DNA मराठी

DNA Marathi News

मुकुंदनगरमध्ये तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला, परिसरात तणावाचे वातावरण

Maharashtra News: मुकुंदनगर येथील मौलाना आझाद शाळेजवळ काल (दि. 13 मार्च) सायंकाळी एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात नाझीम नामक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर काही काळ मुकुंदनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.

मुकुंदनगरमध्ये तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला, परिसरात तणावाचे वातावरण Read More »

सरकारकडून सेव्हन हेवन अर्थसंकल्प सादर ; जयंत पाटलांचा हल्लाबोल

Jayant Patil : उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025 – 26 साठी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल, टनेलच्या घोषणा पण एसटी बसने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याची टीका त्यांनी केली आहे. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचे महसुली तूट ही 20 हजार कोटी वरून वाढून 45 हजार 892 कोटी दाखवली आहे. मागच्या वर्षी 20 हजार कोटींची तूट दाखवलेली ती 26 हजार 536 कोटींवर सुधारित अंदाजाने पोहोचली. म्हणेज एकूण तूट 60 हजार कोटींपर्यंत जाईल. राजकोषीय तूट देखील 1 लाख 10 हजार कोटीवरून आज ती 1 लाख 36 हजार कोटींवर गेली आहे. हा आकडा सुद्धा दीड लाख कोटींपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. असं जयंत पाटील म्हणाले. तसेच अधिक्याचे बजेट करण्याची परंपरा या सरकारने गेल्या काही काळात तोडलेली आहे. त्याचा फटका सर्वांनाच विशेषता आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागातील योजनांवर होत आहे. सरकारने जाहीर केलेल्या योजना सेव्हन हेवन सारख्या आहेत. जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल, टनेलच्या घोषणा आहेत. पण एसटी बसने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीय लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. असेही यावेळी ते म्हणाले. शिवभोजन योजनेचा कुठेही उल्लेख नाहीया अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनीशिवभोजन योजनेचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे ती बंद करण्याचा सरकारचा दृष्टिकोन दिसतोय अशी आमची शंका आहे. तसेच आनंदाचा शिधा यावर देखील भर देण्यात आलेला नाही. कारण आता निवडणुका नाहीत. त्यामुळे या योजनांची गरज फारशी राहिलेली नाही. अशी टीका त्यांनी यावेळी केली. निवडणुकीत केल्या गेलेल्या कुठल्याही घोषणेची पूर्तता या बजेटमध्ये केली गेलेली नाही. लाडकी बहीण योजनेचे अनुदान 1500 वरून 2100 होण्याची अपेक्षा होती पण तेही घडले नाही. 25 लाख रोजगार निर्माण करू अशी घोषणा केली होती प्रत्यक्षात फक्त 90 हजार रोजगार निर्मितीचे अर्थसंकल्पात नमूद केल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.

सरकारकडून सेव्हन हेवन अर्थसंकल्प सादर ; जयंत पाटलांचा हल्लाबोल Read More »

Pankaj Asia : नूतन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया रुजू

Pankaj Asia : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी शासनाने नव्याने नियुक्त केलेले जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया आज रुजू झाले. प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पदभार सोपवला. डॉ.आशिया हे २०१६ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. येथे रुजू होण्यापूर्वी ते यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी डॉ. आशिया जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त, नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉ.आशिया यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातून झाली आहे. या सेवेत आल्यानंतर एक वर्ष परिविक्षाधीन कालावधीत आर्णी येथे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तहसीलदार व बाभुळगाव येथे गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.

Pankaj Asia : नूतन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया रुजू Read More »

शेअर मार्केटच्या नावाखाली कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींना अटक

Stock Market Scam: शेवगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींना बारा तासाच्या आता अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख सिताराम वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंग कंपणी क्लासिक ब्रीज वर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंपनीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन फसवणुक करण्यात आली असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या प्रकरणात तपास करत असताना पोलीस निरीक्षक समाधान नागरे, शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुन्ह्यातील आरोपी संदीप मधुकर थोरात (वय-35 रा.पाईपलाईन रोड अहिल्यानगर, दिलीप तात्याभाऊ कोरडे (वय-35 रा.घोगरगाव ता.श्रीगोंदा जि.अहील्यानगर) यांची गुप्त माहीती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलिसांचे पथके तयार करून आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. आरोपी संदीप मधुकर थोरात याला त्याचे रहाते घरी जात असताना अटक केली तर आरोपी दिलीप तात्याभाऊ कोरडे याला सुपा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. वरील आरोपी विरुध्द इतर कोणीही व्यथीत अगर बळीत अशा जनतेची फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोस्टेला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी पोलिसांनी केले आहे.

शेअर मार्केटच्या नावाखाली कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींना अटक Read More »

मोठी बातमी! शेतकऱ्यांना आकारी पड जमिनी परत मिळणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय

Maharashtra News : शेतकऱ्यांनी आकारी पड जमिनीच्या चालू वर्षाच्या प्रचलित बाजारमूल्याच्या प्रस्तावित २५ टक्के रक्कम ऐवजी ५ टक्के रक्कम शासनास जमा केल्यास, हस्तांतरणास निर्बंध या अटीवर ही जमीन त्यांना परत करण्यात येईल. याचा लाभ राज्यातील ९६३ शेतकऱ्यांना मिळणार आहे. आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतूदीत सुधारणा करण्याबाबतचे विधेयक विधीमंडळाच्या कनिष्ठ सभागृहात मान्यतेसाठी आज सादर करण्यात आले. तगाई किंवा तत्सम थकबाकी न भरल्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २२० नुसार अशा जमिनींचा लिलाव होऊन त्या आकारी पड म्हणून शासन जमा करण्यात येतात. राज्यात अशा ४ हजार ८४९ एकर जमिनी शासन जमा झाल्या होत्या. अशा जमिनी थकबाकीची देय रक्कम आणि त्यावरील व्याज १२ वर्षांच्या आत भरणा केल्यास मूळ खातेदारांना परत करण्याची तरतूद कायद्यात आहे. तथापि, १२ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर अशा जमिनी मूळ मालकांना परत करण्याची तरतूद नव्हती. ही तरतूद बदलण्यात येणार आहे. या सुधारणेमुळे आकारीपडची कार्यवाही तातडीने होऊन शासनाकडे जमा झालेल्या एकूण १०९३ आकारीपड प्रकरणांत साधारण ४ हजार ८४९.७१ एकर क्षेत्र आकारीपड जमिनी मूळ शेतकऱ्यांना तसेच त्यांच्या वारसांना माफक दरात परत मिळणार आहेत. आकारीपड जमिनी म्हणजे काय?शेतजमीन मालकांनी शेतसारा भरला नाही, पिके घेतली नाहीत, अशा जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर सरकारने मालकी हक्क लावला. मात्र, या जमिनी मूळ मालकाकडेच ठेवण्यात आल्या. त्यामुळे जमिनी मालकाची वहिवाट असली, तरी या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर सरकारी मालकी असल्यामुळे त्यांना आकारीपड जमीन म्हटले जाते. पड जमिनींचा तपशील कलम २२० अन्वये कारवाई झालेली एकूण प्रकरणेकोकण विभाग : ३१पुणे विभाग: ५९७नाशिक विभाग: ४६५ सरकारचा ताबा असलेली प्रकरणेकोकण विभाग :१७पुणे विभाग: ६९नाशिक विभाग: ४४ माझी सुरूवातच माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्याने झाल्याचा मला आनंद आहे. दुष्काळ अथवा अनेक अडचणींनी ज्या शेतकऱ्यांनी सरकारला महसूल दिला नाही, त्यामुळे या जमिनी सरकारने ताब्यात घेतल्या होत्या. किमान पन्नास वर्षांपासून याबाबतचा निर्णय प्रलंबित होता. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मंत्रिमंडळात निर्णय घेतल्यावर आज कायद्यात सुधारणा करणे शक्य झाले. शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. असं यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना आकारी पड जमिनी परत मिळणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय Read More »

भारताची फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाला 14 वर्षांनंतर दिली मात

Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये शानदार कामगिरी करत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये पोहचली आहे. 2013, 2017 नंतर सलग तिसऱ्यांदा भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाच्या विजयात मोहम्मद शमी आणि विराट कोहली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शमीने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाला 264 धावांवर रोखले तर कोहलीने धावांचा पाठलाग करताना संघाची जबाबदारी घेतली. ऑस्ट्रेलियाने सुरुवातीला चांगली कामगिरी केली, परंतु भारताच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले. शमीने 3 विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनीही महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. पाठलाग करताना विराट कोहलीने श्रेयस अय्यरसह 91 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दोघांनीही भारताच्या विजयाचा पाया रचला. कोहलीने 73 धावा करत आपले अर्धशतक पूर्ण केले, तर श्रेयसने 45 धावा केल्या. त्यानंतर कोहलीसोबत अक्षर पटेल आणि केएल राहुल यांनीही महत्त्वाचे योगदान दिले. राहुल (42*) आणि हार्दिक पंड्या (28) यांनी संघाला विजय मिळवून दिला. 14 वर्षांनी ऑस्ट्रेलियाला हरवलेभारताने 14 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवले. यापूर्वी 2011 च्या विश्वचषकात भारताने क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले होते.

भारताची फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाला 14 वर्षांनंतर दिली मात Read More »

Devendra Fadanvis : एकनाथ शिंदेंसोबत ‘कोल्ड वॉर’ सुरू? मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले

Devendra Fadanvis : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मात्र सरकार स्थापनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोणता कोणता मुद्द्यावरून मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि याच मतभेदांमुळे दोघांमध्ये कोल्ड वॉर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोल्ड वॉरची चर्चा निराधार आहे. सरकार अतिशय सकारात्मक पद्धतीने काम करत आहे. शिंदे गमतीने म्हणाले की, मतभेद नाहीत, फक्त शिंदेजी आणि मी खुर्च्या बदलल्या आहेत. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते. संजय राऊत यांच्या मतभेदांच्या दाव्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले की, आम्ही दोघांनीही आमच्या जागा बदलल्या आहेत आणि फक्त अजित पवारांकडेच एकच खुर्ची आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख म्हणाले की, जर तुम्ही तुमची खुर्ची वाचवू शकला नाही तर मी यात काय करू शकतो. संजय राऊत यांचे दावे फेटाळलेशिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील परिस्थिती कमकुवत असल्याचा दावा केला होता. त्यांनी पहाटे 4 वाजता अमित शहा यांची भेट घेतली आणि फडणवीस यांच्याबद्दल तक्रार केली. या आरोपांवर शिवसेनाप्रमुख म्हणाले की, काही लोकांच्या मनात रासायनिक असंतुलन असते. अमित शहा हे एनडीएचे नेते देखील आहेत आणि त्यांच्यासोबत एक औपचारिक बैठक झाली. एकनाथ शिंदे सरकारच्या काळात घेतलेले निर्णय थांबवण्याच्या चर्चाही निराधार आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

Devendra Fadanvis : एकनाथ शिंदेंसोबत ‘कोल्ड वॉर’ सुरू? मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले Read More »

Madhabi Puri Buch : अडचणी वाढल्या, सेबीच्या माजी प्रमुख माधवी बुच यांच्याविरुद्ध ‘त्या’ प्रकरणात दाखल होणार गुन्हा

Madhabi Puri Buch : सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील एका विशेष न्यायालयाने त्यांच्या आणि इतर पाच अधिकाऱ्यांविरुद्ध स्टॉक फसवणूक आणि नियामक उल्लंघनाच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. याच बरोबर न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) हा गुन्हा नोंदवून 30 दिवसांच्या आत तपासाचा स्थिती अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराने आरोप केला आहे की आरोपी अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक, नियामक उल्लंघन आणि भ्रष्टाचारात सहभागी होऊन कंपनीला फसव्या पद्धतीने स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टिंग केले. हे काम सेबी कायदा, 1992 आणि त्याच्या नियमांचे पालन न करता करण्यात आले. न्यायालयाने म्हटले की, हे प्रकरण गंभीर आहे आणि त्याची चौकशी आवश्यक आहे. तसेच, कायदा अंमलबजावणी संस्था आणि सेबीच्या निष्क्रियतेमुळे न्यायालयीन हस्तक्षेप आवश्यक झाला आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. तक्रारदाराने असा दावा केला आहे की सेबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष केले आणि बाजारातील हेराफेरी आणि कॉर्पोरेट फसवणुकीला प्रोत्साहन दिले. न्यायालयाने एसीबी वरळी, मुंबईला आयपीसी, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, सेबी कायदा आणि इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सेबी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ गेल्या शुक्रवारी संपला. त्यांच्या कार्यकाळात इक्विटी सेटलमेंटला गती देणे, एफपीआय डिस्क्लोजर वाढवणे आणि 250 रुपयांच्या एसआयपीद्वारे म्युच्युअल फंड प्रवेश वाढवणे अशी पावले उचलण्यात आली. हिंडेनबर्गचा आरोपतर दुसरीकडे माधवी बुच यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या वर्षात, जेव्हा हिंडेनबर्ग रिसर्च आणि काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर आरोप केले तेव्हा वाद वाढला. ऑगस्ट 2023 मध्ये, हिंडेनबर्ग यांनी आरोप केला की माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी ऑफशोअर कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे ज्यात अदानी ग्रुपचे संस्थापक गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी यांचीही गुंतवणूक होती. हिंडेनबर्ग यांनी दावा केला की याचा सेबीच्या तपासावर परिणाम झाला. बुच दाम्पत्याने हे आरोप फेटाळून लावले आणि म्हटले की ही गुंतवणूक सेबीमध्ये सामील होण्यापूर्वी करण्यात आली होती आणि सर्व प्रकटीकरण नियमांचे पालन करण्यात आले होते.

Madhabi Puri Buch : अडचणी वाढल्या, सेबीच्या माजी प्रमुख माधवी बुच यांच्याविरुद्ध ‘त्या’ प्रकरणात दाखल होणार गुन्हा Read More »

Chammpions Trophy 2025 : दुबईत वरुण चमकला, भारताने न्यूझीलंडचा उडवला धुव्वा

Chammpions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आपल्या शेवटच्या ग्रुप सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत न्यूझीलंडवर विजय मिळवला आहे. या विजयानंतर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. तर न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. या सामन्यात वरुण चक्रवर्तीने 5 विकेट्स घेत न्यूझीलंडला बॅकफूटवर नेले होते. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने या सामन्यात 249 धावा केल्या, प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ या लक्ष्याच्या जवळही पोहोचू शकला नाही. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र शुभमन गिल आणि रोहित शर्माची सलामी जोडी काही खास कामगिरी करू शकली नाही आणि भारताने लवकरच सुरुवातीच्या विकेट गमावल्या. विराट कोहलीही या सामन्यात फ्लॉप ठरला परंतु अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यरने भारतीय डाव सावरला. त्यानंतर हार्दिक पंड्याने स्फोटक फलंदाजी करत 45 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने शानदार कामगिरी करत 5 विकेट्स घेतल्या. 249 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची सुरुवात खराब झाली. हार्दिक पंड्याने लवकरच रचिन रवींद्रला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर वरुण चक्रवर्तीने विल यंगला 22 धावांवर बाद केले. कुलदीप यादवने डॅरिल मिशेलला 17 धावांवर बाद केले, तर रवींद्र जडेजाने टॉम लॅथमलाही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. केन विल्यमसनने एका टोकापासून चांगली फलंदाजी केली आणि 81 धावा केल्या, पण त्याला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. वरुण चक्रवर्तीने घातक गोलंदाजी केली आणि न्यूझीलंडचा डाव उद्ध्वस्त केला. त्याने 5 विकेट्स घेतल्या आणि किवी संघाला 200 पेक्षा कमी धावांमध्ये गुंडाळले. अक्षर पटेलनेही एक महत्त्वाची विकेट घेतली आणि विल्यमसनला 81 धावांवर बाद करून भारताचा विजय निश्चित केला. या विजयासह भारताने अ गटात अव्वल स्थान पटकावले आहे.

Chammpions Trophy 2025 : दुबईत वरुण चमकला, भारताने न्यूझीलंडचा उडवला धुव्वा Read More »

शेवगाव पोलिसांची धमाकेदार कारवाई, अफुच्या झाडाची लागवड करणाऱ्या आरोपीला अटक

Ahilyanagar News: शेवगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत अफुच्या झाडाची बेकायदेशिररित्या लागवड करणाऱ्या आरोपीस अटक केली आहे. तसेच 11 लाख 43 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. गणेश नवनाथ घोरतळे, (22 वर्षे रा. मारुती वस्ती बोधेगाव ता. शेवगाव) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राज्यात लागवडीस बंदी घातलेले अफुच्या झाडाची बोधेगाव शिवारात गणेश नवनाथ घोरतळे याने त्याच्या शेतामध्ये बेकायदेशिररित्या लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. आरोपी विरोधात एन डी पी एस कायदा सन 1985 ते कलम 8(b), 18 प्रमाणे कायदेशिर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शेवगाव पोलिसांनी दिली आहे.

शेवगाव पोलिसांची धमाकेदार कारवाई, अफुच्या झाडाची लागवड करणाऱ्या आरोपीला अटक Read More »