Munmun Dutta: लोकप्रिय टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ता नेहमी सोशल मीडियावर चर्चेत राहते. कधी शो मुळे तर कधी आपल्या खाजगी आयुषामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत राहते. तिने बबिता जीच्या भूमिकेने मुनमुनने घराघरात आपली ओळख निर्माण केली. बबिता आणि जेठालालची जोडी सर्वांशी स्पर्धा करते.
मुनमुन चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते मात्र गेल्या काही दिवसांपासून मुनमुन सोशल मीडियावर अँक्टिव नसल्याने तिच्याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या अनेक आठवड्यांपासून बबिताने इंस्टाग्रामवर कोणतीही पोस्ट शेअर केली नाही किंवा कोणतीही स्टोरी पोस्ट केली नाही. आता अलीकडेच मुनमुन दत्ताने स्वतः तिच्या याबाबतचे कारण सांगितले आहे.
मुनमुन दत्ताने पोस्ट शेअर करत लिहिले की ‘हो, मी बऱ्याच दिवसांपासून बेपत्ता आहे. माझी आई बरी नाही. गेल्या 10 दिवसांपासून मी रुग्णालयात ये- जा करत आहे. आईची आता प्रकृती सुधारत आहे आणि लवकरच बरी होईल. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील संतुलन बिघडवत आहे. पण मला खूप साथ देणाऱ्या माझ्या अद्भुत मित्रांचे मी आभार मानते. देव महान आहे.’
हे जाणून चाहत्यांना मुनमुनबद्दल खूप वाईट वाटले. चाहते मुनमुन दत्ताच्या आई लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना करत आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम मुनमुन दत्ताच्या सौंदर्याचे लाखो लोक चाहते आहेत. मुनमुनने तिच्या बंगाली सौंदर्याने लोकांची मने घायाळ केली.
तर दुसरीकडे शोचे निर्माते असित मोदी यांनी दिशा वाकानीसोबत रक्षाबंधन साजरे केले. दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वाकानी वर्षानुवर्षे पाहून चाहते थक्क झाले.