DNA मराठी

DNA Marathi News

Marriage Viral Advertisements: 28 एकर फार्महाऊस अन् एकुलता एक मुलगा लग्नासाठी पाहिजे, सोशल मीडियावर जाहिरात व्हायरल

Marriage Viral Advertisements : आपल्या देशात गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन डेटिंग ॲप्स आणि सोशल मीडियावर लग्नाच्या जाहिरातींचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यातच सोशल मीडियावर एका लग्नाची जाहिरात व्हायरल होत आहे. या जाहिरातीमध्ये 30 वर्षीय महिला आदर्श पती शोधत आहे. या महिलेला लग्नासाठी मुलगा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असावा आणि त्याच्याकडे किमान 28 एकरचे फार्महाऊस असावे, अशी मागणी 30 वर्षीय महिलेने केली आहे. सोशल मीडियावर या जाहिरातीवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका 30 वर्षीय महिलेची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या अजब जाहिरातीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काय आहे महिलेची मागणी?30 वर्षीय महिला लग्नासाठी आदर्श पती शोधत आहे. ज्यांचे वय 25 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. आणि तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असावा तसेच त्याच्याकडे चांगला आणि मजबूत व्यवसाय असणे आवश्यक आहे. मुलाकडे किमान 28 एकरचा बंगला किंवा फार्महाऊस असावा. मुलाला स्वयंपाक कसा करावा हे माहित असले पाहिजे. या पोस्टला 3,000 हून अधिक वेळा लाईक केले गेले आहे आणि 800 हून अधिक वेळा शेअर केले गेले आहे.

Marriage Viral Advertisements: 28 एकर फार्महाऊस अन् एकुलता एक मुलगा लग्नासाठी पाहिजे, सोशल मीडियावर जाहिरात व्हायरल Read More »

Hit And Run : नगर शहरात हिट अँड रन, एकाचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

Hit And Run : शहरातील मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात 25 नोव्हेंबर संध्याकाळी सातच्या सुमारास हिट अँड रनची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून 4 ते 5 जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. रविंद्र रमेश कानडे (वय 32, राहणार कानडे मळा, सोलापूर रोड, अहिल्यानगर) असं मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात संध्याकाळी 7 च्या सुमारास XUV 500 कारने दुचाकी आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना धडक दिली. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे तर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

Hit And Run : नगर शहरात हिट अँड रन, एकाचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल Read More »

Raj Thackeray: राज ठाकरेंना मोठा धक्का, मनसेची मान्यता होणार रद्द, ‘हे’ आहे कारण

Raj Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहे. राज्यात पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने महायुतीची सरकार स्थापन होणार आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माहितीनुसार निवडणूक आयोग राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द करण्याचा विचार करत आहे. प्रत्यक्षात त्यांच्या पक्षाचा एकही आमदार विधानसभा निवडणुकीत जिंकू शकला नाही. त्याच वेळी, पक्षाची मतांची टक्केवारीही खूप कमी होती, त्यामुळे निवडणूक आयोग पक्षाची मान्यता रद्द करण्याचा विचार करत आहे. विधानसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षाला किमान एक विधानसभेची जागा किंवा 8 टक्के मते मिळणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या निकालांवर नजर टाकल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 125 जागांसाठी उमेदवार उभे केले होते, पण एकही जागा जिंकता आली नाही. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांचाही निवडणुकीत पराभव झाला. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता रद्द केल्यास तो राज ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जाईल. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 1.55% मते मिळाली आहेत. पक्षाला एकूण 1,002,557 मते मिळाली. या दारुण पराभवानंतर राज ठाकरे यांनी आज त्यांच्या घरी पक्षश्रेष्ठींची आत्मपरीक्षण बैठक बोलावली आहे. या बैठकीत निवडणुकीतील खराब कामगिरी आणि पुढील रणनीतीवर चर्चा होऊ शकते. भाजपने 132 जागा जिंकल्यामहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सलग तिसऱ्यांदा 100 हून अधिक जागा जिंकण्यात यश मिळवले. 149 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या भाजपने 132 जागा जिंकल्या. त्याचवेळी शिवसेनेने 57 तर राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या. त्या तुलनेत महाविकास आघाडी केवळ 49 जागांवर मर्यादित राहिली. या निवडणुकीत भाजपची मते 26.77 टक्के होती. तर काँग्रेसला 12.4 टक्के मते मिळाली.

Raj Thackeray: राज ठाकरेंना मोठा धक्का, मनसेची मान्यता होणार रद्द, ‘हे’ आहे कारण Read More »

Maharashtra Election: देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे कोण होणार मुख्यमंत्री? जाणून घ्या सर्वकाही…

Maharashtra Election: संपुर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. राज्यात पुन्हा एकदा प्रचंड बहुमतासह महायुती सरकार स्थापन करणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे येत आहे तर शिंदेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने निवडणुकीत 131 जागांवर बाजी मारली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. तसेच पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे अशी इच्छा देखील आरएसएसकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने 236 जागांवर विजय मिळवला आहे तर महाविकास आघाडीला फक्त 49 जागा मिळाले आहे आणि 3 जागांवर इतरांनी बाजी मारली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभासह झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने बाजी मारली असून पुन्हा एकदा हेमंत सोरेन मुख्यमंत्री होणार आहे. त्यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा दावा देखील केला आहे.

Maharashtra Election: देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे कोण होणार मुख्यमंत्री? जाणून घ्या सर्वकाही… Read More »

Maharashtra Election Result : मतमोजणीसाठी जिल्ह्यात 1 हजार 259 कर्मचाऱ्यांची नियुक्ती, सकाळी 8 वाजता होणार सुरुवात

Maharashtra Election Result : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात शनिवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुरूवात होणार असून मतमोजणीसाठी १ हजार २५९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी टपाली मतदानाची मतमोजणी सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने ईव्हीएम यंत्राची मतमोजणी सुरू होईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. मतमोजणीसाठी एकूण उपलब्ध १ हजार ३८५ मनुष्यबळापैकी १ हजार २५९ अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्षात मतमोजणी कामासाठी नियुक्त असणार आहेत. या मनुष्यबळाची पहिली सरमिसळ १६ नोव्हेंबर, दुसरी २१ नोव्हेंबर रोजी झाली असून तिसरी सरमिसळ मतमोजणीच्या दिवशी पहाटे ५ वाजता करण्यात येईल. अकोले विधानसभा मतदार संघासाठी मिटींग हॉल तहसील कार्यालय नवीन इमारत ता. अकोले, संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल, ता. संगमनेर, शिर्डी – प्रशासकीय इमारत, तळमजला, तहसील कार्यालय राहाता, कोपरगाव – सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल, तळमजला, ता. कोपरगाव, श्रीरामपूर – मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय, पहिला मजला, ता. श्रीरामपूर येथे मतमोजणी होईल. नेवासा मतदारसंघासाठी न्यू गव्हर्नमेंट ग्रेन गोडाऊन, उत्तर बाजू खोली क्र.२ संथ मेरीस् स्कुल रोड, मुंकुदपुरा नेवासा फाटा, ता.नेवासा, शेवगाव – शासकीय इमारत तळमजला तहसील कार्यालय शेवगाव, राहुरी – लोकनेते रामदास पाटील धुमाळ न्यु आर्टस सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेज राहुरी इनडोअर स्पोर्ट्स हॉल राहुरी, पारनेर – औद्यागिक प्रशिक्षण संस्था वर्कशॉप पारनेर, अहमदनगर शहर – महाराष्ट्र स्टेट वेअर हाऊस कॉर्पोरेशन गोडाऊन नं.६ एम.आय. डी.सी. नागापूर अहिल्यानगर, श्रीगोंदा – गव्हर्नमेंट ग्रेन गोडाऊन नं.३, पेडगाव रोड श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी बॅडमिंटन हॉल, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे मतमोजणी होईल. अकोले मतदारसंघातील ३०७ मतदान केंद्रांसाठी मतमोजणीच्या २२ फेऱ्या होतील. संगमनेर २८८ आणि २१ , शिर्डी २७१ आणि २०, कोपरगाव २७२ आणि २०, श्रीरामपूर ३११ आणि २३, नेवासा २७६ आणि २०, शेवगाव ३६८ आणि २७, राहुरी ३०८ आणि २२, पारनेर ३६६ आणि २७, अहमदनगर शहर २९७ आणि २२, श्रीगोंदा ३४५ आणि २५, तर कर्जत जामखेड मतदारसंघातील ३५६ मतदान केंद्रांसाठी मतमोजणीच्या २६ फेऱ्या होतील. प्रत्येक मतदारसंघात ईव्हीएम मतमोजणीसाठी १४ टेबल लावण्यात येणार असून प्रत्येक टेबलसाठी त्यासाठी प्रत्येकी १ पर्यवेक्षक, सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. टपाली मतदानासाठी अकोले मतदारसंघात ७ टेबल, संगमनेर आणि कर्जत जामखेड ९, शिर्डी आणि कोपरगाव ४, नेवासा आणि अहमदनगर शहर ६, श्रीरामपूर ५, शेवगाव १०, पारनेर १२, श्रीगोंदा मतदारसंघात ११ टेबलवर मतमोजणी होईल. प्रत्येक टेबलवर १ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, १ पर्यवेक्षक, २ सहाय्यक आणि १ सूक्ष्म निरीक्षक असतील. ईटीपीबीएस स्कॅनिंगसाठी अकोले, शिर्डी, कोपरगाव आणि श्रीरामपूर मतदारसंघात २ टेबल, संगमनेर, पारनेर अणि श्रीगोंदा मतदारसंघात प्रत्येकी ५, नेवासा, अहमदनगर शहर आणि कर्जत जामखेड मतदरसंघात प्रत्येकी ३, शेवगाव ४ आणि राहुरी मतदारसंघात ६ टेबलवर व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर १ पर्यवेक्षक आणि १ सहाय्यकांची नियुक्ती करण्यात येईल. याशिवाय मतमोजणीच्या वेळी प्रत्येक निवडणूक मतमोजणी निरीक्षकांच्या मदतील दोन सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीची आकडेवारी तपासण्यासाठी हे सूक्ष्म निरीक्षक सहकार्य करतील.

Maharashtra Election Result : मतमोजणीसाठी जिल्ह्यात 1 हजार 259 कर्मचाऱ्यांची नियुक्ती, सकाळी 8 वाजता होणार सुरुवात Read More »

Prakash Ambedkar : महायुती की मविआ, वंचित कोणाबरोबर जाणार? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं

Prakash Ambedkar : राज्यात विधानसभेसाठी मतदाप्रक्रिया पार पडली असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. मात्र त्यापूर्वी समोर आलेल्या अनेक एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये ‘काटे की टक्कर’ असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सस्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांची भूमिका महत्वाची ठरणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत आम्ही आम्हाला जर युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहणे पसंद करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महायुती की महाविकास आघाडी कोणाला समर्थन देण्यात याकडे आता सर्वांचे लक्ष लागू नये. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने भाजप विरोधात प्रचार केला होता त्यामुळे निकालानंतर वंचित बहुजन आघाडी महायुतीमध्ये प्रवेश करणार का? याची देखील चर्चा आता सुरू झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहणे पसंद करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे.

Prakash Ambedkar : महायुती की मविआ, वंचित कोणाबरोबर जाणार? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं Read More »

IND vs AUS 2024: ऑस्ट्रेलियाला धक्का, भारतीय संघात ‘या’ 2 खेळाडूंची होणार सरप्राईज एंट्री

IND vs AUS 2024: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्याची बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीची सुरुवात 22 नोव्हेंबर पासून होणार आहे. मात्र त्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज शुभमन गिल सराव सामन्यात जखमी झाल्याने तो पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे जवळपास फिक्स झाले आहे. तर दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा देखील पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वालसोबत कोण ओपनिंग करणार? याचा उत्तर सर्वांना जाणून घ्याचे आहे. माहितीनुसार, बीसीसीआय दोन खेळाडूंची सप्राईज एन्ट्री करू शकतो. भारतीय संघात साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांची सरप्राईज एंट्री होऊ शकते. हे दोन्ही फलंदाज भारत अ संघाचा भाग आहेत. जर गिल किंवा इतर कोणताही खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडला तर या दोघांपैकी एकाला भारतीय संघात प्रवेश मिळू शकतो. साई आणि देवदत्त यांनी ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना सध्या ऑस्ट्रेलियात राहण्यास सांगण्यात आले आहे. कारण ऑस्ट्रेलियात खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. शुभमन गिलची दुखापत किती गंभीर ?WACA येथे भारताच्या आंतर-संघ सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गिलला डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. गिलला इंट्रा-आर्टिक्युलर फ्रॅक्चर झाले असावे अशी माहिती समोर येत आहे. या प्रकारची दुखापत बरी होण्यासाठी साधारणतः दोन ते तीन आठवडे लागतात.

IND vs AUS 2024: ऑस्ट्रेलियाला धक्का, भारतीय संघात ‘या’ 2 खेळाडूंची होणार सरप्राईज एंट्री Read More »

Monika Rajale : विरोधकांच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही – मोनिका राजळे 

Monika Rajale : ताजनापुर योजनेवर चर्चा सुरु केली की समजून जायचे निवडणूक आली आहे. निवडणूक प्रचारात गावासाठी काय दिले, काय करणार हे न सांगता, जातीपातीचे राजकारण सुरु करायचे. त्यांच्याकडे विकासकामांचे मुद्दे नसल्याने, विकासाच्या मुद्द्याला बगल द्यायची, दहा वर्षात तालुका मागे पडला म्हणायचा, जर तुम्ही दहा वर्षात मतदारसंघात फिरले असते तर विकास कामे दिसली असती. तुमच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे.    आमदार राजळे यांनी तालुक्यातील ठाकूर निमगाव, कुरुडगाव रावतळे, वरुर, भगुर, आव्हाणे, दिंडेवाडी, बऱ्हाणपुर, मळेगाव, भातकुडगाव, आखतवाडे, आपेगाव, गरडवाडी, ढोर जळगाव, सामानगाव, लोळेगाव आदी गावातील नागरिकांशी संवाद साधला. वरुर येथे झालेल्या कार्यक्रमात दिनकर अंचवले महाराज, भिमराव फुंदे, सचिन म्हस्के, भानुदास सोनटक्के, मारुती लव्हाट, विठ्ठल झिरपे, केशव म्हस्के, गणपत शिंदे, संजय देवडकर, संजय मोरे, बाबासाहेब धायतडक, प्रकाश म्हस्के, भागवत झिरपे, भाऊसाहेब वावरे, किसन म्हस्के, संजय मोरे, दीपक भुसारी, बापुनाना पिसोटे, रवींद्र वायकर, आशाताई गरड, मारुती खांबट, गणेश म्हस्के, अंबिका लव्हाट, अजिंक्य लव्हाट, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलतांना राजळे म्हणाल्या, कारखान्याला मदत हवी होती, त्यावेळी अजितदादांच्या गटात आले. दिडशे कोटी रुपये निधी मिळाला, लगेच पलटी मारली. त्यांनी देखील यापूर्वी तालुक्याचे प्रतिनिधित्व केले, त्यांच्या कार्यकाळात बसस्थानक, शहर पाणी योजना, ताजनापुर योजना, रस्ते, आदी प्रश्न होते. इतक्या वर्षापासून महिलांचे पाण्यासाठीचे सुरु असलेले हाल त्यांना दिसले नाहीत. मी महिला असल्याने त्यांचे दुःख वेदना मला जाणवल्या त्यामुळे प्राधान्याने पाणी प्रश्नावर पाठपुरावा करुन पाणी प्रश्न मार्गी लावला. बसस्थानक, विविध रस्त्यांचे कामे मार्गी लावली. त्यावेळी त्यांना हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणीही अडवले नव्हते. प्रत्येक गावात किमान एक कोटी निधी देऊन विविध प्रश्न मार्गी लावले. क्वचित एखाद्या गावाला कोटी पेक्षा कमी निधी मिळाला असेल. पण भेदभाव न करता जनतेचे हित लक्षात घेऊन कामे केल्याचे आमदार मोनिका राजळे म्हणाल्या.

Monika Rajale : विरोधकांच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही – मोनिका राजळे  Read More »

Asaduddin Owaisi : सोलापुरात ओवेसींचा भाषण अन् भर मंचावर पोलिसांनी बजावली नोटीस, जाणून घ्या नेमकं घडलं तरी काय?

Asaduddin Owaisi : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) ने देखील 16 जागांवर उमेदवार दिले आहे. 13 नोव्हेंबर रोजी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी सोलापूरमध्ये फारुख शा यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत बोलत असताना सोलापूर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली. नोटीसमध्ये काय होते?नोटीसमध्ये पोलिसांनी ओवेसी यांना कोणत्याही समाजाच्या भावना दुखावू नयेत आणि त्यांच्या भाषणात भडकाऊ शब्द वापरू नयेत असे निर्देश दिले आहेत. ओवेसींनी नोटीस स्वीकारून आपल्या भाषणात याचा उल्लेख करत पोलिसांकडून देण्यात आलेल्या नोटीस मध्ये स्पेलिंग मिस्टेक असल्याचं सांगितलं. तसेच पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किती नोटीस बजावले असं सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीवर जोरदार निशाणा साधला. याच बरोबर त्यांनी 20 नोव्हेंबर रोजी फारुख शाब्दी यांच्यासाठी मतदान करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केला.

Asaduddin Owaisi : सोलापुरात ओवेसींचा भाषण अन् भर मंचावर पोलिसांनी बजावली नोटीस, जाणून घ्या नेमकं घडलं तरी काय? Read More »

Ahmednagar Election: नगरकरांनो, मतदानाचा टक्का वाढवा, सार्वजनिक सुट्टी जाहीर

Ahmednagar Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघात बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्या दिवशी मतदारांना मतदान करता यावे यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीत कामगारांना मतदान करता यावे यासाठी निवडणूक क्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ. आस्थापनांना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी-कर्मचारी इत्यादीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी किंवा व्यवस्थापनाने वरील आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल. याबाबत तक्रार असल्यास सहायक कामगार आयुक्त कार्यालय, मुलजी निवास, डॉ. चोंभे हॉस्पिटल, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर (दूरध्वनी क्र. ०२४१-२४५१८५२) येथे करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त रे.मु.भिसले यांनी केले आहे.

Ahmednagar Election: नगरकरांनो, मतदानाचा टक्का वाढवा, सार्वजनिक सुट्टी जाहीर Read More »