NIA Raid In Maharashtra: महाराष्ट्रासह देशातील पाच मोठ्या राज्यात NIA ने 22 ठिकाणी छापे टाकले असल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार दहशतवाद्यांना निधी देण्याबाबत एनआयएने ही छापेमारी केली आहे. जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
एनआयएने एकाच वेळी सुमारे 22 ठिकाणी छापे टाकले, एनआयए दहशतवाद्यांच्या निधीबाबत मोठी कारवाई करत आहे, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित प्रकरणात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
तर NIA ने महाराष्ट्रात छापे टाकले असून, जालना येथून दोन जणांना ताब्यात घेतले आहे, एक औरंगाबाद, एक मालेगाव, हे सर्वजण जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. संभाजीनगर, जालना आणि मालेगावजवळ छापे टाकून काही जणांना ताब्यातही घेतले आहे. शनिवारी पहाटे एनआयएच्या वेगवेगळ्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली.
एनआयए आणि दहशतवाद विरोधी पथकाने पहाटे चार वाजल्यापासून जालन्यात कारवाई सुरू केली होती, संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, जालना व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर, मालेगाव येथेही एनआयए आणि एटीएसची कारवाई सुरू आहे.