Dnamarathi.com

Prakash Ambedkar : राज्यात विधानसभेसाठी मतदाप्रक्रिया पार पडली असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. मात्र त्यापूर्वी समोर आलेल्या अनेक एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये ‘काटे की टक्कर’ असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सस्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांची भूमिका महत्वाची ठरणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.

यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत आम्ही आम्हाला जर युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहणे पसंद करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महायुती की महाविकास आघाडी कोणाला समर्थन देण्यात याकडे आता सर्वांचे लक्ष लागू नये.

विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने भाजप विरोधात प्रचार केला होता त्यामुळे निकालानंतर वंचित बहुजन आघाडी महायुतीमध्ये प्रवेश करणार का? याची देखील चर्चा आता सुरू झाली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहणे पसंद करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *