DNA मराठी

latest news

Nanded News : विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

Nanded News : विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळा पासून या मोर्चाला सुरुवात झाली. महात्मा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. आदिवासी समाजातील नरहरी झिरवळ,किरण लमहाटे,डॉ राजेंद्र भारुड यांच्या प्रतिमेचे काही समाज कंटकांनी जागतिक आदिवासी दिनी  दहन केले,त्या समाज कंटकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत,12 हजार 500 जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी,पेसा अंतर्गत भरती प्रक्रिया तात्काळ घेण्यात यावी,यासह इतर मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  शासनाने तात्काळ आमच्या मागण्याची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा या मागण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी समाज बांधव रस्त्यावर उतरले असा इशारा माजी आमदार संतोष टारफे यांनी दिलाय.

Nanded News : विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला Read More »

Ahmednagar News: धक्कादायक, स्वस्तिक बस स्थानकात वृद्ध व्यक्ती बसच्या टायर खाली आल्याने गंभीर जखमी

Ahmednagar News:  अहमदनगर शहरातील गजबजलेल्या स्वस्तिक बस स्थानकात एक वृद्ध व्यक्ती बसच्या टायर खाली आल्याने गंभीर जखमी झाला आहे. बस चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले. वृद्ध व्यक्ती बसटायर खाली आल्याने अक्षरशः त्याचा पाय पूर्ण पणे टायर खाली आल्याने रिकामी झाला असून  व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.  अंकुश आबा शिंदे ही व्यक्ती गंभीर झाल्यानंतर तेथील उपस्थित प्रवाशांनी तात्काळ त्या व्यक्तीला बसच्या बाजूला करून बस स्थानकात आणले त्यानंतर बराच वेळ एसटीच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या अंगावरती चादर देखील टाकली नव्हती किंवा रुग्णवाहिकेला देखील फोन केला नव्हता.  प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्या प्रवाशांनी सांगितलं की पूर्णपणे बस चालकाची चुकी असून बस चालकाने कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्या व्यक्तीच्या अंगावर ती गाडी घातली. त्यामुळे प्रवाशांनी रोष व्यक्त केला असून ड्रायव्हर वरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी प्रवाशांची मागणी आहे.  एसटी बस चालकाला कोणी अरेरावी किंवा धक्काबुक्की केली तर प्रशासन किंवा एसटी कर्मचारी हे आंदोलन करतात परंतु आज एका एसटी चालकाच्या चुकीमुळे एका प्रवाशाला गंभीर इजा झाली आहे याकडे प्रशासन कधी लक्ष देणार असं देखील यावेळी प्रत्यक्ष दर्शनी सांगितलं. सदर बस ही शिर्डी ते रोहा अशी अहमदनगर मार्गे जात होती बस चालक आशिक मुबारक शेख याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी प्रत्यक्षदर्शींची आहे. गाडी क्रमांक mh14kq3970 हिरकणी गाडी होती. अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर त्या नागरिकाला रुग्णवाहिकेतून एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून पोलीस प्रशासन पुढील कारवाई करत आहे.

Ahmednagar News: धक्कादायक, स्वस्तिक बस स्थानकात वृद्ध व्यक्ती बसच्या टायर खाली आल्याने गंभीर जखमी Read More »

Pune Crime News: पुण्यात धक्कादायक प्रकरण, इंस्टाग्रामवर मैत्री अन् अल्पवयीन मुलीवर अत्याचार

 Pune Crime News:  गेल्या काही दिवसांपासून राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहे त्यामुळे महिलांचे सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आला आहे.  माहितीनुसार, पुण्यातील हिंजवडी परिसरात अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका 23 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपीचे नाव कार्तिक कांबळे असे असून, त्याच्यावर आयपीसी कलम अ अंतर्गत कलम 376, 376 (2) आणि 506 तसेच POCSO कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला इंस्टाग्रामवर भेटले आणि तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना या वर्षाच्या सुरुवातीला एप्रिल ते जून दरम्यान घडली होती. रीतसर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून गुरुवारी आरोपीला अटक केली. आरोपीने पीडितेचा लैंगिक छळही केला सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेश कुराडे यांनी एएनआयला सांगितले की, आरोपीने पीडितेवरही लैंगिक अत्याचार केले असून त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली  पीडित मुलगी तिच्या कुटुंबासोबत आली आणि घटनेची माहिती दिली. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी आणि आरोपी इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपर्कात आले. त्यानंतर आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच याबाबत घरच्यांना सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 4 दिवसांची कोठडी सुनावली आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Pune Crime News: पुण्यात धक्कादायक प्रकरण, इंस्टाग्रामवर मैत्री अन् अल्पवयीन मुलीवर अत्याचार Read More »

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजा इतिहास रचण्यापासून अवघ्या 6 विकेट्स दूर, महान खेळाडूंच्या क्लबमध्ये करणार प्रवेश

Ravindra Jadeja : भारतीय संघासाठी रवींद्र जडेजा हा केवळ गोलंदाज नाही तर प्रत्येक विभागात एक संपूर्ण पॅकेज आहे. क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो की फलंदाजी, प्रत्येक क्षेत्रात त्याची पकड मजबूत आहे. त्याच्या फिरकी बॉल्समध्ये इतकी विविधता आहे की, कोणत्या प्रकारचा चेंडू येत आहे हे फलंदाजांना समजत नाही.  जडेजाची आणखी एक खासियत म्हणजे त्याचे क्षेत्ररक्षण. तो एक हुशार क्षेत्ररक्षक आहे आणि त्याने आपल्या क्षेत्ररक्षणादरम्यान अचूक लक्ष्ये मारून अनेक वेळा सामन्यांचा रंग बदलला आहे. जडेजाने केवळ गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीतही अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. खालच्या क्रमाने येत त्याने अनेक वेळा अत्यंत कठीण परिस्थितीतही संघाला विजय मिळवून दिला आहे. 300 विकेट्सचे महत्त्व कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळींचा टप्पा ओलांडणे ही एक मोठी उपलब्धी आहे आणि कोणत्याही गोलंदाजाचे स्वप्न पूर्ण होते. यावरून गोलंदाज किती अनुभवी आहे आणि त्याच्याकडे किती क्षमता आहे हे लक्षात येते. हा आकडा जडेजासाठी आणखी खास आहे कारण तो अष्टपैलू खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडूसाठी इतक्या विकेट घेणे सोपे नाही. जडेजाने 300 विकेट्स पूर्ण केल्याने भारतीय फिरकी आक्रमणाचे भवितव्यही उज्ज्वल दिसत आहे. जडेजासोबतच रविचंद्रन अश्विनही भारतीय संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या दोन गोलंदाजांच्या जोडीने भारतीय संघाला मोठ्या सामन्यांमध्ये अनेक मोठे विजय मिळवून दिले आहेत. रवींद्र जडेजा अजूनही त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर असून आगामी काळात तो आणखी अनेक विक्रम मोडू शकतो. जडेजाचे आता 400 बळींचा टप्पा ओलांडण्याचे लक्ष्य असेल.

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजा इतिहास रचण्यापासून अवघ्या 6 विकेट्स दूर, महान खेळाडूंच्या क्लबमध्ये करणार प्रवेश Read More »

Rohit Pawar: ग्रामीण भागातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी रोहित पवारांकडून 14000 सायकलींचा वाटप

Rohit Pawar :  ग्रामीण भागामध्ये शाळेपासून पाच किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असलेल्या मुला-मुलींना शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जाण्यामध्ये त्यांचा वेळ जाऊ नये आणि त्यांच्या अभ्यासावर कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून कर्जत जामखेड मतदार संघातील मुला मुलींना सायकल वाटप करण्यात आले आहे.  हे वाटप करताना कुठलाही भेदभाव केला गेला नाही तो कुठल्या समाजाचा आहे त्यांनी मतदान केलं आहे का? असं न पाहता मुला मुलींचा अभ्यासावरती परिणाम होऊ नये म्हणून विविध संघटनाच्या माध्यमातून आम्ही मुलांसाठी 14000 सायकलीचा वाटप करण्यात आले अशी प्रतिक्रिया आमदार रोहीत पवार यांनी दिली. अजून दोन टप्प्यात हे सायकल वाटप केली जाणार असल्याची माहिती देखील यावेळी रोहित पवार यांनी दिली.  रोहित पवार यांच्या मतदार संघात धाराशिवचे खासदार ओम राजे निंबाळकर आणि अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या हस्ते मुलांना सायकल वाटप करण्यात आले.  सर्व संतांनी आपल्याला माणुसकी जपली पाहिजे  कुणी काय बोलावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे माझ्यावरही धार्मिकतेचा प्रभाव आहे सर्व संतांनी आपल्याला माणुसकी जपली पाहिजे अशी शिकवण दिली आहे.  दुसऱ्या समाजाबद्दल आणि धर्माबद्दल अपप्रचार करू नये अशी संतांची शिकवण आहे कुठलाही भेदभाव न करता सर्वांना मदत केली पाहिजे अशी संतांची शिकवण आहे अशा प्रकारचा कोणी वक्तव्य करत असेल तर ते बरोबर नसल्याचे मत रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Rohit Pawar: ग्रामीण भागातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी रोहित पवारांकडून 14000 सायकलींचा वाटप Read More »

Ahmednagar News: ग्रामीण भागात अज्ञात ड्रोनच्या भीतीने नागरिक भयभीत

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यात काही गावांमध्ये तसेच वाड्या, वस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून ड्रोनच्या घिरट्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्रीच्या अंधारात तीन चार वेळा ड्रोन घिरट्या घालताना दिसून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  हे ड्रोन कोण उडवत आहे? कशासाठी उडवत आहे? त्या मागचा हेतू काय आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते.  ग्रामीण भागात काही दिवसांपासून रात्रीच्यावेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. सुरुवातीला ग्रामीण भागात घिरट्या घालणारे ड्रोन चार पाच दिवसांपासून बालमटाकळी परिसरात  देखील घिरट्या घालताना दिसू लागले.  काही वेळ घिरट्या घालून हे ड्रोन गायब होत असल्याचा प्रकार काही दिवसांपासून सातत्याने घडत आहे. तत्पूर्वी अज्ञात ड्रोन फिरत होते असे काही स्थानिक ग्रामस्थांच म्हणणं आहे. रात्रीच्या वेळीच हे ड्रोन फिरत असल्यामुळे ग्रामस्थांनी अनेक गावात आता रात्री उशिरापर्यंत गस्त घालण्यास सुरुवात केली. चोरी करण्याच्या दृष्टीने रेकी करण्यासाठी ड्रोन उडवले जात असल्याची चर्चा होती.

Ahmednagar News: ग्रामीण भागात अज्ञात ड्रोनच्या भीतीने नागरिक भयभीत Read More »

Manuka Benefits : भिजवलेले मनुके खाल्ल्याने होणार जबरदस्त फायदे, जाणून व्हाल थक्क

Manuka Benefits: मुनक्का आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतो. यामध्ये मुबलक प्रमाणात पोषक तत्वे असतात, ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. पण तुम्हाला माहित आहे का की भिजवलेले मनुके खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.   भिजवलेल्या मनुकाचे फायदे पचनसंस्थेसाठी फायदेशीर भिजवलेल्या मनुकामध्ये भरपूर फायबर असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी देखील हे गुणकारी आहे. हाडांची ताकद बेदाण्यामध्ये कॅल्शियम आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. अशक्तपणा प्रतिबंध भिजवलेल्या मनुकामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, जे अशक्तपणाचा त्रास असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. हृदयासाठी फायदेशीर मनुकामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यांसारख्या आजारांपासून संरक्षण करण्यातही हे उपयुक्त आहे. त्वचेसाठी फायदेशीर मनुकामध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. हे सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास देखील मदत करते. वजन कमी करण्यास उपयुक्त भिजवलेल्या मनुका कॅलरीजमध्ये कमी असतात आणि ते तुम्हाला दीर्घकाळ पोटभर ठेवतात. वजन कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकते. ऊर्जा पातळी वाढते बेदाण्यामध्ये नैसर्गिक साखर असते जी शरीराला ऊर्जा प्रदान करते. त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. भिजवलेल्या मनुकेचा आहारात समावेश कसा करावा? दह्यात भिजवलेले मनुके खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. तुम्ही भिजवलेले मनुके लापशी किंवा ओट्समध्ये मिसळून खाऊ शकता. सॅलडमध्ये भिजवलेले मनुके घातल्याने चव वाढते आणि आरोग्यालाही फायदा होतो. तुम्ही भिजवलेले मनुके स्मूदीमध्ये घालून पिऊ शकता. तुम्ही भिजवलेले मनुके दुधासोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता.

Manuka Benefits : भिजवलेले मनुके खाल्ल्याने होणार जबरदस्त फायदे, जाणून व्हाल थक्क Read More »

Maharashtra Accident: भीषण अपघात! टेम्पो आणि कंटेनरमध्ये धडक, दोघांचा मृत्यू

Maharashtra Accident:  सातारा जिल्ह्यात सोमवारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, आयशर टेम्पो आणि कंटेनर यांच्यात समोरासमोर धडक झाली, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला. सातारा-लोणंद महामार्गावर कोरेगाव तालुक्यातील आंबवडे वाघोलीजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर कंटेनरने पेट घेतला. या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य दोन जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी (12 ऑगस्ट) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळताच वाठार पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. या अपघातात कंटेनरला आग लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातातील जखमींना पोलिसांनी तात्काळ सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. एका जखमीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी क्रेन व जेसीबीच्या सहाय्याने दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक पूर्ववत केली. या दुर्दैवी घटनेत कंटेनर जळून खाक झाला असून आयशर टेम्पोचेही मोठे नुकसान झाले आहे.  आयशर टेम्पो किंवा कंटेनर चालक झोपी गेल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेचा तपास वाठार पोलीस करत आहेत.

Maharashtra Accident: भीषण अपघात! टेम्पो आणि कंटेनरमध्ये धडक, दोघांचा मृत्यू Read More »

Modi Government: बेरोजगारांसाठी खूपच फायदेशीर आहे ‘या’ 3 सरकारी योजना; मिळणार 20 लाख रुपये

Modi Government:  आज देशात बेरोजगारीची समस्या मोठी आहे, तर दुसरीकडे महागाई एवढी पसरली आहे की, लोकांची तुटपुंजी कमाई खर्चावर खर्च होत आहे. त्यामुळे तरुण स्वत:साठी विशेष काही करू शकत नाहीत. लाखो सुशिक्षित तरुण बेरोजगारांच्या अवतीभवती फिरत आहेत, त्यांना काही मदत करून काम सुरू करायचे आहे, बेरोजगार तरुणांसाठी सरकारी योजना वरदानापेक्षा कमी नाही. सरकारलाही महागाई नियंत्रणात ठेवायची आहे आणि त्यासाठी अनेक पावले उचलत आहेत, तर समाजातील प्रत्येक घटकासाठी अनेक शक्तिशाली योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी मोदी सरकारच्या एका योजनेची माहिती घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजना आणि PM स्वानिधी योजना आहेत, ज्यामध्ये लोकांना लाभ मिळू शकतो, तथापि, येथे माहिती जाणून घेणे महत्वाचे आहे, तरच लाभ मिळू शकतो. महत्त्वाची कौशल्ये विनामूल्य शिका युवकांनी कौशल्याने सुसज्ज असल्यास रोजगार मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही, अशा लोकांना चांगले कौशल्य मिळावे, यासाठी प्रधानमंत्री कौशल विकास योजना राबविण्यात येत आहे. तर युवकांनी स्वावलंबी होऊन आपापल्या क्षेत्रात रोजगाराच्या दिशेने जावे हा या योजनेबाबत शासनाचा उद्देश आहे, त्यामुळे या योजनेअंतर्गत शासन युवकांना सर्व क्षेत्रातील मोफत प्रशिक्षण देत आहे. तुम्हाला येथे कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तर त्याच कौशल्य विकास योजनेत, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला एक प्रमाणपत्र मिळते ज्याद्वारे तुम्ही खाजगी किंवा सरकारी क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठी पात्र ठरता. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तरुणांना येथे स्वतःचा व्यवसायही सुरू करता येतो. आर्थिक मदतीसाठी तुम्ही सरकारी योजनेत अर्ज करू शकता. या योजनेत 20 लाख तारण मुक्त कर्ज मिळवा ज्या लोकांना यावेळी कोणत्याही व्यवसायात किंवा जुन्या कामात पैसे गुंतवायचे आहेत, त्यांच्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) उत्तम आहे, सरकारने 2024 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात 10 लाख रुपयांची मर्यादा वाढवून 20 लाख रुपये केली आहे. आता या योजनेंतर्गत 20 लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज दिले जाते. तथापि, येथे कर्ज अर्ज नॉन-कॉर्पोरेट आणि बिगर कृषी उद्देशांसाठी असू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्हाला तुमचा स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा तुमच्या विद्यमान कामाचा विस्तार करायचा असेल तर तुम्ही या PMMY योजनेद्वारे तुमच्या पैशाची गरज पूर्ण करू शकता. छोट्या व्यवसायासाठी 50,000 रुपये दिले जात आहेत देशातील बहुतांश व्यवसाय हे छोट्या व्यवसायात आहेत. येथील कमाई प्रचंड आहे. त्यामुळे सरकारचीही इच्छा आहे की जर लोक जास्त आले तर पीएम स्वानिधी योजनेंतर्गत सरकार रस्त्यावरील विक्रेत्यांना 50,000 रुपयांपर्यंत तारणमुक्त कर्ज देते. येथे, कमी खर्चात व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी मदत होते. विशेष म्हणजे तुम्हाला काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. देशात लाखो रस्त्यावर विक्रेते आहेत, जे रोज कमाई करून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, त्यांचा रोजगार वाढवण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, पंतप्रधान स्वानिधी योजना राबविण्यात येत आहे. 10,000 रुपयांपर्यंतचे कर्ज प्रथमच उपलब्ध आहे. पैशाची परतफेड केल्यावर, रक्कम दुप्पट करण्यासाठी मदत दिली जाते म्हणजे 20,000 रुपयांपर्यंतचे कर्ज, ज्यातून तिसऱ्यांदा 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येते.

Modi Government: बेरोजगारांसाठी खूपच फायदेशीर आहे ‘या’ 3 सरकारी योजना; मिळणार 20 लाख रुपये Read More »

LIC Scheme :  जबरदस्त योजना! ‘या’ लोकांना मिळणार 22 लाख रुपये, वाचा सविस्तर

LIC Scheme : एलआयसी प्रत्येक श्रेणीसाठी पॉलिसी ऑफर करते. LIC कडे सध्या एक मुलींसाठी योजना आहे. या योजनेमुळे मुलीचे भविष्य सुधारेल. त्यामुळे पालक आता या योजनेत पैसे गुंतवून मुलीच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतचा खर्च करू शकतात. विशेष म्हणजे योजना गुंतवणूक जोखीममुक्त आहे.   कन्यादान पॉलिसी  एलआयसीची ही कन्यादान पॉलिसी आहे. या पॉलिसी अंतर्गत, प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर भरता येईल. तुम्ही 25 वर्षांचा टर्म प्लॅन निवडला तर तुम्हाला 22 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागणार आहे. ही योजना 25 वर्षांनी परिपक्व होते, कारण या पॉलिसी अंतर्गत मुदत योजना 13-25 वर्षांसाठी असून हे लक्षात घ्या की मुदतपूर्तीच्या वेळी, संपूर्ण रक्कम विमा रक्कम + बोनस + अंतिम बोनससह दिली जाते. ही पॉलिसी घेण्यासाठी मुलीच्या वडिलांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 50 वर्षे असावे,हे लक्षात घ्या.  मिळेल कर्जाचा लाभ तुम्ही ही पॉलिसी विकत घेतली तर तुम्ही तिसऱ्या वर्षापासून कर्ज घेऊ शकता. समजा तुम्हाला पॉलिसी सरेंडर करायची असल्यास ही सुविधा पॉलिसी घेतल्यानंतर 2 वर्षांनी दिली जाते. या पॉलिसीचा प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिलेल.  मिळेल कर सवलती ही पॉलिसी घेतली तर करमुक्तीचा लाभ मिळतो. प्रीमियम जमा केला तर एखाद्याला कलम 80C अंतर्गत कपातीचा लाभ मिळतो आणि कलम 10D अंतर्गत परिपक्वता रक्कम करमुक्त असून पॉलिसीसाठी विमा रकमेची मर्यादा किमान 1 लाख रुपयांपासून सुरू होते आणि कमाल मर्यादा नाही. असा मिळेल लाखोंचा लाभ  समजा या पॉलिसी अंतर्गत 25 वर्षांचा टर्म प्लॅन घेतला आणि 41,367 रुपये वार्षिक प्रीमियम भरला. मासिक गणना केली तर प्रीमियम सुमारे 3,445 रुपये भरावा लागेल. तुम्हाला 22 वर्षांसाठी हा प्रीमियम भरावा लागणार आहे. ते 25 वर्षांच्या कालावधीत 22.5 लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण प्रदान करेल. वडिलांचा मृत्यू झाला तर पुढील प्रीमियम भरावा लागणार नाही. याशिवाय 25 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत त्यांना वार्षिक 1 लाख रुपये मिळतील. 25 व्या वर्षी एकरकमी परिपक्वता रक्कम दिली जाईल. वडिलांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला तर नॉमिनीला इतर सर्व मृत्यू लाभांसह 10 लाख रुपयांचा अपघाती मृत्यू लाभ देण्यात येतो.

LIC Scheme :  जबरदस्त योजना! ‘या’ लोकांना मिळणार 22 लाख रुपये, वाचा सविस्तर Read More »