Shivendra Raje Bhosale : साताऱ्यातील करहरमध्ये शिवेंद्रराजेंनी जोरदार हल्लाबोलकरत ‘पुनर्रचना देवाभाऊच करणार, गैरसमज ठेवू नका’ असा ठणकावून इशारा विरोधकांना इशारा दिला.
यावेळी शिवेंद्रराजे म्हणाले की, “मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे. वेळ आली तर कोणालाच सोडणार नाही!”असे ज्वालाग्राही शब्द उच्चारत सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्याच्या करहर येथील प्रचारसभेत शिवेंद्रराजे भोसले अक्षरशः बरसले. त्यांच्या या आक्रमक आणि स्पष्ट इशाऱ्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला. विरोधकांकडून सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्यांना थेट उत्तर देत शिवेंद्रराजेंनी रणसिंघ फुंकला.
सन 2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जावळी तालुक्याची विधानसभा निहाय पुनर्रचना होणार, आणि त्यातून आपल्याला पुन्हा संधी मिळणारअशी दिवास्वप्नं काही नेत्यांना पडू लागली आहेत, असा टोला लगावत शिवेंद्रराजे म्हणाले, “मी स्पष्ट सांगतो ही सगळी पुनर्रचना महाराष्ट्राचा बॉस देवेंद्र फडणवीसच करणार. देवाभाऊ माझा नेता आहे.
त्यामुळे कोणीही गैरसमज पाळू नका.” या शब्दांतून त्यांनी नेतृत्वावरील निष्ठा आणि राजकीय दिशा ठामपणे मांडली.
तर ठेकेदारीच्या आरोपांवर विरोधकांनी सुरू केलेल्या टीकेला थेट न्यायालयीन वास्तवासह प्रत्युत्तर देत करहर येथील प्रचारसभेत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जोरदार हल्लाबोल केला.
नवी मुंबईतील मार्केट कमिटीच्या शौचालय बांधकाम प्रकल्पात कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी थेट आरोपपत्र दाखल असल्याचा उल्लेख करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
“ज्यांच्यावर कोर्टात कारवाई सुरू आहे तेच आज आम्हाला नैतिकतेचे धडे देत आहेत.”नाव न घेता शशिकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधताना शिवेंद्रराजे म्हणाले की, ज्यांच्या भ्रष्ट व्यवहारांचे कागद न्यायालयात आहेत, त्यांनी आधी स्वतःकडे पाहावे. आमच्यावर आरोप करण्याची पात्रता त्यांनी केव्हाच गमावली आहे.
शिवेंद्रराजे यांनी या प्रकरणातील सविस्तर माहिती केरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्याकडे असल्याचेही ठामपणे सांगितले, ज्यामुळे सभास्थळी एकच खळबळ उडाली.
7 फेब्रुवारी रोजी 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महापालिका निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा भाजप बाजी मारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.






