Sadabhau Khot : गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू आहे यांचे कॉर्पोरेट ऑफिस आहेत मात्र शेतकऱ्यांना याचा त्रास होत आहे असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
सरकारने कारवाई केली नाही तर पोलीस स्टेशन समोर आम्ही जनावराच्या छावण्या उभं करू असा इशारा देखील माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी दिला.
माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, गाई म्हशीमध्ये शेण दूध आमची माय बहिण बाप काढतो आणि हे गोरक्षक म्हणणारे मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस मधून धंदा करत आहेत. सरकारला माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांची ही मी बोलणार आहे की बाबा शेतकऱ्यांचा व्यवसाय आशाने मरून जाईल गाड्या अडवल्या जातात त्यांना मारलं जातं त्यामुळे यावर कारवाई करा.
थार सारख्या कॉर्पोरेट गाड्या मधून काही लोक पुण्या मुंबईवरून येतात आणि आमच्या गोरक्षणाचा काम करत असल्याचे सांगतात. गोरे गुंठे असतात तुम्हाला कळत नाही शहरात कुत्रे मांजर बघितले यांच्याकडे गाई गोटे कुठून आले असं सदाभाऊ खोत म्हणाले.
पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनाशी आम्ही चर्चा करू जे शेतकरी नेते माझ्यावर टीका करत आहेत त्यांना या बैठकीमध्ये बोलून यावर त्वरित उपाय काढण्याचा प्रयत्न करू. आम्ही आता गोसावी जाणार आहोत काल पोलिसांच्या समोर पंचनामा केला तिचे एकही जनावर नव्हतं तेच पोलीस पुन्हा म्हणतात सात जनावर होते आज परत पोलिसांना सांगितले आमचे 21 जनावर आहेत तर ते म्हणतात हा असते त्यामुळे कोणीतरी त्यांना पाठीशी घातले हे दिसतं.
पोलीस खात्यामध्ये सुद्धा या संदर्भात कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.
राजस्थान इतर राज्यातून दूध देणाऱ्या गाई अशा तथाकथित गोरक्षकाकडून जर गाड्या अडवल्या तर येणार नाहीत शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसान होईल शेतकरी भरडला जाईल. सरकार जरी आमचा असलं तरी मी शेतकरी नेता आहे त्यामुळे या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं टाकण्यासाठी आम्ही आज इथं आलो आहोत आमचे जनावर आम्हाला दिली पाहिजे. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.