DNA मराठी

Ahmednagar Municipal Corporation

img 20250918 wa0001

Sawedi Plot Scam: सावेडी भूखंड प्रकरणः खरेदी झाली पण…, चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी…?

Sawedi Plot Scam: अहिल्यानगर जिल्ह्यातील सावेडी तालुक्यातील स. न. २४५/ब १.३५ हे जमिनीचे खरेदी विक्री प्रकरण सध्या गाजत आहे. महाराष्ट्र महसूल व वन विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या या प्रकरणात एकतर खोट्या खरेदी दस्तावेजांचा वापर करून जमिनीचे व्यवहार घडवून आणले गेले आहेत किंवा संबंधित अधिकारी प्रांताधिकारी, अपर तहसिलदार, मंडळ अधिकारी यांनी नियमांचे उल्लंघन करत या जमिनीच्या फेरफाराला न्याय्यतेचा मुखवटा दिला आहे, असा आरोप उभा राहिला आहे. दुसरे खरेदी खत झाले त्याबद्दल वाद नाही पण संशयित खरेदी खतावर कारवाई कधी, हा प्रश्न उभा राहिला आहे, अशा खरेदी खातांना पाठबळ मिळाले तर येणार कला सर्वसामान्य नागरिकांसाठी घोक्याची घंटा आहे. प्रकरणाचा तपशील सदर प्रकरण मौजे सावेडी ता. जि. अहिल्यानगर येथे स. नं. २४५/ब२ मधील फेरफार क्रमांक ७३१०७ मंजूर दिनांक १७/०५/२०२५ या संदर्भात सुरू आहे. जमिनीचे एकूण क्षेत्रफळ ०.६३ हे. आर असून, दुय्यम निबंधक अहमदनगर दक्षिण यांच्या दस्तावेज क्र. ४३०/१९९१, दिनांक १५/१०/१९९१ अन्वये घेतलेले खरेदी दस्तावेज खोट्या असल्याचे दिसून आले आहे. उप विभागीय अधिकारी अहिल्यानगर भागाकडे अर्ज दाखल करण्यात आला असता त्यानुसार चाचणी करण्यात आली. खरेदी देणार अब्दुल अजिज डायाभाई (वडील) आणि खरेदी घेणार पारसमल मश्रीमल शहा यांच्या दरम्यान व्यवहार घडवून आणला गेला, तरीही वाटपाच्या प्रमाणाप्रमाणे व चुक दुरुस्ती लेखाबाबत शंका निर्माण झाली आहे. कायद्याचे खुले उल्लंघन महत्त्वाची बाब म्हणजे, महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५०(२) नुसार नोटीस बजावणी न करता फेरफार केले जाणे पूर्णपणे अनियमित ठरते. अप्पर तहसिलदारांनी आणि संबंधित प्रांताधिकाऱ्यांनी नोटीस टपालाद्वारे बजावणी न करता अत्यंत तातडीने, फक्त २० दिवसांत नोंद प्रमाणित करण्याची कारवाई घडवून आणली. यामुळे प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तसेच, खरेदी दस्त क्र. २८८५४/२००२ व फेरफार क्र. २७०१८ प्रमाणे अजिज डायाभाई व साजिज डायाभाई यांना मिळकत दिल्याचे दाखवले आहे. मात्र, वाटपामध्ये व चुक दुरुस्तीमध्ये नावे भिन्न दाखवले गेले आहेत. यामुळे आता या प्रकरणामध्ये दस्तऐवज बनावट असल्याची शक्यता स्पष्ट झाली आहे. अप्पर तहसिलदारांची गुप्त कारवाई सर्वसामान्य नागरिकांना सरकारी व्यवहारात नोटीस बजावणी करणे अनिवार्य असताना, अप्पर तहसिलदार स्वप्निल ढवळे यांनी प्रकरण जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्याकडे चर्चेसाठी पोहोचण्याऐवजी, स्वतःच एकाच दिवशी (१४/०८/२०२५) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना तसेच सह दुय्यम निबंधकांना पत्र मारून व्यवहार पुढे नेण्याची कारवाई केली. ही कारवाई प्रकरणाचा फेरफेर करण्याऐवजी त्यात अधिकच संशयास्पदपणा निर्माण करते. याच वेळी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी वेळकाढू धोरण अवलंबून प्रकरणात कोणतीही तातडीने कारवाई न करता उलट जाणीवपूर्वक विलंब केला. या विळख्यात जमीन घोटाळा करणाऱ्या संशयित व्यक्तींना पाठबळ दिल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाची भूमिका : दोषपूर्ण आणि ढासळलेली उप विभागीय अधिकारी अहिल्यानगर भाग व अपर तहसिलदार यांनी संबंधित ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई प्रस्तावित केली नाही. तसेच, कारवाई प्रस्ताव न सादर करणे म्हणजे घोटाळ्याची स्वीकार्यता मानण्यासारखेच ठरते. याव्यतिरिक्त प्रकरणी सुशासन आणि पारदर्शकतेचे पूर्ण उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बाब महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २५८ अन्वये पुनर्विलोकनात घेऊन प्रकरणाची योग्य चौकशी व निर्णयाची गरज अधोरेखित करते. जनतेचा विश्वास फाटला सदर प्रकरणाच्या सतत मिडिया ट्रायलमुळे जनतेमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. लोकांच्या मनात सरकारच्या प्रशासनावर विश्वास हरवला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लोकांनी बळकट आवाज उठवायला हवा. मात्र, प्रशासनाने स्वतःच अशा व्यवहारांमध्ये सामील होऊन परिस्थिती अजूनच विकृत केली आहे. तत्पर कारवाई आणि गंभीर पुनरावलोकन आवश्यक सावेडी भूमाफिया प्रकरणातील भ्रष्टाचाराची जमीनीवरची खोली समजून शासनाने तत्काळ कारवाई करावी लागेल. नियमांचे पालन, पारदर्शकता व समाजाची हितवृत्ती हा प्रत्येक अधिकाऱ्याचा कर्तव्य असले पाहिजे. शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रभावशाली व्यक्ती व भूमाफियांचा दबाव टाळून शासनाच्या न्यायालयीन प्रक्रियेला पूर्णपणे प्राधान्य द्यावे. “भूमी ही लोकांच्या सुरक्षिततेची दागिना असते, ती कोणत्याही प्रकारच्या घोटाळ्यापासून मुक्त राहिली पाहिजे.” अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांनी तातडीने सुनावणी पूर्ण करून दोषी अधिकार्यांविरुद्ध कडक कारवाई करणे अत्यावश्यक ठरेल, अन्यथा शासनाची कायदा अंमलबजावणीची प्रतिमा पूर्णपणे धूसर होण्याचा धोका निर्माण होईल.

Sawedi Plot Scam: सावेडी भूखंड प्रकरणः खरेदी झाली पण…, चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी…? Read More »

img 20250917 wa0004

Ahilyanagar Politics: गोमांस प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई, एकाला अटक

Ahilyanagar Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील कत्तलखाने बंद करा आणि कोठला परिसरात गोमांस फेकणाऱ्या आरोपीला अटक करा या मागणीसाठी रस्तारोको आंदोलन 16 सप्टेंबर रोजी केला होता. तर दुसरीकडे आता या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एकाला अटक केली आहे. तरबेज आबीद कुरेशी, वय 24 वर्षे, रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, ता. जि. अहिल्यानगर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली 40 हजार किंमतीची मोपेड गाडी देखील जप्त केली आहे. सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Ahilyanagar Politics: गोमांस प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई, एकाला अटक Read More »

Nilesh Lanke: नगरच्या राजकारणात नवीन ट्विस्ट, मनपा प्रभाग रचनेवर लंकेंची हरकत; केली मोठी मागणी

Nilesh Lanke : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी नवी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. मात्र आता या प्रभाग रचनेवर खासदार निलेश लंके यांनी हरकत घेत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. ३ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभागांच्या भूसीमांबाबतचे प्राधिकृत प्रकाशन रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. लंके यांनी निवेदनात नमूद केले आहे की, नव्या प्रभाग रचनेत अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय व महिलांसाठी राखीव जागांचा कोणताही तपशील दिलेला नाही. हे भारतीय संविधानाच्या कलम १६, २४३(टी), २४३(एस) तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ५(अ) च्या तरतुदींना सरळ विरोध करणारे आहे. खासदार लंके यांनी आरोप केला की प्रभागांची रचना गुगल मॅपवर वाकड्या-तिकड्या रेषा मारून, गोपनीयतेचा भंग करत व मतदारसंघांची ताटातूट करून करण्यात आली आहे. “राजकीय विरोधकांना संपवण्यासाठीच हा डाव आखण्यात आला आहे,” असा त्यांचा दावा आहे. २०१८ च्या मनपा निवडणुकीत तत्कालीन आयुक्तांनी प्रत्येक प्रभागाचे आरक्षण जाहीर करून नागरिकांच्या हरकती मागवल्या होत्या. मात्र यावेळी त्या प्रक्रियेचे उल्लंघन झाले असून, हरकती दाखल करण्याचा मूलभूत अधिकारही नागरिकांकडून हिरावून घेतल्याचा आरोप लंके यांनी केला. नगर विकास विभागाच्या १० जून २०२५ च्या आदेशातील नैसर्गिक मर्यादा- मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रेल्वे रुळ यांचा विचार न करता ही रचना करण्यात आली आहे, असेही निवेदनात नमूद आहे. त्यामुळे २०१८ प्रमाणेच जुनी प्रभाग रचना कायम ठेवूनच आगामी महानगरपालिका निवडणूक घ्यावी, अशी ठाम मागणी खासदार लंके यांनी केली आहे.

Nilesh Lanke: नगरच्या राजकारणात नवीन ट्विस्ट, मनपा प्रभाग रचनेवर लंकेंची हरकत; केली मोठी मागणी Read More »

Ahilyanagar News: मुकुंदनगरमध्ये पोलीस बंदोबस्तात पालिकेची अतिक्रमण मोहीम

Ahilyanagar News: नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या वतीने अतिक्रम मोहीम राबविण्यात येत आहे. आज 25 फेब्रुवारी रोजी मुकुंदनगर परिसरात पोलीस बंदोबस्तासह महापालिकेने अतिक्रम मोहीम हाती घेतली. यावेळी महापालिकेकडून इरिगेशन रोड, बडी मशिद, अल- अमीन ग्राउंड, गरीब नवाज मशीद, विखे पाटील शाळा परिसर, आयशा मशिद परिसरात अतिक्रम मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत अनेक टपऱ्या, हातगाड्या, दुकानावरील पत्र्याचे शेड हटवण्यात आले. महापालिकेकडून शहरात आणि उपनगर भागात अतिक्रम मोहीम राबवण्यात येत आहे. पालिकेकडून त्याची माहिती देखील देण्यात आली आहे तसेच वेळापत्रक देखील सार्वजनिक करण्यात आला आहे. याच बरोबर नागरिकांनी अतिक्रमण केले असल्यास ते तात्काळ काढून घ्यावे. असं आवाहन देखील पालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

Ahilyanagar News: मुकुंदनगरमध्ये पोलीस बंदोबस्तात पालिकेची अतिक्रमण मोहीम Read More »

Ahmednagar News: मोठी बातमी! अटकपूर्व जामीनसाठी पंकज जावळे यांचा अर्ज, आज होणार सुनावणी

Ahmednagar News: अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीनसाठी अहमदनगर न्यायालयामध्ये अर्ज केला आहे. पंकज जावळे यांच्या या अर्जावर आज (4 जुलै) दुपारनंतर अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.   एसीबीने एका बांधकाम व्यवसायिकाला आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी आयुक्त पंकज जावळे आणि स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून आयुक्त पंकज जावळे आणि देशपांडे दोघेही फार आहेत. सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहे.  छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यातील एसीबीचे पथकाने अहमदनगर महापालिकेत कारवाई करून पंकज जावळे आणि स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सुनवाईत त्यांना अटकपूर्व जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Ahmednagar News: मोठी बातमी! अटकपूर्व जामीनसाठी पंकज जावळे यांचा अर्ज, आज होणार सुनावणी Read More »

Ahmednagar News: मुकुंदनगरमधील शांतीधाम मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य, अनेकांचे आरोग्य धोक्यात मात्र महापालिकेकडून दुर्लक्ष

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरामध्ये असणाऱ्या शांतीधाम मंदिर परिसरात घणीचे साम्राज्य वाढत चालले आहे. मात्र तरी देखील महापालिकेकडून याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.  शांतीधाम मंदिर परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घाणीकडे महापालिकेकडून कुठलेही कारवाई होत नसल्याची तक्रार स्थानिकांकडून होत आहे. या प्रकरणात स्थानिक नागरिक आणि शांतीधाम मंदिरच्या ट्रस्टकडून अहमदनगर महापालिकेला वारंवार तक्रार देण्यात आली आहे मात्र तरी देखील अहमदनगर महापालिकेकडून कुठलेही कारवाई होताना दिसत नाही.  या परिसरात वाढत असणाऱ्या घाणीमुळे आजारांचा धोका वाढत चालला आहे. यामुळे महापालिकेने कारवाई करीत परिसर स्वच्छ करावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Ahmednagar News: मुकुंदनगरमधील शांतीधाम मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य, अनेकांचे आरोग्य धोक्यात मात्र महापालिकेकडून दुर्लक्ष Read More »

Ahmednagar Shivaji Maharaj Statue: शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करा : नगरसेविका शिला दीप चव्हाण यांची मागणी

Ahmednagar Shivaji Maharaj Statue : ऐतिहासिक अहमदनगर शहरातील महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येणार आहे.   या पुतळ्याचे अनावरण मराठा समाजाच्या हक्कासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात यावे अशी मागणी पालिका सभागृहात नगरसेविका शिला दीप चव्हाण यांनी केली आहे. तसेच मनपा आयुक्त व महापौर यांना देखील त्यांनी या मागणीचे पत्र दिले आहे. त्यांनी या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन आदर्श राज्याची निर्मिती केली आहे. यामुळे त्यांचा महापालिकेत बसविण्यात आलेला पुतळा सर्वांना प्रेरणा व ऊर्जा देणारा आहे. अहमदनगर महापालिका प्रशासनाने गुरुवारी (दि.21 डिसेंबर) रोजी महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे नियोजन केले आहे.  या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते झाल्यास सर्व नगरकरांना आनंद होईल.मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला आरक्षण मिळावा यासाठी स्वत:च्या मालकीची जमीन विकून संघर्ष करत आहे. यामुळे ते एक लढवय्ये कार्यकर्ते आहे. आज समाजासाठी सर्वस्वी त्याग करण्याची त्यांची भूमिका आहे.

Ahmednagar Shivaji Maharaj Statue: शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करा : नगरसेविका शिला दीप चव्हाण यांची मागणी Read More »