Mobile Recharge: टेलिकॉम कंपन्यांना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने व्हॉईस कॉल आणि एसएमएससाठी स्वतंत्र रिचार्ज सुविधा प्रदान करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
ट्रायने सांगितले की, या ग्राहकांना अनावश्यक सेवांसाठीही पैसे मोजावे लागतात. अशा लोकांसाठी अत्यावश्यक सेवांसाठी स्वतंत्र रिचार्ज सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना ट्रायने दूरसंचार कंपन्यांना केली आहे.
TRAI ने 2012 च्या दूरसंचार ग्राहक संरक्षण नियमांमध्ये सुधारणा करून हा आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की कमीत कमी एक स्पेशल टेरिफ व्हाउचर फक्त व्हॉइस आणि एसएमएस सेवांसाठी जारी केले जावे. देशातील 15 कोटी मोबाईल ग्राहक अजूनही 2G कनेक्शन वापरतात. हे लक्षात घेऊन ही नवीन दुरुस्ती करण्यात आली आहे. दूरसंचार कंपन्यांना विद्यमान रिचार्ज व्हाउचरसह जास्तीत जास्त 365 दिवसांची वैधता प्रदान करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
वृद्ध, ग्रामीण भागातील लोक आणि इंटरनेटचा जास्त वापर न करणाऱ्या दोन सिम वापरणाऱ्यांसाठी ही सूचना फायदेशीर ठरणार आहे. स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि कॉम्बो व्हाउचरची वैधता देखील 90 दिवसांवरून 365 दिवसांपर्यंत वाढवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय ट्रायने टॉप-अपसाठी 10 रुपयांच्या पटीत असलेली अटही काढून टाकली आहे.