DNA मराठी

Nilesh Ghaywal : घायवळने माहिती लपवली; पासपोर्ट जप्तीसाठी कारणे दाखवा नोटीस

nilesh ghaywal

Nilesh Ghaywal : कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळ याच्या परदेशवारीबाबत नवीन माहिती समोर आली आहे.घायवळविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने त्याला विशिष्ट अटींवर २०२२ मध्ये न्यायालयीन जामीन मंजूर करण्यात आला होता. या अटींमध्ये पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे निर्देश होते. मात्र न्यायालयीन आदेश असूनही पासपोर्ट पोलिसांच्या ताब्यात का आला नाही हा प्रश्न उपस्तित होतो. तसे झाले असते तर घायवल देशाबहेर जाण्याचा प्रश्न च उद्भवला नसता.

परिणामी घायवळ याला २०१९ मध्ये तत्काळ (तत्काळ) योजनेतून मिळवलेला पासपोर्ट वापरून परदेशात जाणे शक्य झाले.

तत्काळ योजना आणि पडताळणी

तत्काळ योजनेत अर्जदाराला जलद पासपोर्ट मिळतो. या प्रक्रियेत पासपोर्ट आधी दिला जातो आणि नंतर काही दिवसांत पोलिस पडताळणी केली जाते. पडताळणी अहवाल नकारात्मक आल्यास पुढे पासपोर्ट एक्ट नुसार पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई करता येते.

पोलिसांचा पडताळणी अहवाल

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, घायवळने २०१९ मध्ये तत्काळ योजनेतून मिळवलेल्या पासपोर्टसाठी झालेल्या पोलिस पडताळणी (पीव्ही) अहवालात त्याच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नसल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच घरावर भेट दिली असता तो “उपलब्द नाही (नॉट अव्हेलेबल)” असल्याची नोंद करण्यात आली होती. वास्तविक पाहता पोलिसांनी गुन्हयाची माहिती अवहालात देणे अपेक्षित होते परंतु तसे झालेले दिसत नाही. यामुळे त्याचा पासपोर्ट कायम ठेवण्यात अडचण आली नाही.

पासपोर्टविषयी पुढील कारवाई

घायवळने पासपोर्ट अर्ज करताना स्वतःविरुद्ध असलेले गुन्हे लपवून चुकीचे प्रतिज्ञापत्र सादर करुण 2019 मध्ये पासपोर्ट मिळवला होता.

पोलिसांनी आरोपी देशा बाहेर गेल्यानंतर हा प्रकार पासपोर्ट कार्यालयला निदर्शनास आणून दिला. त्या नंतर त्याचा पासपोर्ट जप्तीबाबत कारणे दाखवा नोटीस (एससीएन) जारी करण्यात आली आहे. तसेच पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *