DNA मराठी

MBBS प्रवेशातील आरक्षण 50% वरून 25% वर; विद्यार्थ्यांचा संताप, सरकारवर टीका

mbbs

MBBS Reservation: महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी एक धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील निजी अनएडेड (Unaided) मेडिकल महाविद्यालयांमधील MBBS प्रवेशासाठी राखीव जागांचे प्रमाण 50 टक्क्यांवरून थेट 25 टक्क्यांवर आणण्यात आले आहे. या निर्णयामुळे शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे या मुळे विध्यार्थी आक्रमक झाले आहे.

या मुळे आरक्षणातील कपातीमुळे एकूण 766 विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी हुकणार आहे, असा दावा सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी संघटनांनी केला आहे. याबाबत डॉ. सिद्धांत भारणे यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया देत म्हटले की, “हा निर्णय पूर्णपणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असून हे एक नियोजित षडयंत्र असल्यचे बोलले आहे”

राज्यातील विविध भागातील विद्यार्थी संघटनांनी या निर्णयाचा तीव्र विरोध सुरू केला आहे.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबईसह अनेक शहरांमध्ये आंदोलने होत असून विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यांना या संदर्भात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

पूर्वी 50 टक्के आरक्षणामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात आपला वाटा निश्चित करता येत होता. मात्र आता तो हिस्सा अर्ध्यावर आल्याने सामाजिक समतेच्या तत्त्वाला धक्का बसल्याची टीका होत आहे. आधीच महागडी फी व आर्थिक अडचणींच्या कचाट्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

हा निर्णय सरकारच्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला असल्याचे समजते, परंतु यामागील नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. वैद्यकीय शिक्षण विभाग या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करेल अशी अपेक्षा आहे.

या निर्णयाने आता राजकीय वादाला देखील तोंड फुटले आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर हल्ला चढवला असून, “शैक्षणिक संधी कमी करून सामाजिक न्यायाचा गळा घोटण्याचा प्रयत्न सुरू आहे” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *