DNA मराठी

Sujay Vikhe: जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडीनंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

img 20261117 wa0011

Sujay Vikhe : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद घेतले तसेच त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची सद्यस्थिती, जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक सक्षम आर्थिक पाठबळ देणे, सहकारी संस्थांचे बळकटीकरण आणि ग्रामीण भागाच्या विकासात बँकेची भूमिका यासंदर्भात यावेळी चर्चा झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या हातून चांगले काम घडावे, अशा अपेक्षाही व्यक्त केल्या.

यावेळी झालेल्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी दिलेले मार्गदर्शन आणि शुभेच्छा आपल्यासाठी महत्त्वाच्या असल्याची भावना डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *