DNA मराठी

latest news

Maharashtra Keshari 2025: महाराष्ट्र केसरीमध्ये वाद घालणारे शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाडचे 3 वर्षासाठी निलंबन

Maharashtra Keshari 2025 : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने मोठी कारवाई करत महाराष्ट्र केसरीमध्ये वाद घालणारे शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाडचे 3 वर्षासाठी निलंबन करण्याचे निर्णय घेतला आहे. पंचांच्या निर्णय अमान्य असल्याने शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाडने महाराष्ट्र केसरीमध्ये वाद घातला होता. त्यामुळे आता महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे मोठा निर्णय घेत दोघांना तीन वर्षांसाठी निलंबन केला आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या 67 व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करीत विजतेपद पटकाविले. स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळ याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान करण्यात आली. राज्यातील क्रीडा विकासाला चालना देतांना प्रत्येक खेळासाठी आवश्यक आर्थिक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. मॅट विभागात नांदेडचा (मूळचा पुण्याच्या राजगुरुनगरमधील राक्षेवाडीचा) डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली. यात पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. माती विभागातून सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड आणि परभणीचा साकेत यादव यांच्यात अंतिम लढत झाली. यात महेंद्र गायकवाड विजेता ठरला. यावेळी माजी आमदार अरुणकाका जगताप, पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, माजी खासदार सुजय विखे पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस हिंदकेसरी पै. योगेश दोडके, चित्रपट दिग्दर्शक प्रविण तरडे, जिल्हा कुस्तीगीर कार्याध्यक्ष संघाचे संतोष भुजबळ आदी उपस्थित होते.

Maharashtra Keshari 2025: महाराष्ट्र केसरीमध्ये वाद घालणारे शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाडचे 3 वर्षासाठी निलंबन Read More »

UPI मध्ये मोठा बदल…, जाणून घ्या नवीन नियम, नाहीतर होणार नाही पेमेंट

UPI Rules Change: देशात वाढत असणाऱ्या ऑनलाईन व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना देखील समोर येत आहे. या घटनांना थांबवण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नवीन नवीन नियम लागू करत आहे. तर आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आजपासून UPI ​​ट्रान्झॅक्शन आयडीमध्ये विशेष अक्षरे वापरता येणार नाहीत. म्हणजेच तुम्ही UPI आयडीमध्ये *#@ सारखे अक्षरे वापरू शकणार नाही. जर एखाद्या अ‍ॅपने विशेष वर्ण असलेला ट्रान्झॅक्शन आयडी जनरेट केला तर तो पेमेंट सेंट्रल सर्व्हरद्वारे नाकारला जाईल. एनपीसीआयने हा निर्णय का घेतला?UPI ट्रान्झॅक्शन आयडी जनरेट करण्याची प्रक्रिया मानक आणि सुरक्षित करण्यासाठी NPCI ने हे पाऊल उचलले आहे. यामुळे डिजिटल पेमेंट सिस्टमची सुरक्षितता आणि विश्वासार्हता वाढेल. आता व्यवहार आयडीमध्ये फक्त अल्फान्यूमेरिक वर्ण (A-Z, 0-9) वापरले जाऊ शकतात. NPCI ने UPI व्यवहार आयडी प्रमाणित करण्यासाठी आधीच नियम जारी केले आहेत. मार्च 2023 मध्ये जारी केलेल्या आदेशानुसार, व्यवहार आयडीची कमाल लांबी 35 वर्णांपर्यंत निश्चित करण्यात आली होती. डिजिटल पेमेंटमध्ये UPI चा प्रमाण वाढला डिजिटल पेमेंटमध्ये UPI चा वाटा सतत वाढत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अहवालानुसार, 2019 मध्ये डिजिटल पेमेंटमध्ये UPI चा वाटा 34% होता, जो आता 83% पर्यंत वाढला आहे. उर्वरित 17% मध्ये एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे केलेले पेमेंट समाविष्ट आहे. नवीन NPCI नियम लागू झाल्यानंतर, UPI पेमेंट अॅप्सना या बदलाचे पालन करणे बंधनकारक असेल. जर एखाद्या अॅपने नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार ट्रान्झॅक्शन आयडी जनरेट केला नाही, तर ते UPI व्यवहार करू शकणार नाही.

UPI मध्ये मोठा बदल…, जाणून घ्या नवीन नियम, नाहीतर होणार नाही पेमेंट Read More »

LPG Gas Price: आनंदाची बातमी, एलपीजी सिलिंडर स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

LPG Gas Price : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोड्याच वेळात देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहे. या बजेटमध्ये सर्वसामान्य लोकांना काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागू नये मात्र त्यापूर्वीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे. 1 फेब्रुवारी 2025 पासून लागू झालेल्या नवीन दरानुसार, आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 7 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आजपासून दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत 1797 रुपये झाली आहे. कोणत्या शहरात गॅसच्या किमती किती कमी झाल्या?इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, राष्ट्रीय राजधानीत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1 फेब्रुवारीपासून 1804 रुपयांवरून 1797 रुपयांवर आली आहे. कोलकातामध्ये या एलपीजी सिलिंडरची किंमत 1911 रुपयांवरून 1907 रुपयांवर आली आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता 1756 रुपयांवरून 1749.50 रुपयांना उपलब्ध आहे. आजपासून चेन्नईमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 1959.50 रुपये आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचा दरआज घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत, 14 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर अजूनही 803 रुपयांच्या जुन्या किमतीत उपलब्ध आहे. लखनौमध्ये या एलपीजी सिलेंडरची किंमत 810.50 रुपये आहे. मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 802.50 आहे. चेन्नईमध्ये या सिलेंडरची किंमत 818.50 रुपये आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 829 रुपये आहे.

LPG Gas Price: आनंदाची बातमी, एलपीजी सिलिंडर स्वस्त, जाणून घ्या नवीन दर Read More »

Maharashtra Politics : नगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी महापौरसह 12 नगरसेवक शिंदे गटात

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहे. यातच नगर शहरातील देखील तब्बल 12 नगरसेवकांनी ठाकरे गटाला राम राम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख दिलिप सातपुते, शहर प्रमुख सचिन जाधव,युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कतोरेसह उबाठा गटाच्या 12 नगरसेवक, महापौर आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई  येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यामुळे नगरमध्ये उबाठा गटाला मोठ खिंडार पडले. त्याचबरोबर मुंबईतील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीने  प्रभावित होऊन मागील महिनाभरात विविध पक्षांच्या हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत इनकमिंग जोरात सुरू असून उबाठा गटाला खिंडार पडले आहे. नगर महापालिकेचे महापौर संजय शेंडगे, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, नगरसेवक सचिन शिंदे, श्याम नळकांडे, सुरेश तिवारी, संतोष ग्यानाप्पा,बबलू शिंदे, संग्राम कोटकर, दत्तात्रय कावळे, परेश लोखंडे, संदीप दातरंगे, कैलास शिंदे यांच्यासह उपशाखाप्रमुख, विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुख यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी उठाव केला होता. त्याची प्रचिती मागील अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामातून दिसली. त्यामुळेच अनेक पक्षातील लोकप्रतिनिधी शिवसेनेत येत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की 12 नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने नगरमधील शिवसेना आणखी मजबूत झाली आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीच्या सर्वाधिक जागा येतील असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की विधानसभा निवडणुकीत शिवसेना 80 जागा लढली आणि 60 आमदार निवडून आल्या. उबाठा 95 जागा लढले आणि 20 जागी निवडून आले. उबाठापेक्षा शिवसेनेला 17 लाख अधिक मते मिळाली तर लोकसभेत शिवसेनेला दोन लाख जास्त मते मिळाली. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न उरलेला नाही. तसेच नगरमधील विकास कामांना निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

Maharashtra Politics : नगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी महापौरसह 12 नगरसेवक शिंदे गटात Read More »

Baba Siddique : धक्कादायक खुलासा, बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं भाजपच्या बड्या नेत्याचं नाव, WhatsApp चॅटिंग अन्…

Baba Siddique : राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर आता या प्रकरणात मोठा आणि धक्कादायक खुलासा माजी आमदार आणि बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या डायरीत शेवटचे नाव भाजपचे नेते मोहित कंबोज यांचे आहे, असे झिशान सिद्दीकी यांनी सांगितले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. “मोहित कंबोज यांचे डायरीत शेवटचे नाव असून त्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास व्हॉटसॲपवर चॅटिंग केले होते. वडिलांनी त्यांचे नाव डायरीत का लिहले, हे मी सांगू शकत नाही. परंतु या गोष्टीचा तपास होणे गरजेचे आहे,” असं माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी म्हंटले आहे. याच बरोबर झिशान सिद्दीकी यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचाही उल्लेख केला आहे. परब यांनी ज्ञानेश्वर नगर प्रकल्पबाधितांची बैठक घेतली. बैठकीत विकासकांनी झोपडपट्टीधारकांना त्याच ठिकाणी घर मिळेल असे वचन दिले होते. असं झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हंटले आहे. झिशान सिद्दीकी यांनी नोंदविलेल्या जबाबानंतर बाब सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट येणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Baba Siddique : धक्कादायक खुलासा, बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं भाजपच्या बड्या नेत्याचं नाव, WhatsApp चॅटिंग अन्… Read More »

Pratap Sarnaik : महामंडळाला मिळणार 25 हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस, खरेदीसाठी अजित पवारांची मान्यता

Pratap Sarnaik : एस. टी. महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी ५००० या प्रमाणे येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली असून तसा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सन २०२५-२६ अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी बोलवली होती. यामध्ये एसटीच्या सद्यस्थिती मंत्री सरनाईक यांनी विशद केली. सध्या एसटी महामंडळाकडे केवळ १४ हजार ३०० बसेस असून त्यापैकी १० वर्ष पेक्षा जास्त जुन्या झालेल्या १० हजार बसेस आहेत. त्या पुढील ३-४ वर्षात प्रवासी सेवेतून बाद होतील. हि वस्तुस्थिती लक्षात घेता, भविष्यात एसटीला आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतः च्या बसेस घेणे आवश्यक आहे. त्यासाठी दरवर्षी ५ हजार नवीन लालपरी बसेस याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये २५ हजार लालपरी बसेस घेण्याची पंचवार्षिक योजना आम्ही आखली असून त्याला अर्थमंत्र्यांनी परवानगी द्यावी असा प्रस्ताव मांडला. अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाची निकड लक्षात घेऊन तातडीने तत्वतः मान्यता दिली असून त्याबद्दल त्यांचे मंत्री सरनाईक यांनी आभार मानले आहेत. ते पुढे म्हणाले की, दरवर्षी ५ हजार नवीन बसेस याप्रमाणे सन २०२९ साली या २५ हजार वसेस व ५ हजार इलेक्ट्रिक बसेस मिळून ३० हजार बसेसचा ताफा एसटीकडे तयार असेल भविष्यात ” गाव तिथे एसटी… मागेल त्याला बस फेरी..!” आपणं देऊ शकतो. “आज आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देऊन एसटी वर प्रेम करणाऱ्या लाखो सर्वसामान्य जनतेला गोड भेट दिली आहे. याबद्दल मी त्यांचा शतशः आभार आहे.” अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली.

Pratap Sarnaik : महामंडळाला मिळणार 25 हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस, खरेदीसाठी अजित पवारांची मान्यता Read More »

Vijay Wadettiwar : दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर परिवहन खात्या वाली कोण? वडेट्टीवार सरकारवर भडकले

Vijay Wadettiwar : महामंडळाने मोठा निर्णय घेत एसटी भाडेवाढ केले आहे.त्यामुळे आता सरकारवर चारही बाजूने विरोधक जोरदार टीका करताना दिसत आहे. यात आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जर भाडेवाढ जर परिवहन मंत्र्यांनी केली नाही, उपमुख्यमंत्री अजितपवार यांचा विरोध आहे तर एसटीभाडेवाढ तात्काळ मागे घ्यावी आणि जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याच बरोबर दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर या परिवहन खात्याला वाली कोण असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घेतली पाहिजे. मंत्र्यांनी तसे आदेश काढले पाहिजे. दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी? मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दरवाढ विरोध आहे तर दरवाढ मागे घ्यावी आणि दरवाढ मंत्र्यांनी केली नाही तर हे खाते चालवते कोण? अधिकारी जर खाते चालवतात, हा पोरखेळ आहे. सरकारमध्ये गंमत जंमत सुरू आहे. अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर मग त्यांच्यावर कारवाई करणार का? अंगलट आला की अधिकाऱ्यांनी केलं आणि चांगल काही झालं की श्रेय घ्यायचे अशी दुटप्पी भूमिका सरकारची आहे. असा टोला देखील यावेळी राज्य सरकारला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लावला.

Vijay Wadettiwar : दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर परिवहन खात्या वाली कोण? वडेट्टीवार सरकारवर भडकले Read More »

Saif Ali Khan: ‘त्या’ रात्री काय घडले? सैफने केला धक्कादायक खुलासा

Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर काही दिवसापूर्वी चाकूने हल्ला करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे. तर आता त्या रात्री नेमक काय घडलं होते याबाबत सैफने गुरुवारी त्याच्या घरी पोलिसांना आपला जबाब नोंदवला आहे. सैफवर हल्ला झाला त्या रात्री काय घडले?पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफने आपल्या जबाबात म्हटले आहे की, 16 जानेवारीच्या रात्री तो आणि त्याची पत्नी करीना कपूर 11 व्या मजल्यावर त्यांच्या बेडरूममध्ये होते. जेव्हा त्याने त्याची नर्स एलियामा फिलिपच्या किंकाळ्या ऐकल्या. सैफ पुढे म्हणाला की जेव्हा त्यांना त्यांच्या नर्स अलियामा फिलिपच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा ते दोघेही जहांगीरच्या रूमकडे धावले, जिथे अलियामा फिलिप देखील झोपली होती. तिथे त्याला एक अनोळखी माणूस दिसला आणि जहांगीरही रडत होता. सैफवर हल्ला कसा झाला?सैफ म्हणाला की त्याने हल्लेखोराला पकडले. यावेळी हल्लेखोराने त्याच्या पाठीवर, मानेवर आणि इतर ठिकाणी अनेक वार केले. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि कसा तरी त्याने स्वतःची सुटका केली. त्यानंतर हल्लेखोराला मागे ढकलण्यात आले. पोलिसांना चाकूचा तिसरा तुकडा सापडला16 जानेवारी रोजी सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरी झालेल्या हल्ल्यात वापरलेल्या चाकूचा तिसरा तुकडा जप्त करण्यात आला आहे. “चाकूचा तिसरा तुकडा, ज्यामध्ये हँडल आणि ब्लेडचा काही भाग होता, तो वांद्रे तलावाजवळ सापडला,” असे वांद्रे पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. ज्या ठिकाणाहून चाकूचा भाग सापडला ते ठिकाण अभिनेत्याच्या सतगुरु शरण बिल्डिंगमधील घरापासून एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. बुधवारी संध्याकाळी आम्ही आरोपीला तलावावर घेऊन गेलो आणि चाकूचा हरवलेला भाग सापडला.”

Saif Ali Khan: ‘त्या’ रात्री काय घडले? सैफने केला धक्कादायक खुलासा Read More »

Health Update: सावधान…, दह्यासोबत ‘हे’ 5 पदार्थ खाऊ नका, नाहीतर आरोग्यावर होणार वाईट परिणाम

Health Update: आरोग्यासाठी दही हे खूप फायदेशीर मानले जाते. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे पोटात असंख्य चांगले बॅक्टेरिया तयार करतात आणि ते पचनसंस्था मजबूत करण्यास आणि इतर आजारांना दूर ठेवण्यास मदत करतात. मात्र काही गोष्टी अशा आहेत ज्या दह्यासोबत खाऊ नयेत. यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकते. मासेदही आणि मासे एकत्र खाऊ नयेत, त्यांच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या गुणधर्मांमुळे त्याला परस्परविरोधी आहार म्हणतात. अशा परिस्थितीत पोट फुगणे आणि अपचनाची समस्या उद्भवू शकते. यामुळे तुम्हाला त्वचेची अ‍ॅलर्जी देखील होऊ शकते. आंबाआंबा आणि दही, दोन्ही एकत्र खाऊ नयेत. यामुळे पोटात आम्लता, जास्त गॅस तयार होणे आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.  आंबा हा गोड आणि उष्ण पदार्थ आहे आणि दह्याचा स्वभाव थंड असतो, म्हणून दोन्हीही विरुद्ध पदार्थ मानले जातात. कांदाजर तुम्ही दह्यासोबत कच्चा कांदा खाल्ला तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कारण कांदा गरम असतो आणि दही थंड असते. त्यामुळे तेएकत्र खाल्ल्याने पोटफुगी आणि गॅसची तीव्र समस्या उद्भवू शकते. यामुळे अपचन होऊ शकते. दूधदही आणि दूध एकत्र सेवन करू नये. हा एक विसंगत आहार मानला जातो. यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, दही आणि दूध एकत्र सेवन केल्याने पोटात असलेले चांगले बॅक्टेरिया नष्ट होतात, ज्यामुळे एकूण आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जास्त रसाळ फळेजर तुम्ही रसाळ फळांसोबत दही खाल्ले तर पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे पचनक्रियेत समस्या निर्माण होऊ शकतात आणि तुम्हाला पोट फुगण्याची समस्या येऊ शकते. म्हणून, खूप रसाळ फळांसोबत दही खाऊ नका.

Health Update: सावधान…, दह्यासोबत ‘हे’ 5 पदार्थ खाऊ नका, नाहीतर आरोग्यावर होणार वाईट परिणाम Read More »

Narhari Zirwal : अन्न पदार्थांच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य -अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

Narhari Zirwal : समाजातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, उत्तम दर्जाचे व निर्भेळ अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून अन्न पदार्थांच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे शिवांजली कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मूरकुटे, रंगनाथ पवार, डॉ.बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते. मंत्री झिरवाळ म्हणाले, नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ अन्न प्राप्त होणे हा त्यांचा अधिकार आहे. दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ केल्याच्या अनेक घटना घडतात. अशा घटना होऊ नयेत यासाठी कठोर उपाययोजना करत अन्न व औषध विभागाच्या माध्यमातून सामान्यांना निर्भेळ अन्न पदार्थ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, पाटील परिवाराने शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचीद्वारे खुली करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. शिक्षणदानाच्या त्यांच्या या पुण्याच्या कार्यात त्यांना भविष्यकाळात आवश्यक असलेली सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाहीही झिरवाळ यांनी दिली. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमास पदाधिकारी, विविध वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

Narhari Zirwal : अन्न पदार्थांच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य -अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ Read More »