DNA मराठी

अतिक्रमणाची दाखल न घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाचे विशाल वालकर यांचे उपोषण सुरू

IMG 20250623 WA0003 1024x576

Ahilyanagar News : शहरातील माणिक चौक या ठिकाणी असलेले पक्के अतिक्रमण महानगरपालिकेच्या प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा त्याची दखल न घेतल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व्यापारी शहर प्रमुख विशाल वालकर यांनी आज महानगरपालिकेच्या समोर प्रशासनाच्या विरोधामध्ये उपोषण सुरू केले.

महानगरपालिकेच्या प्रशासनाने अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेली असताना देखील सुद्धा कारवाई केली नाही उलट अनेक ठिकाणी मोजक्या कारवाई करून वेळ मारून देण्याचा प्रकार घडलेला आहे असेच उदाहरण शहरातील माणिक चौक भागांमध्ये पाहायला मिळालेले आहे.

महानगरपालिकेच्या माध्यमातून ठिक ठिकाणी रस्त्याची, ड्रेनेजची कामे चालू आहेत. त्यापैकी एकमुखी दत्त मंदीर चौक, सोपानराव वडेवाला समोर, माणिक चौक येथे आशा टॉकीज चौक ते कापड बाजार येथे चालु असलेल्या ड्रेनेज लाईन व काँक्रीटीकरणचे कामाच्या रस्त्यात अडथळा निर्माण करणारे ओटे, पत्रा शेड इ. अतिक्रमण हटवुन काम पुर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. सदर मालमत्ता सि.स.नं. ३६१८/२ या ठिकाणी सन २०१९ पासून अशोक छल्लानी व भागीदार यांनी या मालमत्तेमध्य बेकायदेशीर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाची कुठलीही परवानगी न घेता विनापरवाना बांधकाम करुन गाळे बांधून महानगरपालिकेच्या जागेमध्ये १० फुटाचा ओटा, पत्र्याची शेड बांधून मोठे अतिक्रमण केले आहे.

तसेच अशोक छल्लानी व इतर भागीदार यांनी त्या बेकायदेशीर बांधकाम केलेल्या गाळ्यांमध्ये भाडेकरी टाकले असुन सदर जागेवर डी.एस.पी. फुटवेअर व फुटी फुटवेअर व इतर दुकाने या दोन दुकानदारांनी दुकानासमोर महापालिकेच्या जागेमध्ये वीजेचा खांब पत्रा शेडच्या आत घेऊन रस्त्यावर १० फुट X २० फुट ओटा व पत्राशेड बांधुन मोठे अतिक्रमण केले आहे. तरीपण संबंधीत मालमत्ताधारक हा महानगरपालिकेला न जुमानता वारंवार अतिक्रमण केलेले आहे.

सदर अतिक्रमणाबाबत वालकर यांनी मनपास दिनांक ३० मे २०२५ रोजी आयुक्त रितसर तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या तक्रार अर्जाकडे महापालिका, अतिक्रमण विभाग व प्रभाग समिती नं. २ या विभागांना संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना समक्ष भेटून तक्रारीचे निरसन करण्याची विनंती केली होती. परंतु सदर सर्व विभागांनी याकडे दुर्लक्ष केलेले होते.त्यामुळे दि.१३ रोजी उपोषणाला बसण्याचे आवाहन केले होते, त्या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाने मला दिनांक ०9 रोजी पत्र देऊन अश्वासन दिले की, नगर रचना विभागामार्फत माकींग करुन अहवाल सादर झाला की, उचित कारवाई करण्यात येईल असे पत्र देवून संबोधले होते, या करीता मी उपोषण स्थगित केले होते.

प्रभाग समिती क्र. २ ने नगर रचना विभागाला रितसर अभिप्राय मिळावा या करीता मागणी केली होती, त्या मागणीचा रोड मार्कीग करुन अतिक्रमण केलेला अभिप्राय त्यांना दि. ९ रोजी प्राप्त झालेला आहे. तरी देखील आज पर्यंत महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही अद्याप केलेली नाही व रोडचे काम पुर्णत्वाकडे जात आहे.

दरम्यान, वालकर यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आज सकाळी महानगरपालिकेने त्या ठिकाणी जाऊन फक्त पत्राची शेड बाजूला केली मात्र पक्के बांधकाम तसेच ठेवले आहे. त्यामुळे आज पासून माणिक चौक येथील अतिक्रमण कारवाईच्या संदर्भात प्रशासनाने दिरंगाई केल्यामुळे वालकर यांनी उपोषण सुरू केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *