DNA मराठी

BJP

amol kolhe

Amol Kolhe : अमोल कोल्हे सोडणार शरद पवारांनी साथ? ऑपरेशन तुतारी’वर स्पष्टीकरण देत म्हणाले…

Amol Kolhe : राज्यातील राजकारणात ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. ऑपरेशन तुतारी अंतर्गत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पक्षाची साथ सोडणार असून एनडीएला लोकसभेत समर्थन देणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत ऑफर आली तर विचार करू असं विधान केल्याने अमोल कोल्हे पक्षाची साथ सोडणार आल्याचे सांगितलं जात होतं मात्र आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देत आपण शरद पवार यांच्या नेतृत्वासोबत ठाम असल्याचे स्पष्ट केले. कोल्हे म्हणाले की, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी “ऑफर आली तर विचार करू” असे म्हटले होते. हे विधान केवळ रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात होते, राजकीय प्रवेशाशी त्याचा कोणताही संबंध नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरील आपली निष्ठाही व्यक्त केली. “पवार साहेब सांगतील तेच आमचे धोरण आणि ते बांधतील तेच तोरण,” असे म्हणत पक्षातील सर्व खासदार एकत्र असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच, आपण कुठेही जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनीही ‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चा फेटाळून लावत सर्व खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने काम करत असल्याचे सांगितले. विरोधी पक्षाच्या खासदारांना विकासकामांसाठी निधी मिळण्यात अडचणी येत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

Amol Kolhe : अमोल कोल्हे सोडणार शरद पवारांनी साथ? ऑपरेशन तुतारी’वर स्पष्टीकरण देत म्हणाले… Read More »

dhananjay munde

Dhananjay Munde : नोकरीच्या आमिषाने म्यानमारमध्ये ओलिस ठेवलेल्या तरुणांची सुटका करा

Dhananjay Munde : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील नांदूर घाट येथील रहिवासी स्वप्नील काळुंके यांसह अनेक तरुणांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून म्यानमार – थायलंड सीमेवर एका छळ छावणीत ओलिस ठेऊन त्यांच्या कडून जबरदस्तीने सायबर गुन्हे घडवले जात असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेत केंद्र सरकारच्या मदतीने या सर्व तरुणांची सुखावून सुटका करावी, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी लेखी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री महोदयांची विधानभवन येथे भेट घेत विनंतीचे पत्र दिले आहे. बीड जिल्ह्यातील स्वप्नील काळुंके सह महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे २०-२५ तरुण तर देशातून तब्बल ७००-८०० तरुण म्यानमार – थायलंड सीमेवरील गोल्डन ट्रँगल नामक छळछावणीत ओलिस असून त्यांना शारीरिक यातना देऊन त्याच्याकडून सायबर गुन्हे घडवले जात असल्याची तक्रार बीड सायबर पोलिसात दाखल करण्यात आलेली आहे, तसेच याप्रकरणी तपासाची चक्रे थेट देशाच्या गुप्तचर विभागापर्यंत पोचले असून, आपला बचाव व सुटका होण्यासाठी ही सर्व तरुण प्राणांची बाजी लावत असून सध्या ते मृत्यूच्या दाढेत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तातडीने लक्ष घालून केंद्र सरकार तसेच विदेश मंत्रालयाची मदत घेऊन या तरुणांच्या सुखरूप सुटकेसाठी प्रयत्न सुरू करावेत तसेच मोठ्या पगाराचे आश्वासन देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळे विणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी तस्करी करणाऱ्या या टोळीतील महाराष्ट्रामध्ये सक्रिय असणाऱ्या एजंटांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे.

Dhananjay Munde : नोकरीच्या आमिषाने म्यानमारमध्ये ओलिस ठेवलेल्या तरुणांची सुटका करा Read More »

Sharad Pawar

Maharashtra Politics: शरद पवार गटात दोन ग्रुप? NDA की काँग्रेसमध्ये विलीन होणार

Maharashtra Politics : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात अंतर्गत पातळीवर दोन वेगवेगळे गट निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. माहितीनुसार, काही पक्षाच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय पुढे करत आहे तर काही नेते सत्ताधारी एनडीएत सहभागी होण्याच्या बाजूने असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षात राहिल्यामुळे मतदारसंघातील विकासकामे आणि निधी मिळवताना अडचणी येत असल्याची भावना काही नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सत्तेत सहभागी होण्याबाबत पक्षात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवणे कठीण होत असल्याने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचाही पर्याय विचारात घेतला जावा. त्यामुळे पक्षात दोन वेगवेगळ्या भूमिका समोर आल्याची चर्चा आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी कोणताही आमदार पक्ष सोडणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, भविष्यात पक्षाची राजकीय दिशा काय असेल आणि या मतभेदांवर शरद पवार कोणता निर्णय घेतील, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या घडामोडींबाबत विविध सूत्रांच्या आधारे चर्चा सुरू असून संबंधित पक्षाकडून अंतिम अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही.

Maharashtra Politics: शरद पवार गटात दोन ग्रुप? NDA की काँग्रेसमध्ये विलीन होणार Read More »

anna hazare

Anna Hazare: आंदोलनासाठी अण्णा हजारेंवर संघटनांचा दबाव तर सरकारकडून प्रतिसाद नाही

Anna Hazare: माहिच्या अधिकार कायद्याच्या नियमांतील दुरूस्तीच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर आता विविध संघटनांकडून नैतिक जबाव आणला जात आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारकडून मात्र, अधिकृतपणे संपर्क करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर हजारे यांनी आज सरकारला आंदोलनासंबंधी स्मरणपत्र पाठविले आहे. या कायद्याच्या नियमांत सरकारने अलीकडेच बदल केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना माहिती मिळविणे अवघड जाणार आहे, असे सांगत हजारे यांनी या विरोधात 5 जुलैपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आंदोलन करणार असल्याचा इशारा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून दिला आहे. त्यानंतर मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राळेगणसिद्धीत येऊन हजारे यांची भेट घेतली. मात्र, आपण सरकारचे प्रतिनिधी म्हणून नव्हे तर हजारे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत काहीही तोडगा निघाला नसल्याने हजारे उपोषण करण्यावर ठाम राहिले. त्यानंतर सरकारकडून कोणीही अधिकृतपणे चर्चेसाठी आले नाही. तर दुसऱ्या बाजूला विविध सामाजिक संघटनांनी हजारे यांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दिला. प्रश्न सुटल्याशिवाय आता माघार नाही, अशा निर्धार व्यक्त करीत या संघटनांनी आंदोलनासाठी नैतिक दबाव निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर आता हजारे यांनी सरकारला पुन्हा स्मरणपत्र पाठविले आहे. या पत्रात हजारे यांनी म्हटले आहे की, मी 22 जून 2026 रोजी आपणास सविस्तर पत्र देऊन महाराष्ट्र माहितीचा अधिकार कायद्यातील अनेक तरतुदी नागरिकांच्या माहितीच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या असल्याचे सविस्तर निदर्शनास आणून दिले होते. त्यामध्ये शासनाने या नियमांचा पुनर्विचार न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. यानंतर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राळेगणसिद्धी येथे येवून भेट घेतली. त्यावेळेस आमच्यामध्ये अडीच तास माहिती अधिकार कायद्याचा मूळ उद्देश, नागरिकांच्या अडचणी आणि नवीन नियमांमुळे निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नांवर चर्चा झाली. त्यांनी कोणताही कायदा अथवा नियमावली करण्याचे अधिकार शासनाकडे असल्याने आपल्या भावना आम्ही शासनास कळवितो, पुढील निर्णय शासन घेईल असे सांगितले होते. त्यामुळे सरकारने 12 जून 2026 रोजी लागू केलेली नियमावली रद्द करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर पुन्हा एकदा हा कायदा वाचविण्यासाठी प्राणपणास लावून उपोषण सुरु करावे लागणार आहे. त्यामुळे आपणास नम्र विनंती करण्यात येते की. महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 मधील नागरिकविरोधी व कायद्याच्या मूळ तत्त्वांना बाधा आणणाऱ्या सर्व तरतुदी तात्काळ स्थगित करून रद्द करण्यात याव्यात. माहिती अधिकार क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, माहिती आयुक्त, वकील, पत्रकार आणि नागरिकांच्या प्रतिनिधींची उच्चस्तरीय समिती स्थापन करून नव्याने नियम तयार करण्यात यावेत. माहितीचा अधिकार अधिक प्रभावी, सुलभ आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा राहील याची शासनाने हमी द्यावी, अन्य़था ठरल्याप्रमाणे आंदोलन केले जाईल.

Anna Hazare: आंदोलनासाठी अण्णा हजारेंवर संघटनांचा दबाव तर सरकारकडून प्रतिसाद नाही Read More »

Accident Photo

Ahilyanagar Bus Accident: लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडींच्या लक्झरी बसचा भीषण अपघात; चालक फरार

Ahilyanagar Bus Accident: शेंडी-पोखर्डी परिसरातील घटना लग्न समारंभाचा आनंद साजरा करून परतणाऱ्या वऱ्हाडींवर काळाने घाला घातल्याची घटना अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गावर घडली. खरवंडी येथील लग्न समारंभ आटोपून पुण्यातील स्वारगेटकडे निघालेल्या वऱ्हाडींच्या लक्झरी बसचा शेंडी-पोखर्डी परिसरात भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील लक्झरी बस अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या दुर्घटनेत बसमधील सुमारे २५ ते ३० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी प्रवास सुरू असताना बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. अपघात होताच बसमध्ये एकच आरडाओरडा सुरू झाला. लग्न समारंभाचा आनंद एका क्षणात भीती आणि गोंधळात बदलला. बसमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचाही समावेश असल्याने काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी मदत केली. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्याचे काम करण्यात आले. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेकांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. फरार चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत अपघातानंतर लक्झरी बसचा चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, चालकाचा निष्काळजीपणा होता का, की अन्य काही कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत. अपघातानंतर काही काळ जखमी प्रवाशांना तात्काळ मदत न मिळाल्याने त्यांचे हाल झाल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली. महामार्गावर अपघातानंतर तत्काळ मदत आणि आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध होण्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून, फरार चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Ahilyanagar Bus Accident: लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडींच्या लक्झरी बसचा भीषण अपघात; चालक फरार Read More »

img 20260625 wa0011

Sanjay Raut: शिवीगाळ करणाऱ्या खासदार संजय राऊतांवर कारवाई करा; शिवसेना महिला सेनेची मागणी

Sanjay Raut : उबाठा खासदार संजय राऊत यांच्या दररोजच्या शिवीगाळीने आणि अर्वाच्च भाषेने महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावला आहे. चिथावणीखोर भाषणाने राऊत स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे समजत आहेत. लोकप्रतिनिधी, माता भगिनींचा अवमान करणाऱ्या आणि त्यांना जाहीर धमक्या देणाऱ्या खासदार राऊत यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या महिला सेनेने मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली. खासदार राऊतांवर कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईल तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा यावेळी महिला सेनेच्या नेत्यांनी दिला. शिवसेना महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली. यात शिवसेना नेत्या मीना कांबळी, उपनेत्या शीतल म्हात्रे, राष्ट्रीय सचिव शायना एन सी, उपनेत्या व बेस्ट अध्यक्षा तृष्णा विश्वास राव, उपनेत्या सुवर्णा करंजे, कला शिंदे, मुंबई मनपा विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर, सुधार समिती अध्यक्षा संध्या दोषी तसेच अनेक आजी माजी नगरसेविका, सर्व महिला विभागप्रमुख इ. उपस्थित होत्या. शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या की शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेल्या उबाठाच्या सर्व खासदारांना उद्देशून खासदार राऊत यांनी जाहीर शिवीगाळ केली. राजकीय वैमनस्यातून राऊत यांनी विकृतीच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत, अशी टीका म्हात्रे यांनी केली. राऊत यांनी महिलेला फोनवर शिवीगाळ आणि धमकी दिल्याची ऑडिओ महाराष्ट्राने ऐकली आहे. महिलांविषयी आकस आणि सूडबुद्धीने राऊत सातत्याने खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. कितीही शिवीगाळ केली तर आपले कोणीही, काही करु शकत नाही, असा त्यांचा समज झाला असून ते कायद्यापेक्षा स्वत:ला मोठं समजत आहेत. त्यामुळे राऊत यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ७९, १९६, ३५१, ३५२, ३५३, ३५६ नुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि राऊत यांना अटक करावी, अशी लेखी मागणी शिवसेना महिला सेनेकडून पोलीस आयुक्तांकडे केल्याचे म्हात्रे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, नुकताच समाज माध्यमांवर राऊत यांनी बंदुकीसोबत फोटो पोस्ट केला होता. राऊत यांच्याकडे शस्त्रे आहेत का? ते समाज माध्यमांवर फोटो पोस्ट करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत का? याची पोलीसांनी चौकशी करावी. राऊत लोकप्रतिनिधींना आईबहिणीवरुन शिवीगाळ करतात, माध्यमांच्या माइकवर थुंकतात, खासदारांचा अर्वाच्च भाषेत उल्लेख करतात, माता भगिनींना रक्तावरुन बोलतात आणि अवमान करतात. अशा विकृत लोकांना वेळीच चाप बसावा, यासाठी महिला सेनेने निवेदन दिले. राऊत यांना अटक केल्यानंतर ठाण्यातील मनोरुग्णालयात पाठवावे, शिवसेनेकडून राऊत यांच्यासाठी मनोरुग्णालयातील एक खाट राखून ठेवल्याचा टोला म्हात्रे यांनी लगावला. राऊत यांनी उबाठा पक्ष संपण्याची सुपारी घेतल्याची टीका शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी यांनी यावेळी केली. महाराष्ट्रातील महिलांचा यापुढे अवमान केल्यास शिवसेना महिला सेना त्यांना धडा शिकवेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Sanjay Raut: शिवीगाळ करणाऱ्या खासदार संजय राऊतांवर कारवाई करा; शिवसेना महिला सेनेची मागणी Read More »

mla amit gorkhe

MLA Amit Gorkhe : विषारी दारू प्रकरणातील दोषींवर मोक्का; मृतांच्या सर्व 22 कुटुंबांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

MLA Amit Gorkhe : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी, फुगेवाडी आणि हडपसर परिसरात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी विषारी दारू प्रकरणावर आमदार अमित गोरखे यांनी महाराष्ट्र विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे प्रकाश टाकला.. या गंभीर विषयाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर लिखित उत्तर सभागृहात सादर केले असून त्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करत कठोर कारवाई व महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली. आमदार गोरखे यांनी सभागृहात या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदत, मिथेनॉल पुरवठा साखळीचा संपूर्ण तपास आणि राज्यातील अवैध दारू व्यवसायाविरोधात व्यापक मोहीम राबविण्याची मागणी केली. त्यांच्या या मागण्यांची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या लिखित उत्तरामध्ये तपासाची सद्यस्थिती, दोषींवरील कारवाई तसेच भविष्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. फडणवीस यांच्या लिखित उत्तरानुसार या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून विषारी दारू निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या मिथेनॉलचा पुरवठा करणाऱ्या मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात सांगितले की, या प्रकरणातील मुख्य आरोपींवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही आणि संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. याशिवाय विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या सर्व २२ कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून एकूण १ कोटी १० लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. पीडित कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळावा यासाठी शासनाने ही मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या लिखित उत्तरात राज्यभर अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले असून तालुकास्तरीय दारूबंदी समित्यांचे पुनर्गठन, पोलिस व उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाया आणि मिथेनॉलच्या वाहतुकीवर अधिक कठोर नियंत्रण ठेवण्याबाबत शासनाने ठोस पावले उचलल्याचे नमूद केले आहे. यावेळी आमदार गोरखे म्हणाले, “विषारी दारूमुळे २२ निष्पाप नागरिकांचा मृत्यू ही अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक घटना आहे. मृतांच्या कुटुंबांना न्याय मिळावा, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी मी सभागृहात ठाम भूमिका मांडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत लिखित उत्तराद्वारे कठोर कारवाई व मदतीबाबत भूमिका स्पष्ट केली असून शासनाने घेतलेले निर्णय पीडित कुटुंबांसाठी दिलासादायक आहेत.”

MLA Amit Gorkhe : विषारी दारू प्रकरणातील दोषींवर मोक्का; मृतांच्या सर्व 22 कुटुंबांना प्रत्येकी 5 लाखांची मदत Read More »

amol khatal

Amol Khatal: संगमनेरकरांना दिलासा द्या; वीजखंडिती तात्काळ बंद करा

Amol Khatal: संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत होत असलेल्या वीजखंडितीच्या प्रश्नावर आमदार अमोल खताळ यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जोरदार आवाज उठवत शासनाचे लक्ष वेधले. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना या लोडशेडिंगमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने हा प्रकार तातडीने बंद करून ग्रामीण भागाला अखंड आणि सुरळीत वीजपुरवठा देण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. राज्यात कुठेही लोडशेडिंग होत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असले, तरी संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी असल्याचे आमदार खताळ यांनी निदर्शनास आणून दिले. महावितरणचे स्थानिक अधिकारी वरिष्ठ स्तरावरून वीज व्यवस्थापन (ईएलआर) लागू करण्याचे आदेश असल्याचे सांगत रात्री-अपरात्री तसेच सायंकाळच्या महत्त्वाच्या वेळेत वारंवार वीजपुरवठा खंडित करत असल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला. सध्या ग्रामीण भागातील नागरिकांना दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत वीजपुरवठा खंडित होण्याचा सामना करावा लागत आहे. ही वेळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची, शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामांची तसेच व्यापाऱ्यांच्या व्यवसायाची असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. वारंवार होणाऱ्या वीजखंडितीमुळे घरगुती कामकाज, लघुउद्योग, व्यावसायिक व्यवहार आणि कृषी क्षेत्रावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. ग्रामीण भागातील जनतेला नियमित वीजपुरवठा मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेली सायंकाळची वीजखंडिती तात्काळ थांबविण्यात यावी आणि संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या स्पष्ट सूचना देऊन अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करावा, अशी ठाम मागणी आमदार अमोल खताळ यांनी पावसाळी अधिवेशनात केली.

Amol Khatal: संगमनेरकरांना दिलासा द्या; वीजखंडिती तात्काळ बंद करा Read More »

chaitanya maharaj wadekar

Chaitanya Maharaj Wadekar : चैतन्य महाराज वाडेकर यांच्या भावाला बेदम मारहाण

Chaitanya Maharaj Wadekar : मावळ मधील माजी जिल्हा परिषद सदस्य भाजपचे पदाधिकारी नितिन आण्णासाहेब मराठे आणि त्यांच्या परिवारातील ज्ञानेश्वर मराठे यांनी अनेकांना सोबत घेऊन चैतन्य महाराज वाडेकर यांच्या अपंग भावाला जीवघेणी मारहाण केल्याचा आरोप अमोल वाडेकर यांनी केला आहे. महाराष्ट्र शासनाने अलॅाट केलेल्या वराळे गावातील एक एकर जागेचा ताबा , महसूल अधिकाऱ्यांकडून अधिकृत कुलमुख्त्यारधारक अमोल वाडेकर यांचेकडे पोलीस बंदोबस्तात सोपवण्यात आला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून माजी जिल्हा परिषद सदस्य नितिन आण्णासाहेब मराठे व इतरांनी एका पायाने अपंग असलेल्या चैतन्य महाराजांचे भाऊ अमोल वाडेकर यांना जीवघेणी मारहाण केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सदर बाब मावळचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनिल शेळके यांच्या समोर देखील मांडण्यात आली होती. आमदार सुनिल शेळके यांनी कागदपत्रे तपासून मराठे परिवाराला संबंधित शासकीय कामात अडथळा न करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या. तरीही संबंधितांनी खोटे आरोप करत शासकीय अधिकाऱ्यांनी नियमाप्रमाणे ताबा देऊनही आज मारहाण केली असल्याच वाडेकर यांचं म्हणणं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Chaitanya Maharaj Wadekar : चैतन्य महाराज वाडेकर यांच्या भावाला बेदम मारहाण Read More »

shivsena mp

Shivsena MP: ‘त्या’ 6 खासदारांना दिल्लीतही पोलीस संरक्षण

Shivsena MP : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांना आता दिल्लीतही पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांचा या खासदारांच्या निवासस्थानी बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निवासस्थानांच्या परिसरात नो एंट्रीचे फलक लावण्यात आले आहेत. पक्षांतरानंतर संजय देशमुख (यवतमाळ), संजय जाधव (परभणी), संजय दिना पाटील (मुंबई उत्तर-पूर्व), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), ओमराजे निंबाळकर (धाराशिव) आणि भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) या सहा खासदारांविरोधात महाराष्ट्रात आंदोलने सुरू झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली. त्यानुसार महाराष्ट्रात असताना त्यांना महाराष्ट्र पोलिसांचा बंदोबस्त होता. आता या खासदारांची दिल्लीतील सुरक्षा लक्षात घेता त्यांना दिल्ली पोलिसांचे संरक्षण पुरविण्यात आले आहे. निवासस्थानाच्या बाहेर नो एंट्रीचे फलक लावण्यात आले आहेत. खासदारांच्या परवानगीशिवाय कोणालाही आत सोडले जात नाही.

Shivsena MP: ‘त्या’ 6 खासदारांना दिल्लीतही पोलीस संरक्षण Read More »