DNA मराठी

DNA Marathi News

… तर भांडूपच्या भोंग्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये एक ‘बेड’ बुक करु; आनंद परांजपे यांचा राऊतांवर हल्लाबोल

Anand Paranjape : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता संजय राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिला आहे. भांडुपचा भोंगा दिल्लीवरून कर्णकर्कश आवाजात एखाद्या मानसिक रोग्यासारखा वाजला मात्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्याबद्दल त्याने तारतम्य बाळगून बोलावे नाहीतर ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एक बेड भविष्यात बुक करु अशी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी गुरुवारी वक्फ बोर्डाच्या विधेयकावर भाषण करताना शिवसेनेचे जाज्वल्य हिंदूत्व जे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात होते याची आठवण करून दिली आणि त्या भाषणाच्या मिरच्या इतक्या झोंबल्या की, हा भोंगा दिल्लीवरून कर्कश आणि खालच्या पातळीवर येऊन वाजला असेही आनंद परांजपे म्हणाले. शिवसेनेचे हिंदूत्व हे ‘गर्व से कहो हम हिंदू है…’ आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी माझ्या शिवसैनिकांनी मशीद पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे असे वक्तव्य केले होते आणि ज्यावेळी 92 – 93 मध्ये दंगली झाल्या त्यावेळी शिवसेनेच्या असलेल्या सहभागाबद्दल आठवण करून दिल्यानंतर केवळ आताची शिवसेना जी संजय राऊत यांनी कॉंग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या चरणी अर्पण केली आहे. ज्या प्रकारच्या शब्दांचा त्यांनी प्रयोग केला ते शब्द आम्ही बोलू शकतो मग संजय राऊत यांना कॉंग्रेसचे सर्टीफाईड ‘डॅशडॅशडॅश’ किंवा सिल्व्हर ओकचे सर्टीफाईड ‘डॅशडॅशडॅश’ हे आम्ही देखील बोलू शकतो. परंतु आमच्यावर ते संस्कार नाहीत. लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल ज्या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये दोन्ही सभागृहात शिवसेनेची भाषणे झाली परंतु ही निराशेच्या व पराभवाच्या वैफल्यातून झाल्याचे सांगतानाच रोज पक्ष सोडून जे शिवसैनिक जात आहेत त्यांचा उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास कमी होतो आहे तो अधिक बळकट कसा होईल याचा संजय राऊत यांनी विचार केला तर ते अधिक योग्य राहील असा टोलाही आनंद परांजपे यांनी लगावला. पत्राचाळीची लॉटरी निघत आहे आणि ज्यांना या आरोपात ईडीची 8-9 महिने जेलवारी झाली आहे त्या संजय राऊत यांनी बोलताना तारतम्य बाळगावे. आरोप करणे खूप सोपे आहे. खासदार प्रफुल पटेल यांची साधी चौकशीही कधी लागली नाही. स्वतः संजय राऊत हे ईडीच्या जेलची वारी करुन आले आहेत. सध्या ते जामीनावर आहेत. त्यांनी उगाच वायफळ आरोप करु नये असा इशाराही आनंद परांजपे यांनी दिला.

… तर भांडूपच्या भोंग्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये एक ‘बेड’ बुक करु; आनंद परांजपे यांचा राऊतांवर हल्लाबोल Read More »

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल, चौकशीसाठी समिती गठीत

Devendra Fadanvis : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने विरोधकांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर आता या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या धर्मादाय रुग्ण योजनेची धर्मादाय रुग्णालयांकडून अंमलबजावणी होत नसल्यास, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील कथित प्रकरणाची पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी करण्यात येईल. या समितीत उपसचिव, सह कक्षप्रमुख तथा कक्ष अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष – मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी, मुंबईतील सर जे. जे. रुग्णालय समूहाचे अधीक्षक, तसेच विधि व न्याय विभागाचे उपसचिव/अवर सचिव हे या चौकशी समितीचे सदस्य सचिव असतील. याच प्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धर्मादाय रुग्ण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अंमलबजावणी बाबतही प्रधान सचिव विधी व न्याय विभाग तसेच धर्मादाय आयुक्त यांनी संनियत्रण व नियमन करावे याबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. या निर्देशात म्हटले आहे की, धर्मादाय रूग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व धर्मादाय रुग्णालयांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे ‘धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची’ मान्यता घ्यावी. याबाबत धर्मादाय रुग्णालयांना तत्काळ निर्देश देण्यात यावेत. विधी व न्याय विभागामार्फत गठीत करण्यात आलेल्या तपासणी पथकामार्फत तपासणी अहवाल व समितीच्या शिफारशी सादर केल्या आहेत. त्या शिफारशींवर तत्काळ कार्यवाही करावी. शासनामार्फत धर्मादाय रुग्णालयांमध्ये 186 धर्मादाय आरोग्य सेवकांच्या सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पदांवरील भरती तत्काळ करण्यात यावी. निर्धन रुग्णनिधी (IPF) खात्याबाबतची अद्ययावत माहिती धर्मादाय रुग्णालयांकडून घेवून ती धर्मादाय आयुक्त यांच्या संकेतस्थळावर अद्ययावत करावी. योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या रुणालयांवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कठोर कारवाई करावी.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल, चौकशीसाठी समिती गठीत Read More »

शेवगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी मागितली सामूहिक आत्महत्येची परवानगी, कारण काय?

Maharashtra News: गोळेगाव तालुका शेवगाव, अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामस्थांनी एक अघटीत पाऊल उचलून सामूहिक आत्महत्येची परवानगी मागितली आहे. हा निर्णय त्यांना दुष्काळाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये विविध सरकारी योजनांसाठी केलेल्या मागण्या व प्रयत्नांच्या निष्फळतेमुळे घ्यावा लागला आहे. गोळेगाव येथील पाझर तलावाची दुरुस्ती, भूजल विकास यंत्रणेच्या मार्फत अनुदानित विहिरीचा लाभ, आणि दुष्काळी गावांसाठी पोखरा योजनेत समावेश ही त्यांच्या मुख्य मागण्या आहेत. 5 एप्रिल रोजी देण्यात आलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. पाझर तलावाची दुरुस्ती: जेणेकरून पाणी साठवण क्षमता वाढून नदीपात्रात पाणी सोडता येईल. अनुदानित विहिरीचा लाभ: भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या मार्फत शेतकऱ्यांना अनुदानित विहिरीचा लाभ मिळवून देण्यात यावा. पोखरा योजनेत समावेश: दुष्काळी गावांसाठी पोखरा योजनेत समाविष्ट करण्यात यावे(रेफरन्स नसणे). तर दुसरीकडे यापूर्वी 24 फेब्रुवारी 2025 पासून या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. यावेळी पाझर तलावात जलआंदोलन, तसेच रस्तारोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. प्रशासनाची प्रतिक्रियाग्रामस्थांच्या आंदोलनाला जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पाझर तलावाचे काम जलसंधारण विभागाच्या मार्फत होत असल्याचे सांगितले. दरम्यान, जलसंधारण विभागाचे अधिकारी तोंडी आश्वासन देत असताना लेखी आश्वासन दिले नाही. तसेच, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले होते. आत्महत्येची परवानगीदोन्ही विभागांनी आश्वासन देऊनही काम पुढील कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थ सामूहिक आत्महत्येच्या हद्दीत पोहोचले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, सिंचनासाठी आवश्यक पाझर तलावाची दुरुस्ती न केल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत आहे, तर अनुदानित विहिरीच्या अभावामुळे शेती पणन कठीण होत आहे. या बाबतीत शासनाकडून अधिकृत प्रतिसाद नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामस्थांच्या सामूहिक आत्महत्येच्या धमकीमुळे प्रशासनासाठी त्वरित पावले उचलणे गरजही बनले आहे. या मागण्यांवर तातडीने संवाद साधून समाधानकारक निर्णय घेतल्यास गावात शांतता राखता येईल.

शेवगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी मागितली सामूहिक आत्महत्येची परवानगी, कारण काय? Read More »

भारतीय सिनेसृष्टीतील महान युगाचा अंत, अभिनेते मनोजकुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

Actor Manoj Kumar Passes Away : ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि ‘भारतकुमार’ म्हणून ओळखले जाणारे मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अस्त झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी देशभक्तीपर चित्रपटांच्या माध्यमातून जनमानसात देशप्रेम जागवले. ‘उपकार’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांनी समाजातील वास्तव आणि देशासाठी असलेली निष्ठा मोठ्या ताकदीने मांडली. त्यांच्या अभिनयात आणि दिग्दर्शनात असलेली राष्ट्रभक्ती ही आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांची जागा कधीही भरून निघणारी नाही. ‘दादासाहेब फाळके’, ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त असलेले मनोज कुमार हे अनेक नवोदित कलाकारांचे प्रेरणास्थान होते.त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात केली आहे.

भारतीय सिनेसृष्टीतील महान युगाचा अंत, अभिनेते मनोजकुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली Read More »

ट्रम्पने दिला जगाला धक्का, भारतावर 26% टॅक्स, जाणून घ्या कोणत्या देशावर किती टॅक्स लावला

Trump Tariffs Rules : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आजपासून नवीन टॅरिफ नियम लागू केले आहे. त्यामुळे आता याचा जगाच्या अर्थव्यस्थेवर काय परिणाम होणार याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. नवीन नियमांनुसार भारतातून येणाऱ्या वस्तूंवर 26% कर लावण्यात आला आहे. ट्रम्प यांनी या निर्णयाचे वर्णन अमेरिकेच्या “आर्थिक स्वातंत्र्या”कडे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून केले आहे.या नवीन धोरणांतर्गत, चीन आणि पाकिस्तानसह अनेक देशांवर कठोर आयात कर लादण्यात आले आहेत. चीनवर 34%, बांगलादेशवर 37% आणि पाकिस्तानवर 29% कर लादण्यात आला आहे. तर युरोपियन युनियन, जपान, तैवान, व्हिएतनाम आणि इतर देशांवर वेगवेगळ्या दराने शुल्क लादण्यात आले आहे. भारतावर 26% कर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अमेरिकेला बऱ्याच काळापासून व्यापार पातळीवर तोटा सहन करावा लागत आहे. त्यांनी आरोप केला की भारत अमेरिकन वस्तूंवर 52% कर लादतो, म्हणून अमेरिकेने भारतावर 26% कर लादून प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्या देशांवर किती शुल्क आकारले गेले? ट्रम्प प्रशासनाने जारी केलेल्या चार्टनुसार, हे नवीन शुल्क वेगवेगळ्या देशांवर लादण्यात आले आहे. चीन: 34% युरोपियन युनियन: 20% दक्षिण कोरिया: 25% भारत: 26% व्हिएतनाम: 46% तैवान: 32% जपान: 24% थायलंड: 26% स्वित्झर्लंड: 31% इंडोनेशिया: 32% मलेशिया: 24% कंबोडिया: 49% युनायटेड किंग्डम: 10% दक्षिण आफ्रिका: 30% ब्राझील: 10% बांगलादेश: 37% सिंगापूर: 10% इस्रायल: 17% फिलीपिन्स: 17% चिली: 10% ऑस्ट्रेलिया: 10% पाकिस्तान: 29% तुर्की: 10% श्रीलंका: 44% कोलंबिया: 10% कॅनडा आणि मेक्सिकोसाठी विशेष सूट या नवीन टॅरिफ धोरणात कॅनडा आणि मेक्सिकोला विशेष सूट देण्यात आली आहे. व्हाईट हाऊसने स्पष्ट केले की हे दोन्ही देश आधीच USMCA करारांतर्गत येतात, ज्यामुळे त्यांना या नवीन शुल्कातून सूट देण्यात आली आहे. ट्रम्प म्हणाले, “आपण अनेक देशांना सबसिडी देतो, पण आता आपल्याला आपल्याच देशाचा विचार करावा लागेल.”

ट्रम्पने दिला जगाला धक्का, भारतावर 26% टॅक्स, जाणून घ्या कोणत्या देशावर किती टॅक्स लावला Read More »

बाईक टॅक्सीसाठी ॲग्रीगेटर धोरण जाहीर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Decision : राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी (बाइक) टॅक्सी समुच्चयक ॲग्रीगेटर सेवा सुरू करण्याबाबतचे धोरण लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.बैठकीत बाईक टॅक्सी वाहनांचे समुच्चयक धोरण ठरविण्यासाठी गठीत केलेल्या रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशीनुसार हे धोरण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे राज्यातील नागरिकांसाठी वाहतुकीचा किफायतशीर आणि सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या धोरणांतर्गत बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या समुच्चयकांकडून (Aggregators) इलेक्ट्रिक बाईक वापराव्या लागणार आहेत. त्या पिवळ्या रंगात रंगवलेल्या असतील. हा पर्याय पर्यावरणपूरक व रोजगार उपलब्ध करून देणारा हा पर्याय आहे. यातून मोठी रोजगारनिर्मिती होणार असून महिला चालकांना देखील प्रोत्साहीत केले जाणार आहे. या धोरणांतर्गत सेवा देणाऱ्या अँग्रीगेटरच्या वाहनांना जीपीएस लावणे, संकटकालीन संपर्क सुविधा, वेग पडताळणी, चालक व प्रवाशी या दोन्हींकरिता विमा संरक्षण, स्वच्छता दर्जा राखणे आदी बाबी आवश्यक करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच दुचाकी चालकांची निवड करताना त्यांची पार्श्वभूमी तपासून सुरक्षेबातच्या सर्व निकषांची पूर्तता करणे आवश्यक करण्यात आले आहे. तसेच या बैठकीत वडसा-देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी ९४३ कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. वडसा-देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आणि राज्याच्या हिश्श्याचे ९४३ कोटी २५ लाख रुपये देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा निधी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने वितरित केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने ५० टक्के आर्थिक सहभाग देण्याचा निर्णय पूर्वीच घेतला आहे. सध्या या प्रकल्पाचा एकूण खर्च १ हजार ८८६ कोटी ५ लाख रुपये इतका असून त्यापैकी अर्धा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. आतापर्यंत राज्य सरकारने २८८ कोटी ८५ लाख रुपये वितरित केले असून उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात येईल. हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास गडचिरोली जिल्हा रेल्वे मार्गाने जोडला जाईल, ज्यामुळे येथील विकास प्रक्रियेला गती मिळेल आणि वाहतूक सुलभ होईल.

बाईक टॅक्सीसाठी ॲग्रीगेटर धोरण जाहीर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय Read More »

निवडणूक कार्यक्रम जाहीर, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यात कोण मारणार बाजी?

Cooperative Maharshi Bhausaheb Thorat Cooperative Sugar Factory : नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणेकडून जाहीर करण्यात आला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ११ मे २०२५ रोजी मतदान होणार असून १२ मे रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार आहे. तर नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी संगमनेर यांच्या कार्यालयात ३ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत साप्ताहिक व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मिळतील व स्वीकारण्यात येतील. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. छाननीनंतर वैध नामनिर्देशन पत्रांची यादी १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवार १५ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत अर्ज मागे घेऊ शकतात. माघारीनंतर प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप २ मे रोजी करण्यात येईल. या निवडणुकीसाठी संगमनेर उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, तर तहसीलदार धीरज मांजरे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची प्रारूप मतदार यादी २५ फेब्रुवारी व अंतिम मतदार यादी १९ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, असे निवडणूक अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यात कोण मारणार बाजी? Read More »

1 एप्रिलपासून लागू होणारे 10 मोठे बदल… थेट खिशावर होणार परिणाम, जाणून घ्या सर्वकाही…

April Rules Change: आजपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. देशात त्यामुळे या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून मोठे बदल दिसून येणार आहे आणि या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होताना दिसणार आहे. या महिन्यापासून लागू झालेल्या 10 प्रमुख बदलांबद्दल जाणून घ्या व्यावसायिक सिलिंडर 44.50 रुपयांनी स्वस्तनवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 एप्रिलपासून 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 44.50 रुपयांनी कमी झाली आहे. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 44.50 रुपयांनी स्वस्त झाल्याने दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1762 झाली आहे. 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्तनवीन कर प्रणालीनुसार आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आजपासून देशात 12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना बंदमहिलांसाठी चालवली जाणारी ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ (MSSC) योजना आजपासून बंद करण्यात आली आहे. त्यात 7.5% व्याजदर होता आणि कोणीही किमान 1000 ते 2 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकत होता. कारच्या किमती वाढल्याआजपासून मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, किआ इंडिया, ह्युंदाई इंडिया आणि होंडा या कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती 4% पर्यंत वाढवल्या आहेत. यामुळे वाहने खरेदी करणाऱ्या लोकांना महागाईचा सामना करावा लागेल. UPI वापरला जाणार नाहीजर तुमचा मोबाईल नंबर बराच काळ डि ऍक्टिव्ह असेल तर तुम्ही UPI द्वारे पेमेंट करू शकणार नाही. असे क्रमांक UPI सिस्टममधून काढून टाकले जातील. ज्येष्ठ नागरिकांना व्याज उत्पन्नावर दुप्पट सूट ज्येष्ठ नागरिकांना आता बँका आणि पोस्ट ऑफिसमधील व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 50,000 रुपयांऐवजी 1 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळेल. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी UPS पेन्शन योजना सुरूआता केंद्र सरकारी कर्मचारी युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) चा भाग बनू शकतात, ज्यामध्ये 25 वर्षांच्या सेवेनंतर, कर्मचाऱ्यांना गेल्या 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 50% इतके पेन्शन मिळेल. या योजनेत सरकार 18.5% योगदान देईल. युलिपवरील भांडवली नफा करजर तुमचा युलिप प्रीमियम दरवर्षी 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तो भांडवली मालमत्ता मानला जाईल. आता यावर मिळणाऱ्या नफ्यावर भांडवली लाभ कर आकारला जाईल. बँकेतील किमान शिल्लक नियमात बदलएसबीआय, पीएनबी, कॅनरा बँकेसह अनेक बँकांनी किमान शिल्लक रकमेशी संबंधित नियम बदलले आहेत. आता, तुमच्या खात्यातील किमान शिल्लक तुमच्या क्षेत्रानुसार ठरवली जाईल आणि ती राखण्यात अयशस्वी झाल्यास दंड होऊ शकतो. विमान प्रवास स्वस्त झालाएव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किमती कमी झाल्या आहेत, ज्यामुळे विमान प्रवास खर्चात दिलासा मिळू शकतो. चेन्नईमध्ये एटीएफची किंमत 06,064.10ने स्वस्त झाली आहे. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

1 एप्रिलपासून लागू होणारे 10 मोठे बदल… थेट खिशावर होणार परिणाम, जाणून घ्या सर्वकाही… Read More »

कबर नसलीच पाहिजे…, संग्राम जगतापांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

Sangram Jagtap on Raj Thackeray: गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या भाषणानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. “कबर ठेवली पाहिजे” असे विधान करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर आता विरोधी नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. संग्राम जगताप यांची परखड प्रतिक्रिया – अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी या मुद्द्यावर थेट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कबर ही नसलीच पाहिजे, असे तमाम हिंदूंचे मत आहे. त्यामुळे कोण काय सांगत आहे, त्यापेक्षा सत्य परिस्थिती काय आहे हे महत्त्वाचे आहे.” त्यांनी असा दावाही केला की, “या संदर्भात अपूर्ण माहिती दिली जात असून, आम्ही येणाऱ्या काळात थडगे ठेवणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे.” त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे. शिवसेनेवर हल्लाबोल – संग्राम जगताप यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. “जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे जिवंत होते, तोपर्यंत हिंदुत्व हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. मात्र, शिवसेनेने काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यानंतर आता त्यांना हिंदुत्व महत्त्वाचे वाटेनासे झाले आहे,” असा आरोप त्यांनी केला. “त्यामुळे संजय राऊत यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व देण्याची गरज नाही,” असेही ते म्हणाले. राजकीय वातावरणात तणाव राज ठाकरे यांच्या भाषणानंतर राज्यात हिंदुत्व आणि धार्मिक विषयांवर नवी चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षांचे नेते यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी हे वक्तव्य राजकीय फायद्यासाठी असल्याचा आरोप केला आहे, तर काहींनी याला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. पुढील राजकीय घडामोडींची शक्यता राज ठाकरे यांच्या भूमिकेवरून मनसे अधिक आक्रमक होत असल्याचे स्पष्ट होते. दुसरीकडे, भाजप आणि मनसे यांच्यातील वाढते संबंधही यामुळे चर्चेत आले आहेत. संग्राम जगताप यांची भूमिका ही हिंदुत्ववादी राजकारणाला पूरक असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या वक्तव्यांमुळे आगामी निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः, शिवसेनेला या टीकेला कसे प्रत्युत्तर देता येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शिवसेनेच्या गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही या वादात भूमिका घेत विरोधी गटाच्या रणनीतीवर टीका करू शकतात. निष्कर्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वादंग निर्माण झाला आहे. संग्राम जगताप यांच्या प्रतिक्रियेमुळे हा वाद अधिकच पेटण्याची शक्यता असून, आगामी काळात याचा परिणाम निवडणूक रणनीतींवर होऊ शकतो. हिंदुत्वाचा मुद्दा आगामी राजकीय समीकरणांसाठी कसा महत्त्वाचा ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

कबर नसलीच पाहिजे…, संग्राम जगतापांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल Read More »

Sujay Vikhe: शिर्डीत दिवसा व्हीआयपी दर्शन नको – माजी खासदार सुजय विखे

Sujay Vikhe: साई मंदिरातील दर्शन व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील साई मंदिरात दिवसा व्हीआयपी दर्शन बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच व्हीआयपींना केवळ पहाटे चार ते सहा वाजेपर्यंतच दर्शन दिले पाहिजे. ही व्यवस्था तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर आणली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. सुजय विखे म्हणतात, “साई संस्थानाने तिरुपती बालाजी मंदिराच्या दर्शन व्यवस्थेचा अभ्यास करावा. आम्ही म्हणतो, व्हीआयपींना फक्त पहाटे चार ते सहा वाजेपर्यंतच दर्शन द्यावे. ही व्यवस्था अमलात आणल्यास सर्वसामान्य भक्तांना दिवसभरात सोप्या प्रकारे दर्शन घेता येईल.” शिर्डी मंदिरात अनेकदा व्हीआयपी दर्शनामुळे रांगा थांबवल्या जातात आणि सामान्य भक्तांना वाट पाहावी लागते, ही समस्या सुजय विखे यांनी प्रकाशात आणली. त्यांच्या मते, व्हीआयपींना ठराविक वेळेतच दर्शन दिल्यास ते सामान्य भक्तांचा प्रवास सोपा करणार आहे. शिर्डी मंदिरामध्ये दिवसा व्हीआयपी दर्शनाचा प्रकार बंद करण्याच्या मागणीमागे मुख्य कारण म्हणजे सामान्य भक्तांना होणारा त्रास. अनेकदा व्हीआयपींच्या दर्शनामुळे रांगा थांबवल्या जातात, ज्याचा परिणाम सामान्य भक्तांच्या दर्शनावर होतो. ही समस्या सोडवण्यासाठी सुजय विखे यांनी तिरुपतीच्या धर्तीवरील व्यवस्थेचा अभ्यास करण्याचे आवाहन केले आहे. ही मागणी साई संस्थानातून पुढे जाणार का यावर आता सर्वांचे लक्ष लागून राहील. त्यामुळे या निर्णयाचा सर्वसामान्य साईभक्तांवर होणारा परिणाम लक्षात घेणे गरजेचे आहे.

Sujay Vikhe: शिर्डीत दिवसा व्हीआयपी दर्शन नको – माजी खासदार सुजय विखे Read More »