DNA मराठी

dna marathi

'coolie' vs. 'war 2' — a colorful box office battle

‘Coolie’ विरुद्ध ‘War 2’ — बॉक्स ऑफिसची रंगतदार लढत

दिल्ली – भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या दोन वेगवेगळ्या सिनेमाई प्रवाहांचा थरार अनुभवायला मिळत आहे. एका बाजूला हृतिक रोशन आणि ज्युनियर NTR यांच्या “War 2” मधील अ‍ॅक्शन-थ्रिलरचा झंझावात, तर दुसरीकडे रजनीकांतच्या “Coolie” मधील साऊथ इंडियन मास एंटरटेनमेंटचा जादुई प्रभाव पडला आहे. या दोन्ही चित्रपटांच्या टक्करने बॉक्स ऑफिसवर एक नवा अध्याय लिहायला सुरुवात झाली आहे. सांस्कृतिक विरुद्ध व्यावसायिक ब्रँडिंग War 2 हा यशराज फिल्म्सच्या ‘स्पाय युनिव्हर्स’चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. जागतिक दर्जाच्या अ‍ॅक्शन सिक्वेन्सेस, स्टार कास्टची जबरदस्त केमिस्ट्री आणि हॉलीवूडसदृश सादरीकरण या सगळ्यामुळे त्याची प्रतिमा ‘इंटरनॅशनल थ्रिलर’सारखी झाली आहे. मात्र, Coolieचा प्रभाव वेगळा आहे — रजनीकांतच्या करिष्म्याने तयार झालेला एक सांस्कृतिक सोहळा, ज्यामध्ये कथा, गाणी, संवाद आणि फॅन्सचा भावनिक ओघ या सर्वांचा संगम आहे. आकड्यांचा खेळ पहिल्या दिवशी War 2 ने ₹20–21 कोटींची कमाई करत दमदार सुरुवात केली, विशेषतः हिंदी पट्टा आणि तेलुगू प्रेक्षकांकडून मिळालेल्या उत्साही प्रतिसादामुळे. पण Coolieने एडवांस बुकिंगमध्येच ₹51 कोटींचा टप्पा गाठून आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. परदेशातील प्रीमियर शोजमध्ये Coolieने War 2पेक्षा अनेक पटींनी अधिक कमाई करून एक स्पष्ट संदेश दिला — फॅनबेसची ताकद कोणापेक्षा कमी नाही. मराठी प्रेक्षकांचे स्थान महाराष्ट्रातील चित्रपटप्रेमी या दोन्ही सिनेमांचा आनंद घेत आहेत. एकीकडे War 2मधील आधुनिक अ‍ॅक्शनचा थरार त्यांना भुरळ घालत आहे, तर दुसरीकडे Coolieमधील रजनीकांतच्या अप्रतिम स्क्रीन प्रेझेन्सची मोहिनीही कमी झालेली नाही. स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतरच्या आठवड्याच्या शेवटी कोण आघाडीवर राहील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. निष्कर्ष ही स्पर्धा केवळ आकड्यांची नाही, तर भारतीय प्रेक्षकांच्या विविध अभिरुचींची, भाषांच्या पलीकडच्या प्रेमाची आणि स्टारडमच्या अद्वितीय शक्तीची आहे. Coolie आणि War 2 हे दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या सिनेमाई शाळांचे प्रतिनिधित्व करतात — एक साऊथ इंडियन मास अ‍ॅक्शन, तर दुसरा बॉलिवूडचा जागतिक स्तरावरील थ्रिलर. शेवटी जिंकणारा ठरणार तोच, जो प्रेक्षकांच्या मनात अधिक काळ घर करून राहील.

‘Coolie’ विरुद्ध ‘War 2’ — बॉक्स ऑफिसची रंगतदार लढत Read More »

पत्रकारास शिवीगाळ,

पत्रकारास शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी,तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल;

पत्रकारास शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकीतोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; उपविभागीय पोलीस अधिकारी तपास करणार अहिल्यानगर – शहरातील ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक फौजदार टाईम्स चे कार्यकारी संपादक अन्सार राजू सय्यद (वय 51, रा. वाबळे कॉलनी, मुकुंदनगर) यांना कार्यालयीन आवारात शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बाबासाहेब बलभिम सानप या व्यक्तीविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 9 ऑगस्ट रोजी दुपारी घडला असून, फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून कलम 351(2), 352 बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. घटनेची पार्श्वभूमीफिर्यादी अन्सार सय्यद हे राज चेंबर्स, कोठला येथे असलेल्या आपल्या कार्यालयात नियमित हजेरी लावतात. त्यांच्या कार्यालयासमोरच आरोपी बाबासाहेब सानप यांचेही कार्यालय आहे. 9 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारास फिर्यादींचा ओळखीचा गणेश उरमुले हा कामानिमित्त त्यांना भेटण्यासाठी आला होता. भेटीच्या दरम्यान उरमुले यांनी इमारतीतील शौचालय वापरले. यानंतर सानप यांनी उरमुले यांना बोलावून “तू लघवी केली आहेस, टॉयलेट धुवून घे” असे सांगितले. उरमुले हे पाणी घेऊन टॉयलेट धुण्यास जात असताना सानप यांनी पुन्हा हाक मारून “तू लघवीला तिकडे का गेला?” असे विचारत चापटी मारून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. पत्रकार व मुलाला देखील धमकीही घटना फिर्यादींनी कार्यालयातून पाहिली व त्यांनी सानप यांना ओरडले की, उरमुले टॉयलेट धुवून देतील, मारू नका. यावेळी फिर्यादींचा मुलगा अमन सय्यद हा देखील तिथे गेला व दोघांमध्ये सुरू असलेला वाद सोडविला. यानंतर, पार्किंगमध्ये असताना सानप यांनी अन्सार सय्यद यांना विनाकारण शिवीगाळ करत धक्का बुक्की केली, “तू पत्रकार आहेस म्हणून जास्त शहाणा झाला का? तुमची लायकी काय आहे मला माहित आहे,  मी चांगल्या-चांगल्यांना कामाला लावले आहे, आता पुढचा नंबर तुझा” अशी धमकी दिल्याचे फिर्यादींचे म्हणणे आहे. या प्रकरणी तोपखाना पोलीस्थाण्य्त गुन्हा दाखल,फिर्यादीनुसार तोफखाना पोलिसांनी गुन्हा क्र. 832/2025 दाखल करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांच्याकडे दिला आहे. गुन्हा बीएनएस 351(2) व 352 या कलमांखाली नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी तक्रार लेखी स्वरूपात नोंदवून रोजनाम्यात नोंद केली आहे. या घटनेने पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, पत्रकार संघटनांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

पत्रकारास शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी,तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; Read More »

सावेडी जमीन संशयास्पद व्यवहार : गुजरातचे येतात, जमीन घेतात… आणि महाराष्ट्राचे अधिकारी बघ्याची भूमिका घेतात!

अहिल्यानगर – अहिल्यानगर शहरातील नगर-मनमाड रोडवरील सावेडी नाक्याच्या पुढे असलेल्या तब्बल १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाच्या जमिनीच्या ३५ वर्षांनंतर झालेल्या संशयास्पद नोंदणीने सध्या शहरवासीयांमध्ये प्रचंड खळबळ उडवली आहे. हा केवळ एक जमीन व्यवहार नाही, तर प्रशासनातील बेजबाबदारपणा, सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त आणि भ्रष्ट यंत्रणेचे दर्शन घडवणारा प्रकार आहे. सावेडी मधील सर्व्हे नंबर २४५/ब १ आणि २४५/ब २ या जमिनीचे व्यवहार अचानक इतक्या वर्षांनी होणे आणि त्याचे खरेदीखत गुपचूप तयार होणे हेच पुरेसे संशय वाढवणारे आहे. इतक्या मोठ्या व्यवहारासाठी कोणतीही जाहिर सूचना नाही, आणि पारदर्शक प्रक्रियेचा लवलेशही नाही! हाडांचा कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जमिनीवरील जुन्या भिंती पाडल्या जातात आणि नव्या भिंती उभारण्याचे काम झपाट्याने सुरू होते. हे सगळं लोकांच्या नजरेआड करण्याचा केविलवाणा प्रयत्न नाहीतर काय? आणखी गंभीर बाब म्हणजे गुजरातमधून थेट बाहेरील लोक येऊन बांधकाम सुरू करतात आणि स्थानिक प्रशासन मूकदर्शक बनते. प्रांताधिकारी, तहसीलदार, अप्पर तहसीलदार, सर्कल अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे तक्रारी गेल्यानंतरही काम थांबत नाही, उलट वेगाने सुरू राहते. यामागे सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त नसेल तर काय असेल? ९० कोटींपेक्षा जास्त किंमतीची जमीन असे सहज ताब्यात घेतली जात असेल, तर सामान्य नागरिकांनी काय करायचे? या प्रकरणात तत्कालीन तलाठी, सर्कल अधिकारी यांची भूमिका सखोल तपासली गेली पाहिजे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा संभाव्य संगनमतामुळे इतका मोठा गैरव्यवहार झाला असेल, तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. नागरिकांनी आता जागरूक राहून उच्चस्तरीय चौकशीची मागणी जोर धरायला हवी. प्रशासन आणि सरकारने हे लक्षात घ्यायला हवे की, जमिनीवर भूखंडमाफियाचे सावट निर्माण झाले तर विकासाचे स्वप्न नेहमीच उध्वस्त होईल. आणि यात गरीब मारतो.. कोट्यवधींच्या जमिनीच्या लाटणीसाठी एखादा मोठा अनर्थ व्हावा लागेल का, म्हणजे प्रशासन जागे होईल? हा प्रश्न आज प्रत्येक अहिल्यानगरकराच्या मनात खोलवर टोचतो आहे. आता वेळ आली आहे की, पारदर्शक चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि भूमाफियांना पुन्हा अशा प्रकारची हिंमत करता कामा नये, याची व्यवस्था प्रशासनाने करावी. अन्यथा सावेडी प्रकरण हे भविष्यात अशा भूखंड लाटणाऱ्या टोळ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, आणि नागरी हक्कांचा आणि विकासाचा गळा घोटला जाईल, यात शंका नाही.

सावेडी जमीन संशयास्पद व्यवहार : गुजरातचे येतात, जमीन घेतात… आणि महाराष्ट्राचे अधिकारी बघ्याची भूमिका घेतात! Read More »

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट

Devendra Fadanvis: भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव माध्यमांशी बोलताना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री वैष्णव यांचे आभार मानले. या योजनेत समाविष्ट काही महत्त्वाची स्थानके म्हणजे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर (मध्य आणि पश्चिम), अंधेरी, टिळक टर्मिनस, पुणे, नाशिक रोड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली, अमरावती, भुसावळ, इत्यादी. तसेच, उपनगरीय आणि ग्रामीण भागातील अनेक स्थानकांनाही यात स्थान देण्यात आले आहे, जसे की – अकलकोट रोड, दौंड, इगतपुरी, चांदा फोर्ट, मालाड, डोंबिवली, चिंचवड इत्यादींचा समोवश आहे. या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे. या पुनर्विकासात स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे आहे. अजनी स्टेशन (297.8 कोटी), नागपूर जं. (589 कोटी), नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जं. (17.4 कोटी), जालना (189 कोटी), छत्रपती संभाजीनगर (241 कोटी), रोटेगाव (12 कोटी), अहिल्यानगर (31 कोटी), भायखळा (35.5 कोटी), चिंचपोकळी (52 कोटी), चर्नी रोड (23 कोटी), छत्रपती शिवाजी महाराज टमिनल (1813 कोटी), ग्रॅट रोड (27 कोटी), लोअर परेल (30 कोटी), मरिन लाईन्स (27.7 कोटी), सॅण्डहर्स्ट रोड (16.4 कोटी), मुर्तिजापूर स्टेशन (13 कोटी), बडनेरा (36.3 कोटी), बारामती (11.4 कोटी), दौंड (44 कोटी), केडगाव (12.5 कोटी), परळी वैजनाथ (25.7 कोटी), भंडारा रोड (7.7 कोटी), गोंदिया 40 कोटी), तुमसर रोड (11 कोटी), टिटवाळा (25 कोटी), शेगाव (29 कोटी), बल्लारशाह (31.4 कोटी), चंद्रपूर (25.5 कोटी), चांदा फोर्ट (19.3 कोटी), धुळे (9.5 कोटी), लासलगाव (10.5 कोटी), मनमाड (45 कोटी), नगरसोल (20.3 कोटी), नांदगाव (20 कोटी), आमगाव (7.8 कोटी), वडसा (20.5 कोटी), हातकंणगले (6 कोटी), हिमायतनगर (43 कोटी), हिंगोली डेक्कन (21.5 कोटी), किनवट (23 कोटी), चाळीसगाव (35 कोटी), अंमळनेर (29 कोटी), धरणगाव (26 कोटी), पाचोरा जं. (28 कोटी), दिवा (45 कोटी), मुंब्रा (15 कोटी), शहाड (8.4 कोटी), कोल्हापूर – छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (43 कोटी), लातूर (19 कोटी), जेऊर (20 कोटी), कुर्डूवाडी जं (20 कोटी), फलटण (1 कोटी), वाठर (8 कोटी), आकुर्डी (34 कोटी), चिंचवड (20.4 कोटी), देहू रोड स्टेशन (8.05 कोटी), तळेगाव स्टेशन (40.34 कोटी), मालाड स्टेशन (12.32 कोटी), कुर्ला जं. स्टेशन (28.81 कोटी), कांजुरमार्ग स्टेशन (27 कोटी), विद्याविहार स्टेशन (32.8 कोटी), विक्रोळी स्टेशन (19 कोटी), जोगेश्वरी स्टेशन (119 कोटी), माटुंगा स्टेशन (17.3 कोटी), परळ स्टेशन (19.4 कोटी), प्रभादेवी (21 कोटी), वडाळा स्टेशन (23 कोटी), भोकर स्टेशन (11.3 कोटी), धर्माबाद स्टेशन (30 कोटी), मुखेड जं.स्टेशन (23 कोटी), उमरी स्टेशन (8 कोटी), देवळाली स्टेशन (10.5 कोटी), इगतपुरी स्टेशन (12.5 कोटी), धाराशिव स्टेशन (22 कोटी), गंगाखेड स्टेशन (16 कोटी), मनवथ रोड स्टेशन (12 कोटी), परभणी जं. स्टेशन (26 कोटी), परतूर स्टेशन (23 कोटी), पूर्णा जं. स्टेशन (24 कोटी), सेलू स्‍टेशन (23.2 कोटी), हडपसर स्टेशन (25 कोटी), गोधनी स्टेशन (29 कोटी), काटोल स्टेशन (23.3 कोटी), कामठी स्टेशन (7.7 कोटी), नरखेड जं. स्टेशन (37.6 कोटी), कराड स्टेशन (12.5 कोटी), सांगली स्टेशन (24.2 कोटी), लोणंद जं.स्टेशन (10.5 कोटी), सातारा स्टेशन (34.3 कोटी), बेलापूर स्टेशन (32 कोटी), कोपरगाव स्टेशन (30 कोटी), सेवाग्राम स्टेशन (18 कोटी), धामणगाव स्टेशन (18 कोटी), हिंगणघाट स्टेशन (22 कोटी), पुलगाव स्टेशन (16.5 कोटी), उरूली स्टेशन (13 कोटी), वाशिम स्टेशन (20.3 कोटी), मलकापूर स्टेशन (19 कोटी), नांदुरा स्टेशन (10.6 कोटी), रावेर स्टेशन (9.2 कोटी), सावदा स्टेशन (8.5 कोटी), दुधनी स्टेशन (22 कोटी), पंढरपूर स्टेशन (40 कोटी), सोलापूर स्टेशन (56 कोटी), नंदूरबार स्टेशन (15 कोटी) आणि पालघर स्टेशन (17.5 कोटी).

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट Read More »

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिस मारहाणीत, पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करा, विजय वडेट्टीवर यांची मागणी

Vijay Wadettiwar : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात धक्कादायक अहवाल समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. परभणी प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नैसर्गिक नसून तो पोलिसांच्या मारहाणीत झाला असा अहवाल राज्य मानवाधिकार आयोगाकडे देण्यात आला आहे. तर आता या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. परभणी प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नैसर्गिक नसून तो पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सरकारने या प्रकरणी कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची आता पोलखोल झाली आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवर यांनी केली. परभणी संविधानाच्या अवमान प्रकरणी आंदोलन केलेल्या अनेक आंदोलनकर्त्यांचे कॉम्बिंग ऑपरेशन करून पकडण्यात आले. आणि पोलिस कोठडीत बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू साठी जबाबदार असलेल्या पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी दोषी पोलिसांना निलंबित करण्यात यावे ,पोलिसांवर कठोर कारवाई करावी. याप्रकरणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारने केला आता मात्र सरकार उघडे पडले आहे अशीही टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिस मारहाणीत, पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करा, विजय वडेट्टीवर यांची मागणी Read More »

Eknath Shinde : एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार…, शिवसेना नेत्याचा दावा, अनेक चर्चांना उधाण

Eknath Shinde : मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत महायुतीमध्ये चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे 2 दिवसांसाठी त्यांचे मूळगावी गेल्याने महायुतीमध्ये होणाऱ्या पुढील बैठका दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, एकनाथ शिंदे जेव्हाही त्यांच्या गावी जातात तेव्हा मोठा निर्णय घेऊन परततात. संजय शिरसाट म्हणाले, एकनाथ शिंदे येत्या 24 तासांत काही मोठा राजकीय निर्णय घेऊन परतणार आहेत. यावेळी त्यांनी दावा केला की शिंदे केंद्रीय मंत्रिमंडळात कोणतेही पद घेणार नाहीत, कारण त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. संजय शिरसाट म्हणाले, कोणतीही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आणि एकनाथ शिंदे यांना विचार करण्याची वेळ आली की ते दर्यागावला प्राधान्य देतात. तिथे गेल्यावर ना त्याचा मोबाईल चालतो ना कोणी त्याच्याशी संपर्क साधू शकतो. शांतपणे विचार करून मोठा निर्णय घेऊन ते परतात. शनिवारी सायंकाळपर्यंत एकनाथ शिंदे काही मोठा निर्णय जाहीर करू शकतात, असा दावा शिरसाट यांनी केला. दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतलीयाआधी एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या इतर नेत्यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर महायुतीचे तिन्ही नेते रात्री उशिरा मुंबईत परतले. ही बैठक सकारात्मक असल्याचे सांगून एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची निवड केली जाईल, असे सांगितले होते.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार…, शिवसेना नेत्याचा दावा, अनेक चर्चांना उधाण Read More »

Maharashtra Election: मुद्रीत माध्यमात प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक – निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर या मतदानाच्या दिवशी, मुद्रीत माध्यमांमधून प्रकाशित होणाऱ्या सर्व राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक असल्याचे पारनेर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी कळविले आहे. यासाठी जाहिरात प्रकाशनाच्या प्रस्तावित तारखेच्या किमान दोन दिवस अगोदर जिल्हास्तरीय माध्यम सनियंत्रण व प्रमाणन समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षात अर्ज सादर करावा. मतदानाच्या दिवशी किंवा त्याच्या आधी कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे निवडणूक प्रक्रिया बाधित होवू नये यासाठी पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने या निर्देशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Election: मुद्रीत माध्यमात प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक – निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर Read More »

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात आतापर्यंत 5.34 हजारांची रोकड जप्त

Maharashtra Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने अवैध मद्य, रोकड वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी अहमदनगर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी चेकपोस्ट, आठ भरारी व स्थाई पथके नेमण्यात आली आहेत. भरारी पथकाने नगर शहरात दोन ठिकाणी वाहतूक करण्यात येत असलेली रोकड पंचनामा करुन ताब्यात घेतली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. भरारी पथकाने 16 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता नालेगाव भागातील अमरधाम येथे 3 लाख 84 हजार 300 रुपये एवढी रोख रक्कम दोन पंचासमक्ष पंचनामा करुन ताब्यात घेतली. याबाबतचा तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षककरीत आहेत. कायनेटीक चौक येथे 24 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास काळ्या रंगाचे वाहन क्र.  एमएच 19 ईजी 6311 हे संशयित वाटल्याने वाहनास थांबविण्यात आले. झडती नंतर वाहनाचे चालक आणि सोबतच्या व्यक्तीकडून 1 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम मिळाली. पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचेही कळविण्यात आले आहे.

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात आतापर्यंत 5.34 हजारांची रोकड जप्त Read More »

Maharashtra Election: निवडणुकीची घोषणा अन् अजित पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, जावेद श्रॉफ राष्ट्रवादीमध्ये

Maharashtra Election : निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या अनेक इच्छुक उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसला मोठा धक्का देत मुंबई काँग्रेसचे मोठे नेते जावेद श्रॉफ यांना पक्ष प्रवेश दिला आहे.  जावेद श्रॉफ मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस होते आणि त्यांची मुंबईत चांगली पकड असल्याचे मानले जात आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.  नुकतच जाहीर झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसल्याने याचा फटका काँग्रेसला महाराष्ट्रात बसू शकतो अशी चर्चा सुरू आहे. यातच अनेक नेते आता पक्ष सोडत असल्याने काँग्रेससमोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.  विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. कधी होणार मतदान 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.  22 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि नामांकनाची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असेल. 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. महाराष्ट्रात 9.63 कोटी पात्र मतदार आहेत. महाराष्ट्रातील एकूण 100186 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

Maharashtra Election: निवडणुकीची घोषणा अन् अजित पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, जावेद श्रॉफ राष्ट्रवादीमध्ये Read More »

Ahmednagar News: ‘त्या’ प्रकरणानंतर कुत्र्याला दिले मंत्री भुजबळांचे नाव…मराठा समाज आक्रमक

Ahmednagar News – ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण केलं होत. सध्या ते राज्यभर दौरे करत असून जनतेची भेट घेत आहे. दरम्यान ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यात येऊ नये अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी घेतल्याने आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. जिल्ह्यातील कोपरगाव येथे सकल मराठा समाजाने एका कुत्र्याला छगन भुजबळांचे नाव देत बिस्कीट खाऊ घालत आंदोलन केलं. सध्या राज्यात ओबीसी व मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. याच मुद्द्यावरून सध्या मनोज जरांगे व छगन भुजबळ हे एकमेकांवर टीका टिपण्णी करत आहे. यामुळे राजकारण तापू लागले आहे. दरम्यान नेत्यांची भाषा खालावू लागल्याने आता मराठा समाज देखील आक्रमक होऊ लागला आहे. नुकतेच भुजबळ यांनी टीका करताना मेंदूने दिव्यांग, टाकीवर चढलेले गाढव एवढ्या वर कोणी नेले असे म्हणत जरांगे यांच्यावर बोचरी टीका केली. यांच्या निषेधार्थ कोपरगाव सकल मराठा समाज आक्रमक झाला असून सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी आंदोलन स्थळी अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी चक्क एका कुत्र्याला प्रतिकात्मक छगन भुजबळ याचे नाव देत त्याला बिस्किट खाऊ घालत भुजबळ यांची कान उघडणी करण्यात आली आहे. त्यांना या कुत्र्यप्रमाणे इमानदार राहण्याचा व शांत राहण्याचा सल्ला मराठा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. सदर अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे.

Ahmednagar News: ‘त्या’ प्रकरणानंतर कुत्र्याला दिले मंत्री भुजबळांचे नाव…मराठा समाज आक्रमक Read More »