Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असून राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढील 2 ते 3 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून रायगड, रत्नागिरी, पुणे घाट, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचबरोबर नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे 26 ऑगस्टपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे.
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.