DNA मराठी

latest news

Ahmednagar News: ते मार्गदर्शक होते, जयंत पाटलांचा पराभव मनाला वेदना देणारा…, सत्यजित तांबे

Ahmednagar News: विधान परिषदेचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये 11 जागांसाठी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 असे 12 उमेदवार मैदानात होते. यापैकी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. मात्र यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणुकीत पराभव झाला.  शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा   विधानपरिषदेच्या निवडणूकीतील पराभव हा मनाला वेदना देणारा आहे. पाटील हे विधानपरिषदेच्या सभागृहातील एक ज्येष्ठ व अनुभवी सदस्य होते. आमच्या सारख्या नव्या व तरुण सदस्यांचे ते मार्गदर्शक होते. सभागृहातील त्यांची अनुपस्थिती सर्वांना नक्कीच जाणवेल अशी प्रतिक्रिया आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.  लोकसभा निवडणुका झाल्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीवर राज्याचे लक्ष लागून होते, लोकसभेत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले तर महायुतीला धक्का बसला होता. यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र या निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तर महायुतीचे सर्व 9 उमेदवार जिंकून आले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.  तांबे नेमकं काय म्हणाले? शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील साहेब यांचा आजच्या विधानपरिषदेच्या निवडणूकीतील पराभव हा मनाला वेदना देणारा आहे. भाई जयंत पाटील हे विधानपरिषदेच्या सभागृहातील एक ज्येष्ठ व अनुभवी सदस्य होते. आमच्या सारख्या नव्या व तरुण सदस्यांचे ते मार्गदर्शक होते. सभागृहातील त्यांची अनुपस्थिती सर्वांना नक्कीच जाणवेल. पाटलांचा पराभव हा शरद पवारांना धक्का जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून समर्थन पुरस्कृत उमेदवार होते. मात्र निवडणुकीच्या निकालात ते सुरुवातीपासूनच पिछाडीवर होते. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये जयंत पाटील यांना दुहेरी आकडाही ओलांडता आला नव्हता. विजयासाठी जयंत पाटील यांना 23 संख्यापर्यंत पोहचायचं होतं. पण जयंत पाटील यांना फक्त 12 मते मिळाली.

Ahmednagar News: ते मार्गदर्शक होते, जयंत पाटलांचा पराभव मनाला वेदना देणारा…, सत्यजित तांबे Read More »

Maharashtra News : मुस्लिम कुटुंबाच्या घरी पंढरीच्या वारकऱ्यांचा मुक्काम, दिंडीचे स्वागत व वारकऱ्यांची सेवा

Maharashtra News: तीर्थक्षेत्र नाशिक राजापूर ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी गेल्या सात वर्षापासून सोलापूर रोडवरील वाकोडी फाटा येथील वास्तव्यास असलेले माजी सैनिक युनूस टेंगे या मुस्लिम कुटुंबाकडे मुक्कामी असते. हे मुस्लिम कुटुंब वारकऱ्यांची मनोभावे सेवा करत आलेले आहेत. पंढरीच्या वारकऱ्यांना त्यांच्याकडून पंगत दिली जाते.  कुटुंब प्रमुख माजी सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विभागाचे अध्यक्ष युनूस टेंगे हे एक माजी सैनिक आहेत. त्यांनी हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब भाई भाई हीच एक सैनिकाची शिकवण असते, भारत माता ही एकच जात आणि एकच धर्म आहे. याचा आदर्श एका माजी सैनिकांनी समाजाला या माध्यमातून दिला आहे.  माजी सैनिक युनिस टेंगे मुस्लिम समाजाचे आहेत त्यांच्या घरी गेल्या सात वर्षापासून ही दिंडी मुक्कामी असते त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य दिंडीतील वारकऱ्यांची मनोभावे सेवा करतात. पूजा अर्चा करून त्यांच्या समवेत हरिनामाच्या गजरात विलीन होतात यापेक्षा दुसरी देशसेवा कोणतीच नसल्याचे ते म्हणाले.

Maharashtra News : मुस्लिम कुटुंबाच्या घरी पंढरीच्या वारकऱ्यांचा मुक्काम, दिंडीचे स्वागत व वारकऱ्यांची सेवा Read More »

Ahmednagar News: आयक्त पंकज जावळेंच्या अडचणीत वाढ…कोर्टाने जामीन फेटाळला

Ahmednagar News: लाच मागितल्याच्या गुन्ह्यात अहमदनगर महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने पंकज जावळे फेटाळला. अटकपूर्व अर्जावर न्यायालयात पाच दिवस सुनावणी झाली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश निरंजन नाईकवाडी यांनी अटकपूर्व जामीन फेटाळून आहे.  अहमदनगर शहरातील बांधकाम व्यवसायाकडे आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी महानगरपालिकेच्या आयुक्त पंकज जावळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.  या प्रकरणांमध्ये जामिनसाठी जावळे यांनी अहमदनगरच्या न्यायालयामध्ये अर्ज केला होता न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आयुक्त पंकज जावळे यांचा जामीन नाकारला आहे.  दरम्यान जावळे हे अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्याच काम सुरू आहे.

Ahmednagar News: आयक्त पंकज जावळेंच्या अडचणीत वाढ…कोर्टाने जामीन फेटाळला Read More »

Zika Virus: सावधान, ‘या’ शहरात वाढत आहे झिकाचा धोका, समोर आले 15 रुग्ण

Zika Virus:  राज्यात हळूहळू झिका वाढताना दिसत आहे. माहितीनुसार, पुण्यात आतापर्यंत झिकाचे 15 रुग्ण आढळून आले आहे.  त्यामध्ये 9 गर्भवती महिलांचाही समावेश आहे. तीन नवीन रुग्ण आढळल्याने मंगळवारी पुण्यातील झिका रुग्णांची संख्या 15 वर पोहोचली. तिन्ही बाधित महिला गर्भवती असून त्या जिल्ह्यातील पाषाण परिसरात राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय 23 आठवड्यांच्या गर्भवती महिलेचा अहवाल 5 जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. तर 8 जुलै रोजी 18 वर्षांच्या 28 आठवड्यांच्या गर्भवती महिलेमध्ये संसर्गाची पुष्टी झाली. तिसरा केस, 23 आठवड्यांची गरोदर असलेल्या 19 वर्षीय महिलेची 8 जुलै रोजी चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांना सांधेदुखी आणि सौम्य ताप होता. 20 जूनपासून, पुणे महानगरपालिकेने (PMC) झिका विषाणूची 15 प्रकरणे नोंदवली आहेत, ज्यात नऊ गर्भवती महिलांचा समावेश आहे. जर गर्भवती महिलांना झिकाची लागण झाली असेल तर त्यांच्या नवजात बालकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. डोळ्यांच्या समस्या, ऐकण्याची क्षमता कमी होणे अशा अनेक समस्या नवजात बालकांमध्ये उद्भवू शकतात. मेंदूच्या असामान्य विकासामुळे अनेक प्रकरणांमध्ये बाळाचे डोके खूपच लहान असते. देशात झिकाची अद्याप कोणतीही लस नाही. झिका   प्रामुख्याने संक्रमित एडिस डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. हा संसर्ग गंभीर नसला तरी गर्भवती महिलेला संसर्ग झाल्यास तो गर्भासाठी धोकादायक ठरू शकतो. झिका  लैंगिक संभोगातूनही पसरू शकतो. याशिवाय, काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये, झिका संक्रमित रक्ताच्या संक्रमणाने देखील पसरतो.

Zika Virus: सावधान, ‘या’ शहरात वाढत आहे झिकाचा धोका, समोर आले 15 रुग्ण Read More »

Accident News: भीषण अपघात, 4 जण जागीच ठार, 2 गंभीर जखमी

Accident News:  देशात दररोज अपघताच्या घटना घडत आहे. यातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, मध्य प्रदेशामधील शाहडोल जिल्ह्यातील बुधर पोलीस स्टेशन हद्दीतील लालपूर येथे कोळसा भरलेल्या ट्रेलरने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला धडक दिली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला, तर 2 जणांना गंभीर अवस्थेत वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. बुधर पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय जयस्वाल यांनी सांगितले की, अनुपपूर येथून कोळसा भरून ट्रेलर शहडोलकडे जात होता. दरम्यान, लालपूरजवळील क्रशरजवळ भरधाव वेगात आलेल्या ट्रेलरने ऑटोला जोरदार धडक दिली. या घटनेत ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. 4 जणांची प्रकृती गंभीर असताना पोलिसांनी त्यांना त्यांच्याच वाहनातून वैद्यकीय महाविद्यालयात नेले, तेथे 4 पैकी 2 जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर 2 जण गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. बिट्टू, रिया, रोशनी आणि ममता अशी या भीषण रस्ता अपघातात जीव गमावलेल्यांची नावे आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की ऑटो शहडोलहून धनपुरीच्या दिशेने जात होता, ज्यामध्ये 35 वर्षीय नेमचंद वडील हरिशंकर, 40 वर्षीय रोशनी पती मज्जू साकेत, 30 वर्षीय कुंज बिहारी त्रिपाठी, सर्व धनपुरी येथील रहिवासी आणि इतर वाहनात होते. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. कागदपत्रांशिवाय कोळसा वाहतूक सुरू होती मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक कोळसा भरला होता, जो अनुपपूर येथील रामनगर येथून भरून रेवा येथे जात होता. मात्र, ट्रकची झडती घेतली असता कोळशाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. अपघातानंतर बुरहार येथील कोळसा व्यापारी घटनास्थळी पोहोचले होते. अपघातानंतर कोळसा व्यापारी वाहतुकीशी संबंधित कागदपत्रे तयार करण्यासाठी तातडीने खाणीवर पोहोचले होते, असेही सांगण्यात येत आहे.

Accident News: भीषण अपघात, 4 जण जागीच ठार, 2 गंभीर जखमी Read More »

Ahmednagar News : नंदाच्या जमिनीत पेरलेल्या कपाशी व तूर पिकाची भावजाईने केली नासाडी, गुन्हा दाखल

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील रहिवासी असलेल्या महिला शेतकरी सोफिया फिरोज शेख यांची बालमटाकळी येथे असणाऱ्या गट नंबर १३५ मधील दीड एकर शेतीमध्ये कपाशी व तूर पिकाची लागवड केली होती. हे पीक मोठी झाल्याने सोफिया फिरोज शेख व त्यांचे पती फिरोज शेख हे दोघे शनिवार दिनांक २९ जुलै रोजी दुपारी आपल्या शेतात खुरपण करत होते. तेव्हा  अचानक सोफिया शेख यांची भावजाई हुमेरा युनुस शेख राहणार अहमदनगर यांनी सोफिया फिरोज शेख व त्यांचे पती फिरोज शेख यांना   शेतामध्ये येऊन शिवीगाळ करत दीड एकर शेतीमधील उभे असलेले कपाशी व तुरीचे पीक हे आमच्या डोळ्यादेखत उपटून फेकून दिले. त्यामुळे फिर्यादीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  याबाबत हुमेरा युनूस शेख यांना आम्ही आमची कपाशी व तुर पीक का उपटले अशी विचारणा केली असता त्यांनी मला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.  याबाबत महिला शेतकरी सोफिया फिरोज शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हुमेरा युनुस शेख यांचे विरोधात शेवगाव पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तसेच आम्हाला न्याय न मिळाल्यास व आमच्या पिकांची झालेली नुकसान भरपाई न मिळाल्यास उपोषणास बसण्याचा इशाराही महिला शेतकरी सोफिया फिरोज शेख यांनी दिला आहे.

Ahmednagar News : नंदाच्या जमिनीत पेरलेल्या कपाशी व तूर पिकाची भावजाईने केली नासाडी, गुन्हा दाखल Read More »

Dhananjay Munde : … तर आम्ही तुमच्या गाड्या फोडणार, गोरख दळवींचा धनजय मुंडेंना इशारा

Dhananjay Munde : संपूर्ण राज्यात सध्या आरक्षणावरून चांगलंच राजकीय वातावरण तापल आहे. यातच आता मराठा समाजाचे कार्यकर्ता गोरख दळवी यांनी पत्रकार परिषद घेत लक्ष्मण हाके ओबीसी नसून धनगर असून त्यांनी त्यांच्या समाजाचा पाहावा छगन भुजबळ यांचे प्यादे बनू नये आणि छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचे प्यादे बनू नये अशी टीका केली. मनोज जरांगे यांची राज्यात कोणी बरोबरी करु शकत नाही असं देखील ते म्हणाले. तसेच त्यांनी राज्याचे मंत्री धनजय मुंडे यांना इशारा देत तुम्ही दोन समाजामध्ये भांडण लावू नये अशी देखील विनंती केली.  धनजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या गाड्यांची तोडफोड केली असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.  तुम्हाला एका मराठ्याने घडवलं आहे. आम्ही देखील राज्यात फिरणाऱ्या तुमच्या गाड्या फोडू शकतात असा इशारा देखील यावेळी त्यांनी धनजय मुंडे यांना दिला.

Dhananjay Munde : … तर आम्ही तुमच्या गाड्या फोडणार, गोरख दळवींचा धनजय मुंडेंना इशारा Read More »

Ahmednagar News: नगर जिल्ह्यात हप्त्यासाठी खुनी हल्ला? अनेक चर्चांना उधाण

Ahmednagar News:  पारनेर तालुक्यातील निघोज येथे अज्ञात चोरट्यांनी जेवणाच्या उद्देशाने निघोज – वडगाव रस्त्यावर असलेल्या गणेश भुकन व प्रविण भुकन यांच्या मालकीच्या  जत्रा या हॉटेलमधील प्रविण भुकन या़च्यावर हल्ला केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.   यामध्ये प्रविण भुकन हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रात्री दोन वाजता नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.   या प्रकरणानंतर गणेश भुकन यांनी रात्री निघोज पोलीसांना संपर्क केला मात्र पोलिसांनी याची दखल न घेता टाळाटाळ केली असा आरोप गणेश भुकन यांच्याकडून करण्यात आला आहे. हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला की आम्हाला महिन्याकाठी हप्ता दे या उद्देशाने झाला याची सध्या निघोज परिसरात चर्चा सुरू असून हल्लेखोर निघोज आणि परिसरातील असून भुकन हे सध्या नगर येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे.  त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले असून आज सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ते शुद्धीवर आल्यावर पोलीसांना काय जबाब देतात यावर बरेच काही अवलंबून आहे.  गेली काही दिवसांत निघोज आणी परिसरात गुन्हेगारी वाढली असून गुन्हेगारीला राजकीय आश्रय आहे की काय यावर निघोज परिसरात चर्चा सुरू आहे.

Ahmednagar News: नगर जिल्ह्यात हप्त्यासाठी खुनी हल्ला? अनेक चर्चांना उधाण Read More »

Lal Krishna Advani: मोठी बातमी! ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती अचानक बिघडली, AIIMS मध्ये दाखल

Lal Krishna Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची बुधवारी रात्री अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले आहे.  देशाचे माजी उपपंतप्रधान अडवाणी यांच्यावर एम्सच्या युरोलॉजी विभागात उपचार सुरू आहेत. त्यांना एम्सच्या जुन्या खासगी वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. ते सध्या 96 वर्षांचे आहेत. मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतरत्न आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याला यूरोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्याला वयोमानाशी संबंधित समस्या असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. नुकतेच एनडीएच्या संसदीय दलाच्या नेत्याची निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना त्यांच्या घरी भेटायला गेले होते आणि त्यांचे आशीर्वाद घेतले होते. यासंबंधीचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 2014 पासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते हे विशेष. लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म पाकिस्तानातील कराची येथे 8 नोव्हेंबर 1927 रोजी एका हिंदू सिंधी कुटुंबात झाला होता. ते 1998 ते 2004 दरम्यान भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये गृहमंत्री होते. 10व्या आणि 14व्या लोकसभेत त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका चोख बजावली. भारत सरकारने त्यांना यावर्षी देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन गौरविले. लालकृष्ण अडवाणी यांनी 2002 ते 2004 दरम्यान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये भारताचे सातवे उपपंतप्रधान म्हणूनही हे पद भूषवले होते. 2015 मध्ये, त्यांना पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला.

Lal Krishna Advani: मोठी बातमी! ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती अचानक बिघडली, AIIMS मध्ये दाखल Read More »

Election 2024 : नाशिक शिक्षक निवडणुकीसाठी 93.48 टक्के मतदान

Election 2024- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे मतदान प्रक्रिया विभागात शांततेत सुरळीतपणे पार पडली.नाशिक विभागात एकूण 90 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. विभागातील  69 हजार 368 मतदानापैकी  64 हजार 846 इतके मतदान झाले असून 93.48  टक्के मतदान झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा व अपर आयुक्त निलेश सागर यांनी दिली. विभागातील नाशिक जिल्ह्यात एकूण 25 हजार 302 मतदारापैंकी हजार 23 हजार 184  इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून नाशिक जिल्ह्यात 91.63 टक्के मतदान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 17 हजार 392 मतदारापैंकी 16 हजार 327 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून अहमदनगर जिल्ह्यात 93.88 टक्के मतदान झाले आहे.  धुळे जिल्ह्यात एकूण 8 हजार 159 मतदारापैंकी  7 हजार 651 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 93.77 टक्के मतदान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण 13 हजार 122 मतदारापैंकी 12 हजार 500 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यात 95.26 टक्के मतदान झाले आहे. नंदूरबार जिल्ह्यात एकूण  5 हजार 393 मतदारापैंकी 5 हजार 184 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 96.12 टक्के इतके मतदान नंदूरबार जिल्ह्यात झाले आहे.

Election 2024 : नाशिक शिक्षक निवडणुकीसाठी 93.48 टक्के मतदान Read More »