Pune News : पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात पाण्याची टाकी कोसळून 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
भोसरीतील सदगुरुनगर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले असून अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या ठिकाणी लेबर कॅम्पमधील काही कामगार राहत होते. बिल्डरने तकलादू पद्धतीने ही पाण्याची टाकी उभारली होती, असा आरोपही नागरिकांनी केला आहे. आज सकाळी सुमारे 7 च्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे.
टाकीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आतापर्यंत चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर काही कामगार जखमी झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवडमधील अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या हा ढिगारा हटवून जखमींना बाहेर काढले जात आहे. तसेच सध्या जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे.मात्र या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह काढण्यास नातेवाईकांडून विरोध दर्शवला जात आहे.