DNA मराठी

latest news

Pratap Sarnaik : महामंडळाला मिळणार 25 हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस, खरेदीसाठी अजित पवारांची मान्यता

Pratap Sarnaik : एस. टी. महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी ५००० या प्रमाणे येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली असून तसा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सन २०२५-२६ अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी बोलवली होती. यामध्ये एसटीच्या सद्यस्थिती मंत्री सरनाईक यांनी विशद केली. सध्या एसटी महामंडळाकडे केवळ १४ हजार ३०० बसेस असून त्यापैकी १० वर्ष पेक्षा जास्त जुन्या झालेल्या १० हजार बसेस आहेत. त्या पुढील ३-४ वर्षात प्रवासी सेवेतून बाद होतील. हि वस्तुस्थिती लक्षात घेता, भविष्यात एसटीला आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतः च्या बसेस घेणे आवश्यक आहे. त्यासाठी दरवर्षी ५ हजार नवीन लालपरी बसेस याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये २५ हजार लालपरी बसेस घेण्याची पंचवार्षिक योजना आम्ही आखली असून त्याला अर्थमंत्र्यांनी परवानगी द्यावी असा प्रस्ताव मांडला. अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाची निकड लक्षात घेऊन तातडीने तत्वतः मान्यता दिली असून त्याबद्दल त्यांचे मंत्री सरनाईक यांनी आभार मानले आहेत. ते पुढे म्हणाले की, दरवर्षी ५ हजार नवीन बसेस याप्रमाणे सन २०२९ साली या २५ हजार वसेस व ५ हजार इलेक्ट्रिक बसेस मिळून ३० हजार बसेसचा ताफा एसटीकडे तयार असेल भविष्यात ” गाव तिथे एसटी… मागेल त्याला बस फेरी..!” आपणं देऊ शकतो. “आज आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देऊन एसटी वर प्रेम करणाऱ्या लाखो सर्वसामान्य जनतेला गोड भेट दिली आहे. याबद्दल मी त्यांचा शतशः आभार आहे.” अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली.

Pratap Sarnaik : महामंडळाला मिळणार 25 हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस, खरेदीसाठी अजित पवारांची मान्यता Read More »

Vijay Wadettiwar : दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर परिवहन खात्या वाली कोण? वडेट्टीवार सरकारवर भडकले

Vijay Wadettiwar : महामंडळाने मोठा निर्णय घेत एसटी भाडेवाढ केले आहे.त्यामुळे आता सरकारवर चारही बाजूने विरोधक जोरदार टीका करताना दिसत आहे. यात आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जर भाडेवाढ जर परिवहन मंत्र्यांनी केली नाही, उपमुख्यमंत्री अजितपवार यांचा विरोध आहे तर एसटीभाडेवाढ तात्काळ मागे घ्यावी आणि जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याच बरोबर दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर या परिवहन खात्याला वाली कोण असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घेतली पाहिजे. मंत्र्यांनी तसे आदेश काढले पाहिजे. दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी? मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दरवाढ विरोध आहे तर दरवाढ मागे घ्यावी आणि दरवाढ मंत्र्यांनी केली नाही तर हे खाते चालवते कोण? अधिकारी जर खाते चालवतात, हा पोरखेळ आहे. सरकारमध्ये गंमत जंमत सुरू आहे. अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर मग त्यांच्यावर कारवाई करणार का? अंगलट आला की अधिकाऱ्यांनी केलं आणि चांगल काही झालं की श्रेय घ्यायचे अशी दुटप्पी भूमिका सरकारची आहे. असा टोला देखील यावेळी राज्य सरकारला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लावला.

Vijay Wadettiwar : दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर परिवहन खात्या वाली कोण? वडेट्टीवार सरकारवर भडकले Read More »

Saif Ali Khan: ‘त्या’ रात्री काय घडले? सैफने केला धक्कादायक खुलासा

Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर काही दिवसापूर्वी चाकूने हल्ला करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे. तर आता त्या रात्री नेमक काय घडलं होते याबाबत सैफने गुरुवारी त्याच्या घरी पोलिसांना आपला जबाब नोंदवला आहे. सैफवर हल्ला झाला त्या रात्री काय घडले?पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफने आपल्या जबाबात म्हटले आहे की, 16 जानेवारीच्या रात्री तो आणि त्याची पत्नी करीना कपूर 11 व्या मजल्यावर त्यांच्या बेडरूममध्ये होते. जेव्हा त्याने त्याची नर्स एलियामा फिलिपच्या किंकाळ्या ऐकल्या. सैफ पुढे म्हणाला की जेव्हा त्यांना त्यांच्या नर्स अलियामा फिलिपच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा ते दोघेही जहांगीरच्या रूमकडे धावले, जिथे अलियामा फिलिप देखील झोपली होती. तिथे त्याला एक अनोळखी माणूस दिसला आणि जहांगीरही रडत होता. सैफवर हल्ला कसा झाला?सैफ म्हणाला की त्याने हल्लेखोराला पकडले. यावेळी हल्लेखोराने त्याच्या पाठीवर, मानेवर आणि इतर ठिकाणी अनेक वार केले. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि कसा तरी त्याने स्वतःची सुटका केली. त्यानंतर हल्लेखोराला मागे ढकलण्यात आले. पोलिसांना चाकूचा तिसरा तुकडा सापडला16 जानेवारी रोजी सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरी झालेल्या हल्ल्यात वापरलेल्या चाकूचा तिसरा तुकडा जप्त करण्यात आला आहे. “चाकूचा तिसरा तुकडा, ज्यामध्ये हँडल आणि ब्लेडचा काही भाग होता, तो वांद्रे तलावाजवळ सापडला,” असे वांद्रे पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. ज्या ठिकाणाहून चाकूचा भाग सापडला ते ठिकाण अभिनेत्याच्या सतगुरु शरण बिल्डिंगमधील घरापासून एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. बुधवारी संध्याकाळी आम्ही आरोपीला तलावावर घेऊन गेलो आणि चाकूचा हरवलेला भाग सापडला.”

Saif Ali Khan: ‘त्या’ रात्री काय घडले? सैफने केला धक्कादायक खुलासा Read More »

Health Update: सावधान…, दह्यासोबत ‘हे’ 5 पदार्थ खाऊ नका, नाहीतर आरोग्यावर होणार वाईट परिणाम

Health Update: आरोग्यासाठी दही हे खूप फायदेशीर मानले जाते. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे पोटात असंख्य चांगले बॅक्टेरिया तयार करतात आणि ते पचनसंस्था मजबूत करण्यास आणि इतर आजारांना दूर ठेवण्यास मदत करतात. मात्र काही गोष्टी अशा आहेत ज्या दह्यासोबत खाऊ नयेत. यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकते. मासेदही आणि मासे एकत्र खाऊ नयेत, त्यांच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या गुणधर्मांमुळे त्याला परस्परविरोधी आहार म्हणतात. अशा परिस्थितीत पोट फुगणे आणि अपचनाची समस्या उद्भवू शकते. यामुळे तुम्हाला त्वचेची अ‍ॅलर्जी देखील होऊ शकते. आंबाआंबा आणि दही, दोन्ही एकत्र खाऊ नयेत. यामुळे पोटात आम्लता, जास्त गॅस तयार होणे आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.  आंबा हा गोड आणि उष्ण पदार्थ आहे आणि दह्याचा स्वभाव थंड असतो, म्हणून दोन्हीही विरुद्ध पदार्थ मानले जातात. कांदाजर तुम्ही दह्यासोबत कच्चा कांदा खाल्ला तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कारण कांदा गरम असतो आणि दही थंड असते. त्यामुळे तेएकत्र खाल्ल्याने पोटफुगी आणि गॅसची तीव्र समस्या उद्भवू शकते. यामुळे अपचन होऊ शकते. दूधदही आणि दूध एकत्र सेवन करू नये. हा एक विसंगत आहार मानला जातो. यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, दही आणि दूध एकत्र सेवन केल्याने पोटात असलेले चांगले बॅक्टेरिया नष्ट होतात, ज्यामुळे एकूण आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जास्त रसाळ फळेजर तुम्ही रसाळ फळांसोबत दही खाल्ले तर पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे पचनक्रियेत समस्या निर्माण होऊ शकतात आणि तुम्हाला पोट फुगण्याची समस्या येऊ शकते. म्हणून, खूप रसाळ फळांसोबत दही खाऊ नका.

Health Update: सावधान…, दह्यासोबत ‘हे’ 5 पदार्थ खाऊ नका, नाहीतर आरोग्यावर होणार वाईट परिणाम Read More »

Narhari Zirwal : अन्न पदार्थांच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य -अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

Narhari Zirwal : समाजातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, उत्तम दर्जाचे व निर्भेळ अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून अन्न पदार्थांच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे शिवांजली कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मूरकुटे, रंगनाथ पवार, डॉ.बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते. मंत्री झिरवाळ म्हणाले, नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ अन्न प्राप्त होणे हा त्यांचा अधिकार आहे. दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ केल्याच्या अनेक घटना घडतात. अशा घटना होऊ नयेत यासाठी कठोर उपाययोजना करत अन्न व औषध विभागाच्या माध्यमातून सामान्यांना निर्भेळ अन्न पदार्थ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, पाटील परिवाराने शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचीद्वारे खुली करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. शिक्षणदानाच्या त्यांच्या या पुण्याच्या कार्यात त्यांना भविष्यकाळात आवश्यक असलेली सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाहीही झिरवाळ यांनी दिली. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमास पदाधिकारी, विविध वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

Narhari Zirwal : अन्न पदार्थांच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य -अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ Read More »

Mahayuti Government: पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद? ‘या’ जिल्ह्यांबबत सरकारने घेतला मोठा निर्णय

Mahayuti Government: शनिवारी रात्री महायुती सरकारकडून पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र आता महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून मोठा वाद निर्माण झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, पालकमंत्री पदाची यादी जाहीर होताच शिवसेना पक्षाचे मंत्री भरत गोगावले आणि ज्येष्ठ नेते मंत्री दादा भुसे नाराज झाले आहे. त्यामुळे आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षाचे मंत्री भरत गोगावले आणि ज्येष्ठ नेते मंत्री दादा भुसे नाराज असल्याने राज्य सरकारकडून परिपत्रक काढून रायगड जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची नियुक्ती पुढील आदेशापर्यंत स्थगित केली आहे. शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन तर रायगड जिल्ह्याची जबाबदारी मंत्री अदिती तटकरे यांना देण्यात आली होती मात्र आता दोन्ही जिल्ह्याची नियुक्ती पुढील आदेशापर्यंत सरकारने स्थगित केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून मोठा वाद निर्माण झाला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गडचिरोली जिल्ह्याची तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुणे जिल्ह्याची तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याची आणि जालना जिल्ह्याची जबाबदारी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

Mahayuti Government: पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद? ‘या’ जिल्ह्यांबबत सरकारने घेतला मोठा निर्णय Read More »

Suresh Dhas : करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल कोणी ठेवली? पहिल्यांदाच सुरेश धसांनी थेट नावचं घेतलं, म्हणाले…..

Suresh Dhas: काही दिवसांपूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांनी एका पोलीस अधिकाऱ्याने करुणा शर्मा यांच्या गाडीत साडी नेसून पिस्तुल ठेवल्याचा दावा केला होता. पण त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्याचं नाव घेतलं नव्हतं. पण आता त्यांनी थेट अधिकाऱ्याचं नाव सांगितलं आहे. “बीडमध्ये हक्काची दहशत मोडून काढतील चुकीच्या व्यक्तीला मदत करणारे व्यक्ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार नाही. ते कधीही चुकीच्या व्यक्तीला पाठीशी घालणार नाही. एलसीबीच्या 107 च्या टेबलवर प्रति आरोपी पाच हजार ते वीस हजार असा रेट सुरू असून करुणा शर्मांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवण्याचे बक्षीस म्हणजे सचिन सानप यांची एलसीबीला झालेली बदली. कोल्हापूरवरून गणेश हंगे बदलून आणला तो 107 चा टेबल आहे, सचिन आंधळे याला ही बदलून आले,” असे सुरेश धस म्हणाले. दरम्यान, सुरेश धस यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. यावर आता काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील सातत्याने करत आहे.

Suresh Dhas : करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल कोणी ठेवली? पहिल्यांदाच सुरेश धसांनी थेट नावचं घेतलं, म्हणाले….. Read More »

UP Crime: मामी आणि भाचाचं प्रेम… नंतर मामाचा काढला कटा

UP Crime: मामी आणि भाच्यामधील नात्यात एक लज्जास्पद घटना उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिरोजाबादमध्ये, एका भाच्याने त्याच्या मामाची हत्या केली कारण तो त्याच्या मामीच्या प्रेमात आंधळा झाला होता. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना खैरगड पोलीस ठाण्यातील वैरनी गावातील आहे, जिथे सत्येंद्र नावाच्या तरुणाचे 8 मे 2021 रोजी रोशनी नावाच्या मुलीशी लग्न झाले होते. सत्येंद्र आणि रोशनी यांच्या वयात खूप फरक होता, सत्येंद्र त्याच्या पत्नीपेक्षा सुमारे 22 वर्षांनी मोठा होता. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली, पण काही काळानंतर रोशनीला तिच्या पतीचा भाचा गोविंदवर प्रेम झाले. गोविंद आणि रोशनीमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले, जे सत्येंद्रच्या लक्षात आले. त्यामुळे घरात वारंवार वाद होऊ लागले. हे प्रकरण इतके वाढले की रोशनी आणि गोविंद यांनी मिळून सत्येंद्रच्या हत्येचा कट रचला. हे षड्यंत्र गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होते आणि 14 जानेवारीच्या रात्री ते अंमलात आणण्यात आले. 14 जानेवारी रोजी संध्याकाळी गोविंद त्याचे मामा सत्येंद्र यांच्या घरी आला आणि जेवण करून सर्वजण झोपायला गेले. रात्रीच्या अंधारात गोविंदने त्याचे मामा सत्येंद्र यांची हत्या केली आणि तो पळून गेला. सकाळी सत्येंद्रचा मृतदेह सापडला तेव्हा गावात एकच खळबळ उडाली आणि पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी सांगितले की, मृत सत्येंद्रचा भाऊ शत्रुघ्नने हत्येचा अहवाल दाखल केला होता ज्यामध्ये पत्नी रोशनी आणि भाचा गोविंद दोघांनाही आरोपी ठरवण्यात आले होते. एसपी (ग्रामीण) अखिलेश भदोरिया यांनी माहिती दिली की, “चौकशीदरम्यान गोविंदने सांगितले की त्याचे त्याच्या मामीसोबात प्रेमसंबंध होते आणि म्हणूनच त्याने त्याच्या मामाची हत्या केली.” पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून चौकशी सुरू आहे.

UP Crime: मामी आणि भाचाचं प्रेम… नंतर मामाचा काढला कटा Read More »

Maharashtra News: डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन, MIDC मधील अधिकारी भेटेना, उद्योजक हैराण

Maharashtra News : एमआयडीसी मधील अधिकारी उद्योजकांना भेटत नाहीत अशा अनेक तक्रारी वारंवार येत असतात एमआयडीसी मधील वरिष्ठ अधिकारी वेळ देऊनही भेट देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रारी यापूर्वीही झाले आहेत याबाबत एका उद्योजकाने डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून एमआयडीसीमध्ये लेखावर्ष अधिकाऱ्याची तक्रार केली आहे. यावर फडणवीस काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अहिल्यानगर शहरापासून एमआयडीसीमध्ये उद्योजकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यात एमआयडीसी मधील वरिष्ठ अधिकारी उद्योजकांना ऑफिसला बोलवून घेऊन ते स्वतः बाहेर निघून जातात असे प्रकरण समोर आले आहे, एमआयडीसी मधील उप अभियंता एस एस बडगे यांच्या विरोधात खास करून या तक्रारी आहेत किलोस्कर सारख्या मोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना कराल यात बोलून ठेवले सदरचे अधिकारी हे अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी पुण्याहून नगरला आले होते. मात्र उप अभियंता पडदे यांनी त्यांना जवळपास तीन तास बसवले तरीही ते आले नाही अशा प्रकारे अनेक तक्रारी पडदे यांच्या विरोधात करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोननगर एमआयडीसी मधील वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटणं टाळत असतात यामुळे कंपन्यांचा विस्तार होण्यास अडचणीत असल्याचं उद्योजकांनी म्हटल आहे कुठल्याही काम वेळेवर होत नसल्याने उद्योजक हैराण झाले आहेत अभियंता यांच्या विरोधात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका उद्योजकाने डायरेक्ट तक्रार केली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यावर काय कार्य करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, अर्थपूर्ण समजण्यासाठी अधिकाऱ्यांना भेट टाळण्याची शक्यता उद्योजक उद्योगातील कामासाठी अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी फोन करून पूर्व परवानगी घेतली जाते. परंतु, एमआयडीसीतील काही वरिष्ठ अधिकारी हे जाणीवपूर्वक भेट घेत नाहीत, अर्थपूर्ण तडजोडीचे बोलावे म्हणून उद्योजकान भेट घेण्यास टाळाटाळ केली जाते अशी चर्चा उद्योजकांमध्ये आहे.

Maharashtra News: डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन, MIDC मधील अधिकारी भेटेना, उद्योजक हैराण Read More »

PM Modi: पंतप्रधान मोदी आज मुंबईत नौसेनेच्या तीन युद्ध नौकांचे करणार लोकार्पण

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून मुंबईतील दौऱ्यादरम्यान भारतीय नौसेनेच्या तीन अद्यावत युद्ध नौकांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. भारतीय नौसेनेच्या माहितीनुसार या तीन अद्यावत युद्धनौकांमध्ये, आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर युद्ध लोकांचा समावेश आहे. या तीन युद्धनौका म्हणजे आपल्या देशाची सागरी सुरक्षेतील एक महत्त्वाची झेप असल्याचे भारतीय नौदलाचे म्हणणे आहे. भारतीय नौदलाच्या माहितीनुसार, INS निलगिरी हे 17A स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिले जहाज आहे. भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने त्याची रचना केली आहे. वाढीव क्षमता, समुद्रात जास्त काळ राहणे आणि स्टेल्थ यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांसह ते नौदलात सामील करण्यात आले आहे. हे देशी फ्रिगेट्सच्या पुढील पिढीचे प्रतिनिधित्व करते. INS सूरत हे 15B वर्गाच्या गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर प्रकल्पाचे चौथे आणि अंतिम जहाज आहे. हे जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक आहे. यात 75 टक्के स्वदेशी सामग्री आहे, ती अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमतांनी सुसज्ज आहे. INS वाघशिर ही P75 स्कॉर्पीन प्रकल्पातील सहावी आणि अंतिम पाणबुडी आहे. INS वाघशिर पाणबुडी बांधणीत भारताच्या वाढत्या कौशल्याचे प्रतिनिधित्व करते. हे फ्रेंच नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने बांधण्यात आले असल्याची माहिती भारतीय नौदलाने दिली आहे. देशाला देणार भक्कम सुरक्षा कवच आयएनएस सूरत आणि आयएनएस निलगिरी या भारतीय नौदलाच्या अतिशय अद्ययावत युद्धनौका आहेत. देशाला हवाई सुरक्षा देण्यास त्या सक्षम असून शत्रूने धाडलेले क्षेपणास्त्र सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर हवेतच नष्ट करता येणार आहे. आयएनएस वाघशीर ही अद्ययावत पाणबुडी देशाच्या मारक क्षमतेत भर टाकणार आहे. दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा मारा या पाणबुडीवरून करता येणार आहे. याच श्रेणीतील आयएनएस अरिघात ही पाणबुडी गेल्यावर्षी नौदलात समाविष्ट करण्यात आली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्या दरम्यान, नवी मुंबईतील इस्कॉन श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. नऊ एकरांवर पसरलेल्या या प्रकल्पात अनेक देवतांच्या देवतांचे मंदिर, वैदिक शिक्षण केंद्र, प्रस्तावित संग्रहालय, सभागृह आणि उपचार केंद्र यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे त्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी महायुतीतील सर्व आमदारांशी संवाद साधणार आहे.यात आमदारांचे रिपोर्टकार्ड,मतदार संघातील आढावा त्यासोबत काही प्रश्न देखील पंतप्रधान आमदरांना विचारणार असून त्यानंतर मार्गदर्शन करणार आहे.असल्याची माहिती मिळतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची आणि नेत्यांची मंगळवारी रात्री बैठक घेतली होती.

PM Modi: पंतप्रधान मोदी आज मुंबईत नौसेनेच्या तीन युद्ध नौकांचे करणार लोकार्पण Read More »