PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. नाशिक येथे आयोजित एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला.
या सभेत बोलताना त्यांनी वीर सावरकर यांना काँग्रेसचे युवराज संपूर्ण देशात फिरून शिव्या देतात मात्र सावरकर यांचा वारसा जपण्याचा दावा करणारे आज काँग्रेससोबत आहे. असं देखील नरेंद्र मोदी म्हणाले.
तसेच आमची सरकार आली तर राज्यातील शेतकऱ्यांना 12 ऐवजी 15 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार असल्याची घोषणा देखील मोदींनी नाशिकमधून केली.
तर राज्यातील अनेक विकास कामे थांबवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीची सरकार आणा असा आवाहन देखील त्यांनी केला.
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, जर राज्यात महाविकास आघाडीची सरकार आली तर राज्यात सुरु असणारी लाडकी बहिण योजना बंद होणार असा दावा देखील त्यांनी केला.
राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.