Dnamarathi.com

Double-decker Bus Fire : गुरुवारी सकाळी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, लखनऊमध्ये गुरुवारी सकाळी एका डबल डेकर बसला भीषण आग लागली, ज्यामध्ये 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

मोहनलालगंजजवळील किसान पथावर हा अपघात झाला. ही बस दिल्लीहून बिहारला जात होती आणि त्यात 60 हून अधिक प्रवासी होते.

अपघाताच्या वेळी बहुतेक प्रवासी झोपेत होते. अचानक बस धुराने भरली तेव्हा सर्वांना जाग आली. आग लागल्यानंतर चालक आणि कंडक्टर बसमधून उड्या मारून पळून गेले. आपत्कालीन गेट उघडला नाही त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही म्हणून अनेक प्रवासी बसमध्ये अडकले.

आगीची परिस्थिती आणि बचाव कार्य

बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी आजूबाजूचे लोक मदतीला आले. मात्र आग इतकी भीषण होती की, आगीच्या ज्वाळा 1 किलोमीटर अंतरापर्यंत दिसत होत्या. अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी तासन्तास अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आणि तपास सुरू केला.

आगीचे कारण

एका प्रवाशाने सांगितले की, गिअरजवळील ठिणगीमुळे आग लागली. आगीमुळे बस अवघ्या 10 मिनिटांत पूर्णपणे जळून खाक झाली. दुसऱ्या प्रवाशाने सांगितले की, आग लागल्यानंतर बसमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्याने त्याच्या पत्नीला उठवले आणि दोघेही बसमधून बाहेर पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *