DNA मराठी

DNA Marathi News

Suresh Dhas : करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल कोणी ठेवली? पहिल्यांदाच सुरेश धसांनी थेट नावचं घेतलं, म्हणाले…..

Suresh Dhas: काही दिवसांपूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांनी एका पोलीस अधिकाऱ्याने करुणा शर्मा यांच्या गाडीत साडी नेसून पिस्तुल ठेवल्याचा दावा केला होता. पण त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्याचं नाव घेतलं नव्हतं. पण आता त्यांनी थेट अधिकाऱ्याचं नाव सांगितलं आहे. “बीडमध्ये हक्काची दहशत मोडून काढतील चुकीच्या व्यक्तीला मदत करणारे व्यक्ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार नाही. ते कधीही चुकीच्या व्यक्तीला पाठीशी घालणार नाही. एलसीबीच्या 107 च्या टेबलवर प्रति आरोपी पाच हजार ते वीस हजार असा रेट सुरू असून करुणा शर्मांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवण्याचे बक्षीस म्हणजे सचिन सानप यांची एलसीबीला झालेली बदली. कोल्हापूरवरून गणेश हंगे बदलून आणला तो 107 चा टेबल आहे, सचिन आंधळे याला ही बदलून आले,” असे सुरेश धस म्हणाले. दरम्यान, सुरेश धस यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. यावर आता काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील सातत्याने करत आहे.

Suresh Dhas : करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल कोणी ठेवली? पहिल्यांदाच सुरेश धसांनी थेट नावचं घेतलं, म्हणाले….. Read More »

BJP News : भाजपचे शेवगांव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांचा राजीनामा…..!

BJP News: शेवगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान तालुका अध्यक्ष तुषार वैद्य यांनी भाजपा तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्याकडे  दिला आहे. तुषार वैद्य यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी मला शेवगाव तालुका भाजपा अध्यक्ष या पदाची जबाबदारी दिली होती. दिलेल्या पदाचा मी पक्ष वाढीसाठी माझ्यापरीने प्रयत्न केला दरम्यानच्या काळात लोकसभेसाठी गावोगाव जाऊन पक्षाचे विकास कार्य व लोक प्रतिनिधींची विकास कामे सांगून लोकांपर्यंत पोहचवण्याच काम केले. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार मोनिकाताई राजळे व त्यांचे समर्थक यांच्या विचारांच्या मतभेदामुळे मी व आमची कार्यकारिणी प्रचारादरम्यान सहभागी झालो नाही. कारण शेवगाव तालुका भाजपा पक्ष संघटना वाढीसाठी मागील ३० ते ३५ वर्षाचा इतिहास पाहीला तर माझे वडील स्व. शिवनाथ अण्णा वैद्य यांनी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना बरोबर घेऊन लोकनेते. स्व. गोपीनाथ मुंढे व स्व. दिलीप गांधी यांच्या नेतृत्वात शेवगाव तालुक्यात भाजपा पक्ष वाढीसाठी अतिशय कष्ट घेतले. अनेक सहकाऱ्यांच्या माध्यमातून तालुक्यात प्रस्थापीतांच्या विरोधात पक्ष संघटना वाढवीली हे करत असताना फार मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला. नंतर मी देखील माझ्या परीने अगदी प्रामाणीकपणे पक्षनीष्टा जोपासून सर्वांना बरोबर घेऊन पक्ष वाढीसाठी अनेक ठिकाणी शाखा उघडण्यात आल्या नवीन कार्यकर्ते संघटीत केले.  २०१४ विधानसभेसाठी आ. मोनिकाताईना पक्षाने संधी दिली, २०१९ ला दिली आम्ही प्रामाणीक काम केल. परंतु २०१४ ते २०२४ पर्यंत आमदार ताईचे कार्यकर्ते व जुनी भाजपा यांमध्ये पाहीजे तेवढे सौख्य राहीले नाही. आम्ही पटले नाही तरी पक्षाचा उमेदवार म्हणून काम केले परंतु स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जसे की जी.प., पं. स. तसेच ग्रामपंचायत मध्ये राजळे गटाने जुन्या भाजपाला कायम विरोध केल्याचे निदर्शनास आले. तेव्हा या वेळी २०२४ ला विधानसभेच्या पक्षाच्या मुळ कार्यकर्त्याला म्हणजे अरुण भाऊ मुंढे यांना पक्षाने उमेदवारी द्यावी असा आग्रह आम्ही म्हणजे जवळपास ८० % जुन्या भाजपा कार्यकर्त्यांनी धरला होता. परंतु त्याला यश आले नाही. पक्षाने मोनिकाताईंना उमेदवारी दिल्याने मागील १० वर्षाचा अनुभव पाहता आम्हाला मीळालेली वागणूक पाहता यावेळी आमच्या विचारांच्या लोकांनी मोनिकाताईचे काम करण्याची मानसीकता राहीली नव्हती. म्हणून मी व आमच्या विचारांच्या लोकांनी शांत बसण्याचा निर्णय घेतला होता. कारण आमदारांच्या कार्यकर्त्यांनी येथून मागे प्रमाणीकपणाने काम करून देखील आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळी तर आम्ही उघडपणे पक्षाकडे तिकीट बदलासाठी भूमीका घेतली होती. आम्ही जरी पक्षाचा उमेदवार या नात्याने काम केले असते तरी त्यांनी ते मान्य केले नसते म्हणून शांत बसलो विधानसभेला पक्षासाठी काम केले नाही.  मी पदावर असून देखील मी या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे काम न करता शांत बसलो. या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी भाजपा तालुका अध्यक्ष या पदाचा राजीनामा देत आहे.  असे दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. पक्षवादीसाठी यांना देखील करावे लागले संघर्ष…..!स्व. शिवनाथ अण्णा वैद्य यांनी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना बरोबर घेऊन लोकनेते. स्व. गोपीनाथ मुंढे व स्व. दिलीप गांधी यांच्या नेतृत्वात शेवगाव तालुक्यात भाजपा पक्ष वाढीसाठी अतिशय कष्ट घेतले. त्यांना सहकार्य लाभलेल्यांमध्ये स्व. भाऊसाहेब कोल्हे, पांडुरंग लांडे, भीमराज सागडे, तानाजी मालुसरे, डॉ. सोनाजी लांडे, स्व. विष्णुपंत देहडराय, काशीनाथ चौधरी, पांडुरंग मिसाळ, बाळासाहेब सोनवणे, बाळासाहेब कोळगे, कचरू चोथे, अरून मुंढे, विक्रम देशमुख, स्व. अंकुश केसभट, अशोकशेठ आहुजा, बंडूशेठ रासने, विजय देवळालीकर, राजाभाऊ लड्डा, छोटूशेठ लड्डा. शेतकरी संघटनेचे ताराभाऊ लोंढे, बापूसाहेब पाटेकर, नितीन काकडे, विनायक खेडकर, परशुराम गरड, स्व. सखाराम निर्मळ, गोपाळशेठ शर्मा, हरिभाऊ झुंबड, शब्बीरभाई राक्षीवाले, मारुतराव नागरे, स्व. गहीनीनाथ ढाकणे, बबनराव ढाकणे, आविनाश मगरे, पंडीतराव नेमाने, गोविंदराव बर्डे, रवी तानवडे, संजय टाकळकर, उद्धव काजळे, डॉ. मंत्री तसेच बालमटाकळी मधील अनेक सहकाऱ्यांच्या माध्यमातून तालुक्यात प्रस्थापीतांच्या विरोधात पक्ष संघटना वाढवीली हे करत असताना फार मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला.

BJP News : भाजपचे शेवगांव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांचा राजीनामा…..! Read More »

UP Crime: मामी आणि भाचाचं प्रेम… नंतर मामाचा काढला कटा

UP Crime: मामी आणि भाच्यामधील नात्यात एक लज्जास्पद घटना उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिरोजाबादमध्ये, एका भाच्याने त्याच्या मामाची हत्या केली कारण तो त्याच्या मामीच्या प्रेमात आंधळा झाला होता. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना खैरगड पोलीस ठाण्यातील वैरनी गावातील आहे, जिथे सत्येंद्र नावाच्या तरुणाचे 8 मे 2021 रोजी रोशनी नावाच्या मुलीशी लग्न झाले होते. सत्येंद्र आणि रोशनी यांच्या वयात खूप फरक होता, सत्येंद्र त्याच्या पत्नीपेक्षा सुमारे 22 वर्षांनी मोठा होता. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली, पण काही काळानंतर रोशनीला तिच्या पतीचा भाचा गोविंदवर प्रेम झाले. गोविंद आणि रोशनीमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले, जे सत्येंद्रच्या लक्षात आले. त्यामुळे घरात वारंवार वाद होऊ लागले. हे प्रकरण इतके वाढले की रोशनी आणि गोविंद यांनी मिळून सत्येंद्रच्या हत्येचा कट रचला. हे षड्यंत्र गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होते आणि 14 जानेवारीच्या रात्री ते अंमलात आणण्यात आले. 14 जानेवारी रोजी संध्याकाळी गोविंद त्याचे मामा सत्येंद्र यांच्या घरी आला आणि जेवण करून सर्वजण झोपायला गेले. रात्रीच्या अंधारात गोविंदने त्याचे मामा सत्येंद्र यांची हत्या केली आणि तो पळून गेला. सकाळी सत्येंद्रचा मृतदेह सापडला तेव्हा गावात एकच खळबळ उडाली आणि पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी सांगितले की, मृत सत्येंद्रचा भाऊ शत्रुघ्नने हत्येचा अहवाल दाखल केला होता ज्यामध्ये पत्नी रोशनी आणि भाचा गोविंद दोघांनाही आरोपी ठरवण्यात आले होते. एसपी (ग्रामीण) अखिलेश भदोरिया यांनी माहिती दिली की, “चौकशीदरम्यान गोविंदने सांगितले की त्याचे त्याच्या मामीसोबात प्रेमसंबंध होते आणि म्हणूनच त्याने त्याच्या मामाची हत्या केली.” पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून चौकशी सुरू आहे.

UP Crime: मामी आणि भाचाचं प्रेम… नंतर मामाचा काढला कटा Read More »

Maharashtra News: डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन, MIDC मधील अधिकारी भेटेना, उद्योजक हैराण

Maharashtra News : एमआयडीसी मधील अधिकारी उद्योजकांना भेटत नाहीत अशा अनेक तक्रारी वारंवार येत असतात एमआयडीसी मधील वरिष्ठ अधिकारी वेळ देऊनही भेट देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रारी यापूर्वीही झाले आहेत याबाबत एका उद्योजकाने डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून एमआयडीसीमध्ये लेखावर्ष अधिकाऱ्याची तक्रार केली आहे. यावर फडणवीस काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अहिल्यानगर शहरापासून एमआयडीसीमध्ये उद्योजकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यात एमआयडीसी मधील वरिष्ठ अधिकारी उद्योजकांना ऑफिसला बोलवून घेऊन ते स्वतः बाहेर निघून जातात असे प्रकरण समोर आले आहे, एमआयडीसी मधील उप अभियंता एस एस बडगे यांच्या विरोधात खास करून या तक्रारी आहेत किलोस्कर सारख्या मोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना कराल यात बोलून ठेवले सदरचे अधिकारी हे अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी पुण्याहून नगरला आले होते. मात्र उप अभियंता पडदे यांनी त्यांना जवळपास तीन तास बसवले तरीही ते आले नाही अशा प्रकारे अनेक तक्रारी पडदे यांच्या विरोधात करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोननगर एमआयडीसी मधील वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटणं टाळत असतात यामुळे कंपन्यांचा विस्तार होण्यास अडचणीत असल्याचं उद्योजकांनी म्हटल आहे कुठल्याही काम वेळेवर होत नसल्याने उद्योजक हैराण झाले आहेत अभियंता यांच्या विरोधात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका उद्योजकाने डायरेक्ट तक्रार केली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यावर काय कार्य करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, अर्थपूर्ण समजण्यासाठी अधिकाऱ्यांना भेट टाळण्याची शक्यता उद्योजक उद्योगातील कामासाठी अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी फोन करून पूर्व परवानगी घेतली जाते. परंतु, एमआयडीसीतील काही वरिष्ठ अधिकारी हे जाणीवपूर्वक भेट घेत नाहीत, अर्थपूर्ण तडजोडीचे बोलावे म्हणून उद्योजकान भेट घेण्यास टाळाटाळ केली जाते अशी चर्चा उद्योजकांमध्ये आहे.

Maharashtra News: डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन, MIDC मधील अधिकारी भेटेना, उद्योजक हैराण Read More »

PM Modi: पंतप्रधान मोदी आज मुंबईत नौसेनेच्या तीन युद्ध नौकांचे करणार लोकार्पण

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून मुंबईतील दौऱ्यादरम्यान भारतीय नौसेनेच्या तीन अद्यावत युद्ध नौकांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. भारतीय नौसेनेच्या माहितीनुसार या तीन अद्यावत युद्धनौकांमध्ये, आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर युद्ध लोकांचा समावेश आहे. या तीन युद्धनौका म्हणजे आपल्या देशाची सागरी सुरक्षेतील एक महत्त्वाची झेप असल्याचे भारतीय नौदलाचे म्हणणे आहे. भारतीय नौदलाच्या माहितीनुसार, INS निलगिरी हे 17A स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिले जहाज आहे. भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने त्याची रचना केली आहे. वाढीव क्षमता, समुद्रात जास्त काळ राहणे आणि स्टेल्थ यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांसह ते नौदलात सामील करण्यात आले आहे. हे देशी फ्रिगेट्सच्या पुढील पिढीचे प्रतिनिधित्व करते. INS सूरत हे 15B वर्गाच्या गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर प्रकल्पाचे चौथे आणि अंतिम जहाज आहे. हे जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक आहे. यात 75 टक्के स्वदेशी सामग्री आहे, ती अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमतांनी सुसज्ज आहे. INS वाघशिर ही P75 स्कॉर्पीन प्रकल्पातील सहावी आणि अंतिम पाणबुडी आहे. INS वाघशिर पाणबुडी बांधणीत भारताच्या वाढत्या कौशल्याचे प्रतिनिधित्व करते. हे फ्रेंच नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने बांधण्यात आले असल्याची माहिती भारतीय नौदलाने दिली आहे. देशाला देणार भक्कम सुरक्षा कवच आयएनएस सूरत आणि आयएनएस निलगिरी या भारतीय नौदलाच्या अतिशय अद्ययावत युद्धनौका आहेत. देशाला हवाई सुरक्षा देण्यास त्या सक्षम असून शत्रूने धाडलेले क्षेपणास्त्र सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर हवेतच नष्ट करता येणार आहे. आयएनएस वाघशीर ही अद्ययावत पाणबुडी देशाच्या मारक क्षमतेत भर टाकणार आहे. दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा मारा या पाणबुडीवरून करता येणार आहे. याच श्रेणीतील आयएनएस अरिघात ही पाणबुडी गेल्यावर्षी नौदलात समाविष्ट करण्यात आली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्या दरम्यान, नवी मुंबईतील इस्कॉन श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. नऊ एकरांवर पसरलेल्या या प्रकल्पात अनेक देवतांच्या देवतांचे मंदिर, वैदिक शिक्षण केंद्र, प्रस्तावित संग्रहालय, सभागृह आणि उपचार केंद्र यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे त्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी महायुतीतील सर्व आमदारांशी संवाद साधणार आहे.यात आमदारांचे रिपोर्टकार्ड,मतदार संघातील आढावा त्यासोबत काही प्रश्न देखील पंतप्रधान आमदरांना विचारणार असून त्यानंतर मार्गदर्शन करणार आहे.असल्याची माहिती मिळतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची आणि नेत्यांची मंगळवारी रात्री बैठक घेतली होती.

PM Modi: पंतप्रधान मोदी आज मुंबईत नौसेनेच्या तीन युद्ध नौकांचे करणार लोकार्पण Read More »

Muralidhar Mohol : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचा मातीपूजन सोहळा संपन्न

Muralidhar Mohol : केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कै. बलभीमअण्णा जगताप क्रीडा नगरी वाडिया पार्क येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचे मातीपूजन करण्यात आले. कुस्तीला नवे वैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहन मोहोळ यांनी केले. कार्यक्रमाला आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार तथा अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संग्राम जगताप, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै.रामदास तडस, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, माजी आमदार अरुणकाका जगताप, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै.संदीप भोंडवे, उपाध्यक्ष गुलाबराव दगडे, सरचिटणीस हिंदकेसरी पै.योगेश दोडके आदी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची वैभवशाली परंपरा आहे. त्यामुळे इथे होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा निश्चितपणे मोठी आणि यशस्वी होईल. खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणारा पैलवान आपल्याकडे झाला नाही. त्यामुळे अशा स्पर्धेतून कुस्तीमध्ये देशाचे नेतृत्व करणारे कुस्तीगीर घडविण्याची गरज आहे. स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन झाल्यास कुस्तीगीरांना प्रेरणा मिळते. अहिल्यानगरमध्ये होणारी स्पर्धा कुस्ती क्षेत्राला नवी ऊर्जा देण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातल्या मातीतल्या या खेळाला शासनाने भरीव अर्थसहाय्य दिले असून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी 1 कोटी रुपये देण्याचा आणि महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरींच्या पुरस्कार रकमेतही वाढ करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच्या स्पर्धेच्यावेळी घेतला आहे, असेही ते म्हणाले. आमदार कर्डिले म्हणाले, कुस्तीमुळे शरीर निरोगी आणि मन शुद्ध रहाते, जीवनात नवी ऊर्जा मिळते. लाल मातीत श्रम करतांना पैलवानांनी चुकीच्या गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. स्पर्धेच्या निमित्ताने पैलवानांना प्रोत्साहन दिल्यास त्यांना पुढील कारकिर्दीसाठी ऊर्जा मिळेल, असे त्यांनी सांगितले. आमदार जगताप म्हणाले, महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वेगळे महत्व आहे. 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार असून राज्यातील मल्ल स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेतून देशभरातील मल्लांना प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची गौरवशाली परंपरा आहे, हे वैभव आणखी वाढविण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरणार असल्याचे ते म्हणाले. तडस म्हणाले, महाराष्ट्रातील कुस्तीगीरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले यश संपादन केले आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर संघातर्फे कुस्तीगीरांना चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. त्यांनी ऑलिंपिक, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत चांगले यश मिळावे यासाठी प्रयत्न होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुस्तीगीरांना राजाश्रय देण्याचे, त्यांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे कार्य केले. कुस्तीच्या विकासासाठी तालुका पातळीवर मॅटची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. संतोष भुजबळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला महाराष्ट्र केसरी, उप महाराष्ट्र केसरी, कुस्तीप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Muralidhar Mohol : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचा मातीपूजन सोहळा संपन्न Read More »

Maharashtra News: श्रीगोंदा पोलीसांची कारवाई, चोरी होणाऱ्या मोटर सायकलाचा तपास लावला, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

Maharashtra News: श्रीगोंदा पोलीसांनी मोठी कारवाई करत श्रीगोंदा न्यायालय आणि परीसरातुन चोरी होणाऱ्या मोटर सायकलाचा तपास करत तब्बल 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करून दहा चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 4 जानेवारी रोजी श्रीगोंदा पो स्टे हद्दीतील काष्टी गावामध्ये एक इसम संशयीत रित्या विना नंबर प्लेटच्या मोटर सायकलवर फिरत असल्याची माहिती श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना माहिती मिळाली. या माहितीवरून किरण शिंदे यांनी पेट्रोलिंग करीता काष्टी गावात एक पथक रवाना केले. पेट्रोलिंग दरम्यान श्रीगोंदा चौक, काष्टी येथे एक इसम श्रीगोंदा चौकात मोटार सायकल लावलेल्या ठिकाणी संशयीतरीत्या मोटार सायकलवर फिरत असताना मिळून आला. त्यास पोलिसांनी नाव-गांव विचारले असता महेंद्र बाळु सुपेकर (रा. पुनर्वसन काष्टी ता.श्रीगोंदा) येथे राहत असल्याचे सांगीतले तसेच अधिक चौकशीसाठी त्याला ताब्यात घेऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आणले. चौकशी दरम्यान पैशांची आवश्यकता असल्याने मी कोर्टाचे पाकींग, श्रीगोंदा शहर, काष्टी गावात व इतर वेगवेगळया ठिकाणाहुन मोटार सायकल चोरी केल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी आरोपींकडून 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील कारवाई सुरू आहे.

Maharashtra News: श्रीगोंदा पोलीसांची कारवाई, चोरी होणाऱ्या मोटर सायकलाचा तपास लावला, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त Read More »

Maharashtra News: मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये, वैद्यकीय शिक्षण,अन्न व औषध प्रशासन व सामान्य प्रशासन विभागांचा घेतला आढावा

Maharashtra News: शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक सेवा अद्यावत करून त्या अधिक दर्जेदार द्या. वैद्यकीय शिक्षण अंतर्गत असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या बळकटीकरण करा. औषध व अन्नपदार्थ मधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करा. भविष्यातील आव्हाने ओळखुन प्रशासन गतिमान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन व सामान्य प्रशासन विभाग यांना पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने बैठक झालीया बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ,राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री योगेश कदम यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत रक्त दान मोहीम, अवयव दान,स्तनाचा कर्करोग जनजागृती आणि उपचार, लठ्ठपणा जनजागृती आणि उपचार, मिशन थायरॉईड, अंधत्व प्रतिबंधात्मक उपाय योजना,मिशन मौखिक आरोग्य मोहीमांची प्रभावी अंमलबजावणी करा. वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी आणि परिसर सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कार्यान्वित करणे, आयुर्वेदिक महाविद्यालयामार्फत प्रकृती परीक्षण अभियान, योगा सेंटरची स्थापना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या छतावरती सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करणे, वैद्यकीय संशोधन केंद्रांचे बळकटीकरण करणे, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अधिक लोकाभिमुख करा व योजनेत सुधारणा करणे, वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेपासून ते उत्तीर्ण होईपर्यंतच्या शैक्षणिक प्रक्रियेचे व्यवस्थापन पुढील शंभर दिवसात प्राधान्याने करा. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अन्न व औषध प्रशासन विभागात ऍलोपॅथी औषध निर्माते, रक्तपेढ्या, शासकीय रुग्णालयातील सर्व औषधांच्या नमुन्यांची गुणवत्ता तपासणी,फूड टेस्टिंगसाठी लॅबोरेटरी सुरू केली आहे तेथील कामकाज सुरू करणे या सर्व बाबी प्राधान्याने पूर्ण कराव्यात. दुध भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा,अन्न व औषध अंतर्गत नोंदणी व परवाने तपासणी,मंदिर व देवस्थाने येथील प्रसाद गुणवत्ता तपासणी ही कामे प्राधान्याने करा. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,राज्यात कार्यरत अधिकारी व कर्मचारी कर्मचाऱ्यांशी निगडित सेवा अधिक सुलभ होण्यासाठी भर देण्यात यावा. कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणीसाठी वेगवेगळे प्रशिक्षण व उपक्रम राबवा.विभागांतर्गत परीक्षा, नियुक्ता वेळेत देणे, बदल्या, गोपनीय अहवाल, स्थायित्व लाभ, सेवानिवृत्ती प्रकरणाबाबतची कार्यपद्धती सुलभता आणणे,वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती आणि पदोन्नतीचा मानिव दिनांक देणे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांशी निगडित सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावी.भविष्यातील आव्हाने स्वीकारण्यासाठी आणि प्रशासन गतिमान करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता,ब्लॉकचेन सायबर सुरक्षितता, सांख्यिकीय माहिती गोळा करणे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण अधिकारी आणि कर्मचारी यांना द्या असेही त्यांनी सांगितले. बैठकीला मुख्य सचिव सुजाता सौनीक, अपर मुख्य सचिव (वित्त) विभाग ओ.पी.गुप्ता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे,अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे,अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव व्ही.राधा,प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, आयुक्त राजीव निवतकर, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर उपस्थित होते.

Maharashtra News: मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये, वैद्यकीय शिक्षण,अन्न व औषध प्रशासन व सामान्य प्रशासन विभागांचा घेतला आढावा Read More »

HMPV आजाराला घाबरू नका, काळजी घ्या, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांचे आवाहन

HMPV Virus: एच.एम.पी.व्ही (ह्यूमन मेटा न्युमो) हे श्वसन विषाणू नवीन नसून 2001 पासून प्रचलित आहेत. हा नवीन आजार नसून आधीपासून अस्तित्वात असलेला आहे. या आजारातील विषाणू रुपांतरीत होत नाही. नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जावू नये. वैयक्तिक स्वच्छता पाळून काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात संयुक्तरीत्या आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले. पत्रकार परिषदेला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, विभागाचे सचिव डॉ निपुण विनायक, सचिव नवीन सोना, आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर उपस्थित होते. केंद्र शासनाच्या याबाबतीत येत असलेल्या दिशा निर्देश आणि मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. या आजाराबाबत कोणीही अफवा पसरवू नये. नागरिकांनी वस्तुस्थिती लक्षात घेत अफवांवर विश्वास ठेवू नये. लहान मुले, वयोवृद्ध, दुर्धर आजार असलेल्या रुग्णांची काळजी घेणे गरजेचे आहे. आजाराच्या संदर्भामध्ये आरोग्य विभागाचे संपूर्ण पथक कार्यरत असून लवकरच विशिष्ट कार्यपद्धती जाहीर करण्यात येईल. राज्यात आरोग्य विभागाची चांगली व्यवस्था असून यंत्रणा सज्ज आहेत. असे सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. या आजाराबाबत आरोग्य विभागाचे सचिव डॉ निपुण विनायक म्हणाले, सध्या चीनमध्ये श्वसनविषयक आजाराच्या विषाणूबाबत समाजमाध्यमावर माहिती येत आहे. चीनमध्ये हिवाळी वातावरणामुळे श्वसन संसर्गाची वाढ अनैसर्गिक नाही. इन्फ्ल्यूंझा, आर. एस. व्ही, एचएमपीव्ही (Human Meta Pneumo Virus) यासारखे विषाणू कारणीभूत आहेत. हे विषाणू भारतासह जगामध्ये पहिल्यापासून प्रचलित आहे. एचएमपीव्ही हा साधारणतः सौम्य आजार आहे. ज्यामध्ये सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे असतात. लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकार शक्ती असलेल्या लोकांना आजाराचा जास्त धोका असू शकतो. हा एक हंगामी रोग आहे, जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला उद्भवतो. सद्यस्थितीत भारतामध्ये श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवाढीमध्ये वाढ आढळून आलेली नसून या स्थितीला काळजीचे कारण नाही. सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधीसाठा आहे. या आजाराला कारणीभूत असलेल्या विषाणूची तपासणी राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे येथे करण्यात येत आहे. या आजारावर लक्षणाधारीत सहायक उपचार करण्यात येतो. या आजारावर प्रतिजैविके (antibiotics) अनावश्यक असुन कुठलीही लस किंवा उपयुक्त अशी अँन्टीव्हायरल (antiviral) औषधी नाहीत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आजाराबाबत पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागानेही खबरदारी म्हणून सर्व जिल्ह्यांना काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय श्वसनाचे संसर्ग वाढू नये, यासाठी लोकांनी स्वच्छतेचे मूलभूत नियम पाळावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. नागरिकांना श्वसनाच्या संसर्गापासुन बचाव करण्यासाठी ही काळजी घ्यावी जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून ठेवा आपले हात वारंवार धुवा. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा. भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक खावे संक्रमण कमी करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी उदा. शाळा व कार्यालये इ. ठिकाणी हवा खेळती असावी. हस्तांदोलन टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर टाळावा. आजारी लोकांशी जवळचा संपर्क नसावा. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे टाळावे. सर्दी व खोकला झाल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.

HMPV आजाराला घाबरू नका, काळजी घ्या, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांचे आवाहन Read More »

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य

Maharashtra Government: राज्यातील चार चाकी वाहन धारकांना 01 एप्रिल पासून फास्ट टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. या निर्णयामुळे वाहतूक कोंडी टळून इंधनाची आणि वेळेची देखील बचत होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. फास्ट टॅग कार्यरत नसेल तर वाहन धारकाला पथकर शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावे लागेल. त्याचप्रमाणे रोख रक्कम, स्मार्ट कार्ड, क्रेडिट डेबिट कार्ड किंवा कोड किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे पथकर शुल्क भरायचे असेल तरी देखील दुप्पट पथकर शुल्क भरावे लागेल. अशी माहिती देखील सरकारकडून देण्यात आली आहे. एमएसआरडीसीच्या अखत्यारीत 50 टोलनाके असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यात 23 टोल नाके आहेत. या नाक्यांवर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य Read More »