Ahmednagar News: धक्कादायक, स्वस्तिक बस स्थानकात वृद्ध व्यक्ती बसच्या टायर खाली आल्याने गंभीर जखमी
Ahmednagar News: अहमदनगर शहरातील गजबजलेल्या स्वस्तिक बस स्थानकात एक वृद्ध व्यक्ती बसच्या टायर खाली आल्याने गंभीर जखमी झाला आहे. बस चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले. वृद्ध व्यक्ती बसटायर खाली आल्याने अक्षरशः त्याचा पाय पूर्ण पणे टायर खाली आल्याने रिकामी झाला असून व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. अंकुश आबा शिंदे ही व्यक्ती गंभीर झाल्यानंतर तेथील उपस्थित प्रवाशांनी तात्काळ त्या व्यक्तीला बसच्या बाजूला करून बस स्थानकात आणले त्यानंतर बराच वेळ एसटीच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या अंगावरती चादर देखील टाकली नव्हती किंवा रुग्णवाहिकेला देखील फोन केला नव्हता. प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्या प्रवाशांनी सांगितलं की पूर्णपणे बस चालकाची चुकी असून बस चालकाने कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्या व्यक्तीच्या अंगावर ती गाडी घातली. त्यामुळे प्रवाशांनी रोष व्यक्त केला असून ड्रायव्हर वरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी प्रवाशांची मागणी आहे. एसटी बस चालकाला कोणी अरेरावी किंवा धक्काबुक्की केली तर प्रशासन किंवा एसटी कर्मचारी हे आंदोलन करतात परंतु आज एका एसटी चालकाच्या चुकीमुळे एका प्रवाशाला गंभीर इजा झाली आहे याकडे प्रशासन कधी लक्ष देणार असं देखील यावेळी प्रत्यक्ष दर्शनी सांगितलं. सदर बस ही शिर्डी ते रोहा अशी अहमदनगर मार्गे जात होती बस चालक आशिक मुबारक शेख याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी प्रत्यक्षदर्शींची आहे. गाडी क्रमांक mh14kq3970 हिरकणी गाडी होती. अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर त्या नागरिकाला रुग्णवाहिकेतून एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून पोलीस प्रशासन पुढील कारवाई करत आहे.