DNA मराठी

ahmednagar news

IMG 20240422 WA0003

Sujay Vikhe News: महाविकास आघाडीचे कुणी आले तरी विजय सुजय विखेंचाच: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Sujay Vikhe News: महाराष्ट्र मजबूत  झाला तरच देश मजबूत होईल, मोदींच्या विकासाचे यान चंद्रावर पोहचले आहे. मात्र राहूल गांधीचे यान अद्यापही लॉंच होऊ शकले नाही. महाविकास आघाडीचे कुणी आले तरी विजय सुजय विखेंचाच होईल, कारण आता जनतेचा विश्वास फक्त मोदी गॅरेंटीवर असल्याचे प्रदिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या सभेत ते बोलत होते.    नगर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील  यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आयोजित केलेल्या जाहीर सभेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. प्रा.राम शिदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आ. संग्राम जगताप, माजी अरूणकाका जगताप, आ. मोनिका राजळे, शिवसेनेचे जिल्‍हा प्रमुख बाबुशेवठ टायरवाले,भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष दिलीप भालसिंग , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, शहर अध्‍यक्ष अभय आगरकर, रिपाईचे भैलुमे यांच्‍यासह राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, रिपब्लिक पार्टी आठवले गट तथा मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.  ततपुर्वी महायुतीच्या वतीने नगर शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आलेल्या प्रचार फेरीतून डॉ. सुजय विखे पाटील यांनी भव्य शक्ती प्रदर्शन केले. प्रभातफेरीपुर्वी डॉ.सुजय विखे पाटील यांनी शहरातील सर्व महापुरूषांना विनम्र अभिवादन केले.या रॅलीमध्ये महिला युवक, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिल्लीगेट चौकात या रॅलीचा समारोप झाला.  त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना मुख्यंत्री एकनाथ शिदे म्हणाले की , ड्रामा करून कुणी निवडून येत नाही. विखे परिवाराला समाजकारणाची मोठी परंपरा आहे. स्व डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात मोठे योगदान असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलरावांच्या   आठवणींना उजाळा दिला. त्यांचा  वारसा स्व. बाळासाहेब विखे यांची पुढे नेला,तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याचा वटवृक्ष केला.आणि सुजय विखे हा वारसा अविरत चालवत आहेत. यामुळे सुजय विखे हे सर्वांच्या सुखादुखात धावून जातात. त्यांना तरूणांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यांनी जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्रातील अनेक प्रश्न मोठ्या प्रभावीपणे लोकसभेत मांडले आहेत. यामुळे ज्याच्या नावातच जय आहे त्याचा पराभव अशक्य आहे. डॉ. विखे खासदार झाल्यावर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीप मध्ये सामिल होणार आहेत. यामुळे नगर जिल्ह्याचा विकास जलद गतीने होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात  इंडी आघाडीचा चांगलाच समाचार घेतला. फडणवीस म्हणाले की, महायुती सरकार ही विकासाची गाडी असून त्याला वेगवान पंतप्रधान मोदी यांचे इंजिन आहे. तर दुसरीकडे इंडी आघाडीत सर्वच स्वताला इंजिन समजतात. राहूल गांधी, उध्दव ठाकरे, शरद पवार, ममता बॅनर्जी, असे सर्वच नेते आपल्याला इंजिन समजत असल्याने इंजिनमध्ये केवळ ड्रायवरला बसायला जागा असते. सर्वसामान्यांना इंजिनमध्ये बसता येत नाही.  राहूल सोनिया गाधीच्या इंजिन मध्ये राहूल गांधी बसतील होतील, शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळे बसतील होतील तर उध्दव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरे असतील अशी मार्मिक टिका करून दुसरीकडे मोदींच्या विकासाच्या इंजिनला भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, आणि इतर मित्र पक्षांचे डबे आहेत. तिथे सर्वांना बसण्यासाठी जागा आहे. मोदींच्या गॅरंटीमध्ये सबका साथ सबका विकास हे धोरण आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या विकासासाठी डॉ.सुजय विखे यांचा डबा मोदींच्या गाडीला जोडण्यासाठी १३ मेला मोठ्या मताधिक्याने सुजय विखे यांना मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या प्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.तर खा. डॉ, सुजय विखे पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Sujay Vikhe News: महाविकास आघाडीचे कुणी आले तरी विजय सुजय विखेंचाच: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

IMG 20240422 WA0002

Ahmednagar News: केवळ दहा जागा लढविणारे देशाचे भवितव्‍य घडवू शकणार नाहीत : राधाकृष्‍ण विखे पाटील

Ahmednagar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली देश आज महासत्‍ता  बनत आहे. त्‍यांचे नेतृत्‍व आता विश्‍वमान्‍य झाल्‍यामुळेच देशाचे भवितव्‍य घडणार आहे. केवळ दहा जागा लढविणारे  देशाचे भवितव्‍य घडवू शकणार नाहीत असा टोला लगावून जिल्‍ह्यातील औद्योगिक क्षेत्र अधिक विकसीत करण्‍याचा आपला प्रयत्‍न असून, आपली भूमि‍का उद्योग व्‍यवसाय आणण्‍याची आहे. इतरांसारखी धाक, दडपशाही करुन घालविण्‍याची नाही अशी टिका अशी खरमरीत टिका महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली.  तालुकयातील टाकळी ढोकेश्‍वर येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या  कार्यकर्त्‍यांच्‍या मेळाव्‍यात ना.विखे पाटील बोलत होते. जेष्‍ठनेते खिलारी गुरुजी, सुजीत झावरे, तालुका अध्‍यक्ष राहुल शिंदे, मंगलदास बांगल आदी याप्रसंगी उपस्थित होते.  आपल्‍या भाषणात मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली देशाचा विकास सर्व क्षेत्रांमध्‍ये होत आहे. मोदींची गॅरंटी आता देशवासियांना मिळाली आहे. त्‍यामुळेच त्‍यांना तिस-यांदा पंतप्रधान करण्‍यासाठी देशातील नागरीक सज्‍ज झाले असून, ही निवडणूक देशाचे भवितव्‍य घडविणारी आहे.  कोव्‍हीड संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांच्‍या पाठीशी उभे राहीले. मोफत धान्‍य योजनेपासून ते आयुष्यमान भारत योजने पर्यंत, सामाजिक योजनांना त्‍यांनी प्राधान्‍य दिले. जिल्‍ह्यात किसान सन्‍मान योजनेच्‍या माध्‍यमातून पारनेर तालुक्‍यात ४४  हजार ३८० शेतक-यांना ६७ कोटी ७१ लाख रुपयांचे अनुदान आले. राज्‍य सरकारने सुरु केलेल्‍या एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ १ लाख २७ हजार शेतक-यांना झाला असल्‍याची माहीती देवून पालकमंत्री विखे पाटील म्‍हणाले की, मागील अडीच वर्षे फक्‍त मुख्‍यमंत्री घरात बसून होते. नगर जिल्‍ह्यासाठी कोणतीही मदत महाविकास आघाडीचे नेते करु शकले नाहीत.  पारनेर तालुक्‍यातील पिंपळगाव जोगा धरणाचा प्रश्‍न प्राधान्‍याने सोडविण्‍याची आपली भूमिका असून, या तालुका आता बागायती कसा होईल यासाठी सुध्‍दा प्रयत्‍न करणार आहोत. जिल्‍ह्यातील तरुणांना जिल्‍ह्यातच रोजगार निर्माण करुन देण्‍यासाठी अनेक उद्योग नव्‍याने आणण्‍याची आपली भूमिका आहे. इतरांसारखी उद्योजकांना धाक दडपशाहीने पळवून लावण्‍याची भूमिका आमची नसल्‍याचा टोला त्‍यांनी लगावला.  याप्रसंगी सुजीत झावरे यांनी आपल्‍या भाषणात पारनेर तालुकयातून खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी मताधिक्‍य देण्‍याची ग्‍वाही दिली. मंगलदास बांगर यांनी शरद पवारांचे नाव न घेता त्‍यांनी आपल्‍या पुतण्‍याला या निवडणूकीत उभे का केले नाही असा सवाल उपस्थित केला. धनगर समाजाचे नेते श्री.बाचकर यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. सभेपुर्वी मंत्री विखे पाटील यांचे ग्रामस्‍थांनी मिरवणूक काढून स्‍वागत केले.

Ahmednagar News: केवळ दहा जागा लढविणारे देशाचे भवितव्‍य घडवू शकणार नाहीत : राधाकृष्‍ण विखे पाटील Read More »

IMG 20240421 WA0006

Maharashtra News : भगवान महाविरांची शिकवण  सामाजिक कल्याणासाठी महत्वाची : खा. डॉ. सुजय विखे पाटील

Maharashtra News:  भगवान महावीर यांची शिकवण ही सामाजिक कल्याणासाठी असून प्रत्येकाने ती आत्मसाद केली पाहिजे असे मत महायुतीचे उमेदवार  खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी सर्व जैन बांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.   महावीर जयंतीच्या निमित्ताने दाल मंडई आडते बाजार, धार्मिक परिक्षा बोर्ड तसेच विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला त्यांनी भेट देऊन भगवान महाविरांच्या मुर्तीस पुष्प अर्पण केले. यावेळी बोलताना खासदार म्हणाले की, भगवान महावीर हे त्याग, करूणा आणि संवेदनशीलतेचे प्रतिक आहेत. त्यांची संयम, सदाचार, करुणा आणि अहिंसा ही शिकवण समाजाच्या कल्याणासाठी आहे. यामुळे ही शिकवण प्रत्येकाने आत्मसाद करूण जीवन सुखकर करावे असे त्यांनी सांगितले.त्याच बरोबर जैन बांधवांना त्यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह मा.नगरसेक सचिन जाधव, अजिक्य तळे, प्रशांत मुथ्था, कमलेश भंडारी आणि महावीर  ग्रुपचे  विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खा. सुजय विखे पाटील यांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्याशी संवाद साधला.

Maharashtra News : भगवान महाविरांची शिकवण  सामाजिक कल्याणासाठी महत्वाची : खा. डॉ. सुजय विखे पाटील Read More »

IMG 20240421 WA0005

Ahmednagar News: किसान सन्‍मान योजनेचा लाभ मतदार संघातील 2 लाख 82 हजार शेतकऱ्यांना

Ahmednagar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतून शेतक-यांसाठी सुरु करण्‍यात आलेल्‍या किसान सन्‍मान योजनेचा लाभ मतदार संघातील २ लाख ८२ हजार शेतक-यांना  झाला असून, या योजनेचे सुमारे ५६ कोटी ४७ लाख रुपयांचे अनुदान बॅक खात्‍यात वर्ग झाले. केंद्र सरकारने शेतक-यांना सक्षम बनविण्‍यासाठी सुरु केलेल्‍या योजना महत्‍वपूर्ण असल्‍याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.  दहा वर्षांच्‍या काळात कृषि क्षेत्राला आत्‍मनिर्भर बनविण्‍याचे काम केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून झाले आहे. कृषि क्षेत्रासाठी घेतलेल्‍या प्रत्‍येक निर्णयाचा लाभ शेतक-यांना होत आहे. किसान सन्‍मान योजनेच्‍या माध्‍यमातून शेतक-यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्‍याचा निर्णय झाला. मागील पाच वर्षे ही योजना अखंडीत सुरु आहे. जिल्‍ह्यातील २ लाख ८२ हजार ३७९ शेतक-यांना ५६ कोटी ४७ लाख ४ हजार रुपयांचे अनुदान मिळाले असल्‍याचे खा.विखे पाटील म्‍हणाले.   या बरोबरीनेच खंतांच्‍या किमती कमी करण्‍यासाठी केंद्र सरकारने अनुदानाची उपलब्‍धता करुन दिली. शेती विषयक ज्ञान शेतक-यांना एकाच छत्राखाली मिळावे यासाठी किसान समृध्दी केंद्रांची स्‍थापना करण्‍यात आल्‍याचे सांगून ते म्‍हणाले की, नैसर्गिक आपत्‍तीमध्‍येही केंद्र आणि राज्‍य सरकार शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले आहे.  अतिवृष्‍टीमध्‍ये नुकसान झालेल्‍या मतदार संघातलील ३ लाख २५ हजार २८६ शेतक-यांना ३६५ कोटी ६५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्‍यात आली असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.  सहकार मंत्रालय स्‍थापन करुन, केंद्र सरकारने एैतिहासिक निर्णय घेतला. हे मंत्रालय सुरु झाल्‍यानंतर सहकारी साखर कारखान्‍यांवर वर्षानुवर्षे लादण्‍यात आलेला आयकराचा बोजा कमी करण्‍याचा निर्णय झाल्‍यामुळेच राज्‍यातील आणि जिल्‍ह्यातील सहकारी साखर कारखानदारी टिकून आहे. केंद्र सरकारने ऊसाच्‍या हमीभावातही सातत्‍याने वाढ केली.   ग्रामीण भागाच्‍या अर्थकारणाला सहाय्यभूत ठरणा-या प्राथमिक सोसायट्यांना सहकार मंत्रालयाच्‍या माध्‍यमातून आता नवी ओळख निर्माण करुन देण्‍याचे काम होत असून, धान्‍य गोदामांची उभारणी करण्‍यासाठीही प्राथमिक सोसायट्यांना सहकार्य करण्‍याची भूमीका तसेच प्रमुख पीकांकरीता हमीभावाची शाश्‍वती देताना अन्‍य २२ उत्‍पादीत पिकांनाही हमीभाव देण्‍याची हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्‍प पत्राच्‍या माध्‍यमातून दिली असल्‍याचे डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले.

Ahmednagar News: किसान सन्‍मान योजनेचा लाभ मतदार संघातील 2 लाख 82 हजार शेतकऱ्यांना Read More »

IMG 20240421 WA0001

BJP News: जनता दल से. यांचा डॉ. सुजय विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा

BJP News: महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचा वाढता जनसंपर्क पाहता विविध सामाजिक संघटना, धार्मिक संघटना आणि छोटेमोठे राजकीय पक्ष त्यांच्या समर्थासाठी पुढे येत आहेत. त्यात आता जनता जल सेक्युलर पक्षाची पडली आहे. अहमदनगर जनता दल से. चे जिल्हाध्यक्ष भगवान बांगर यांनी सुजय विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे सुजय विखे पाटील यांना अधिक बळ मिळाले आहे.  सुजय विखे पाटील हे अहिल्यानगरचे विद्यमान खासदार असून महायुतीच्या माध्यमातून भाजपचे उमेदवार म्हणुन रिंगणात आहेत. मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर ते मतदारांपुढे जात आहेत. महायुतीतील घटक पक्षांची त्यांना साथ मिळाल्याने त्यांची बाजू उजवी असल्याचे दिसून येत आहे. त्यात अनेक स्थानिक सामाजिक, धार्मिक संघटना त्यांना सहकार्य करत आहेत. यामुळे त्यांच्या विजयाचे मार्ग अधिक प्रबळ होत आहेत. त्यात आता जनता दल सेक्युलर जोडीला आल्याने जिल्ह्यातील त्यांचे मताधिक्य वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.  जनता दल से. चे जिल्हाध्यक्ष भगवान बांगर यांनी सांगितले की, सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर त्यांना आम्ही आमच्या पक्षाचा पाठिंबा जाहिर केला आहे. त्यासाठी जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे समन्वयक प्रसाद लाड यांच्याशी पाठिंब्या बाबत चर्चा केली असून त्यांच्या आदेशानुसार आम्ही त्यांना हा पाठिंबा पत्राद्वारे घोषित केला आहे. येणाऱ्या काळात सुजय विखे पाटील हे जिल्ह्याच्या विकासासाठी कामे करतील यावर आमचा विश्वास आहे. असे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

BJP News: जनता दल से. यांचा डॉ. सुजय विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा Read More »

IMG 20240221 WA0004

Lok Sabha Election : ‘या’ दिवशी सुजय विखे दाखल करणार उमेदवारी अर्ज

Lok Sabha Election : अहमदनगर दक्षिणेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील कधी आणि कशा पद्धतीने अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी माहिती दिली की, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थित २२ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.  अहिल्यानगर लोकसभेत भाजपचे उमेदवार हे विजयाचे प्रमुख दावेदार असल्याने त्यांच्या उमेदवारी अर्जाकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. अभय आगरकर यांनी सांगितले की, २२ एप्रिल रोजी डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ११ वाजता आपला अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. त्याचबरोबर आमदार मोनिका राजळे, आमदार प्रा. राम शिंदे, जिल्हाबॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री तथा आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार चंद्रशेखर कदम,माजी आमदार चंद्रशेखर घुले, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले, अनिल शिंदे यांच्यासह सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.  नगर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवाद करून आपल्या मिरवणुकीला सुरवात करणार आहेत. माळीवाडा वेस येथून विशाल गणपतीचे दर्शन घेत, पंच पीर चावडी मार्गे माणिक चौक, भिंगारवाला चौक, तेलीखुंट, चितळे रोड, स्वा. वीर सावरकर चौक, दिल्लीगेट ते निलक्रांती चौक येथे मिरवणुकीची सांगता होईल.यावेळी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि सत्कार केला जाणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप, महायुती आणि घटक पक्ष, मित्र, पक्षाचे हजारो कार्यकर्ते यावेळी हजर राहणार असल्याचे आगरकर यांनी सांगितले.  सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर जिल्ह्यातील जनतेचा कौल त्यांच्या बाजूने देशात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी सुरू आहे. यामुळे सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित असून ते मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Lok Sabha Election : ‘या’ दिवशी सुजय विखे दाखल करणार उमेदवारी अर्ज Read More »

IMG 20240224 WA0002

Sujay Vikhe News : मोदींनी 10 वर्षात जो विकास करून दाखवला तो इतरांना जमला नाही : खा. सुजय विखे

Sujay Vikhe News:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात जो विकास करून दाखवला इतका विकास देशात आजपर्यंत कधीही झाला नव्हता.  यामुळे देशात केवळ मोदी हमीचा विश्वास दिसून येत आहे. मोदींच्या शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. लोकसभा निवडणुकीच्या निमित्याने पुन्हा भाजपाचे सरकार आणण्याचा निर्धार देशातील जनतेने केला असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. पेडगाव येथील आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी प्रताप पाचपुते, अण्णासाहेब शेलार यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशात अनेक वर्षे सत्ता भोगूनही जे इतरांना करता आले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात करून दाखविले. जगाच्या कानाकोपऱ्यात देशाचे नावलौकिक निर्माण करण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. देशाने मागील १० वर्षात विविध क्षेत्रात आपली योग्यता सिद्ध करत प्रगती साधली आहे. त्याच बरोबर सर्वाधिक सरकारी योजना निर्माण करून त्या शेवटच्या लाभार्थांपर्यंत पोहचवून त्यांचे जिवनमान उंचावले आहे. शेतकरी, महिला, व्यापारी, तरुणांसाठी मोदी सरकारने भरीव काम केले आहे. यामुळे ३० कोटीहून अधील लोक गरिबीमुक्त झाले आहेत. यामुळे देशाने मोदींनाच प्रंसती देत दोन वेळा देशाची सेवा करण्याची संधी दिली आहे. आणि आता तिसऱ्यांदा सुद्धा त्यांचीच निवड होणार आहे. असा विश्वास खा. विखे पाटील यांनी सांगितले.  सुजय विखे पाटील यांनी देशाच्या योग्य नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योग्य पर्याय आहेत. सध्या देशात त्यांच्या इतका प्रभावी आणि दुरदुष्टी असलेला एकही नेता नाही. २०४७ पर्यंत भारत महासत्ता बनविण्याचे व्हिजन त्यांच्याकडे आहे. मागील १० वर्षात त्यांनी केवळ विकास कामांचे ट्रेलर दाखविले, अजून पुर्ण पिच्चर बाकी आहे. यामुळे मोदींचे हात बळकट करण्यासाठी लोकांनी मतदान करावे असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. नगर जिल्ह्यातही त्याच्या मार्फत मोठा निधी आला असून अनेक विकास कामे मार्गी लागली. यामुळे जिल्ह्यात पुन्हा विकासाचे पर्व महायुतीचा उमेदवारच सुरू ठेऊ शकतो. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

Sujay Vikhe News : मोदींनी 10 वर्षात जो विकास करून दाखवला तो इतरांना जमला नाही : खा. सुजय विखे Read More »

MP Sujay Vikhe

Ahmednagar News:  सुजय विखे यांचा विरोधकांवर घणाघात, म्हणाले माझ्याकडे…

Ahmednagar News: राहुरी येथिल एका सभेत बोलताना महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सुजय विखे यांनी विरोधकांवर टीका करत माझ्याकडे विकासाची ब्लू प्रिंट आहे तुमच्याकडे काय आहे? तुम्ही केलेले काम दाखवा अशा परखड शब्दांत टिका केली आहे.  नगर जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुका ह्या दुसऱ्या टप्प्यात आल्या असून जिल्ह्यातील रणधुमाळीला चांगलीच रंगत चढली आहे. प्रचारात आघाडीवर असेलेले महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या समर्थात ठिक ठिकाणी रॅली, सभा भरविल्या जात आहेत. त्यांच्या सभांना वाढत्या गर्दीने विरोधकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. अशाच पार्श्वभूमीवर राहुरी शहर येथे त्यांच्या समर्थासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.  सुजय विखे पाटील म्हणाले की, मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचारात केवळ विकास कामांवर आपण चर्चा केली असून विरोधात कोण आहे? याचा विचार केला नसून कोणावरही टिका टिप्पणी केली नाही. केवळ मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपण मैदानात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचा विकास हे एकमेव ध्येय ठेवून आपण राजकारणात आले असून, जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावणे, रोजगार निर्मिती करणे, महिलांचे सक्षिमिकरण करणे, जिल्ह्यात विकासाच्या पायाभूत सेवा सुविधा निर्माण करणे, सक्षम जिल्हा तयार करण्यासाठी माझ्याकडे विकासाचा अजेंडा असून येणाऱ्या पाच वर्षात नगरकरांना त्याचा अनुभव येईल. विरोधकांकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही, त्यांचे हात भष्ट्राचाराने बरबटले आहेत. त्यांच्या दहशतीने व्यापारी हैराण झाले आहेत. सामान्य जतना  वैतागली असताना केवळ आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण करू शकतात. त्यामुळे त्यांना आपण कोणतेही महत्व देत नसून विकास कामांवर चर्चा करण्याचे खुले आवाहन त्यांनी विरोधकांना दिले.  मतदार संघात सुजय विखे यांच्या प्रचार सभां लोकांची गर्दी खेचत आहेत. केवळ विकास कामांचे मुद्दे घेऊन रिंगणात आलेले सुजय विखे पाटील यांना तरुणांची चांगली पसंती मिळत आहे. तरूण त्यांना विळखा घालून सेल्फी काढण्यासाठी गर्दी करत आहेत.

Ahmednagar News:  सुजय विखे यांचा विरोधकांवर घणाघात, म्हणाले माझ्याकडे… Read More »

IMG 20240419 WA0002

Sujay Vikhe : जो रामाचा नाही तो कोणाच्‍याही कामाचा नाही: सुजय विखे

Sujay Vikhe :  जो रामाचा नाही तो कोणाच्‍याही कामाचा नाही. असा संदेश देत आयोध्‍येमध्‍ये राम मंदिराचे निर्माण करुन कोट्यावधी भारतीयांच्‍या  अपेक्षा पुर्ण करणा-या नरेंद्र मोदींनाच पुन्‍हा जनता जनार्दन तिस-यांदा पंतप्रधान करेल असा विश्‍वास महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला.   पारनेर येथे आयोजित केलेल्‍या कार्यक्रमात खा.डॉ.विखे पाटील पाटील यांनी उपस्थित नागरीकांशी संवाद साधला. या निमित्‍ताने त्‍यांनी देशामध्‍ये पुन्‍हा एकदा भाजपाची सत्‍ता येणार आहे. ज्‍यांनी राम मंदिराचे दिलेले आश्‍वासन पुर्ण केले त्‍यांनाच सत्‍तेवर बसविण्‍याचा निर्धार देशातील नागरीकांनी केला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  पारनेर तालुक्‍यातील राजकारण वेगळ्या दिशेला नेण्‍याचा प्रयत्न झाला. मागील साडेचार वर्षात ज्‍या गोष्‍टी तालुक्‍यात घडल्‍या त्‍यातून युवकांची हेळसांडच झाली. सर्वसामान्‍य लोकांमध्‍ये निर्माण झाली. खदखद आणि झालेला त्रास बाहेर येवू लागला आहे. विजय औटींसारखा कार्यकर्ता जनतेचे अश्रू पुसण्‍यासाठी पुढे आला, याचा मोठा आधार पारनेरच्‍या जनतेला मिळाला असल्‍याचे खा.विखे पाटील म्‍हणाले.    तालुक्‍यात काय चालले आहे हे सर्वांना माहीती आहे, अन्‍याय करणा-या घटना सातत्‍याने घडत आहेत. पण एक गोष्‍ट लक्षात ठेवा या शहराच्‍या पाणी योजनेसाठी येणा-या काळात आपल्‍याला काम करायचे आहे. शहराची पाणी योजना पुर्ण करण्‍याचा शब्‍द मी देत असून, मी जो शब्‍द देतो तो पुर्णच करतो अशी ग्‍वाही त्‍यांनी देतानाच, सर्व युवकांनी संयमाने राजकारण करावे, युवकांचे भविष्‍य खुप महत्‍वाचे आहे. त्‍यांच्‍यासाठी आपल्‍याला आपल्‍याला काम करायचे आहे.   रोजगाराची संधी निर्माण करणे हेच आपले उदिष्‍ट असून, जिल्‍ह्याच्‍या औद्योगिक आणि पर्यटन विकासातून रोजगारची निर्मिती करण्‍याचा आराखडा तयार करण्‍यात आला असून, व्‍यक्तिगत टिका करण्‍यापेक्षा विकासाच्‍या बाबींवर निवडणूकीत चर्चा होण्‍याची आवश्‍यकता आहे. मतदार संघातील जनता सुज्ञ असून, विकासाच्‍या  आणि विचारांच्‍या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्‍याची परंपरा या निवडणूकीतही कायम राहील अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यकत केली.

Sujay Vikhe : जो रामाचा नाही तो कोणाच्‍याही कामाचा नाही: सुजय विखे Read More »

IMG 20240406 WA0015

Sujay Vikhe News: जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : डॉ. विखे पाटील

Sujay Vikhe News:  मागील पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून भरपुर निधी मिळाला असून जिल्ह्याच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. नगर येथील देहरे गावातील प्रचारसभेत ते बोलत होते.  सुजय विखे पाटील आणि जिल्ह्यात आणलेला निधी आमि त्यातून झालेल्या यांनी विकास कामांच्या जोरावर मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. डॉ. विखे पाटील यांच्यासह या बैठकीला जिल्हाबॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, देहरे गावच्या सरपंच नंदाताई भगत, ऱभाजी सुळ, अंबादास काळे, रमेश काळे, केशवराव अडसुरे,सुनिल जाधव, संजय बाचकर व इतर प्रमुख स्थानिक नेते उपस्थित होते.    सुजय विखे पाटील म्हणाले की, विकास हाच माझा अजेंडा असून त्यासाठी मी सदैव कटीबद्ध आहे. मागील पाच वर्षात मी केलेल्या कामांचा आढावा घ्या, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची जिल्ह्यात झालेली प्रभावी अंमलबजावणी ही आपल्या जमेची बाजू असून शेवटच्या लाभार्थांपर्यंत योजनेचा लाभ पोहचला आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यात लवकरच तीन नव्या एमआयडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. मोठ मोठे उद्योग जिल्ह्यात येणार आहे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी माझ्याकडे ध्येय आणि धोरणे आहेत. यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील प्रमुख प्रश्नांची यादी तयार असून त्यांना मार्गी लावण्यासाठी आपण अविरत प्रतत्न करू असे विखे पाटील यांनी सांगितले.  आपल्या विकास कामांची माहिती देत असताना त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वनेता म्हणुन गौरव करत. मागील दोन दशकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सर्वाधिक कल्याणकारी योजना राबविल्या. देशाच्या आर्थिक धोरणाला चालना दिली, आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण करत देशाला जगात किर्ती मिळवून दिली. त्यामुळे देशात केवळ मोदीपर्वाचीच हवा असून पुन्हा एकदा त्यांच्या रुपाने एक मजबूत नेतृत्व देशाला मिळणार आहे. यामुळे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान मोदींना साथ द्या असे आवाहन सुद्धा त्यांनी मतदारांना केले आहे.  सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, निवडणुकीला कमी दिवस राहिले असल्याने विरोधक खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणार आहेत. बिनबुडाचे आणि खोटे आरोप करतील. त्यांनी तुम्ही कोणतेही प्रतिउत्तर न देता केवळ आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहचवा. विजय केवळ आपलाच आहे. त्यात फक्त आपले मताधिक्य कसे वाढेल यावर भर द्या असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना देत त्यांच्यात उर्जा भरली.

Sujay Vikhe News: जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : डॉ. विखे पाटील Read More »