Ahmednagar News: अभिनेते सिद्धार्थ जाधव, निर्माते दिग्दर्शक डॉ.मयूर तिरमाखे,अभिनेत्री मयुरी देशमुख,अभिनेत्री अमिता कुलकर्णी यांचा “लग्नकल्लोळ” हा सिनेमा 1 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
त्यानिमित्ताने या सिनेमाची संपूर्ण टीम प्रमोशनसाठी रेडिओ नगर 90.4 एफएम येथे आली होती. त्यांची मुलाखत Rj Renuka यांनी घेतली.
या टीमचे स्वागत रेडिओ नगरचे स्टेशन हेड संदीप क्षीरसागर यांनी केले.
सर्व कलाकार यांना रेडिओचे संचालक भूषण देशमुख यांनी रेडिओ नगरचे माहिती पत्रक, स्नेहालयचे परिवर्तन पहाट पुस्तक देऊन त्यांच्या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळेस रेडिओ नगरचे आरजे कोमल,आरजे चिन्मयी,आरजे आदिती सब्बन, एडिटर अंशुल सब्बन, उद्धव वाघ, युवा निर्मांचे विकास सुतार,संतोष धर्माधिकारी,आदी उपस्थित होते.