मध्ये या अगोदर देखील बरेच कार्यक्रम झाले परंतु कोणत्याच कार्यक्रमाला इतक्या प्रचंड प्रमाणात महिलांची गर्दी उसळली नव्हती. ‘न भूतो न भविष्यती’ असा हा सोहळा पार पडला. जणू काही महिलांसाठी ही एक विशेष पर्वणीच होती असा भास सगळ्यांनाच झाला. अगदी आनंदमय वातावरणात सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होत आपल्या धावपळीच्या आयुष्यातून वेळ काढत हा क्षण अविस्मरणीय केला. दरम्यान जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची संपूर्ण तालुक्यात चर्चा होत आहे. उत्कृष्ट नियोजन आणि महिलांचे संघटन काय असते हे खासदार सुजय विखे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाकडे पाहून सर्वांनाच समजले. यावेळी आमदार मोनिका राजळे आणि रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्ष धनश्री विखे पाटील देखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा फुंदे, पाथर्डीत रुग्ण सेवा सुरू करणाऱ्या प्रथम महिला डॉ. सुरेखा लोखंडे, युवा कीर्तनकार ह.भ.प. वैष्णवी मुखेकर, पैठणी विणकामाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार मिळवून देणाऱ्या शितल टेके, महिला उद्योजक उमामहेश्वरी बजाज, समाजहित जोपासणाऱ्या मा. नगरसेविका सुरेखा गोरे, शैक्षणिक कार्यात महत्वाचे योगदान देणाऱ्या मुख्याध्यापिका विजया चोरमले, महिला उद्योजक मिरा बडे, महिला उद्योजक सिंधू आहेर, महिला उद्योजक पार्वती शिंदे, डॉ. आयेशा पठाण, आरोग्यमाता केंद्राच्या माध्यमातून रुग्ण सेवा करणाऱ्या समाजसेविका शिला जाधव आदी कर्तृत्ववान महिलांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. सोनाली कुलकर्णी यांनी कार्यक्रमादरम्यान दादांबद्दल काढले गौरवोद्गार… अभिनेत्री सोनाली कुलकर्णी खासदार सुजय दादांबद्दल म्हणाल्या की, एरवी नेते मंडळी पुढच्या रांगेत सोफ्यावर बसून कार्यक्रमाचा आनंद घेतात. परंतु दादांचे तसे नाही, कुठलाही बडेजावपणा न करता कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये कुठेतरी हरवलेले असतात. दादा आहेत की नाही कार्यक्रमात याची शोधाशोध आम्हाला करावी लागते आणि म्हणूनच दादांना जनतेचे नेते म्हणतात. वारंवार त्यांच्या कार्यातून आणि वागणुकीतून हे दिसून येते.

Ahmednagar News:  जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पाथर्डी येथे आयोजित कार्यक्रमास महिलांची ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी.. Read More »