Asaduddin Owais: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन ( AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे अहमदनगर शहरात आगमन झाले असून आज संध्याकाळी 7 वाजता मुकुंदनगरमधील सीआयव्ही ग्राउंड येथे ओवैसी जाहीर सभा घेणार आहे. या सभेत ओवैसी यांच्याकडून कोणते मुद्दे उपस्थित करण्यात येणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
खासदार ओवैसी यांच्यासोबत नगर शहरात एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासह मुंबई प्रदेशाध्यक्ष फारुक शाब्दी, माजी आमदार वारीस पठाण आज नगर शहरात येणार आहे.
खासदार ओवैसी पहिल्यांदाच नगर शहरात जाहीर सभा घेत असल्याने सभेच्या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा सभेच्या ठिकाणी दाखल झाला आहे.