DNA मराठी

आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुण्यात पूरसदृश परिस्थिती; जाणून घ्या ताजे अपडेट

Pune Rain Alert: रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात मुसरधार पावसाने हजेरी लावली. रविवारी पुणे जिल्ह्यातील बारामती आणि इंदापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आहे. पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूकही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मदत आणि बचाव कार्य त्वरित सुरू करण्यात आले ज्यासाठी एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आली.

मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी

भारतीय हवामान खात्याने आज पुण्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. अनेक नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत, ज्यामुळे घरांमध्ये पाणी शिरले आहे आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोक त्यांच्या घरात अडकले आहेत आणि प्रशासन मदत कार्यात व्यस्त आहे.

बारामतीत 150 घरांमध्ये पाणी

जिल्हा अधिकाऱ्यांच्या मते, इंदापूरमधील सुमारे 70 वस्त्यांमध्ये आणि बारामतीतील सुमारे 150 घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. बारामतीमध्ये 19 घरांचे अंशतः नुकसान झाले. घरात पाणी साचल्याने एकाच कुटुंबातील सात जण अडकले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *